‘गुंगी गुडिया’ टिप्पणी निषेधार्ह; सपकाळांनी शब्द मागे घ्यावेत—दीपक मानकर

Date:

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावर माजी उपमहापौरांची प्रतिक्रिया; राजकीय टीकेत महिलांचा अवमान टाळण्याचे आवाहन

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवर माजी उपमहापौर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सपकाळ यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, अशी मागणी मानकर यांनी केली.

राजकीय पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आणि टीका असू शकते; मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या महिलेबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची भूमिका मानकर यांनी मांडली. राजकारणातील टीकेची पातळी घसरू नये आणि महिलांचा सन्मान राखला जावा, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार या लोकशाही प्रक्रियेतून पुढे आलेल्या नेत्या असून त्यांच्याविषयी मतभेद असतील, तर काँग्रेसने त्यांच्या निर्णयांवर आणि कामकाजावर मुद्देसूद टीका करावी. त्यांच्याबाबत अवमानकारक शब्दप्रयोग करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असा आशय मानकर यांनी व्यक्त केला.

काँग्रेसने महिलांच्या सन्मानाबाबत नेहमी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एका महिला नेत्याबाबत अशी टिप्पणी करणे विसंगत असल्याचेही मानकर यांनी म्हटले. सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सपकाळ यांनी ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नसून सुनेत्रा पवार यांच्या मौनाचे वर्णन असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेण्यास नकार देत सुनेत्रा पवार यांनी कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करावे, असे आव्हान दिले होते.

या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा फुले मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करा

गाळेधारकांना विश्वासात घेऊनच भाडे निश्चित करण्याची नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू)...

‘सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने करा, एकामागे एक राजीनामे मागण्यासाठी नको’

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे कॉक्रोच...