; घरोघरी जावून प्रचार करत विजयी करण्याचा संकल्प
पुणे : मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटना आणि मातंग समाजातील विविध संघटनेच्या वतीने महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांना अविनाश बागवे यांचे नेतृत्वात जाहीर पाठिंबा देण्यात आला.
मातंग एकता आंदोलन आणि मातंग समाजातील विविध संघटना सुरुवातीपासून महाविकास आघाडी चे घटक म्हणून सोबत आहोत. भाजपाने मातंग आणि दलित समाजाची मोठ्या प्रमाणात फसविण्याचे काम केले आहे. लहुजी वस्ताद स्मारक, आण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच विविध शासकीय समित्यांमध्ये केवळ लोकांचा वापर करून दिशाभूल केली आहे. त्यामुळे मातंग समाज भाजप ला कधीही माफ करणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील अश्विनी कदम यांना विजयी करण्यासाठी जीवाची रान करणार आहे. अश्विनी कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत मतदारसंघातील सर्व वाड्या वस्त्या आणि झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्धार करत भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती अविनाश बागवे यांनी व्यक्त केली.
यावेळी मातंग एकता आंदोलन राज्य समन्वयक विठ्ठल थोरात,महिला आघाडी उपाध्यक्ष रुक्मिणी धेडे, रावसाहेब खवळे, राजू गायकवाड, सचिन जोगदंड आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नितीन कदम यांनी सर्वांचे आभार मानत मातंग एकता आंदोलन आणि मातंग समाजातील विविध संघटनांच्या कायम ऋणात असल्याची भावना व्यक्त केली.