Home Blog Page 582

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी

कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन

पुणे:

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत; घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे स्त्रीचा भक्कम आधार असतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा यांना त्यांच्या पत्नी आणि व्यवसायाने कॉस्ट ऑडिटर असलेल्या अंजली पाटील यांची वेळोवेळी साथ मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. नागरिकांमधूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनीही निवडणूक प्रचारात सहभागी होऊन; कोथरूड मधील अनेकांच्या घरोघरी भेटी घेत आहेत.

यामध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुनिती जोशी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ. वासंती पटवर्धन आणि भुपाल पटवर्धन, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ माया तुळपुळे, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आणि मधुमिता बर्वे यांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले.

यावेळी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील ह्या देखील उपस्थित होत्या.

पर्वतीत सायबर पोलिस स्टेशन उभारणार आमदार माधुरी मिसाळ

पुणे:नागरिकांचे आर्थिक व्यवहार हे बहुतांशी ऑनलाइन पद्धतीकडे वळल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा ऑनलाइन गुन्हेगारीकडे वळविल्याचे दिसून येते. शहरात दिवसाकाठी 70 ते 80 तक्रार अर्ज दाखल होतात. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यावर मोठा ताण येतो. सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात सायबर पोलिस स्टेशन उभारणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ सॅलिस्बरी पार्क परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, डॉ. भरत वैरागे, बंटी मोकळ, देवेंद्र बनसोडे, सुनील इंगळे, प्रसन्न वैरागे, निखिल शिळीमकर, उमेश शहा, सिद्धार्थ चिंचोळकर, किरण रामसिन्हा, राजेंद्र सरदेशपांडे, गणपत मेहता, पूजा जोशी, संगीता कांबळे, वंदना गावडे, रेणुका पाठक,अनिल भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर गुन्हेगारांच्या नवनवीन क्लुप्त्या पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. गंभीर गुन्हे हाताळण्यासाठी 30 पोलिस ठाणी आणि संपूर्ण गुन्हे शाखा काम करते. मात्र गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांची संख्या दुप्पट असूनही त्याचा ताण केवळ एकाच सायबर पोलिस ठाण्यावर येत आहे. या पोलिस ठाण्यात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. तक्रार अर्जांची संख्या लक्षात घेता प्रत्येक गुन्ह्याचा तपास करणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्वतीत सायबर पोलिस ठाणे उभारून प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहोत.

मिसाळ पुढे म्हणाल्या, पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द लक्षात घेता आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, काळे, फुरसुंगी, काळेपडळ या ठिकाणी पोलिस स्टेशन उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांवरील ताण कमी होऊ शकेल. पर्वती मतदारसंघात सिंहगड रस्ता आणि बिबवेवाडी परिसरात प्रत्येकी एक पोलिस स्टेशन व पोलिस चौकी उभारण्यात आली. या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देता आले. तसेच प्रशासनात गतिमानता यावी यासाठी संगणक उपलब्ध करून दिले. गुन्ह्यांचा तपास तत्काळ आणि कुशलतेने होण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना बूस्ट मिळाला. त्यामुळे मतदारसंघातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.

रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध :रासने

पुणे:

रिक्षा हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. रिक्षाचालकांना एकेरी हाक न मारता अहो, रिक्षावाले काका असे म्हणण्याचे संस्कार आणि संस्कृती स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी निर्माण करून या व्यावसायिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानुसार रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची भावना कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली.

दत्तवाडी, साने गुरुजी नगर परिसरात रासने यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. धीरज घाटे, धनंजय जाधव, प्रशांत सुर्वे, विजय गायकवाड, दीपक पोटे, तानाजी ताकपिरे, चंद्रकांत पोटे, अश्विनीताई पवार, शैलेश लडकत, सुनिता जंगम, केदार मानकर, विशाल पवार, आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, महायुती सरकारने राज्यातील रिक्षाचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नावाने महामंडळ स्थापन केले. या मंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षाचालकाला जीवन विमा कवच आणि मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. अपघातात कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये केली जाईल. रिक्षाचालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तर उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल करण्यात येणार आहे. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. या सर्व योजना कसबा विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
रासने पुढे म्हणाले, रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बेताची असते. कृतज्ञतेच्या भावनेने मध्य वस्तीतील 1200 रिक्षाचालकांना गणवेश वितरित करण्यात आले. रिक्षाचालकांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी लाभ घेतला. रिक्षाचालकांना सक्तीचा केलेला दररोजचा 50 रुपयांचा वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड रद्द करावा यासाठी आग्रही राहीन. रिक्षा ॲपसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, मेट्रोला पूरक नव्याने शेअर रिक्षा धोरण राबविणार आहे. शहरातील प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून रिक्षांना सीएनजी किटसाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले. शहराची वाढती हद्द आणि लोकसंख्या लक्षात घेऊन रिक्षा स्टँडची संख्या वाढविण्यावर भर देणार आहे.

गोरगरिबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कायमच प्राधान्य – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

0

एकमेकांवरील विश्वास ढळू देऊ नका – डॉ गोऱ्हे यांचे आवाहन

मुंबई दि.१५: आजच्या बदललेल्या जगात घर, पाणी वीज सर्व काही मिळेल पण विश्वास मिळणार नाही. आपण सर्वांनी तो विश्वास भारत वाघमारे यांच्यावर दाखविला आणि आतापर्यंत जी वाटचाल केलेली आहे त्याबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन केले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत वाघमारे यांना चर्चेद्वारे येथील समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातूनच येथील घरांचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

चेंबूर येथील एस. आर. ए. हक्क परिषदेला डॉ गोऱ्हे यांनी आज मार्गदर्शन केले. याप्रसंगी, मुख्यप्रवर्तक भारत वाघमारे, समृद्धी काते, ऍड. अभिजित रंजन, प्रकाश थोरवडे, गोरखनाथ कांबळे, अविनाश वाघमारे, संजय कांबळे, राजू आठवले, प्रकाश कोटी व इतर मान्यवर उपस्थित होते.

चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील एस.आर.ए. योजनेमधील घरे उभी करताना येथील लोकांना अक्षरशः वेठीस धरले गेले आहे, याकडे लक्ष वेधतांना, या गोरगरिबांच्या हक्कांच्या घरासाठी अनेकदा आपण लढा दिला असून यामध्ये पुण्यासह इतर ठिकाणी देखील गोरगरीब लोकांच्या भूखंडावर डल्ला मारणाऱ्या विकासकांवर आयुष्यभर तुरुंगात राहण्याची वेळ आलेली आहे, याची आठवण डॉ गोऱ्हे यांनी यावेळी करुन दिली.

या लढ्यामध्ये कायद्याचे आणि नियमांचे संरक्षण आपल्याला आहे, असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, पूर्वी ब्रिटिश काळात एखादी वस्तू आंदण म्हणून दिली जायची, सिद्धार्थ नगर कॉलनी देखील आंदण दिल्याप्रमाणे येथे राजेशाही नाही तर गुंडशाही सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावनाही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

येथील नागरिकांनी विकासकाच्या दबावाला बळी न पडता एकमेकावरील विश्वास कायम ठेवावा, असे अवाहन डॉ गोऱ्हे यांनी केले. या योजनेत होत असलेल्या गैरप्रकाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, हे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत येथील नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, अशी ग्वाही डॉ गोऱ्हे यांनी दिली.

येत्या २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदान करावे आणि राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आणावे, असे आवाहनही शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रसंगी केले.

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे ग्रहण दूर होणार – संजय राऊत

रमेशदादा मोठ्या फरकाने विजयी होणार

पुणे : कोयता गँग, ड्रग्ज, ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण यामुळे कँटोन्मेंटवर डाग लागला आहे. सभ्य पुणे शहर भाजपमुळे बदनाम झाले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपवर केली. कँटोन्मेंटची प्रतिमा बदलण्यासाठी बदल झालाच पाहिजे. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाला लागलेले ग्रहण दूर करण्याची वेळ आली आहे. रमेशदादा मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक तसेच महाविकास आघाडीचा मेळावा क्वार्टर गेट येथील पीजीआय हॉल येथे संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी उत्साहात पार पडला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, उमेदवार रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट तसेच डॉ. अमोल देवळेकर आणि जावेद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कँन्टोन्मेंटमधील विविध जाती-धर्माच्या समाजात फूट पाडण्याचे काम भाजपने केले आहे. लोक या खोके सरकारला कंटाळले असून महाविकास आघाडी सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेने केले आहे. आता रमेशदादांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन राऊत यांनी केले. अजित पवार हे वाघासारखे होते. आता त्यांची मांजर झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कँटोन्मेंट मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवसैनिकांनी तयार केलेल्या केकवर किंगमेकर संजय राऊत असा उल्लेख करण्यात आला होता. गुरू नानक जयंती निमित्त रमेश बागवे यांनी कॅम्पमधील प्रसिद्ध हॉलिवूड गुरुद्वारा येथे शुक्रवारी भेट दिली. गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन शीख बांधवांना गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी शीख बांधवांनी रमेश बागवे यांचे स्वागत करून विजय निश्चित असल्याचा विश्वास दिला. यावेळी शीख बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बटेगे तो कटेंगे ‘हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा :विनोद तावडे

पुणे, –
‘बटेगे तो कटेंगे ‘हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती जाती मध्ये लोक विभागले गेले की, त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात, त्यामुळे काहीजण विरोध दर्शवतात. मराठा समाजाचा प्रश्नावर कोणी आंदोलन केले तर ते चांगले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम आरक्षण दिले नंतर त्याच्या बाबत विविध मागण्या वेळोवेळी समोर आल्या. मंडल आयोग माध्यमातून देखील आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना ,मराठा आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात ते टिकून दाखवले तरी मराठा नेते मनोज जरांगे भाजपला दोष का देत आहे ?
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, हेमंत लेले,प्रशांत कोतवाल ,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
तावडे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यात प्रचार दौरा करत असताना सामान्य मतदाराची भावना समजून घेतली तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमत पलीकडे जाईल असे आज चित्र आहे. लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या त्यामुळे अनेकांच्या मनात विविध कल्पना निर्माण झाल्या. त्यांनी लोकसभा निवडणूक विश्लेषण नीट करणे गरजेचे होते आघाडी पेक्षा केवळ ०.३ टक्के मते युतीला कमी होती. आता अनेक पक्ष निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे मत विभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील. मनसे मानसिक दृष्ट्या युती सोबत आहे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पार नारा मुळे मोदीच निवडून येणार असल्याने चार टक्के लोक मतदानास आले नाही ते यंदा येतील. राज्यात स्पष्ट बहुमत युतीचे सरकार राज्यात सत्तेवर येईल. महायुतीने राजकारण करताना प्रत्यक्ष लाभार्थी आणि अप्रत्यक्ष लाभ माध्यमातून विकास साधला आहे. विविध सरकारी योजना याद्वारे पायाभूत सुविधा निर्माण होऊन नागरिकांना फायदा झाला आहे. लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली आहे. अशावेळी जेष्ठ नेते शरद पवार सांगत होते की, लाडकी बहिण योजना राबवताना इतर सर्व खात्याचे पैसे वळवण्यात आल्याचा आरोप केला आणि स्वतःच्या जाहीरनाम्यात योजना राबवणार असल्याचे सांगत दुटप्पी भूमिका घेत आहे. उध्दव ठाकरे हे राम मंदिर, हिंदुत्व कलम ३७० यास विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत जाऊन त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणे आणि आघाडी सोबत जाणे जनतेस पटले नाही. जातीगत जनगणना माध्यमातून लोकसंख्या टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी सांगत असून याबाबत उध्दव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणारी व्यक्ती उद्या पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांचे सभेचे आयोजन करत आहे. त्यांच्या सभा ज्याठिकाणी होतात तिथे पाऊस पडल्यावर जागा जिंकता येतात हा भ्रमनिरस आहे. सातारा मधील लोकसभा जागा आम्ही जिंकली नाही तरी विधानसभा जागा जिंकली आहे. मी राज्यातील मुख्यमंत्री पदाचा शर्यती मध्ये नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप आणि महायुती सरकार येण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली मध्ये निवडणूक निकाल नंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

भीमराव तापकिरांची वारजे व माळवाडी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड परिसरात प्रचार यात्रा

खडकवासला: भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसादमिळत असून यांचा चौथ्या विजयासाठीचा प्रचार सध्या खडकवासला मतदारसंघात जोमाने सुरू आहे. सलग तीन कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर, निवडणुकीला सामोरे जात असताना तापकीर यांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण आणि शहरी भागांचा संगम असलेल्या खडकवासला मतदारसंघात तापकीर यांनी विकासाच्या कामांमुळे ठसा उमटवला आहे. तापकीर यांच्या प्रचाराला मिळणारा चांगला प्रतिसाद मिळत असून वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी आणि इतर भागांमध्ये तापकीर यांच्या प्रचार दरम्यान नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. “तापकीर म्हणजे विकास,” अशा घोषणा या सभांमध्ये ऐकायला मिळत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली परिसराचा झालेला कायापालट नागरिकांच्या मनावर ठसला आहे. मितभाषी स्वभाव आणि सादगीपूर्ण राहणीमान: तापकीर यांचे नागरिकांशी प्रामाणिक आणि साधे वर्तन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना आहे. मागील तीन कार्यकाळांमध्ये त्यांनी विधानसभेत खडकवासला मतदारसंघाच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला. यामध्ये मिळकतकराचा प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा आणि नागरी सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भरीव कामगिरी केली. गेल्या पाच वर्षांत आमदार तापकीर यांनी मतदारसंघात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले आहेत ते फक्त कागदावर नसून सत्यात उतरल्याचे पाहवयास देखील मिळत आहे.

याशिवाय, स्मार्ट शाळा, सोलर प्रकल्प, आणि मेट्रोचे जाळे यांसारख्या लोकहिताच्या कामांमुळे खडकवासला मतदारसंघाचा विकास वेगाने झाला आहे.

तापकीर यांच्या प्रचार सभांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. प्रचारादरम्यान नागरिक “तापकीर साहेबच हवेत,” अशा प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नेते प्रचंड जोमाने काम करत आहेत. खडकवासल्याचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रमुख उद्देश आहे,” असे सांगत तापकीर यांनी मतदारांना आश्वस्त केले आहे की, पुढील कार्यकाळात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळेल आणि परिसराचा विकास आणखी वेगाने होईल.

वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी भागांतील नागरिक म्हणतात, “तापकीर यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला मतदारसंघाचा विकास झाला आहे. त्यांच्या सडेतोड आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे या निवडणुकीत विजय निश्चित आहे.”

भिमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला मतदारसंघ विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. चौथ्या टर्मसाठी यशस्वी होण्यासाठी तापकीर आणि त्यांचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करत असून “मतदारांचा विश्वासच माझी ताकद आहे,” असे ठामपणे सांगत तापकीर यांनी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

धंगेकर यांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली – खासदार संजय राऊत

कसब्यातील मतदार पोटनिवडणुकीतील
निकालच कायम ठेवतील

पुणे:रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील मतदार याही निवडणुकीत हाच निर्णय कायम ठेवतील आणि धंगेकर यांना विजयी करतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

लोकमान्य सभागृह केसरी वाडा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. ते म्हणाले की कसब्यातील शिवसैनिक जोरात आहेत. ते धंगेकर यांना समर्थपणे साथ देतील. महाराष्ट्राच्या सत्तेवरची घाण उखडून फेकण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मदतीचा हात देऊन पुण्यात यश मिळवलेच पाहिजे. त्याखेरीज पुण्यात निर्माण झालेली ही कोयता गॅंग उध्वस्त करता येणार नाही. एकेकाळी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आज कोयता गॅंगचे शहर, भ्रष्टाचाराचे शहर अशी झाली आहे. त्याला सध्याचे सत्ताधारीच जबाबदार आहेत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची पैशाची भूक भागलेली नाही. जे आमदार आणि खासदार विकले गेले ते मोदी-शहांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. त्यांनी मुंबई संपवली, आता ते पुणे संपवायला निघाले आहेत. या राज्यात जर पुन्हा फडणवीस यांची सत्ता आली, तर ते पहिला विदर्भ वेगळा करतील, त्यानंतर मुंबई तोडली जाईल, त्यांचे हे महाराष्ट्र तोडण्याचे षडयंत्र बरेच दिवस शिजते आहे. जोपर्यंत एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत महाराष्ट्र तोडता येणार नाही, अशी खात्री पटल्यामुळेच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. गुजरातचे लोक हे व्यापारी वृत्तीने राज्य करतात त्यांनी देशभर लूट चालवली आहे. त्यांनी आता पैशाची मस्ती दाखवायला सुरुवात केली आहे, ही पैशाची मस्ती आपण खपवून घ्यायची नाही आणि एकजूट कायम राखून या महाराष्ट्रविरोधी शक्तींना सत्तेवरून खाली खेचायचे असा निर्धार आपण केला पाहिजे असे आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की आपण मोठ्या मताधिक्याने विजय होवू.

या कार्यकर्ता मेळाव्याला अंकुश काकडे, संजय मोरे, गजानन थरकुडे, मोहन जोशी, रोहित टिळक, बाळासाहेब अमराळे, नीता परदेशी, गणेश नलावडे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत आणि रवींद्र धंगेकर यांना समर्थन दिले.

दरम्यान, आज चातुर्मास परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने आमदार रवींद्र धंगेकर यांनी दादावाडी जैन श्वेतांबर मंदिर येथे साकारण्यात आलेल्या शत्रुंजय गिरीराज पर्वत म्हणजेच शत्रुंजयपटाचे दर्शन घेतले. या दिनानिमित्त जैन साधू एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी विहार करतात, त्यामुळे जैन समाजात या दिवसाला खूप महत्त्व असते. यावेळी रमेश बोराणा, कांतीलाल पार्लेचा, सुरेश जैन, शांतीलाल जैन, संपत जैन आदी उपस्थित होते. उपस्थित जैन बांधवांनी यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या.

स्वमग्न मुलांच्या थेरपी सेंटर साठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार – संदीप खर्डेकर.

पुणे:क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने गुरुनानक जयंती व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वमग्न मुलांच्या केंद्रास विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.

स्वमग्न मुलांच्या समस्या खूप वेगळ्या असून त्यांचा दिनक्रम बघितल्यावर आणि त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकून त्यांच्या वेदनांची कल्पना येते असे संदीप खर्डेकर म्हणाले.अश्या मुलांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आज गुरुनानक देव यांच्या 555 व्या जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रसन्न ऑटिझम सेंटर येथील मुलांसाठी विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,प्रसन्न ऑटिझम सेंटर च्या कार्यकारी संचालिका साधना गोडबोले, संचालक सुभाष केसकर व स्वमग्न विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्र सरकारने दिव्यांग जनांच्या यादीत स्वमग्न मुलांचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना साधनाताई गोडबोले यांनी ” राज्य सरकार ने अश्या मुलांसाठी थेरपी सेंटर उभरावेत ” अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुणे मनपा तर्फे देखील अश्या मुलांच्या संगोपन व उपचारासाठी केंद्र उभारावेत यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
भावी काळात ही ह्या मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचे वचन नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे विश्वस्त मनोज हिंगोरानी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी दिले.

हडपसरमध्ये भीषण आग: जवानांनी वाचविले तिघांचे प्राण (व्हिडीओ)

अनधिकृत व्यवसायीकाच्या हलगर्जीपणाने दुर्घटना

पुणे- आज सकाळी हडपसर येथे वैभव सिनेमागृहा जवळील भीमाशंकर सोस्यातीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली . या आगीत तिसऱ्या मजल्यावरच अडकलेल्या तिघांचे प्राण वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी यश मिळविले तर दुसऱ्या मजल्यावर देखील अडकलेल्या चौघांची जवानांनी सुटका केली अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे आणि अनिल गायकवाड यांनी दिली . हि आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या २३ जवानांनी ३ फायर गाड्या आणि एका टँकरचा वापर केला .

भीमाशंकर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर अनधिकृत पणे फोटो फ्रेमचा व्यवसाय निवासी भागात चालू होता आता या इमारतीला महापालिकेचा परवाना होता काय ? हि माहिती मिळू शकली नाही मात्र नियम बाह्य पद्धतीने व्यवसाय येथे सुरु होता कोणतेही शोर्ट सर्किट झाले नव्हते . फोटोच्या फर्म तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणत होत्या त्यामुळे हि आग भडकली आणि अपुऱ्या जागेत ये जा करण्याची वहिवाट यामुळे लोक आगीतून बाहेर येणे मुश्कील झाले होते. सुदैवाने अग्निशामक दलाच्या जवनांनी अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात यश मिळविले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला .

महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम व्हायचे आहे काय ? संजय राऊतांचा सवाल

रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांची सभा

पुणे-मोदी,शहा,फडणवीस,शिंदे हे सारे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे शत्रू आहेत,ते महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम बनवू पाहत आहेत,सुज्ञ असलेल्या विचारी असलेल्या पुणेकरांनो आता जास्त विचार करत बसू नका आता बांबू घालायची वेळ आली आहे ती जाऊ देऊ नका महात्मा फुले,सावित्रीमाई फुलेंचे सभ्य पुणे यांनी आता गुन्हेगारीचे शहर बनवलेय वेळीच सावध व्हा आणि आता महार्श्त्रातून भाजपला हद्दपार करा महाविकास आघाडीच्या रमेश बागवे यांना विजयी करा असे आवाहन येथे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. पुणे कँटोंमेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे,तसेच संजय मोरे विशाल धनवडे,अविनाश बागवे,पल्लवी जावळे, वसंत मोरे, विठ्ठल थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संजय राउत म्हणाले ,’ फुले शाहू आंबेडकरांचे पुणे सभ्य माणसांचे पुणे मानून ओळखले जात होते.आता कोणते गुन्हे या शहरात घडत नाहीत इथे, रुग्णांना जीवन देणारे ससून रुग्णालय यांनी नशिल्या ड्रग्जचा अड्डा बनवला,कोयता गँग,महिला असुरक्षित,बेरोजगारीने हैराण पुणे.गुन्हेगारांचे पुणे अशी ख्याती होऊ लागली.राजत सरकार बेईमान आणि गद्दार सरकार म्हणून ओळखले जाऊ लागले.आपण महाराष्ट्र कधीही विकू घेऊ शकतो अशी धारणा बाळगणारे मोदी- शहा या महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. सगळे बडे उद्योग कारखाने गुजरातला पळवत आहेत.यांनी कंगाल केलाय महाराष्ट्र, विचार करणारे सुज्ञ असलेल्या.पुण्याच्या लोकांनो आता विचार करू नका आता बांबू घालायची वेळ आली आहे.महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करून ठेवायचा आहे यांना.ते होऊ द्यायचे नसेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींचे हात बळकट करावे लागतील.हि लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे शिंदे,फडणवीस शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ लोकांनी बलिदान दिलेय.मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने उभे करायला आता महाविकास आघाडीला निवडून द्यावे लागेल. लाडकी बहिण योजनेत १५०० रुपये देतात आमचे सरकार आल्यावर आम्ही ३००० रुपये देणार आहोत.१५०० रुपये देऊन ते लाज काढताय.आम्ही सिलेंडर देखील ५००/६०० रुपयंना देऊ, आरोग्य विमा २५ लाखाचा देऊ,शेतकऱ्यांचे कर्ज ३ लाखापर्यंतचे आपण माफ करणार आहोत.असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

युवा कलाकारांच्या मुकुल कला महोत्सवाला चांगला प्रतिसाद!

कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट कडून यशस्वी आयोजन

पुणे :कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अरुंधती पटवर्धन यांच्या वतीने युवा कलाकारांसाठी आयोजित ‘मुकुल कला महोत्सवाला आज चांगला प्रतिसाद मिळाला.

हा कला महोत्सव 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी (कोथरूड) येथे उत्साहात पार पडला.

कला महोत्सवाच्या प्रसंगी ज्येष्ठ नृत्य गुरू डॉ. सुचेता भिडे- चापेकर व ज्येष्ठ हार्मोनियम वादक, भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे प्रमुख शारंगधर साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

कृष्णा साळुंके यांच्या शिष्यांचे पखवाज वादन, सुप्रसिद्ध तबला वादक अजिंक्य जोशी आणि गायिका गायत्री जोशी यांची कन्या आणि शिष्या आरुषी जोशी चे गायन, कथक नृत्यांगना पायल गोखले यांची कन्या आणि शिष्या रिया गोखले चे कथक नृत्य,
डॉ. देविका बोरठाकूर यांच्या शिष्यांचे सत्रीय नृत्य आणि
श्रीमती अनुजा बाठे यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम् नृत्य सादर झाले. पारंपारिक रचनाच्या या जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितानी भरभरून दाद दिली.सत्रिय ही आसाम मधील बहारदार नृत्यशैली देखील रसिकांची दाद मिळवून गेली.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शारंगधर साठे म्हणाले,’ युवा कलाकारांना, युवा मनांना व्यासपीठ देण्याचा हा सातत्यपूर्ण उपक्रम महत्वपूर्ण आहे.लहान वयापासून हे सर्व सहभागी युवा कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य कला शिकत आहेत,भारतीय कलांसाठी हे आश्वासक चित्र आहे.अशा व्यासपीठांना भारती विद्यापीठ बळ देण्याचे काम करेल ‘.

आम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या मुस्लीम सैनिकांचे वंशज आहोत, औरंगजेबची औलाद नाही,हे लक्षात ठेवा

पुणे:’मराठी मुस्लीम सेवा संघाने महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्यावरून भाजपाचे किरीट सोमय्या, रवीशंकर प्रसाद जो व्होट जिहादचा प्रचार करीत आहेत,तो दुष्प्रप्रचार आहे,असा आरोप करीत ज्यांचे विचार पटतील,त्या पक्षाला-उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे’, असे सडेतोड उत्तर मराठी मुस्लीम सेवा संघातर्फे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले.

मराठी मुस्लीम सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम खान, राज्य सहसचिव अब्दुल जब्बार शेख,पुणे शहराध्यक्ष जावेद शेख,सिकंदर मुलाणी, अस्लम बागवान आदी उपस्थित होते.१५ नोव्हेंबर रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ही पत्रकार परिषद झाली.

इब्राहिम खान म्हणाले,’मागील निवडणुकीत ‘सब का साथ, सबका विकास’ ऐकून भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता का ? या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे.मुस्लीमांच्या आत्मसन्मानाशी खेळण्याचे काम भाजपने केले.

सोमय्या यांनी मुख्तार अब्बास नक्वी,माधव भांडारी, डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडून २०१४ च्या निवडणुकीत आम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती घ्यावी. भाजपाने बटेंगे, कटेंगे सारख्या घोषणा देऊन ध्रुवीकरणाचे प्रयत्न करू नये.

मराठी मुस्लीम सेवा संघ आत्मसन्मान, संविधान अधिकार, रोजगार, प्रादेशिक अस्मिता या मुद्यावर काम करते. आमच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. भाजपाला हरविण्यास जे सक्षम आहेत, त्यांना मतदान करणार आहे.

सिकंदर मुलाणी म्हणाले,’मुस्लीम हे राक्षस, देशद्रोही असल्याचे चित्र रंगविण्याचे प्रयत्न होत आहेत. आम्ही शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या मुस्लीम सैनिकांचे वंशज आहोत, औरंगजेबची औलाद नाही,हे लक्षात ठेवावे’.

खडकवासालामध्ये 68 मतदारांनी केले गृहमतदान

पुणे: खडकवासाला विधानसभा मतदारसंघांतर्गत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण ७० मतदारांनी फॉर्म क्रमांक १२ डी भरून गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ६८ मतदारांनी गृह मतदान केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.त्याअनुषंगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.
विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी दिपगौरी जोशी आणि किशोरी शिंदे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पडली. या पथकामध्ये मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. टपाली मतदान कक्षाचे प्रशासन कर्मचारी लौकिक दाभाडे यांनी या पथकासोबत समन्वय ठेवून गृह मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.या प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.किरण सुरवसे तसेच सचिन आखाडे, अंकुश गुरव आणि साहीर सय्यद यांचे सहकार्य मिळाले

राहुल गांधींच्या उद्या चिमूर व धामणगाव रेल्वे येथे सभा तर प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापुरात सभा, १७ तारखेला प्रियंका गांधी गडचिरोली व नागपूरात.

मुंबई, दि. १५ नोव्हेंबर २०२४
काँग्रेस अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले व वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्षच करत आहे, असे सडेतोड उत्तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली व जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आरोपाचा तीव्र निषेधही करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जनता मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. नरेंद्र मोदी रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत होते. याउलट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्या दिनांक १६ नोव्हेंबर रोजी चिमूर व धामणगाव रेल्वे येथे जाहीर प्रचार सभा होत आहेत तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या उद्या शिर्डी व कोल्हापुरात जाहीर सभा तसेच १७ तारखेला गडचिरोली व नागपूरमध्ये प्रचारसभा होतील, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले आहे.

भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा व कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला ७००० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असेही रमेश चेन्नीथला यांनी जाहिर केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत डाव्या विचार सरणीचे लोक होते या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, भारत जोडो यात्रा हे एक मोठे जनआंदोलन होते. यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. या यात्रेतून राहुल गांधी यांनी देशातील गरीब, आदिवासी, दलित, वंचित, शेतकरी, महिला, तरुण वर्गांच्या समस्या व वेदना जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रेला जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे भाजपा धास्ती बसली आहे त्यातून असे खोटे आरोप केले आहेत असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, सरचिटणीस ब्रीज दत्त, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.