४०.३४ लाखांची १ किलो ७९० ग्रॅम अफू जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची मोठी कारवाई

Date:

आंबेगाव परिसरातून राजस्थानातील आरोपीला अटक; कार, मोबाईलसह ४०.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने मोठी कारवाई करत १ किलो ७९० ग्रॅम अफू जप्त केली असून या कारवाईत ४० लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी राजस्थानातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २६ जून रोजी सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे अधिकारी शहरात पेट्रोलिंग करत असताना सचाईमाता मंदिर, दुगड शाळेजवळ, आंबेगाव-कात्रज परिसरात एका व्यक्तीकडे अफू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत देवेंद्रसिंह प्रेमसिंह शक्तावत (मूळ रा. भातसोडा गाव, जि. चितोडगड, राजस्थान) याच्या ताब्यातून ३५ लाख ८० हजार रुपयांची १ किलो ७९० ग्रॅम अफू, ५० हजार रुपयांचा मोबाईल फोन, ४ लाख रुपयांची ह्युंदाई कंपनीची चारचाकी आणि ४ हजार २०० रुपये रोख, असा एकूण ४० लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व १७(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अफरोज पठाण तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

३.६५ लाखांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; चंदननगर पोलिस ठाण्यात...

भाजपने पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यावर आपत्ती – चंदूशेठ कदम

पुणे-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापायी राजकारणाला अति महत्व...

जीवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, ७.०९ लाखांचा...