पुणे- बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून ताब्यात घेतले आहे. यामुळे अटक झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. त्याला मंगळवारी दुपारपर्यंत पुणे शहरात आणले जाणार आहे. अख्तर शेख (३२, रा. उंड्री,पुणे – मूळ प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.-
तो पुण्यात एका भंगाराच्या दुकानात काम करत होता. गुन्हा केल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी नागपूर येथे पळून गेला. तेथे त्याची पत्नी राहत होती, तर प्रयागराज येथे त्याच्या इतर दोन पत्नी आहेत. नागपूर येथून त्याने प्रयागराजला पळ काढला. त्याच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अख्तरवर इंदापूरमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तसेच इतरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.