Home Blog Page 644

मुंबईतील टोल माफ मग महाराष्ट्रातील टोलमाफी का नाही? ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ आश्वासनाचे काय झाले?

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत. जनतेने या जुमलेबाजीला फसू नये, महाराष्ट्राच्या विकासासाठी मविआलाच विजयी करा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.

नाशिक येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील पाच टोल नाक्यावरील टोल माफ करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागतच आहे पण महाराष्ट्रातील टोल का माफ केले नाहीत? मुंबई व महाराष्ट्राची जनता वेगळी आहे का? फडणवीस व गडकरी यांनीच ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? १० वर्षापासून भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. भाजपा युतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे पण फडणवीस सक्षम गृहमंत्री अशी जाहिरात बाजी केली जात आहे परंतु फडणवीस हे सर्वात निक्रीय गृहमंत्री आहेत.
महाविकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज असून मविआ २८८ जागांवर लढणार आहे, आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ असा वाद नाही. महाराष्ट्राला वाचवणे हे आमचे लक्ष्य असून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना राज्यात कुठलेही स्थान मिळता कामा नये याची खबरदारी घेऊ. महाराष्ट्रात मोदी शाह यांचा विचार कदापी रुजू देणार नाही. महाराष्ट्रातील चित्र बदलणार असून मविआचे बहुतमाचे सरकार येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.
राज्यपालांनी आज घाईघाईत ७ जणांना राज्यपाल नियुक्त आमदारपदाची शपथ दिली. महाविकास आघाडीचे सरकार असताना १२ जणांची नावे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राजभवला दिली होती पण त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर सही केली नाही. हे प्रकरण न्यायालयात असून त्याचा निकाल अजून लागलेला नसताना राज्यापालांनी ७ जणांची नियुक्ती केली आहे, याप्रकरणी कोर्टात दाद मागू असे पटोले यांनी सांगितले.
हिरामण खोसरकारांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, इगतपूरी हा काँग्रेस विचाराचा मतदारसंघ असून ज्यांनी काँग्रेसची साथ सोडली त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस होटिंग केली होती, लोकसभा निवडणुक व त्यानंतरही त्यांनी सतत पक्षविरोधी कारयावा केल्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. इगतपुरीत काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर आहे, स्थानिक उमेदवारालाच संधी दिली जाईल असेही नाना पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान:23 नोव्हेंबरला निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

अशी असेल महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया-23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी राज्यातील 1 लाख 186 मतदान केंद्रांवर 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार आहेत.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यापैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी), तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल. त्यानुसार तत्पूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येईल.

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह अनेक शहरांतील मतदान केंद्रांवर मतदारांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागले होते. त्यावेळी अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत गर्दीच्या मतदान केंद्रांवर खुर्च्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचा आग्रह धरला होता.

राज्यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार

राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात 4.59 कोटी पुरुष, तर 4.64 कोटी महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून दिव्यांग मतदारही 6.32 लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्डजेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. हे सदृढ सामाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे 18 ते 19 वर्ष वयोगटातील संख्या 19.48 लाख आहे. या निवडणुकीत आमचे या तरुण मतदारांवर खास लक्ष असेल. कारण हेच तरुण मतदार भविष्यात लोकशाहीला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

निवडणुकीतील महत्त्वाची आकडेवारी

राज्यात एकूण 9 कोटी 59 लाख मतदार आहेत.
4 कोटी 95 लाख पुरुष, तर 4 कोटी 64 लाख महिला मतदार.
महिला मतदारांच्या संख्येत 22% ची वाढ.
19.48 लाख मतदार प्रथमच मतदान करणार.
6.32 लाख दिव्यांग मतदार बजावणार हक्क.
85 किंवा त्याहून अधिक वय असणारे 12.48 लाख मतदार.
100 किंवा त्याहून अधिक वयाचे 49034 मतदार.
राज्यात 1 लाख 186 मतदान केंद्र.
शहरात 42, 585, तर ग्रामीण भागात 57, 601 मतदान केंद्र.
राज्यात 1.86 लाख मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 52585 केंद्र शहरी भागात, तर 57,601 केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 950 मतदार असतील. विशेषतः 350 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुणांकडे असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर रात्री 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पैशांची वाहतूक करता येणार नाही. या काळात रुग्णवाहिका, बँक व पतसंस्थांवर विशेष लक्ष ठेवले जाईल.

निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक खास अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर मतदारांना आपल्या तक्रारी करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरु असेल, तर केवळ फोटो काढून या अ‍ॅपवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना आपल्यावरील दाखल गुन्ह्यांची स्थानिक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांत तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? ते सांगावे लागणार आहे. राजकीय पक्षांनाही हा नियम लागू असेल. त्यांनाही गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला उमेदवारी का दिली? हे नमूद करावे लागेल.

नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी विमा सादर करण्याकरता भारतीय नौदलाने केला बजाज अलायन्झ लाइफ इनश्युरन्स सोबत सामंजस्य करार

पुणे: भारतीय नौदलाने भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी आज भारतातील अग्रगण्य खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक बजाज अलायन्झ लाइफ कंपनीसोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी  केली आहे. या सहयोगाचा भाग म्हणून बजाज अलायन्झ लाइफ किफायतशीर दरात सर्वसमावेशक संरक्षण सुनिश्चित करत विविध प्रकारची जीवन विमा उत्पादने सादर करेल.

‘नौदल नागरी वर्षा’ साठीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून असलेले महत्व नमूद करताना व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला, चीफ ऑफ पर्सोनेल यांनी बजाज अलायन्झ लाइफने विशेषकरून भारतीय नौदल नागरी कर्मचाऱ्यांच्या गरजांना लक्षात घेऊन रचना करण्यात आलेल्या जीवन विमा उपाय सुविधांची प्रशंसा केली.

बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुघ म्हणाले, “भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना जीवन विमा सेवा प्रदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल बजाज अलायन्झ लाइफमधील आम्हा सर्वांसाठी हे खरोखरच अभिमानाचे क्षण आहेत. भारतीय नौदलाच्या 2024 ‘नौदल नागरी वर्षा’ च्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, आम्ही नौदल नागरी कर्मचाऱ्यांसाठी आमच्या सेवा सुरू करणार आहोत. मला विश्वास आहे की हे  अनेक भारतीयांसाठी जीवन विम्याचे फायदे मिळवण्याच्या दिशेने मोठे पाऊल असेल. आम्ही आपल्या देशातील विमा सुविधा घेण्यामध्ये असलेली दरी भरून काढण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. आम्ही भारतीय नौदलासाठी सर्वोत्तम आणि अत्यंत सुलभ विनाअडथळा उपाय सुविधा देण्याचे सुनिश्चित करू.”

