Home Blog Page 578

नरेंद्र मोदींच्या राजवटीत, शेतकरी, कामगार, महिला, तरूण सेफ नाहीत, फक्त उद्योगपती अदानीच सेफ आहेत: प्रियंका गांधी.

काँग्रेस सरकारने भेदभाव न करता सर्व राज्यांचा विकास केला, भाजपा सरकारकडून मात्र महाराष्ट्राशी भेदभाव.

काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींची गडचिरोलीमध्ये प्रचारसभा व नागपुरात तुफान रोड शो.

मुंबई, गडचिरोली दि. १७ नोव्हेंबर २०२४

विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधी यांची गडचिरोलीमध्ये प्रचारसभा झाली. या सभेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेष बघेल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, रिपाईंचे नेते राजेंद्र गवई, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

आपल्या भाषणातून भाजपा सरकारचा समाचार घेत प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाचे हित पाहून मोठ्या संस्था, करखाने, बंदरे, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स विविध राज्यात उभी केली. विकासाच्या कामात काँग्रेस सरकारने कधीच भेदभाव केला नाही. परंतु मागील ११ वर्षांपासून देशात भेदभावाचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवून महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे. देशातील सर्व विमानतळ, बंदरे, कारखाने, जमीन एकाच उद्योगपतीला दिली आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण भरती केली नाही. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जात आहे. सर्वात जास्त तरुणांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. शेतकरी संकटात आहे, त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, कापसाची मोठ्या प्रमाणात आयात करुन शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव वाढू दिले नाहीत. १० वर्षापासून सोयाबीनचा दर वाढलेला नाही. काँग्रेस सरकार असताना सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव होता आज तो फक्त ४ हजार रुपये आहे. कांदा निर्यातबंदी केली होती, त्यामुळे ५० लाख टन कांदा बाद झाला, दूधाला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही आणि शेती साहित्यावर मात्र जीएसटी लावून शेतकऱ्याला लुटले जात आहे. शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. आदिवासांचे हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस सरकारने पेसा कायदा बनवला. आज भाजपाच्या राज्यात आदिवासींवर अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील ४ लाख आदिवासींनी जमिन पट्ट्यांसाठी अर्ज केले त्यातील २ लाख बाद करण्यात आले. तर देशभरातून २२ लाख आदिवासींचे अर्ज बाद केले असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

महाराष्ट्रातील सरकार मोदी व भाजपाने चोरले. सरकार स्थापनेच्या बैठकीत उद्योगपती अदानी उपस्थित होते अशी चर्चा बाहेर आली आहे. आता विधानसभा निवडणुकीत काळजीपूर्वक मतदान करा उद्योगपतींच्या हितासाठी काम करणारे नाही तर जनतेसाठी काम करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले.

काँग्रेस बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गडचिरोलीच्या संपत्तीची लुट सुरु असून ती थांबवली पाहिजे, मविआचे सरकार आल्यानंतर गडचिरोलीत रोजगार निर्मिती करणारे उद्योग उभे केल जातील भाजपाने शेतकरी, आदिवासी, तरुण व महिलांना फसवले आहे. भाजपा विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. गुजरात मधून महाराष्ट्रात ड्रग्ज आणून तरुणपिढी बरबाद केली जात आहे. शिंदे व भाजपाने महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, शेतकरी, महिला, तरुणांच्या, गरिबांच्या हिताचे रक्षण करणारे मविआचे सरकार आणा, असे आवाहन पटोले यांनी केले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, भाजपा धोक्यात असल्यावरच त्यांना हिंदूंची आठवण येते व हिंदू खतरें में है, बटेंगे कटेंगे अशा धमक्या देत आहेत. भाजपाचे सरकार गरीबांचे सरकार नाही श्रीमंतांचे आहे. अदानीने ५ लाख कोटींच्या जमिनी गिळंकृत केल्या आहेत. ६ लाख कोटींच्या कामे ३५ टक्के जास्त किमतीला देऊन त्यात १ लाख ८० हजार कोटींचा भ्रष्टाचार शिंदे भाजपा सरकारने केला आहे. ही निवडणूक संघ परिवार विरुद्ध संविधान परिवार अशी आहे. बहुजनांनाचे रक्षण काँग्रेस पक्ष, राहुल गांधी व प्रियंका गांधीच करु शकतात. २० तारखेला काँग्रेस व मविआच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.

दिल्ली ते गल्ली,”भाजपचे गळती सरकार”-अनंतराव गाडगीळ

पुणे- पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल रोडच्या भिंतीतून ४ महिन्यातच पाणी झिरपू लागले आहे.
यावरून, केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एनडीए – भाजप सरकारने घाईत सर्व प्रकल्प उरकल्याचे सिद्ध होते. एवढेच नव्हे तर यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचेही उघड झाले आहे. कारणास्तव, भाजपची सारी सरकार हि ” गळती सरकार ” असल्याचा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव गाडगीळ यांनी केला आहे.

केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पातच नव्हे तर भा. ज. प. / युतीच्या गैरकारभार – गैरनियोजन यामुळे देशाच्या
अर्थव्यवस्थेलाही गळती लागली असल्याचे स्पष्ट होत आहे. मोठा गाजावाजा झालेल्या ” स्मार्ट सिटी ” योजने
अंतर्गत सुमारे १५ हजार कोटींचे प्रकल्प अजूनही अपुरे आहेत. एकूण सुमारे ८ हजार प्रकल्पांपैकी जवळपास
६५०० प्रकल्प कसेबसे पुरे होण्याच्या मार्गावर आहेत तर उर्वरित सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम
थोडीफार चालू झाली आहेत.

फसलेल्या नोटबंदी व जि. एस. टी. मुळे एकीकडे गेल्या वर्षभरात ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर
दुसरीकडे दिड कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. गेल्या वर्षभरात ” सी एन जी ” २५ रुपयांनी महाग झाला आहे तर
रेल्वेच्या गलथान कारभारामुळे गेल्या ४ वर्षात तब्ब्ल ४० रेल्वे अपघात झाले आहेत.

परिणामी, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदानातच गळती लागल्याचे दिसून येईल असे
प्रतिपादनही गाडगीळ यांनी केलं आहे.

पोर्शे कार अपघात, ड्रग्जच्या विळख्यात पुणे, कोयता गँग, खंडणी वसुली अशा प्रकरणात हेमंत रासने झोपलेले का ?

दोनदा १५ हजार कोटीचे बजेट केले पण साधे सीसी टीव्ही कॅमेरे निट बसवले नाही, सिग्नल सिंक्रोनायझिंग करता आले नाही मग १५ हजार कोटीच्या बजेटचे केले काय ? -खासदार अमोल कोल्हे

पुणे : आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणेकरांसाठी, तसेच कसबा मतदारसंघातील नागरिकांसाठी तळमळीने काम केले. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी हा माणूस पोटतिडकीने लढला आणि त्यांच्या या कामाला नाटक असे संबोधून ज्येष्ठ भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हेटाळणी केली आहे. त्यांची ही हेटाळणी सर्वस्वी गैर आहे आणि ती कसब्यात भाजपला महागात पडेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.पोर्शे कार अपघात, ड्रग्जच्या विळख्यात पुणे, कोयता गँग, खंडणी वसुली , बेरोजगारीने हैराण पुणे अशा प्रकरणात हेमंत रासने झोपलेले का ? असा सवाल हि त्यांनी केला .कसब्यातून दिले गेलेले हेच ते स्वराज्याचे आणि सुराज्याचे स्वप्न होते काय ?

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज कसबा मतदारसंघात धंगेकर यांच्यासाठी पदयात्रा काढली. लाल महालात माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांनी पदयात्रेला प्रारंभ केला. नंतर त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचेही दर्शन घेतले. अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची आरतीही डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाली. तसेच मंडई परिसरात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले. तसेच मंडईतील व्यापाऱ्यांशीही संवाद साधला.

यानंतर त्यांनी बाबू गेनू चौकात क्रांतिवीर बाबू गेनू यांच्या स्मृतिस्थळा पुष्पहार अर्पण करून वंदन केले. तेथेच सभा घेऊन धंगेकर यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. कोल्हे म्हणाले की, गेल्या वेळी भाजप नेत्यांनी ‘हू इज धंगेकर?’ असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न भाजपाला महागात पडला. धंगेकर यांनी भरीव कार्यांने आपली येथे ओळख निर्माण केली आहे. शहरातील अवैध पब्ज, मादक द्रव्यांचा पुणे शहराला पडत असलेला विळखा, पोर्शे कार अपघात प्रकरण या महत्त्वाच्या प्रश्नांसह धंगेकर यांनी आमदारकीच्या दीड वर्षाच्या काळात लोकांच्या प्रश्नांवर तळमळीने काम केले आहे. त्यांच्या या कामांची नाटक म्हणून अवहेलना करणे भाजपला महागात पडणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. हेमंत रासने यांनी महापालिकेचे दोनदा १५ हजार कोटीचे बजेट केले पण साधे सीसी टीव्ही कॅमेरे निट बसवले नाही, सिग्नल सिंक्रोनायझिंग करता आले नाही मग १५ हजार कोटीच्या बजेटचे केले काय ? याच काळात तेथील सुरक्षा रक्षकांना देखील कायम सेवेत सामावून घेतले नाही .शीपाई आणि सुरक्षा रक्षक यांची पिळवणूक महापलिकेत करण्यात आली .

आमदार रवींद्र धंगेकर यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी आमदारकीच्या १६ महिन्यांच्या काळात केलेल्या कामाची माहिती देतानाच यापुढील काळात अधिक जोमाने येथील जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मोहन जोशी, अभय छाजेड, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात, बाळासाहेब मारणे, संजय मोरे, विशाल धनवडे, गणेश नलावडे, अक्षय माने आदी उपस्थित होते.

यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात बाइक रॅली काढण्यात आली. त्यात शेकडो तरुण सहभागी झाले. कसबा गणपती येथून रॅलीस सुरुवात झाली. दारूवाला पूल, नाना पेठ, सुभानशा दर्गा, राष्ट्रभूषण चौक, एसपी कॉलेज, राजेंद्रनगर, दत्तवाडी, अलका टॉकीज चौक, शनिवार पेठ, कागदीपुरा व कसबा मेट्रो स्टेशनपाशी रॅली समाप्त झाली.

“पुढील पाच वर्षांत सर्वाधिक आमदार निधी सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरणार” – आमदार भिमराव तापकीर

पुणे-खडकवासला मतदारसंघाचेभारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणिआमदार भिमराव तापकीर यांनी आज धनकवडी भागातील प्रचार दौऱ्यात आपल्या आगामी विकास योजनांबाबत महत्वाचे विधान केले. “पुढील पाच वर्षांत खडकवासला मतदारसंघातील सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्या आणि ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आमदार निधी मोठ्या प्रमाणावर वापरणार आहे,” असे तापकीर यांनी जाहीर केले.

त्यांच्या प्रचारादरम्यान केशव कॉम्प्लेक्स, पंचरत्न, राजमुद्रा, ओंकार पार्क, राघव नगर, श्री मंगल, नर्सेस टाऊन, गणेश नगर, सह्याद्री नगर, आदर्श नगर, संभाजीनगर, वनराई कॉलनी, रामचंद्र नगर, ज्योती पार्क या भागांना भेट देऊन त्यांनी येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि आपल्या कामगिरीचा आढावा दिला.

गेल्या पाच वर्षांत 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प खडकवासला मतदारसंघात आणण्यात यशस्वी झाल्याचा उल्लेख करताना, त्यांनी महत्त्वाचे प्रकल्प उदा. मेट्रो प्रकल्प, पश्चिम रिंग रोड, चांदणी चौक उड्डाणपूल, आणि जलसंपदा सुधारणा यांसारख्या उपक्रमांचे यशस्वी नेतृत्व कसे केले हे सांगितले.

महत्वाचे मुद्दे:

सिंहगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर.

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी.

नागरी आणि ग्रामीण भागांसाठी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा.

सोसायट्यांच्या सोलर प्रकल्पांसाठी विशेष निधी उपलब्ध.

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 32 गावांमधील मालमत्ता कराचा प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न.

तापकीर यांचा पुढील दृष्टीकोन:
“खडकवासल्याचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आहे. येत्या काळात सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्या, आणि ग्रामीण भागांसाठी पाणीपुरवठा, जलसंधारण, सौरऊर्जा, सुरक्षा व्यवस्थापन, आणि अन्य सुविधा विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार आहे. नागरिकांच्या गरजा प्राधान्याने पूर्ण करणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” असे तापकीर यांनी स्पष्ट केले.

प्रचार दौऱ्यात माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आप्पासाहेब धावणे, युवराज रेणूसे, अभिषेक तापकीर, सचिन बदक, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले आणि महायुतीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

ग्रामीण भागासह नागरी क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार व्यक्त करत, तापकीर यांनी चौथ्या विजयासाठी जनतेचा आशीर्वाद मागितला.

महायुतीच्या विकासावर जनतेचा विश्वास– सिद्धार्थ शिरोळे

पुणे, दि. १७ नोव्हेंबर, २०२४ : ‘”महायुती सरकारने देशातील सर्वाधिक ५२ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. वेदांता, टाटा एअरबस, फॉक्सकॉनसारखे प्रकल्प महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्याच काळात राज्याबाहेर गेले. काँग्रेस आघाडी वारंवार खोटे बोलत असली,तरी त्यामुळे मतदार भ्रमित होणार नाहीत. मतदारांचा महायुतीने केलेल्या विकासावर विश्वास आहे, असा विश्वास शिवाजीनगरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला. शिवाजीनगर मतदारसंघात आयोजित युवा मेळाव्यात ते बोलत होते. तरुण मतदार, महिला आणि नागरिकांची या वेळी प्रचंड गर्दी होती. याबरोबरच खडकी बाजार व पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमांना शिरोळे यांनी उपस्थिती लावली.    
यावेळी बोलताना आमदार शिरोळे म्हणाले, ‘‘२०१४ ते २०१९ या कालखंडात भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकावर ठेवले. २०१९ नंतर जनादेशाचा अपमान करून सत्तेत आलेले आघाडी सरकार इतके निष्क्रिय होते, की अडीच वर्षांत त्यांनी गुंतवणूक समितीची बैठकसुद्धा घेतली नाही. हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवून भाजपा महायुतीला विजयी करण्याचा संकल्प आता जनतेने केला आहे.’’  

मतदारांना फसवता येईल, असे महाविकास आघाडीला वाटते. पण जनता सजग आहे. मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, महामार्ग, उड्डाणपूल, कोस्टल रोड, अटल सेतू सागरी मार्ग, वाढवण बंदराची मुहूर्तमेढ असे शेकडो मेगा प्रोजेक्टस् भाजपा महायुती सरकारने केले. महाराष्ट्राच्या पुढच्या पन्नास वर्षांच्या अर्थकारणाचा पाया यातून रचला गेला आहे. गेल्या साडेसात वर्षांच्या सत्ताकाळातील प्रगतीचा हा वेग महाराष्ट्राने गेल्या कित्येक दशकात गाठला नव्हता, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

‘‘दीर्घकाळ राज्याच्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसंख्येची प्रचंड वाढ होत असताना पायाभूत सुविधा वेळेत निर्माण केल्या नाहीत. त्यामुळे शहरीकरणाच्या अनेक समस्या आज निर्माण झाल्या. त्यावर भाजपा महायुतीच गांभीर्याने काम करीत आहे. पुढच्या पिढ्यांसाठी रोजगारक्षम, विकासाभिमुख महाराष्ट्र घडवायचा असेल, तर भाजपा महायुती सरकारला पुन्हा निवडून दिले पाहिजे, हे आता मतदारांनी ओळखले असल्याचे शिरोळे म्हणाले.

जातीपातीत विष कालवून सत्ता मिळविण्याचे महाविकास आघाडीचे जुनाट राजकारण आजच्या पिढीने फेकून दिले आहे. त्यांना रोजगार हवे आहेत. चांगले आयुष्य जगायचे आहे. स्वतःच्या परिवारासाठी आनंदी शहरे त्यांना हवी आहेत. वाहतुकीच्या सुविधा हव्या आहेत. सुरक्षितता पाहिजे. हे सगळे देण्याची क्षमता भाजपा महायुतीकडे आहे. म्हणूनच सुजाण मतदार प्रचंड संख्येने घराबाहेर पडून भाजपा महायुतीला मतदान करण्यास उत्सुक आहे याकडे शिरोळे यांने लक्ष वेधले.

मतदानानंतर केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करा व मिळवा प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून त्यासाठी मतदान केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममधील माहिती अचूक भरावी तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा. त्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेल वर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

पुणे: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मतदाराला प्रमाणपत्र मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाची बाब असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. मतदारांना मतदानाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला असून त्याचे स्टीकर्स सर्व विधानसभा मतदार संघांना वितरीत करण्यात आले आहेत.

मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून त्यासाठी मतदान केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममधील माहिती अचूक भरावी तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा. त्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेल वर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ.‍ दिवसे यांनी केले आहे.

देश विश्वगगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम : नितीन गडकरी

पुणे : कोणाला आमदार खासदार करण्यासाठी नाही तर भारतीय जनता पक्ष हा देश विश्वगगुरु झाला पाहिजे या विचाराने काम करतो आहे,असे केंद्रीय परिवहन आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे सांगितले.‌

महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. खासदार मेदा कुलकर्णी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर तसेच पुनित जोशी, वर्षा डहाळे डॉ. संदीप बुटाला, मोनिका मोहोळ, जयंत भावे, किरण साळी, सचिन थोरात, मंदार जोशी आदी कार्यकर्ते व्यासपीठावर होते.

देशाच्या प्रगतीसाठी पैशांची गरज नसते तर इमानदारीने काम करणाऱ्यांची गरज असते. त्यासाठी डबल इंजिन सरकार राज्यामध्ये आले पाहिजे. प्रश्न सोडवणारे नेते म्हणून उच्चांक मोडणाऱ्या मतांनी चंद्रकांत पाटील यांनी निवडून येतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडकरी म्हणाले की गरीबी हटाव अशी घोषणा झाली, पण गरीबी कोणाची हटली नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हे नवीन आर्थिक धोरणामुळे लोकप्रिय झाले आहे.‌ देशात परिवर्तन सुरू झाले आहे संशोधन आणि शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे या प्रयत्नांसाठी जनतेच्या पाठबळाचे अपेक्षा असते ती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी पूर्ण केली पाहिजे.

आम्ही संविधान बदलणार नाही. ते बदलण्याची कोणाची हिंमत नाही. संविधानातील मुलभूत तत्वे बदलता येत नाही ज्यांनी पूर्वी संविधान तोडण्याचे काम केले तीच काँग्रेस आता आम्ही संविधान सोडत आहोत असा अपप्रचार करत आहे,अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले ” ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करणारी आहे. काँग्रेसच्या काळामध्ये लाखो करोड रुपयांची गुंतवणूक वाया गेली. सिंचन सुविधा नव्हत्या, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होते. पाण्याच्या नियोजनाकडे लक्ष दिले गेले नाही .‌ १९७० पासून २३ राज्यांची आपापसात पाण्यावरून भांडणे होती. त्यातली १७ भांडणे मी त्यांच्यात मध्यस्थी करून मिटवली
पाकिस्तान मध्ये जाणारे नद्यांचे पाणी आज पंजाब हरियाणाला मिळते आहे. त्यामुळे त्यांच्यातला पाण्याचा प्रश्न सुटला.”

पूर्वी पुणे शहर स्वच्छ हवा असलेले आणि सुंदर होते. आता पुण्यात प्रदूषण खूप झाले आहे. त्याबद्दल एक लाख कोटींची कामे झाल्याशिवाय राहणार नाहीत. बस हाॅस्टेस आणि खानपान सुविधा असलेली बस पुण्यातही सुरू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

समाजात जातीय तिथे विष पेरले जात आहे त्याला काही अर्थ नाही. वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत पण संस्कृती एकच आहे, असे सांगून गडकरी यांनी वेस्ट टु वेल्थ आदी कल्पनांचा उहापोह केला.

लोकांची फसवणूक करणाऱ्या एका कंपनीला न्यायालयात संरक्षण देण्याचे काम आघाडी सरकारने केले : माधव भंडारी

पुणे –
क्यूनेट कंपनीच्या माध्यमातून राज्यात साडेनऊ ते दहा लाख लोक आणि देशात सुमारे ५० लाख जणांची गुंतवणुकीच्या माध्यमातून ५० हजार कोटी पेक्षा अधिकची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा प्रयत्न करून आघाडी सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. फडणवीस सरकारने संबंधित कंपनीवर कारवाई सुरू केली होती. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने या प्रकरणात आरोपींना सहाय्य केले आहे .संबंधित कंपनीचे तीन मुख्य संचालकांपैकी एक संचालक श्रीलंकेत रहिवासी असून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांशी त्याचा संबंध आहे अशा लोकांना आघाडी सरकार पाठबळ का देते याबाबत त्यांनी खुलासा करावा. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी याबाबत राज्यपाल यांच्याकडे मागणी करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, गुरुप्रित सिंग, हेमंत लेले ,पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

भंडारी म्हणाले, आघाडी सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील राहुल चिटणीस यांनी तत्कालीन राज्य सरकारच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक प्रमुख यांना एक मसुदा पाठवला होता. त्यात रिकाम्या जागा ठेऊन सह्या करून मसुदा पाठवण्यास सांगितले. त्यावर २९/२/२०२० रोजी एसआयटी प्रमुख दिलीप देशमुख यांनी दोन पानी उत्तर पाठवले. तुमचे मसुद्याचे पत्र न्यायालयात हजर केले तर ते खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करणे माझ्याकडून घडेल. मी जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरेल त्यामुळे मी सही करणार नाही. त्यावर राज्य सरकारने एसआयटी बरखास्त केली आणि अधिकाऱ्यांची बदली केली, लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या एका कंपनीला न्यायालयात संरक्षण देण्याचे काम आघाडी सरकारने केले आणि गुन्हेगार यांना पाठीशी घातले.
डॉ झाकीर नाईक यांना परदेशात पळून जाण्यास मदत ही क्यूनेट कंपनीने केली आहे. चिटणीस हे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण, पालघर साधू हत्याकांड मध्ये आघाडी सरकारकडून बाजू मांडत होते. माविआ मधील सर्व नेत्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी याबाबत खुलासा करावा.
व्होट जिहाद बाबत शरद पवार टीका करतात याबाबत बोलताना भंडारी म्हणाले, खासदार शरद पवार आपण पूर्वी नेमके काय केले हे विसरून जातात. धर्माच्या नावावर मते द्या असे आव्हान त्यांच्या पक्षासाठी केले गेले तर त्याबाबत धार्मिक राजकारण नसते. पण व्होट जिहाद बाबत ते दुटप्पी राजकारण करत आहे. पवार हे सर तन से जुदा होगा याबाबत कधी स्वतःची भूमिका मांडत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील पवार यांच्या सोबत राहून त्यांच्या सारखे बोलायला लागले आहे.

मातंग एकता आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

; घरोघरी जावून प्रचार करत विजयी करण्याचा संकल्प

पुणे : मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटना आणि मातंग समाजातील विविध संघटनेच्या वतीने महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांना अविनाश बागवे यांचे नेतृत्वात जाहीर पाठिंबा देण्यात आला.

मातंग एकता आंदोलन आणि मातंग समाजातील विविध संघटना सुरुवातीपासून महाविकास आघाडी चे घटक म्हणून सोबत आहोत. भाजपाने मातंग आणि दलित समाजाची मोठ्या प्रमाणात फसविण्याचे काम केले आहे. लहुजी वस्ताद स्मारक, आण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच विविध शासकीय समित्यांमध्ये केवळ लोकांचा वापर करून दिशाभूल केली आहे. त्यामुळे मातंग समाज भाजप ला कधीही माफ करणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील अश्विनी कदम यांना विजयी करण्यासाठी जीवाची रान करणार आहे. अश्विनी कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत मतदारसंघातील सर्व वाड्या वस्त्या आणि झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्धार करत भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती अविनाश बागवे यांनी व्यक्त केली.

यावेळी मातंग एकता आंदोलन राज्य समन्वयक विठ्ठल थोरात,महिला आघाडी उपाध्यक्ष रुक्मिणी धेडे, रावसाहेब खवळे, राजू गायकवाड, सचिन जोगदंड आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नितीन कदम यांनी सर्वांचे आभार मानत मातंग एकता आंदोलन आणि मातंग समाजातील विविध संघटनांच्या कायम ऋणात असल्याची भावना व्यक्त केली.

ज्ञानपीठ’ विजेत्यांचे स्मरण देणारे संग्रहालय उभारणार: अश्विनी कदम

पुणे : जनता वसहतीमधील अनेक तरुण कामासाठी, व्यावसायानिमित्त बाहेर जातात, त्यांच्या घरी परतण्याच्या वेळा मध्यरात्रीच्या असतात, त्यांना पोलिसांकडून अनेकदा हटकले जाते. त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. या त्रासातून सुटका होण्यासाठी त्यांना ओळखपत्र देण्याचा आग्रह धरणार. तसेच साहित्यक्षेत्रातील ‘ज्ञानपीठ’ विजेत्यांचे स्मरण करणे आणि त्यांची ओळख सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी, भारतीय भाषांना वैभव प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानपीठ विजेत्यांची सर्वांगीण माहिती असणारे संग्रहालय पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये उभारणार असल्याचे महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी सांगितले.

महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत मधील गल्ली नंबर 1 ते 108 याठिकाणी नागरीकांशी संवाद आणि आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी संजय बालगुडे, विशाल धनवडे स्वातीताई पोकळे,बबलु जाधव,चंदन,साळुंखे,हेमंत राजभोज, निलेश बोराटे, राकेश नामेकर,इंद्रजीत शिंदे,रितेश परमार,पिरमोद शेलार,बंटी शेलार,बाबा मासोळे,सोहम मासोळे,केतन नागडे,दिलीप राऊतआदी महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे शहरात महिला स्वच्छतागृहाचा विषय सभागृहात प्रथम मांडणाऱ्या जागरूक लोकप्रतिनिधी आणि सहकारनगर मध्ये महिलांसाठी स्वतंत्र जिमची संकल्पना पूर्णत्वास नेणाऱ्या आदर्श नगरसेविका म्हणून अश्विनी नितीन कदम यांचे काम आम्ही पाहिले आहे. त्या आमदार म्हणून पर्वती विधानसभेचा विकासात्मक कायापालट करतील.

  • सीमा महाडिक
    सचिव, काँग्रस कमिटी सोशल मीडिया महाराष्ट्र

सरहद महाविद्यालय व इतर महाविद्यालयांत मतदार जनजागृतीचे उपक्रम

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सरहद महाविद्यालय आणि इतर महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून मतदार जनजागृतीचे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले. निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम पार पडले. स्वीप टीमचे अधिकारी प्रा. शरदचंद्र गव्हाळे यांनी या उपक्रमांचे नियोजन केले.या कार्यक्रमांतर्गत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) प्रणालींचा परिचय देत मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मतदार याद्यांमध्ये नावनोंदणी, ऑनलाईन सुविधांचा वापर, आणि मतदानाच्या प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सरहद महाविद्यालयाबरोबरच विविध महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी लक्ष्मण लांडे, दिवटे सर आणि इतर सहकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
“मतदार जागृतीसाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांच्या सक्रिय सहभागाने लोकशाही मजबूत होते,” असे निवडणूक अधिकारी डॉ. माने यांनी सांगितले. या कार्यक्रमांमुळे युवकांमध्ये आणि पालकांमध्ये मतदानाविषयी सकारात्मकता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी बुडणार; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची टीका

काँग्रेस ज्याच्या गळयात पडते त्याचे बुडणे निश्चित

सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन

पुणे, दि. १६ नोव्हेंबर, २०२४ : काँग्रेस पक्षाची स्थिती नाजूक बनली आहे, त्यामुळे ते ज्यांच्या गळ्यात पडतात त्या पक्षांचे बुडणे निश्चित आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळयात पडली आहे, त्यामुळे या पक्षांचे बुडणे नक्की असल्याची टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली. काँग्रेसची स्थिती बिकट असून ती आपल्या पायावर पुन्हा उभी राहू शकत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी सिंह यांच्या सभेचे आयोजन खडकीतील आलेगावकर शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे महाप्रांत प्रमुख राजेश पांडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, माजी नगरसेविका सुनीता वाडेकर, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अॅड. एस. के. जैन आदी उपस्थित होते.

यावेळी राजनाथ सिंग यांचा शिंदेशाही पगडी घालून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देऊन सन्मान करण्यात आला. या सभेला मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिरोळे यांच्या विकासनाम्याचे राजनाथसिंग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

महाविकासआघाडीमध्ये सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांना काय झाले आहे, त्यांनी कोणाच्या बरोबर समझोता केला आहे, असा सवाल राजनाथसिंग यांनी यावेळी उपस्थित केला. महाआघाडीचे सरकार सत्तेमध्ये असताना महाराष्ट्र त्यांच्यासाठी एटीएमचे मशीन होता, त्यांनी राज्याचे काय भले केले. काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला काही राज्यामध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामध्ये हरियाणा, महाराष्ट्र यांचा समावेश होता. नुकत्याच हरियाणामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिथल्या जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवत सत्ता दिली. महाराष्ट्रामध्ये देखील त्याचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणार आहे. सरकार चालवण्याची कला भारतीय जनता पक्षाकडे असल्याचे राजनाथसिंग यावेळी म्हणाले.

दहा वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या सरकारने केलेल्या कामामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारत जे बोलतो ते जग कान देऊन ऐकत असतो. देशाने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीमध्ये भारताने जगात पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. २०२७ मध्ये भारत तिसऱ्या स्थानावर येईल, असेही सिंग यांनी सांगितले.

केंद्र सरकारने राबवलेल्या उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना यांचा जनतेला फायदा होत आहे. राज्यात काम करणारे महायुतीच्या सरकारने देखील जनहिताची कामे केली आहेत. भारतासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे, काँग्रेसने त्यांचा योग्य सन्मान केला का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. संरक्षण खात्याच्या जमिनीमुळे तो प्रश्न प्रलंबित राहिला होता, पण राजनाथसिंग यांनी त्यामध्ये लक्ष घातल्यामुळे हा प्रश्न सुटल्याचे सांगत सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे अनेक प्रश्न आहेत. निधीच्या कमतरते अभावी इथल्या कर्मचाऱ्यांचे पगार, नागरी समस्या यांची सोडवणूक करणे कठीण बनले आहे. खडकीचा विकास व्हायचा असेल तर त्याचा पुणे महापालिकेत समावेश करण्याची आवश्यकता आहे, त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून आपल्याकडे पाठवू.” महायुतीच्या सरकारने खडकीच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्याचा वापर करून अनेक प्रश्न सोडवले असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.

