पुणे, –
‘बटेगे तो कटेंगे ‘हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती जाती मध्ये लोक विभागले गेले की, त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात, त्यामुळे काहीजण विरोध दर्शवतात. मराठा समाजाचा प्रश्नावर कोणी आंदोलन केले तर ते चांगले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम आरक्षण दिले नंतर त्याच्या बाबत विविध मागण्या वेळोवेळी समोर आल्या. मंडल आयोग माध्यमातून देखील आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना ,मराठा आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात ते टिकून दाखवले तरी मराठा नेते मनोज जरांगे भाजपला दोष का देत आहे ?
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, हेमंत लेले,प्रशांत कोतवाल ,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
तावडे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यात प्रचार दौरा करत असताना सामान्य मतदाराची भावना समजून घेतली तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमत पलीकडे जाईल असे आज चित्र आहे. लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या त्यामुळे अनेकांच्या मनात विविध कल्पना निर्माण झाल्या. त्यांनी लोकसभा निवडणूक विश्लेषण नीट करणे गरजेचे होते आघाडी पेक्षा केवळ ०.३ टक्के मते युतीला कमी होती. आता अनेक पक्ष निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे मत विभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील. मनसे मानसिक दृष्ट्या युती सोबत आहे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पार नारा मुळे मोदीच निवडून येणार असल्याने चार टक्के लोक मतदानास आले नाही ते यंदा येतील. राज्यात स्पष्ट बहुमत युतीचे सरकार राज्यात सत्तेवर येईल. महायुतीने राजकारण करताना प्रत्यक्ष लाभार्थी आणि अप्रत्यक्ष लाभ माध्यमातून विकास साधला आहे. विविध सरकारी योजना याद्वारे पायाभूत सुविधा निर्माण होऊन नागरिकांना फायदा झाला आहे. लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली आहे. अशावेळी जेष्ठ नेते शरद पवार सांगत होते की, लाडकी बहिण योजना राबवताना इतर सर्व खात्याचे पैसे वळवण्यात आल्याचा आरोप केला आणि स्वतःच्या जाहीरनाम्यात योजना राबवणार असल्याचे सांगत दुटप्पी भूमिका घेत आहे. उध्दव ठाकरे हे राम मंदिर, हिंदुत्व कलम ३७० यास विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत जाऊन त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणे आणि आघाडी सोबत जाणे जनतेस पटले नाही. जातीगत जनगणना माध्यमातून लोकसंख्या टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी सांगत असून याबाबत उध्दव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी.
शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणारी व्यक्ती उद्या पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांचे सभेचे आयोजन करत आहे. त्यांच्या सभा ज्याठिकाणी होतात तिथे पाऊस पडल्यावर जागा जिंकता येतात हा भ्रमनिरस आहे. सातारा मधील लोकसभा जागा आम्ही जिंकली नाही तरी विधानसभा जागा जिंकली आहे. मी राज्यातील मुख्यमंत्री पदाचा शर्यती मध्ये नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप आणि महायुती सरकार येण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली मध्ये निवडणूक निकाल नंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.