पुणे- १५ वर्षे पत्नीला नगरसेवक म्हणून निवडून आणणाऱ्या डॉ. भरत भानुदास वैरागे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत खुद भाजपच्या महारष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी आश्वासने देऊन उमेदारी अर्ज मागे घ्यायला लावला,५ वर्षात आश्वासने तर पाळली गेली नाहीतच पण २००९ पासून निव्वळ उमेदवारीच्या रांगेत उभे असणारे वैरागे आताही उमेदवारीची प्रतीक्षाच करत असल्याचे दिसून आले आहे.अवघ्या थोडक्या मतांनी विजयी झालेल्या भाजपच्या विद्यमान आमदारांना आणि त्यांच्या माजी मंत्री राहिलेल्या बंधूंची समजूत घालून भाजपा वैरागे यांना विधानसभेची संधी देणार आहे की नाही ? या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळू शकणार आहे.बायोडाटा भक्कम असूनही असंख्य वर्षे प्रतीक्षेत असलेले उमेदवार भाजपच्या वर्तुळात भरपूर आहेत पण अशांच्या नशिबी काही जणांवर सातत्यने नेतृत्वाने चालविलेली अपार कृपा आडवी येते असल्याचे दिसून आले आहे.
कोण आहेत हे डॉ. भरत भानुदास वैरागे हे पाहू या …
व्यवसाय : १९९३ ते १९९७ जनता वसाहत येथे वैद्यकिय व्यवसायास सुरूवात
अण्णा जोशी,प्रदीप रावत,गिरीश बापट,अनिल शिरोळे आणि आता मुरलीधर मोहोळ या सर्वांना आपल्या प्रभागातून लोकसभेला मताधिक्य मिळवून दिले.
- १९८९ सालापासून डायस प्लॉट गुलटेकडी पुणे वस्ती क्षेत्रात संघाच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार गोपाळराव बुधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५ वी ते १० वी गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस कार्यास सुरूवात.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद संघात कार्यरत.
- अयोध्या आंदोलनामध्ये कार सेवक म्हणुन सक्रिय सहभाग.
- दादा वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषदेचा १० दिवसाचा १९९० साली ठाणे जिल्हा येथील टिटवाळा येथे निवासी वर्ग पुर्ण केला.
- १९९२ साली भा.ज.पा. युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सहभाग.
- १९९५ साली भा.ज.पा. वॉर्ड अध्यक्ष.
- १९९८.चिटणीस : भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे शहर
- अध्यक्ष : बेरोजगार आघाडी, पर्वती.
- गिरीश बापट अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकरणीत उपाध्यक्ष भा.ज.पा. पुणे शहर.
- अनिल शिरोळे अध्यक्ष असताना पुणे शहर उपाध्यक्ष म्हणुन काम केले.
- योगेश गोगावले अध्यक्ष यांच्या कार्यकरणीत अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भा.ज.पा. पुणे शहर म्हणुन कार्यरत.
- २००२ साली पुणे शहरातील सॅलिसबरी पार्क या प्रभागातून प्रचंड मताधिक्याने पुणे महानगरपालिकेत
नगरसेवक म्हणुन निवड. - २००४ साली चिटणीस भा.ज.पा अनुसूचित जाती, महाराष्ट्र प्रदेश
- २००२ ते २००७ पुणे महापालिकेमध्ये स्थायी समिती सदस्य म्हणुन २ वर्षे पदावर समर्थपणे काम केले.
- २००४ साली बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून काम केले.
- २००७ साली सदर वॉर्ड हा महिला झाल्यामुळे त्यांच्या पत्नी सौ. कविता भरत वैरागे या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणुन निवडून आल्या.
- २००९ साली पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह भूमिका पक्षाकडे मांडली.
- सन २०१२ मध्ये धनदांडग्या प्रतिस्पर्धेच्या विरोधात ६०% झोपडपट्टी असताना प्रतिस्पर्धेचे डिपॉझिट जप्त करून पत्नी कविता भरत वैरागे या सॅलिसबरी पार्क या प्रभागातून निवडुन आल्या. प्रभाग हा अक्षरशः बालेकिल्ला केला.
- २०१४ मध्ये कॅन्टोमेंट मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी पुन्हा एकदा पक्षाकडे आग्रह भुमिका त्यावेळेस स्थानिक योग्य उमेदवार असताना उमेदवारी मिळू शकली नाही.
- सन २०१४ मध्ये पक्षाने दिलेला उमेदवारास प्रचंड मताने विजयी करण्यात हाथभार .
- कॅन्टोमेंट मतदार संघात डायस प्लॉट झोपडपट्टी, ढोले मळा वसाहत, खिलारे वस्ती, प्रकाश कॉलनी, पोस्ट व टेलिफोम कॉलनी, कोयना सोसायटी इत्यादी भागाचा सामावेश असून आनंद मीरा परिसरामध्ये ३५ सोसायट्या आहेत. एकून या भागाच मतदान १५,००० (पंधरा हजार) आहेत.
- २०१७ साली सदर प्रभाग हा महिला राखीव झाल्यामुळे पत्नी सौ. कविता भरत वैरागे या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणुन पुन्हा तिसऱ्यांदा २०,००० मताधिक्याने निवडून आल्या.