कोथरुडमधील प्रभाग १३ मध्ये घुमला जय श्रीरामचा नारा

चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पारंपरिक वेशात महिला सहभागी

क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि स्थापत्य अभियंता संघटनेचा पाठिंबा

पुणे : भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. या रॅलीत पारंपरिक वेशात महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सु. बे. स्थापत्य अभियंता संघटनेने आपला पाठिंबा पाटील यांना जाहीर केला.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसच बाकी आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना सर्वच स्तरातून व्यापक जनसमर्थन मिळत आहे. जागोजागी होणाऱ्या कॉर्नर सभा, सोसायटी मिटिंग, घरोघरी संपर्क यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध संघटनांकडूनही जाहीर पाठिंबा दिला जात आहे. आज क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सु. बे. स्थापत्य अभियंता संघटनेने आपला पाठिंबा पाटील यांना जाहीर केला. संघटनेचे अध्यक्ष पाठिंब्याचे पत्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

आज कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत ‘जय श्रीराम’ च्या घोषणेसह हात उंचावून प्रतिसाद मिळाल्याने रॅलीत उत्साह संचारला होता. तर प्रभागातील मंडळांकडून ही पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, या संपूर्ण रॉलीमध्ये अनेक महिला पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या.

एरंडवण्याचे ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली. या रॉलीत भाजपाचे माजी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, अग्रसेन खिलारे, अमोल डांगे, अनुराधा एडके, गिरीश खत्री, मंदार बलकवडे यांच्यासह भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संत नामदेव महाराज सायकल वारीचे पुण्यात उत्स्फूर्त स्वागत

संत नामदेव महाराज यांच्या  ७५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान सायकल वारीचे आयोजन

पुणे :  संत नामदेव महाराज यांच्या  ७५४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आल्यावर या सायकल वारीचे  श्री नामदेव शिंपी समाज पुणे लष्कर, नामदेव समाजोन्नती परिषद व पुणेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी लक्ष्मी रोड मार्गे बुधवार पेठ येथील संत नामदेव मंदिरापर्यंत नामदेव महाराजाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली होती.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य, पालखी सोहळा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, श्री नामदेव दरबार कमिटी श्री क्षेत्र घुमान (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने या वारीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे यांनी सोहळ्याचे संयोजन केले आहे. पालखीचे स्वागत पुणे विभागीय उपाध्यक्ष रणजित माळवदे, जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, ना स.प. पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, प्रशांत सातपुते, सुभाष पांढरकामे, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे, अक्षय मांढरे यांनी केले.

श्री क्षेत्र पंढरपूरहून या सोहळ्यास प्रारंभ झाला. सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात निरा, जेजुरी, सासवड, हडपसर मार्गे वारी पुणे शहरात दाखल झाली. पालखी सोहळा व सायकल वारीची मिरवणूक बुधवार पेठ येथील नामदेव मंदिर येथे आल्यानंतर महिलांनी ओवाळून व पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. यावेळी सायकल स्वारांचा सत्कार देखील करण्यात आला.

यावेळी वारीतील सहभागी सायकल स्वारांना मेडिकल किट देण्यात आले. सायकल स्वारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नृत्य व सायकल वारीवर हिंदी गीताचे सादरीकरण करण्यात आले. या गीताची रचना करणारे सुधाकर मेहेर व संगीतकार हरीश धोंगडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पादुकांची पूजा करून महाआरती करण्यात आली. यावेळी बुधवार पेठ शिंपी समाज व संस्थेचे अध्यक्ष कैलास देवळे, चिटणीस डॉ. लक्ष्मण कालेकर यांच्यावतीने उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व तुळशी विवाह संपन्न

पंच पक्वांन्नाच्या नैवेद्याचे सामाजिक संस्थांना दान

पुणे :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव, तुळशी विवाह आणि ५६ भोग चा नैवेद्य करण्यात आला. यावेळी विविध पंच पक्वान आणि फळाची आरास बाप्पा समोर साकारण्यात आली होती.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने नेहमी प्रमाणे सामाजिक भान राखून बाप्पाला दाखविण्यात येणाऱ्या नैवद्यातील सर्व मिठाई, फराळ आणि फळे सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दत्तवाडी येथील देवतारू आश्रम आणि मुळशी खोऱ्यातील कातकर वस्ती वरील ३०० विद्यार्थ्याना शिक्षण देणाऱ्या आणि दररोज ९० मुलांना जेवण पुरविणाऱ्या पौड येथील ‘डोनेट ऐड’ संस्था आणि भाजे येथील बालग्राम केंद्र यासर्वांना हे सर्व नैवेद्यचे पदार्थ देण्यात येणार आहे.

दिव्यांच्या सजावटीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे मंदिर उजळले
त्रिपुरारी पौर्णिमेंनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात दिवे लावून फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. काचेच्या ग्लासमधील दिव्यांनी संपूर्ण मंदीर उजळून निघाले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे सर्व पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.