या भागीदारी अंतर्गत बजाज अलायन्झ लाइफ भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांच्या विविध जीवन उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी विविध जीवन विमा उत्पादनांची श्रेणी सादर करणार आहे. भारतीय नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांना टर्म इनश्युरन्स आणि आपली जीवन उद्दिष्टे सुरक्षित करण्यासाठी पुरेसे जीवन विमा संरक्षण यांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शैक्षणिक सेमिनार आणि सत्रांचे आयोजन केले जाईल. कंपनी नौदल नागरी कर्मचाऱ्यांच्या विशेष गरजांना अनुसरून  विशिष्ट प्रक्रिया देखील सुरू करेल.

नौदलाच्या नागरी कर्मचाऱ्यांना विमा पुरविण्यासाठी भारतीय नौदलाने व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला, चीफ ऑफ पर्सोनेल आणि भारतीय नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीसोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी  केली आहे. यावेळी बजाज अलायन्झ लाइफचे प्रॉप्रायटरी सेल्स फोर्सचे मुख्य वितरण अधिकारी श्री. अमित जयस्वाल आणि टीम मधील इतर सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी संपन्न :चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटील यांच्यासह 7 जणांनी घेतली शपथ

मुंबई–विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी या नावांना मंजूरी दिली होती. या आमदारांचा आज शपथविधी झाला.

विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेनेने हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांची वर्णी लागली आहे.

महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही नियुक्त्या दिल्या नाही. कोश्यारी मुद्दामहून अडवणूक करत आहेत, असा आरोप करत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यात जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यामुळे आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महायुतीच्या वतीने 7 जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.

कोण राहणार ?कोण उरणार ? नवे चेहरे कोणते येणार ? पहा या २८८ आमदारांचे आता काय होणार ?

पुणे- एकेकाळी राजकारणाला एवढे महत्व नव्हते. बॉलीवूड सर्वात strong होते. पण आताच्या राजकारणाने बॉलीवूड संपविले.सिनेमे आता रसिकांच्या साठी निघत नाहीत तर राजकारणासाठी निघतात.अशा दशकाच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा च नाही तर समाजकारणाचा,प्रशासनाचा,गुन्हेगारीचा,संस्कृतीचा साराच चेहरा मोहरा बदलून,ढवळून निघतो आहे.आता या बदलत्या जमान्यात आजपासून महाराष्ट्राच्या या २८८ विद्यमान आमदारांची आणि राजकीय पक्षांची परीक्षा सुरु होते आहे

पाहू यात यातले कोण रिंगणात राहणार,कोण उरणार ? आणि कोणते नवे चेहरे येणार ?

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04

1) अक्कलकुवा विधानसभा – अॅड. के. सी पाडवी (काँग्रेस)
2) शहादा विधानसभा- राजेश पाडवी (भाजप)
3) नंदुरबार विधानसभा – विजयकुमार गावित (भाजप)
4) नवापूर विधानसभा – शिरीष नाईक (काँग्रेस)

धुळे जिल्ह्यातील आमदार : 05

5) साक्री विधानसभा- मंजुषा गावित (अपक्ष)
6) धुळे ग्रामीण विधानसभा – कुणाल पाटील (काँग्रेस)
7) धुळे शहर विधानसभा – फारुक शाह (MIM)
8) सिंदखेडा विधानसभा – जयकुमार रावल (भाजप)
9 ) शिरपूर विधानसभा – काशिराम पावरा (भाजप)

जळगाव जिल्ह्यातील आमदार : 11

10) चोपडा विधानसभा- लता सोनवणे (शिवसेना – शिंदे गट)
11) रावेर विधानसभा – शिरीष चौधरी (काँग्रेस)
12) भुसावळ विधानसभा- संजय सावकारे (भाजप)
13) जळगाव शहर विधानसभा – सुरेश भोळे (भाजप)
14) जळगाव ग्रामीण विधानसभा- गुलाबराव पाटील (शिवसेना – शिंदे गट)
15) अमळनेर विधानसभा – अनिल पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
16) एरंडोल विधानसभा – चिमणराव पाटील (शिवसेना- शिंदे गट)
17) चाळीसगाव विधानसभा – मंगेश चव्हाण (भाजप)
18) पाचोरा विधानसभा – किशोर पाटील (शिवसेना)
19) जामनेर विधानसभा – गिरीष महाजन (भाजप)
20) मुक्ताईनगर विधानसभा – चंद्रकांत पाटील (अपक्ष)

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07

21) मलकापूर विधानसभा – राजेश एकाडे (काँग्रेस)
22) बुलढाणा विधानसभा – संजय गायकवाड (शिवसेना – शिंदे)
23) चिखली विधानसभा – श्वेता महाले (भाजप)
24) सिंदखेड राजा विधानसभा – राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
25) मेहकर विधानसभा – संजय रायमूलकर (शिवसेना शिंदे)
26) खामगाव विधानसभा – आकाश फुंडकर (भाजप)
27) जळगाव जामोद विधानसभा – संजय कुटे (भाजप)

अकोला जिल्ह्यातील आमदार : 05

28) अकोट विधानसभा – प्रकाश भारसाकळे (भाजप)
29) बाळापूर विधानसभा – नितीन देशमुख (शिवसेना – उद्धव ठाकरे)
30) अकोला पश्चिम विधानसभा – गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
31) अकोला पूर्व विधानसभा – रणधीर सावरकर (भाजप)
32) मूर्तिजापूर विधानसभा – हरीश पिंपळे (भाजप)

वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03

33) रिसोड विधानसभा – अमित झनक (काँग्रेस)
34) वाशिम विधानसभा – लखन मलिक (भाजप)
35) कारंजा विधानसभा – राजेंद्र पाटनी (भाजप)

अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08

36) धामणगाव रेल्वे विधानसभा – प्रताप अरुण अडसड (भाजप)
37) बडनेरा विधानसभा – रवी राणा (अपक्ष)
38) अमरावती विधानसभा – सुलभा खोडके (काँग्रेस)
39) तिवसा विधानसभा – यशोमती ठाकूर (काँग्रेस)
40) दर्यापूर विधानसभा- बळवंत वानखेडे (काँग्रेस) (लोकसभेवर निवड)
41) मेळघाट विधानसभा – राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती)
42) अचलपूर विधानसभा – बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)
43) मोर्शी विधानसभा – देवेंद्र भुयार (स्वाभिमानी) – सध्या अजित पवारांसोबत

वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04

44) आर्वी विधानसभा – दादाराव केचे (भाजप)
45) देवळी विधानसभा – रणजित कांबळे (काँग्रेस)
46) हिंगणघाट विधानसभा – समीर कुणावार (भाजप)
47) वर्धा विधानसभा – पंकज भोयर (भाजप)

नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12

48) काटोल विधानसभा – अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
49) सावनेर विधानसभा – सुनील केदार (काँग्रेस)
50) हिंगणा विधानसभा – समीर मेघे (भाजप)
51) उमरेड विधानसभा – राजू पारवे (काँग्रेस) – सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
52) नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा- देवेंद्र फडणवीस (भाजप)
53) नागपूर दक्षिण विधानसभा – मोहन माटे (भाजप)
54) नागपूर पूर्व विधानसभा – कृष्णा खोपडे (भाजप)
55) नागपूर मध्य विधानसभा – विकास कुंभारे (भाजप)
56) नागपूर पश्चिम विधानसभा – विकास ठाकरे (काँग्रेस)
57) नागपूर उत्तर विधानसभा – नितीन राऊत (काँग्रेस)
58) कामठी विधानसभा – टेकचंद सावरकर (भाजप)
59) रामटेक विधानसभा – आशिष जयस्वाल (अपक्ष)

भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03

60) तुमसर विधानसभा – राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी – अजित पवार )
61) भंडारा विधानसभा – नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
62) साकोली विधानसभा – नाना पटोले (काँग्रेस)

गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04

63) अर्जुनी मोरगाव विधानसभा – मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
64) तिरोरा विधानसभा – विजय रहांगदळे (भाजप)
65) गोंदिया विधानसभा – विनोद अग्रवाल (अपक्ष)
66) आमगाव विधानसभा – मारुती कारोटे (काँग्रेस)

गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03

67) आरमोरी विधानसभा – कृष्णा गजबे (भाजप)
68) गडचिरोली विधानसभा – डॉ. देवराव होळी (भाजप)
69) अहेरी विधानसभा – धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी- अजित पवार)

चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06

70) राजुरा विधानसभा – सुभाष धोटे (काँग्रेस)
71) चंद्रपूर विधानसभा – किशोर जोर्गेवार (अपक्ष)
72) बल्लारपूर विधानसभा – सुधीर मुनगंटीवार (भाजप)
73) ब्रह्मपुरी विधानसभा – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74) चिमुर विधानसभा – कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
75) वरोरा विधानसभा – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) (सध्या लोकसभेवर)

यवतमाळ जिल्ह्यातील आमदार : 07

76) वणी विधानसभा – संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)
77) राळेगांव विधानसभा – अशोक उईके (भाजप)
78) यवतमाळ विधानसभा – मदन येरावार (भाजप)
79) दिग्रस विधानसभा – संजय राठोड (शिवसेना- एकनाथ शिंदे)
80) आर्णी विधानसभा – संदीप धुर्वे (भाजप)
81) पुसद विधानसभा – इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी – अजित पवार)
82) उमरखेड विधानसभा – नामदेव ससाणे (भाजप)

नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09

83) किनवट विधानसभा – भीमराव केराम (भाजप)
84) हदगाव विधानसभा – माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
85) भोकर विधानसभा – अशोक चव्हाण (भाजप) – सध्या राज्यसभा खासदार
86) नांदेड विधानसभा – उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
87) नांदेड विधानसभा – दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
88) लोहा विधानसभा – श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
89) नायगाव विधानसभा – राजेश पवार (भाजप)
90) देगलूर विधानसभा – जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
91) मुखेड विधानसभा – तुषार राठोड (भाजप)

हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03

92) वसमत विधानसभा – चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
93) कळमनुरी विधानसभा – संतोष बांगर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
94) हिंगोली विधानसभा – तानाजी मुटकुळे (भाजप)

परभणी जिल्ह्यातील आमदार : 04

95) जिंतूर विधानसभा – मेघना बोर्डीकर (भाजप)
96) परभणी विधानसभा – राहुल पाटील (शिवसेना – उद्धव ठाकरे)
97) गंगाखेड विधानसभा – रत्नाकर गुट्टे (रासप)
98) पाथरी विधानसभा – सुरेश वरपूडकर (काँग्रेस)

जालना जिल्ह्यातील आमदार : 05

99) परतूर विधानसभा – बबन लोणीकर (भाजप)
100) घनसावंगी विधानसभा – राजेश टोपे (राष्ट्रवादी – शरद पवार)
101) जालना विधानसभा – कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
102) बदनापूर विधानसभा – नारायण कुचे (भाजप)
103) भोकरदन विधानसभा – संतोष दानवे (भाजप)

औरंगाबाद/ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09

104) सिल्लोड विधानसभा – अब्दुल सत्तार (शिवसेना – एकनाथ शिंदे)
105) कन्नड विधानसभा – उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे)
106) फुलंब्री विधानसभा – हरिभाऊ बागडे (भाजप)
107) औरंगाबाद मध्य विधानसभा – प्रदीप जयस्वाल (शिवसेना – एकनाथ शिंदे)
108) औरंगाबाद पश्चिम विधानसभा – संजय शिरसाट (शिवसेना – एकनाथ शिंदे)
109) औरंगाबाद पूर्व विधानसभा – अतुल सावे (भाजप)
110) पैठण विधानसभा – संदीपान भुमरे (शिवसेना – एकनाथ शिंदे) – सध्या खासदार
111) गंगापूर विधानसभा – प्रशांत बंब (भाजप)
112) वैजापूर विधानसभा – रमेश बोरनारे (शिवसेना – एकनाथ शिंदे)

नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15

113) नांदगाव विधानसभा – सुहास कांदे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
114) मालेगाव मध्य विधानसभा – मोहम्मद इस्माईल (MIM)
115) मालेगाव बाह्य विधानसभा – दादा भुसे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
116) बागलान विधानसभा – दिलीप बोरसे (भाजप)
117) कळवण विधानसभा – नितीन पवार (राष्ट्रवादी – अजित पवार)
118) चांदवड विधानसभा – राहुल आहेर (भाजप)
119) येवला विधानसभा – छगन भुजबळ (राष्ट्रवादी – अजित पवार)
120) सिन्नर विधानसभा – माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी – अजित पवार)
121) निफाड विधानसभा – दिलीप बनकर (राष्ट्रवादी – अजित पवार)
122) दिंडोरी विधानसभा – नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी- अजित पवार)
123) नाशिक पूर्व विधानसभा – राहुल ढिकळे (भाजप)
124) नाशिक मध्य विधानसभा – देवयानी फरांदे (भाजप)
125) नाशिक पश्चिम विधानसभा – सीमा हिरे (भाजप)
126) देवळाली विधानसभा – सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
127) इगतपुरी विधानसभा – हिरामण खोसकर (काँग्रेस)

पालघर जिल्ह्यातील आमदार: 06

128) डहाणू विधानसभा – विनोद निकोले (माकप)
129) विक्रमगड विधानसभा – सुनिल भुसारा (राष्ट्रवादी – शरद पवार)
130) पालघर विधानसभा – श्रीनिवास वनगा (शिवसेना)
131) बोईसर विधानसभा – राजेश पाटील (बविआ)
132) नालासोपारा विधानसभा – क्षितिज ठाकूर (बविआ)
133) वसई विधानसभा – हितेंद्र ठाकूर (बविआ)

ठाणे जिल्ह्यातील आमदार : 18

134) भिवंडी ग्रामीण विधानसभा – शांताराम मोरे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
135) शहापूर विधानसभा – दौलत दरोडा (राष्ट्रवादी – अजित पवार)
136) भिवंडी पश्चिम विधानसभा – महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
137) भिवंडी पूर्व विधानसभा – रईस शेख (समाजवादी पक्ष)
138) कल्याण पश्चिम विधानसभा – विश्वनाथ भोईर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
139) मुरबाड विधानसभा – किसन कथोरे (भाजप)
140) अंबरनाथ विधानसभा – बालाजी किणीकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
141) उल्हासनगर विधानसभा – कुमार आयलानी (भाजप)
142) कल्याण पूर्व विधानसभा – गणपत गायकवाड (भाजप)
143) डोंबिवली विधानसभा – रवींद्र चव्हाण (भाजप)
144) कल्याण ग्रामीण विधानसभा – प्रमोद पाटील (मनसे)
145) मीरा-भाईंदर विधानसभा – गीता जैन (अपक्ष)
146) ओवळा-माजीवडाविधानसभा – प्रताप सरनाईक (शिवसेना – एकनाथ शिंदे)
147) कोपरी-पाचपाखाडी विधानसभा – एकनाथ शिंदे (शिवसेना)
148) ठाणे विधानसभा – संजय केळकर (भाजप)
149) मुंब्रा-कळवा विधानसभा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरद पवार)
150) ऐरोली विधानसभा – गणेश नाईक (भाजप)
151) बेलापूर विधानसभा – मंदा म्हात्रे (भाजप)

मुंबईतील आमदारांची संख्या : 36

152) बोरीवली विधानसभा – सुनिल राणे (भाजप)
153) दहिसर विधानसभा – मनिषा चौधरी (भाजप)
154) मागाठणे विधानसभा – प्रकाश सुर्वे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
155) मुलुंड विधानसभा – मिहीर कोटेचा (भाजप)
156) विक्रोळी विधानसभा – सुनील राऊत (शिवसेना – उद्धव ठाकरे)
157) भांडुप पश्चिम विधानसभा – सुरेश कोपरकर (काँग्रेस)
158) जोगेश्वरी पूर्व विधानसभा – रविंद्र वायकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
159) दिंडोशी विधानसभा – सुनील प्रभू (शिवसेना – उद्धव ठाकरे)
160) कांदिवली पूर्व विधानसभा – अतुल भातखळकर (भाजप)
161) चारकोप विधानसभा – योगेश सागर (भाजप)
162) मालाड पश्चिम विधानसभा – अस्लम शेख (काँग्रेस)
163) गोरेगाव विधानसभा – विद्या ठाकूर (भाजप)
164) वर्सोवा विधानसभा – भारती लवेकर (भाजप)
165) अंधेरी पश्चिम विधानसभा – अमित साटम (भाजप)
166) अंधेरी पूर्व विधानसभा – ऋतुजा लटके (शिवसेना – उद्धव ठाकरे)
167) विलेपार्ले विधानसभा – पराग अळवणी (भाजप)
168) चांदिवली विधानसभा – दिलीप लांडे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
169) घाटकोपर पश्चिम विधानसभा – राम कदम (भाजप)
170) घाटकोपर पूर्व विधानसभा – पराग शाह (भाजप)
171) मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा – अबू आझमी (समाजवादी पक्ष)
172) अणूशक्तिनगर विधानसभा – नवाब मलिक (राष्ट्रवादी)
173) चेंबुर विधानसभा – प्रकाश फातर्पेकर (शिवसेना – उद्धव ठाकरे)
174) कुर्ला विधानसभा – मंगेश कुडाळकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
175) कलिना विधानसभा – संजय पोतनीस (शिवसेना – उद्धव ठाकरे)
176) वांद्रे पूर्व विधानसभा – झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
177) वांद्रे पश्चिम विधानसभा – आशिष शेलार (भाजप)
178) धारावी विधानसभा – वर्षा गायकवाड (काँग्रेस) – सध्या लोकसभेवर निवड
179) सायन कोळीवाडा विधानसभा – कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)
180) वडाळा विधानसभा – कालिदास कोळंबकर (भाजप)
181) माहिम विधानसभा – सदा सरवणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
182) वरळी विधानसभा – आदित्य ठाकरे (शिवसेना – उद्धव ठाकरे)
183) शिवडी विधानसभा – अजय चौधरी (शिवसेना – उद्धव ठाकरे)
184) भायखळा विधानसभा – यामिनी जाधव (शिवसेना – एकनाथ शिंदे)
185) मलबार हिल विधानसभा – मंगल प्रभात लोढा (भाजप)
186) मुंबादेवी विधानसभा – अमीन पटेल (काँग्रेस)
187) कुलाबा विधानसभा – राहुल नार्वेकर (भाजप)

