अनधिकृत व्यवसायीकाच्या हलगर्जीपणाने दुर्घटना
पुणे- आज सकाळी हडपसर येथे वैभव सिनेमागृहा जवळील भीमाशंकर सोस्यातीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली . या आगीत तिसऱ्या मजल्यावरच अडकलेल्या तिघांचे प्राण वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी यश मिळविले तर दुसऱ्या मजल्यावर देखील अडकलेल्या चौघांची जवानांनी सुटका केली अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे आणि अनिल गायकवाड यांनी दिली . हि आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या २३ जवानांनी ३ फायर गाड्या आणि एका टँकरचा वापर केला .
भीमाशंकर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर अनधिकृत पणे फोटो फ्रेमचा व्यवसाय निवासी भागात चालू होता आता या इमारतीला महापालिकेचा परवाना होता काय ? हि माहिती मिळू शकली नाही मात्र नियम बाह्य पद्धतीने व्यवसाय येथे सुरु होता कोणतेही शोर्ट सर्किट झाले नव्हते . फोटोच्या फर्म तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणत होत्या त्यामुळे हि आग भडकली आणि अपुऱ्या जागेत ये जा करण्याची वहिवाट यामुळे लोक आगीतून बाहेर येणे मुश्कील झाले होते. सुदैवाने अग्निशामक दलाच्या जवनांनी अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात यश मिळविले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला .