पुणे-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापायी राजकारणाला अति महत्व देत कारभार करत पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले म्हणूनच पुण्यावर आज पाण्याची आपत्ती कोसळली आहे.हजारो कोटीचे प्रकल्प आणून विकास होतो हि कल्पनाच भ्रामक आहे मेट्रो आणून आणि पाताळलोक उभारून पैशांची उधळपट्टी करून शहराचा विकास होतो हि कल्पनाच भ्रामक आहे , इथे पाणी हि सराव्धिक मोठी गरज आहे , पाणीच नाही … हात धुवायला .. तिथे असला हा दिखावेबाज विकास कसला ? पाण्या अभावी सारे भकास आहे. नेमके त्याकडे दुर्लक्ष करून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पुण्यापुढे पाणी संकट निर्माण कले आहे असा स्पष्ट आरोप कॉंग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला आहे .दरवर्षी १५ जुलाई पर्यंत नियमित पाणीपुरवठा करता येईल एवढा पाणी साठा ठेवण्याची महापालिकेची पद्धत तत्कालीन पाणीपुरवठा प्रमुख ह. द. राव यांनी घालून दिलेली असताना यंदा काय झाले , १५ जूनलाच पाणी कपात का करावी लागली ? पाणी गेले कुठे धरणातले ? असे प्रश्न देखील कदम यांनी उपस्थित केले आहेत.
ते म्हणाले युनिफाईड DC रूळ द्वारे , TDR द्वारे पुनर्विकासाच्या नावाने लोकसंख्या अफाट वाढविली गेली . त्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे होते . मेट्रो आणली , आणू द्यात पण ती आणल्याने शहराच्या लोकसंख्येवर काय परिणाम होईल , केवळ उड्डाण पुले करून आणि हजारो कोटींचे प्रकल्प आणून शहराचा विकास होतो हि कल्पनाच भ्रामक आहे , हे सारे आणण्यापूर्वी त्यासाठी पाया मजबूत करावा लागतो तेव्हा कळस जोमाने डोलतो . या साठी पुढील दृष्टीकोन ठेऊन पुढे काय होईल किती लोक या शहरात येतील हे सर्व नियोजनपूर्वक ठरवून सर्वात प्रथम पाणी .. म्हणजे अन्न वस्त्र आणि मग निवारा या प्रमाणे जर नियोजन केले असते तर विकास झाला म्हणता आले असते . शहरातील पाणी साथ , महापालिकेला त्यातून मिळणारे पाणी याकडे गेल्या १० वर्षात भाजपने लक्ष दिलेले नाही. १० वर्षात पाणी साठ वाढविण्याचे आणि पुण्याला जास्त पाणी मिळविण्याचे कोणतेही प्रयत्न भाजपने केले नाहीत. कात्रजच्या दोन्ही तलावांचे पाणी किती सालापर्यंत कुठे कुठे वापरले जात होते ? याचा तपशील महापालिकेने आणि भाजपने जाहीर करावा आणि आता मात्र या तलावातील पाणी वाया घालविले जाते , अशीच अवस्था शहरातील अन्य तलावांचीही आहे.शहरातील भूजल पातळी टिकविण्यासाठी महापालिकेने काय प्रयत्न केले ? आता टंचाईच्या काळात टँकर लॉबीला धंदा , काळाबाजार करायला पाणी मिळते आणि महापालिकेला मात्र मिळत नाही हि अजब तर्हा आहे . महापालिकेने पिण्याचे पाणी आणि वापरायचे पाणी असे दोन्ही पाणी जनतेला पुरविले पाहिजे. केवळ निसर्गावर खापर फोडून मोकळे होता येणार नाही तुम्ही संकटावर मात करण्यासाठी काय पर्यायी योजना राबविल्या काय दक्षता घेतली हे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले .

