जीवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

Date:

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, ७.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे | प्रतिनिधी

जीवे मारण्याची तसेच बांधकाम पाडून टाकण्याची धमकी देत तब्बल १० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींकडून ७ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी यांनी हुजूरपागा शाळेसमोरील मांगडेवाडी, कात्रज येथे ममता फाउंडेशन संस्थेसाठी इमारत तसेच राहण्यासाठी दोन घरे बांधली होती. या बांधकामाबाबत भीम संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद निवृत्ती गायकवाड यांनी पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून बांधकाम पाडून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारी थांबवायच्या असतील तर १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीकडून टायटन कंपनीचे घड्याळ, ऑनलाइन १० हजार रुपये तसेच गुगल पेद्वारे ५ हजार रुपयेही स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी खंडणीपैकी ५० हजार रुपये कात्रज येथील किनारा हॉटेल येथे स्वीकारण्याचे ठरवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून विनोद गायकवाड आणि संग्राम सोनवणे यांना ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान इतर आरोपींनाही अटक करण्यात आली.

या प्रकरणात विनोद निवृत्ती गायकवाड (रा. विंझर, ता. वेल्हा), संग्राम दत्तात्रय सोनवणे (रा. विंझर, ता. वेल्हा), सुधीर मुगुट शेडगे (रा. मांगडेवाडी, कात्रज) आणि निलेश बाबन कुंभार (रा. भोर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण ७ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत.

या प्रकरणातील आरोपींनी यापूर्वीही कोणाला धमकावून खंडणी किंवा मौल्यवान वस्तू उकळल्या असतील, तर संबंधितांनी पुढे येऊन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

४०.३४ लाखांची १ किलो ७९० ग्रॅम अफू जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची मोठी कारवाई

आंबेगाव परिसरातून राजस्थानातील आरोपीला अटक; कार, मोबाईलसह ४०.३४ लाखांचा...

३.६५ लाखांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; चंदननगर पोलिस ठाण्यात...

भाजपने पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यावर आपत्ती – चंदूशेठ कदम

पुणे-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापायी राजकारणाला अति महत्व...

आंबेगावमध्ये पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात गेल्या २४ तासांत विविध प्रकारचे...