रायगड जिल्ह्यातील आमदार : 07

188) पनवेल विधानसभा – प्रशांत ठाकूर (भाजप)
189) कर्जत विधानसभा – महेंद्र थोरवे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
190) उरण विधानसभा – महेश बालदी (अपक्ष)
191) पेण विधानसभा – रवीशेठ पाटील (भाजप)
192) अलिबाग विधानसभा – महेंद्र दळवी (शिवसेना – एकनाथ शिंदे)
193) श्रीवर्धन विधानसभा – अदिती तटकरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
194) महाड विधानसभा – भरत गोगावले (शिवसेना – एकनाथ शिंदे)

पुणे जिल्ह्यातील आमदार : 21

195) जुन्नर विधानसभा – अतुल बेणके (राष्ट्रवादी – अजित पवार)
196) आंबेगाव विधानसभा – दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
197) खेड आळंदी विधानसभा – दिलीप मोहिते (राष्ट्रवादी – अजित पवार)
198) शिरुर विधानसभा – अशोक पवार (राष्ट्रवादी – अजित पवार)
199) दौंड विधानसभा – राहुल कुल (भाजप)
200) इंदापूर विधानसभा – दत्ता भरणे (राष्ट्रवादी – अजित पवार)
201) बारामती विधानसभा – अजित पवार (राष्ट्रवादी)
202) पुरंदर विधानसभा – संजय जगताप (काँग्रेस)
203) भोर विधानसभा – संग्राम थोपटे (काँग्रेस)
204) मावळ विधानसभा – सुनील शेळके (राष्ट्रवादी – अजित पवार)
205) चिंचवड विधानसभा – अश्विनी जगताप (भाजप)
206) पिंपरी विधानसभा – अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी – अजित पवार)
207) भोसरी विधानसभा – महेश लांडगे (भाजप)
208) वडगावशेरी विधानसभा – सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
209) शिवाजीनगर विधानसभा – सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
210) कोथरुड विधानसभा – चंद्रकांत पाटील (भाजप)
211) खडकवासला विधानसभा – भीमराव तपकीर (भाजप)
212) पर्वती विधानसभा – माधुरी मिसाळ (भाजप)
213) हडपसर विधानसभा – चेतन तुपे (राष्ट्रवादी – अजित पवार)
214) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा – सुनिल कांबळे (भाजप)
215) कसबा पेठ विधानसभा – रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12

216) अकोले विधानसभा – किरण लहामटे (राष्ट्रवादी – शरद पवार)
217) संगमनेर विधानसभा – बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
218) शिर्डी विधानसभा – राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
219) कोपरगाव विधानसभा – आशुतोष काळे (राष्ट्रवादी – अजित पवार)
220) श्रीरामपूर विधानसभा – लहू कानडे (काँग्रेस)
221) नेवासा विधानसभा – शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष)
222) शेवगाव पाथर्डी विधानसभा – मोनिका राजळे (भाजप)
223) राहुरी विधानसभा – प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी – शरद पवार)
224) पारनेर विधानसभा – निलेश लंके (राष्ट्रवादी) – सध्या लोकसभेवर निवड
225) अहमदनगर शहर विधानसभा – संग्राम जगताप (राष्ट्रवादी – अजित पवार)
226) श्रीगोंदा विधानसभा – बबनराव पाचपुते (भाजप)
227) कर्जत जामखेड विधानसभा – रोहित पवार (राष्ट्रवादी – शरद पवार)
बीड जिल्ह्यातील आमदार : 06

228) गेवराई विधानसभा – लक्ष्मण पवार (भाजप)
229) माजलगाव विधानसभा – प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी – अजित पवार)
230) बीड विधानसभा – संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – शरद पवार)
231) आष्टी विधानसभा – बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी – अजित पवार)
232) केज विधानसभा – नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी विधानसभा – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी – अजित पवार)

लातूर जिल्ह्यातील आमदार : 06

234) लातूर ग्रामीण विधानसभा – धीरज देशमुख (काँग्रेस)
235) लातूर शहर विधानसभा – अमित देशमुख (काँग्रेस)
236) अहमदपूर विधानसभा – बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
237) उदगीर विधानसभा – संजय बनसोडे (राष्ट्रवादी – अजित पवार)
238) निलंगा विधानसभा – संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239) औसा विधानसभा – अभिमन्यू पवार (भाजप)

उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील आमदार : 04

240) उमरगा विधानसभा – ज्ञानराज चौगुले (शिवसेना – एकनाथ शिंदे)
241) तुळजापूर विधानसभा – राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
242) उस्मानाबाद विधानसभा – कैलास पाटील (शिवसेना- उद्धव ठाकरे)
243) परांडा विधानसभा – तानाजी सावंत (शिवसेना – एकनाथ शिंदे)

सोलापूर जिल्ह्यातील आमदार : 11

244) करमाळा विधानसभा – संजय शिंदे (अपक्ष) – अजित पवारांना पाठिंबा
245) माढा विधानसभा – बबन शिंदे (राष्ट्रवादी – अजित पवार)
246) बार्शी विधानसभा – राजेंद्र राऊत (अपक्ष) – भाजपला पाठिंबा
247) मोहोळ विधानसभा – यशवंत माने (राष्ट्रवादी – अजित पवार)
248) सोलापूर शहर उत्तर विधानसभा – विजयकुमार देशमुख (भाजप)
249) सोलापूर शहर मध्य विधानसभा – प्रणिती शिंदे (काँग्रेस) – सध्या लोकसभेवर खासदार
250) अक्कलकोट विधानसभा – सचिन शेट्टी (भाजप)
251) सोलापूर दक्षिण विधानसभा – सुभाष देशमुख (भाजप)
252) पंढरपूर विधानसभा – समाधान अवताडे (भाजप)
253) सांगोला विधानसभा – शहाजी बापू पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
254) माळशिरस विधानसभा – राम सातपुते (भाजप)

सातारा जिल्ह्यातील आमदार : 08

255) फलटण विधानसभा – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – अजित पवार)
256) वाई विधानसभा – मकरंद पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
257) कोरेगाव विधानसभा – महेश शिंदे (शिवसेना- एकनाथ शिंदे)
258) माण विधानसभा – जयकुमार गोरे (भाजप)
259) कराड उत्तर विधानसभा – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
260) कराड दक्षिण विधानसभा – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
261) पाटण विधानसभा – शंभूराज देसाई (शिवसेना – एकनाथ शिंदे)
262) सातारा विधानसभा – शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : 05

