रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांची सभा
पुणे-मोदी,शहा,फडणवीस,शिंदे हे सारे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे शत्रू आहेत,ते महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम बनवू पाहत आहेत,सुज्ञ असलेल्या विचारी असलेल्या पुणेकरांनो आता जास्त विचार करत बसू नका आता बांबू घालायची वेळ आली आहे ती जाऊ देऊ नका महात्मा फुले,सावित्रीमाई फुलेंचे सभ्य पुणे यांनी आता गुन्हेगारीचे शहर बनवलेय वेळीच सावध व्हा आणि आता महार्श्त्रातून भाजपला हद्दपार करा महाविकास आघाडीच्या रमेश बागवे यांना विजयी करा असे आवाहन येथे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. पुणे कँटोंमेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे,तसेच संजय मोरे विशाल धनवडे,अविनाश बागवे,पल्लवी जावळे, वसंत मोरे, विठ्ठल थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संजय राउत म्हणाले ,’ फुले शाहू आंबेडकरांचे पुणे सभ्य माणसांचे पुणे मानून ओळखले जात होते.आता कोणते गुन्हे या शहरात घडत नाहीत इथे, रुग्णांना जीवन देणारे ससून रुग्णालय यांनी नशिल्या ड्रग्जचा अड्डा बनवला,कोयता गँग,महिला असुरक्षित,बेरोजगारीने हैराण पुणे.गुन्हेगारांचे पुणे अशी ख्याती होऊ लागली.राजत सरकार बेईमान आणि गद्दार सरकार म्हणून ओळखले जाऊ लागले.आपण महाराष्ट्र कधीही विकू घेऊ शकतो अशी धारणा बाळगणारे मोदी- शहा या महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. सगळे बडे उद्योग कारखाने गुजरातला पळवत आहेत.यांनी कंगाल केलाय महाराष्ट्र, विचार करणारे सुज्ञ असलेल्या.पुण्याच्या लोकांनो आता विचार करू नका आता बांबू घालायची वेळ आली आहे.महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करून ठेवायचा आहे यांना.ते होऊ द्यायचे नसेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींचे हात बळकट करावे लागतील.हि लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे शिंदे,फडणवीस शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ लोकांनी बलिदान दिलेय.मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने उभे करायला आता महाविकास आघाडीला निवडून द्यावे लागेल. लाडकी बहिण योजनेत १५०० रुपये देतात आमचे सरकार आल्यावर आम्ही ३००० रुपये देणार आहोत.१५०० रुपये देऊन ते लाज काढताय.आम्ही सिलेंडर देखील ५००/६०० रुपयंना देऊ, आरोग्य विमा २५ लाखाचा देऊ,शेतकऱ्यांचे कर्ज ३ लाखापर्यंतचे आपण माफ करणार आहोत.असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.