पुणे -सदाशिव पेठेतील आंबिल ओढा कॉलनी परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार सोमवारी (दि.१४) उघडकीस आला. यासंदर्भात दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आंबिल ओढा कॉलनी ते दत्तवाडी मार्गावर एका तरुणाचा मृतदेह सोमवारी रात्री आढळला. पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. धारदार शस्त्रांचे वार करून आणि डोक्यात दगड घालून या तरुणाचा खून करण्यात आल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.