Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान:23 नोव्हेंबरला निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा

Date:

निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

अशी असेल महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया-23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी राज्यातील 1 लाख 186 मतदान केंद्रांवर 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार आहेत.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यापैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी), तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल. त्यानुसार तत्पूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येईल.

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह अनेक शहरांतील मतदान केंद्रांवर मतदारांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागले होते. त्यावेळी अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत गर्दीच्या मतदान केंद्रांवर खुर्च्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचा आग्रह धरला होता.

राज्यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार

राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात 4.59 कोटी पुरुष, तर 4.64 कोटी महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून दिव्यांग मतदारही 6.32 लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्डजेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. हे सदृढ सामाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे 18 ते 19 वर्ष वयोगटातील संख्या 19.48 लाख आहे. या निवडणुकीत आमचे या तरुण मतदारांवर खास लक्ष असेल. कारण हेच तरुण मतदार भविष्यात लोकशाहीला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

निवडणुकीतील महत्त्वाची आकडेवारी

राज्यात एकूण 9 कोटी 59 लाख मतदार आहेत.
4 कोटी 95 लाख पुरुष, तर 4 कोटी 64 लाख महिला मतदार.
महिला मतदारांच्या संख्येत 22% ची वाढ.
19.48 लाख मतदार प्रथमच मतदान करणार.
6.32 लाख दिव्यांग मतदार बजावणार हक्क.
85 किंवा त्याहून अधिक वय असणारे 12.48 लाख मतदार.
100 किंवा त्याहून अधिक वयाचे 49034 मतदार.
राज्यात 1 लाख 186 मतदान केंद्र.
शहरात 42, 585, तर ग्रामीण भागात 57, 601 मतदान केंद्र.
राज्यात 1.86 लाख मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 52585 केंद्र शहरी भागात, तर 57,601 केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 950 मतदार असतील. विशेषतः 350 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुणांकडे असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर रात्री 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पैशांची वाहतूक करता येणार नाही. या काळात रुग्णवाहिका, बँक व पतसंस्थांवर विशेष लक्ष ठेवले जाईल.

निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक खास अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर मतदारांना आपल्या तक्रारी करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरु असेल, तर केवळ फोटो काढून या अ‍ॅपवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना आपल्यावरील दाखल गुन्ह्यांची स्थानिक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांत तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? ते सांगावे लागणार आहे. राजकीय पक्षांनाही हा नियम लागू असेल. त्यांनाही गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला उमेदवारी का दिली? हे नमूद करावे लागेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी आर्थिक पाठबळ

पुणे : ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी...

ऐतिहासिक चित्रपटांमुळे संस्कारक्षम पिढी घडेल : मुरलीधर मोहोळ

पुणे : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा...

शहर पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार यांना महाराष्ट्र दिनानिमित्त महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

पुणे- महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ...

वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करावा – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या...