पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटायला लागले..विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आणि भविष्यावर घाला-रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम

Date:

पुणे- सध्याच्या सरकारच्या काळात पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटायला लागले..विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आणि भविष्यावर हा घाला असल्याचे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले,’ NEET परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अद्याप ताजी असतानाच आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवक आपल्या भविष्याची स्वप्ने डोळ्यांत ठेवून वर्षानुवर्षे अभ्यास करतात. मात्र वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. NEET नंतर आता TET परीक्षेचाही पेपर फुटणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.

“सरकारचे संपूर्ण लक्ष प्रशासन सुधारण्यापेक्षा राजकीय कुरघोड्या करण्यात गुंतले आहे. पक्ष फोडण्यात व्यस्त असलेले सरकार आता पेपर फुटण्यापासूनही वाचवू शकत नाही. पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटायला लागले आहेत. ही परिस्थिती राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.”

पेपरफुटी हा केवळ गुन्हा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आणि भविष्यावर झालेला घाला आहे. प्रत्येक वेळी परीक्षा रद्द होते, नवीन तारीख जाहीर होते, मात्र विद्यार्थ्यांचा मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक त्रास कोण भरून काढणार

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट उघड करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटणार नाही, यासाठी तातडीने प्रभावी यंत्रणा उभी करावी.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळता कामा नये. युवकांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर सरकारने तात्काळ आणि कठोर पावले उचलली पाहिजेत.असेही कदम यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे...

४०.३४ लाखांची १ किलो ७९० ग्रॅम अफू जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची मोठी कारवाई

आंबेगाव परिसरातून राजस्थानातील आरोपीला अटक; कार, मोबाईलसह ४०.३४ लाखांचा...

३.६५ लाखांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; चंदननगर पोलिस ठाण्यात...

भाजपने पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यावर आपत्ती – चंदूशेठ कदम

पुणे-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापायी राजकारणाला अति महत्व...