आंबेगावमध्ये पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

Date:

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहरात गेल्या २४ तासांत विविध प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आले असून घरफोडी, खुनाचा प्रयत्न, ऑनलाइन फसवणूक, लाखो रुपयांची चोरी तसेच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट-२ आणि शहरातील विविध पोलिस ठाण्यांनी स्वतंत्र कारवाया करत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.

गुन्हे शाखा युनिट-२ ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आंबेगाव पठार येथील शिवकॉलनी परिसरात सापळा रचून दिनेश सुरेश ढोरे (वय ३८, रा. शिवकॉलनी, आंबेगाव पठार) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा सुमारे ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बाणेरमध्ये अडीच लाखांची घरफोडी

बालेवाडी येथील २६ वर्षीय फिर्यादी यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. २५ जून रोजी सायंकाळी रिलायन्स फ्रेशजवळील हिल साईड अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे (मो. ८६८९९०६१११) करत आहेत.

कोथरूडमध्ये धारदार शस्त्राने खुनाचा प्रयत्न

कोथरूड येथील २० वर्षीय फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आशिष गार्डन चौक परिसरात पूर्वीच्या वादातून हर्ष सीताराम नाईक व अक्षय संजय मणेरे या दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे (मो. ९८८१४६१६२४) करत आहेत.

स्वारगेट परिसरात ७.१० लाखांची ऑनलाइन फसवणूक

महार्षीनगर येथील २८ वर्षीय महिलेची टेलिग्रामद्वारे संपर्क साधून ‘पार्ट टाईम जॉब’ आणि जास्त नफ्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भामट्यांनी तब्बल ७ लाख १० हजार ८५ रुपये उकळले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम (मो. ९८२२०९२२२५) करत आहेत.

शिवाजीनगरमध्ये ज्येष्ठ महिलेच्या घरातून ९० हजारांचा ऐवज लंपास

शिवाजीनगर येथील ६५ वर्षीय महिलेच्या घरात पहाटे अज्ञात चोरट्याने प्रवेश करून २५ हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर (दूरध्वनी : ०२०-२५८१८६५९) करत आहेत.

चतु:श्रृंगी परिसरातून १०.४६ लाखांचे बांधकाम साहित्य चोरी

पिंपळे निलख येथील ३५ वर्षीय फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बाणेर येथील बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाच्या बेसमेंटमधून अज्ञात चोरट्यांनी १० लाख ४६ हजार रुपयांचे कॉपर पाईप, वायर व इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार रविंद्र दहातोंडे (मो. ९०९६९६१३१३) करत आहेत.

कोंढव्यात घरातून ६.२४ लाखांचे दागिने व रोकड चोरी

कोंढवा परिसरातील २५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या ओळखीच्या व्यक्तीने घरात प्रवेश करून २४ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंद थिटे (मो. ७९७७९९२७३९) करत आहेत.

पुणे शहर पोलिसांनी सर्व घटनांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

४०.३४ लाखांची १ किलो ७९० ग्रॅम अफू जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची मोठी कारवाई

आंबेगाव परिसरातून राजस्थानातील आरोपीला अटक; कार, मोबाईलसह ४०.३४ लाखांचा...

३.६५ लाखांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; चंदननगर पोलिस ठाण्यात...

भाजपने पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यावर आपत्ती – चंदूशेठ कदम

पुणे-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापायी राजकारणाला अति महत्व...

जीवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, ७.०९ लाखांचा...