263) दापोली विधानसभा – योगेश कदम (शिवसेना – एकनाथ शिंदे)
264) गुहागर विधानसभा – भास्कर जाधव (शिवसेना- उद्धव ठाकरे)
265) चिपळूण विधानसभा – शेखर निकम (राष्ट्रवादी – अजित पवार)
266) रत्नागिरी विधानसभा – उदय सामंत (शिवसेना – एकनाथ शिंदे)
267) राजापूर विधानसभा – राजन साळवी (शिवसेना – उद्धव ठाकरे)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : 03

268) कणकवली विधानसभा – नितेश राणे (भाजप)
269) कुडाळ विधानसभा – वैभव नाईक (शिवसेना – उद्धव ठाकरे)
270) सावंतवाडी विधानसभा – दीपक केसरकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार : 10

271) चंदगड विधानसभा – राजेश नरसिंग पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
272) राधानगरी विधानसभा – प्रकाश आबिटकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
273) कागल विधानसभा – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी – अजित पवार)
274) कोल्हापूर दक्षिण विधानसभा – ऋतुराज पाटील (काँग्रेस)
275) करवीर विधानसभा – पी एन पाटील सडोलीकर(काँग्रेस) – निधन
276) कोल्हापूर उत्तर विधानसभा – जयश्री जाधव (काँग्रेस)
277) शाहूवाडी विधानसभा – विनय कोरे (जनसुराज्य)
278) हातकणंगले विधानसभा – राजू आवळे (काँग्रेस)
279) इचलकरंजी विधानसभा – प्रकाश आवाडे (अपक्ष)
280) शिरोळ विधानसभा – उल्हास पाटील (शिवसेना – उद्धव ठाकरे)

सांगली जिल्ह्यातील आमदार : 08

281) मिरज विधानसभा – सुरेश खाडे (भाजप)
282) सांगली विधानसभा – सुधीर गाडगीळ (भाजप)
283) इस्लामपूर विधानसभा – जयंत पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
284) शिराळा विधानसभा – मानसिंग नाईक (राष्ट्रवादी – शरद पवार)
285) पलूस कडेगाव विधानसभा – डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
286) खानापूर विधानसभा – अनिल बाबर (शिवसेना) – निधन
287) तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा – सुमनताई पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
288) जत विधानसभा – विक्रम सावंत (काँग्रेस)

पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षाच

पुणे- १५ वर्षे पत्नीला नगरसेवक म्हणून निवडून आणणाऱ्या डॉ. भरत भानुदास वैरागे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत खुद भाजपच्या महारष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी आश्वासने देऊन उमेदारी अर्ज मागे घ्यायला लावला,५ वर्षात आश्वासने तर पाळली गेली नाहीतच पण २००९ पासून निव्वळ उमेदवारीच्या रांगेत उभे असणारे वैरागे आताही उमेदवारीची प्रतीक्षाच करत असल्याचे दिसून आले आहे.अवघ्या थोडक्या मतांनी विजयी झालेल्या भाजपच्या विद्यमान आमदारांना आणि त्यांच्या माजी मंत्री राहिलेल्या बंधूंची समजूत घालून भाजपा वैरागे यांना विधानसभेची संधी देणार आहे की नाही ? या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळू शकणार आहे.बायोडाटा भक्कम असूनही असंख्य वर्षे प्रतीक्षेत असलेले उमेदवार भाजपच्या वर्तुळात भरपूर आहेत पण अशांच्या नशिबी काही जणांवर सातत्यने नेतृत्वाने चालविलेली अपार कृपा आडवी येते असल्याचे दिसून आले आहे.

कोण आहेत हे डॉ. भरत भानुदास वैरागे हे पाहू या …
व्यवसाय : १९९३ ते १९९७ जनता वसाहत येथे वैद्यकिय व्यवसायास सुरूवात

अण्णा जोशी,प्रदीप रावत,गिरीश बापट,अनिल शिरोळे आणि आता मुरलीधर मोहोळ या सर्वांना आपल्या प्रभागातून लोकसभेला मताधिक्य मिळवून दिले.

  • १९८९ सालापासून डायस प्लॉट गुलटेकडी पुणे वस्ती क्षेत्रात संघाच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार गोपाळराव बुधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५ वी ते १० वी गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस कार्यास सुरूवात.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद संघात कार्यरत.
  • अयोध्या आंदोलनामध्ये कार सेवक म्हणुन सक्रिय सहभाग.
  • दादा वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषदेचा १० दिवसाचा १९९० साली ठाणे जिल्हा येथील टिटवाळा येथे निवासी वर्ग पुर्ण केला.
  • १९९२ साली भा.ज.पा. युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सहभाग.
  • १९९५ साली भा.ज.पा. वॉर्ड अध्यक्ष.
  • १९९८.चिटणीस : भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे शहर
  • अध्यक्ष : बेरोजगार आघाडी, पर्वती.
  • गिरीश बापट अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकरणीत उपाध्यक्ष भा.ज.पा. पुणे शहर.
  • अनिल शिरोळे अध्यक्ष असताना पुणे शहर उपाध्यक्ष म्हणुन काम केले.
  • योगेश गोगावले अध्यक्ष यांच्या कार्यकरणीत अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भा.ज.पा. पुणे शहर म्हणुन कार्यरत.
  • २००२ साली पुणे शहरातील सॅलिसबरी पार्क या प्रभागातून प्रचंड मताधिक्याने पुणे महानगरपालिकेत
    नगरसेवक म्हणुन निवड.
  • २००४ साली चिटणीस भा.ज.पा अनुसूचित जाती, महाराष्ट्र प्रदेश
  • २००२ ते २००७ पुणे महापालिकेमध्ये स्थायी समिती सदस्य म्हणुन २ वर्षे पदावर समर्थपणे काम केले.
  • २००४ साली बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून काम केले.
  • २००७ साली सदर वॉर्ड हा महिला झाल्यामुळे त्यांच्या पत्नी सौ. कविता भरत वैरागे या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणुन निवडून आल्या.
  • २००९ साली पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह भूमिका पक्षाकडे मांडली.
  • सन २०१२ मध्ये धनदांडग्या प्रतिस्पर्धेच्या विरोधात ६०% झोपडपट्टी असताना प्रतिस्पर्धेचे डिपॉझिट जप्त करून पत्नी कविता भरत वैरागे या सॅलिसबरी पार्क या प्रभागातून निवडुन आल्या. प्रभाग हा अक्षरशः बालेकिल्ला केला.
  • २०१४ मध्ये कॅन्टोमेंट मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी पुन्हा एकदा पक्षाकडे आग्रह भुमिका त्यावेळेस स्थानिक योग्य उमेदवार असताना उमेदवारी मिळू शकली नाही.
  • सन २०१४ मध्ये पक्षाने दिलेला उमेदवारास प्रचंड मताने विजयी करण्यात हाथभार .
  • कॅन्टोमेंट मतदार संघात डायस प्लॉट झोपडपट्टी, ढोले मळा वसाहत, खिलारे वस्ती, प्रकाश कॉलनी, पोस्ट व टेलिफोम कॉलनी, कोयना सोसायटी इत्यादी भागाचा सामावेश असून आनंद मीरा परिसरामध्ये ३५ सोसायट्या आहेत. एकून या भागाच मतदान १५,००० (पंधरा हजार) आहेत.
  • २०१७ साली सदर प्रभाग हा महिला राखीव झाल्यामुळे पत्नी सौ. कविता भरत वैरागे या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणुन पुन्हा तिसऱ्यांदा २०,००० मताधिक्याने निवडून आल्या.

