मुंबई-महाराष्ट्रातील मुंबईत मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. मालाड पूर्व येथे एका 27 वर्षीय तरुणाला त्याच्या कुटुंबासमोर 10-15 जणांनी बेदम मारहाण केली. घटना 12 ऑक्टोबरची आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे ओव्हरटेकिंगवरून सदरील व्यक्तीचा एका ऑटोचालकाशी वाद झाला होता. त्यानंतर अनेक ऑटोचालक आणि स्थानिक दुकानदारांनी त्याला मारहाण केली.पीडितेची आई त्याला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावर पडली तेव्हा जमावाने तिलाही लाथा मारल्या. दरम्यान, या भांडणात पीडित पत्नीचा गर्भपात झाला आहे.पीडित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) सदस्य होता. त्याचे नाव आकाश मैने असल्याचे सांगण्यात येत आहे. 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी कुटुंबासह नवीन कार खरेदी करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. मालाड रेल्वे स्थानकाजवळ एका ऑटोने त्याच्या कारला ओव्हरटेक केला, त्यामुळे रिक्षाचालक आणि आकाश यांच्यात बाचाबाची झाली.पीडितच्या वडिलांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा डावा डोळा कायमचा निकामी झाला आहे.असे सांगितले जातेय . यावेळी वाद वाढत गेल्याने रिक्षाचालकाने त्याच्या मित्रांसह स्थानिक दुकानदारांनी आकाशवर हल्ला केला. ते आकाशला सतत लाथा मारत राहिले. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांला हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेले असता आकाशचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथे ओव्हरटेक करण्यावरून भांडण झाले असून त्यात आकाश यांना मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. 9 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.