पुणे- पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल रोडच्या भिंतीतून ४ महिन्यातच पाणी झिरपू लागले आहे.
यावरून, केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एनडीए – भाजप सरकारने घाईत सर्व प्रकल्प उरकल्याचे सिद्ध होते. एवढेच नव्हे तर यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचेही उघड झाले आहे. कारणास्तव, भाजपची सारी सरकार हि ” गळती सरकार ” असल्याचा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव गाडगीळ यांनी केला आहे.
केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पातच नव्हे तर भा. ज. प. / युतीच्या गैरकारभार – गैरनियोजन यामुळे देशाच्या
अर्थव्यवस्थेलाही गळती लागली असल्याचे स्पष्ट होत आहे. मोठा गाजावाजा झालेल्या ” स्मार्ट सिटी ” योजने
अंतर्गत सुमारे १५ हजार कोटींचे प्रकल्प अजूनही अपुरे आहेत. एकूण सुमारे ८ हजार प्रकल्पांपैकी जवळपास
६५०० प्रकल्प कसेबसे पुरे होण्याच्या मार्गावर आहेत तर उर्वरित सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम
थोडीफार चालू झाली आहेत.
फसलेल्या नोटबंदी व जि. एस. टी. मुळे एकीकडे गेल्या वर्षभरात ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर
दुसरीकडे दिड कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. गेल्या वर्षभरात ” सी एन जी ” २५ रुपयांनी महाग झाला आहे तर
रेल्वेच्या गलथान कारभारामुळे गेल्या ४ वर्षात तब्ब्ल ४० रेल्वे अपघात झाले आहेत.
परिणामी, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदानातच गळती लागल्याचे दिसून येईल असे
प्रतिपादनही गाडगीळ यांनी केलं आहे.