आंबिल ओढा कॉलनीजवळ तरुणाचा खून

पुणे -सदाशिव पेठेतील आंबिल ओढा कॉलनी परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार सोमवारी (दि.१४) उघडकीस आला. यासंदर्भात दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आंबिल ओढा कॉलनी ते दत्तवाडी मार्गावर एका तरुणाचा मृतदेह सोमवारी रात्री आढळला. पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. धारदार शस्त्रांचे वार करून आणि डोक्यात दगड घालून या तरुणाचा खून करण्यात आल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत ‘मॉब लिंचिंग’:वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईलाही जमावाकडून मारहाण; पत्नीचा गर्भपात, वडिलांचे डोळे फुटले


मुंबई-महाराष्ट्रातील मुंबईत मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. मालाड पूर्व येथे एका 27 वर्षीय तरुणाला त्याच्या कुटुंबासमोर 10-15 जणांनी बेदम मारहाण केली. घटना 12 ऑक्टोबरची आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे ओव्हरटेकिंगवरून सदरील व्यक्तीचा एका ऑटोचालकाशी वाद झाला होता. त्यानंतर अनेक ऑटोचालक आणि स्थानिक दुकानदारांनी त्याला मारहाण केली.पीडितेची आई त्याला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावर पडली तेव्हा जमावाने तिलाही लाथा मारल्या. दरम्यान, या भांडणात पीडित पत्नीचा गर्भपात झाला आहे.पीडित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) सदस्य होता. त्याचे नाव आकाश मैने असल्याचे सांगण्यात येत आहे. 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी कुटुंबासह नवीन कार खरेदी करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. मालाड रेल्वे स्थानकाजवळ एका ऑटोने त्याच्या कारला ओव्हरटेक केला, त्यामुळे रिक्षाचालक आणि आकाश यांच्यात बाचाबाची झाली.पीडितच्या वडिलांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा डावा डोळा कायमचा निकामी झाला आहे.असे सांगितले जातेय . यावेळी वाद वाढत गेल्याने रिक्षाचालकाने त्याच्या मित्रांसह स्थानिक दुकानदारांनी आकाशवर हल्ला केला. ते आकाशला सतत लाथा मारत राहिले. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांला हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेले असता आकाशचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथे ओव्हरटेक करण्यावरून भांडण झाले असून त्यात आकाश यांना मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. 9 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बोपदेव घाट गँगरेप:दुसरा आरोपी प्रयागराजला पकडला ,ज्याला आहेत ३ बायका …

पुणे- बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून ताब्यात घेतले आहे. यामुळे अटक झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. त्याला मंगळवारी दुपारपर्यंत पुणे शहरात आणले जाणार आहे. अख्तर शेख (३२, रा. उंड्री,पुणे – मूळ प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.-
तो पुण्यात एका भंगाराच्या दुकानात काम करत होता. गुन्हा केल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी नागपूर येथे पळून गेला. तेथे त्याची पत्नी राहत होती, तर प्रयागराज येथे त्याच्या इतर दोन पत्नी आहेत. नागपूर येथून त्याने प्रयागराजला पळ काढला. त्याच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अख्तरवर इंदापूरमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तसेच इतरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

आज दुपारी १२ वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी-उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे शपथ देणार

मुंबई दिनांक १५ ऑक्टोबर २०२४– महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील.विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. आज शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सन्माननीय सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे –

१) श्रीमती चित्रा किशोर वाघ २) श्री विक्रांत पाटील ३) श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड ४) श्री पंकज छगन भुजबळ ५) श्री इद्रिस इलियास नाईकवाडी ६) श्री हेमंत श्रीराम पाटील ७) डॉ श्रीमती मनीषा कायंदे.


90 वर्षांचा झालो तरी मीच महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणणार- पवार

फलटण-वय झाल्यामुळे आणि नव्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळावी म्हणून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून बाजूला व्हावे आणि आपल्याला संधी द्यावी असा प्रयत्न अजित पवारांनी केला होता. त्याला आधी होकार देऊन नंतर शरद पवार मागे फिरले होते. त्यानंतर ते सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाची सूत्रे देतील, अशी चर्चा होती. मात्र, आपण निवृत्ती घेणार नाहीच. पक्षाची सूत्रे दुसऱ्या कुणाकडेही देणार नसल्याचे संकेत ८४ वर्षीय शरद पवारांनीच सोमवारी दिले.

अजित पवार पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचे बंधू सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, त्यांचा मुलगा अनिकेत तसेच फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण येथील सोहळ्यात शरद पवार गटात प्रवेश केला. त्या वेळी शरद पवारांनी स्वत:ची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. ते म्हणाले की, काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभी होती. त्यात माझा फोटो होता. त्यात लिहिले होते की, ८४ वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय.

८४ वर्षांचा होवो की ९० वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे. रामराजेंचे नाव न घेता पवार म्हणाले की, इथे एक जण दिसत नाहीये. परंतु त्यांची मानसिकता काय आहे हे धैर्यशील यांच्या निवडणुकीत मला कळलं.

लोकसभेला ३१ जागा गमावल्यावर लाडकी बहीण आठवली

शरद पवार असेही म्हणाले की, बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा थेट उल्लेख टाळत पवार म्हणाले की, लोकसभेला ३१ जागा गमावल्यावर लाडकी बहीण आठवली. बारामतीकर लय हुशार आहेत. बारामतीकरांनी बहिणीला पाठिंबा दिला. संजीवराजे निंबाळकर म्हणाले की, साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, सातारा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा जिल्हा आहे. महाराष्ट्र आणि देशाला पवारांशिवाय पर्याय नाही.

महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीच्या तारखा आज दुपारी जाहीर होणार,आणि तत्क्षणी आचारसंहिता लागू

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान तर झारखंडमध्ये 5 टप्प्याची शक्यता
निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. तर झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदानाचा कल कायम ठेवला जाऊ शकतो.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे

महाराष्ट्रात गेल्या दोन वेळापासून (2014 आणि 2019) एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये 15 ऑक्टोबर रोजी सर्व 288 जागांसाठी मतदान झाले होते. तर 2019 मध्ये 30 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते.तर झारखंडमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी पाच टप्प्यांत मतदान झाले आहे. 2014 मध्ये 25 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 9 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले. तर 2019 मध्ये 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले.महाराष्ट्रात महायुतीचे म्हणजेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार आहे. सत्ताविरोधी आणि 6 मोठ्या पक्षांमध्ये मतांचे विभाजन हे पक्षांसमोर मोठे आव्हान असेल.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भारत आघाडीला 30 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये हा आकडा 42 होता. म्हणजे निम्म्याहून कमी.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनुसार भाजपच्या जवळपास 60 जागा कमी होतील. विरोधी आघाडीच्या सर्वेक्षणात एमव्हीए म्हणजेच महाविकास आघाडीला राज्यातील 288 जागांपैकी 160 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठा आंदोलन हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे आहे.झारखंडमध्ये महाआघाडी म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) च्या नेतृत्वाखाली सरकार आहे. यामध्ये काँग्रेस, आरजेडी आणि डावे पक्ष यांचा समावेश आहे. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला संथाल परगणा आणि कोल्हान विभागातील 32 जागांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

कधी देशभक्तीचे धडे गिरवणारा शुभम बनला लॉरेन्स बिष्णाेईच्या टोळीचा गुंड:पुण्यामध्ये शुभम भाऊ प्रवीणसोबत विकायचा भाजी, वारजेत ‘लोणकर डेअरी’

मुंबई-माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुण्यातून प्रवीण लोणकर याला ताब्यात घेतले आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात असलेल्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर असून त्याचादेखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांना चौकशीत आढळून आले आहे.

शुभम हा महाविद्यालयात असताना एनसीसी कॅडेट म्हणून देशसेवेचे धडे गिरवत असतानाच राजस्थानमध्ये भरती प्रक्रियेदरम्यान लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड झाला. शुभम याचे कुटुंबीय मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी आहे. २०११ पासून शुभम हा पुण्यात राहण्यास आला होता, तर २०१९ मध्ये त्याचे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहण्यास आलेले होते.

एनसीसीत असताना भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या विचारांपासून तो प्रेरित झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने भावासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. २०२२ मध्ये वारजे परिसरात ‘लोणकर डेअरी’ नावाने त्यांनी दुकान उघडले होते, असेही समोर आले आहे.

धर्मराज कश्यप, शिवकुमार करनैल गोळा करायचे भंगार-मुंबईमध्ये एप्रिल महिन्यात अभिनेता सलमानच्या घरावर जो गोळीबार झाला त्या गुन्ह्यात फरार आरोपी म्हणून त्याचेदेखील नाव दोषारोपपत्रात समोर आले होते. त्यामुळेच त्याने जुलै महिन्यात घरातून बाहेर पडताना कुटुंबीयांना मला शोधू नका तसेच माझ्यावर लक्ष देऊ नका, असे सांगितले होते. धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि करनैल सिंह हेदेखील वारजे परिसरात राहत होते. हे तिघेही स्क्रॅप गोळा करण्याचे काम करत होते.

पुण्यातील आणखी काही जण लॉरेन्स टोळीच्या संपर्कात ?लॉरेन्स टोळीशी पुणे शहरातील आणखी तरुण संपर्कात आहे का ? याबाबत पुणे पोलिसांकडून सकल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शुभम आणि त्याचा भाऊ यांचे काही काळ पुण्यात वास्तव्य होते. त्यामुळे आता पोलिस त्यांच्या संपर्कातील इतरांचाही शोध घेत असल्याचाही माहिती समोर आली आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात-सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभम लोणकर हा लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात होता. प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांना आर्म्स ॲक्ट गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल आणि काडतुसेदेखील जप्त केली होती. या गुन्ह्यात जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर प्रवीण हा डेअरीचे काम पाहत होता, तर शुभम हा जुलै महिन्यापासून पसार झाला. मे ते जूनदरम्यान तो पुण्यात वारजेनगर परिसरात राहत होता.

पुण्यातील वारजेत ‘लोणकर डेअरी’ नावाने उघडले होते दुकान-पुण्यामध्ये शुभम याने सुरुवातीला २०२२ मध्ये पुण्यात दूध डेअरची व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसादही मिळत होता. अनेक वेळा मुंबईला ये-जा करत असे. प्रवीण लोणकर यानेच हल्लेखोरांना राहण्यासाठी रूम भाड्याने दिली होती. तसेच लोणकर डेअरीशेजारी स्क्रॅप दुकानात काम करत होते.

भाजपाचे माजी आमदार धृपदराव सावळे व अविनाश घाटेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमाल फारुखींचाही काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर
काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असून आज टिळक भवनमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे, राज्य ग्राहक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, प्रवक्ते उमर फारुखी, अकोला जिल्ह्यातील वंचितचे डॉ. रहेमान खान, बाळापूरचे माजी नगराध्यक्ष जम्मूसेठ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

राज्यातील भाजपा शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून शेतकरी, कामगार यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महागाईने जगणे कठीण झाले आहे परंतु राज्यातील युती सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाला तारणारी असून राहुल गांधी यांची देश जोडणारी भूमिका सर्वात महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यात काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करून काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहचवा असे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, मुझफ्फर हुसेन, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, राजीव गांधी पंचायत राज मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि.१४: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्यावतीने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत विविध साधने खरेदी करण्यासाठी निधी वितरण करण्यात येत असून या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली आहे.

पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा आदी सहाय्यभूत आवश्यक साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिले जातात.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार संलग्न बॅकेच्या बचत खात्यात ऑनलाईन पद्धतीने करण्याऐवजी पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाव्दारे एकवेळ एकरकमी ३ हजार रूपयेच्या मर्यादेत ऑफलाईन पद्धतीने वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज मुदतीत सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयास सादर करावेत, असे आवाहनही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.