पुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमध्ये विद्युतविषयक तसेच तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने पुणे शहरातील अनेक प्रमुख भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारीच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र, मध्यवर्ती पेठा आणि नरवीर तानाजी मालुसरे रस्ता अर्थात सिंहगड रस्ता परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
या भागांना बसणार फटका
पर्वती परिसर :
सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, चिंतामणीनगर, गंगाधाम, अप्पर व लोअर इंदिरानगर, लेकटाउन, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, पर्वती गावठाण, जनता वसाहत आणि लगतचा परिसर.
भामा आसखेड जलयोजना परिसर :
लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद आणि संलग्न परिसर.
कोथरूड, बावधन आणि कर्वेनगर परिसर :
संपूर्ण बावधन, भुसारी कॉलनी, पौड रस्ता, पौड फाटा, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, विठ्ठल मंदिर परिसर, सहवास, गोसावी वस्ती, करिश्मा परिसर, नळस्टॉप ते दशभुजा गणपती, मंगेशकर रुग्णालय परिसर, महात्मा सोसायटी, वारजे माळवाडी, तपोधाम, काकडे सिटी, कर्वेनगर गावठाण आणि कॅनॉल रस्ता परिसर.
नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

