पुणे : शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘एशिया-अरब समिट अँड अवार्ड्स’मध्ये सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या तीन इन्स्टिट्यूट्सने सन्मान मिळवत हॅट्रिक साधली, तर संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमेन अचिव्हर अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. तीन महाविद्यालयांना उत्कृष्टतेचा आणि सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वूमेन’चा सन्मान मिळणे, ही सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसाठी अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला ‘बेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला ‘बेस्ट हॉटेल इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’ आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनला ‘मोस्ट प्रेफर्ड डिझाईन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
पुण्यातील हॉटेल अरोरा टॉवर्स येथे झालेल्या एशिया-अरब एज्युकेशनल समिटमध्ये नुकतेच या पुरस्कारांचे वितरण झाले. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वतीने विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन, प्रवास आणि पर्यटन, हॉटेल व्यवस्थापन, मीडिया आणि मास कम्युनिकेशन, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन आणि ज्वेलरी डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, मल्टीमीडिया ग्राफिक्स आणि अॅनिमेशन अशा विविध अभ्यासक्रमामध्ये नावीन्यपूर्ण शिक्षण दिले जाते. त्याची दाखल घेऊन सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अॅचिव्हर’ पुरस्कार प्रदान केला. प्रसंगी प्रा. उल्हास चौधरी, प्रा. नूतन गवळी, प्रा. फिरोज खान, जीन इनिस, प्रा.. रेणुका कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘एशिया-अरब समिट अँड अवॉर्ड’मध्ये शिक्षण, अध्यापन, संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना सन्मानित केले जाते. शिक्षण, उद्योग, विज्ञान, व्यवस्थापन, आयटी, वाणिज्य, कला क्षेत्रातील व्यक्तींना तसेच शाळा, महाविद्यालये आदींच्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची ओळख समाजापर्यंत पोहचवण्यासाठी हा पुरस्कार महत्वाचा मानला जातो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण, उद्योग आणि समाजाच्या बदलत्या गरजा भागविणारे तज्ञ प्रशिक्षक यांना सोबत घेऊन सूर्यदत्ताने विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षण दिले. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी आज अनेक नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत, असे सुषमा चोरडिया यांनी नमूद केले.