Home Blog Page 577

दोन दिवसांत तीन मंत्र्यांसह ९ आमदारांच्या घरांवर हल्ले,आमदाराला भरचौकात बांधून मारहाण,आमदाराचे घर पेटवून दिले …

0

गुवाहाटी-मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यातील सहा जिल्ह्यांत रविवारीही तणाव होता. रविवारी सायंकाळी संतप्त जमावाने भाजप आमदाराचे घर पेटवून दिले. एका अपक्ष आमदाराच्या इमारतीत तोडफोड केली. दोन दिवसांत तीन मंत्र्यांसह ९ आमदारांच्या घरांवर हल्ले झाले. त्यामुळे प्रशासनाने या जिल्ह्यांतील संचारबंदी शिथिल केली नाही. सात जिल्ह्यांत दुसऱ्या दिवशीही इंटरनेट बंद होते.

संपूर्ण खोऱ्यात पहिल्यांदाच मोठा सुरक्षा ताफा तैनात आहे. म्हणूनच अशा अनेक मंत्री-आमदारांनी नातेवाइकांना राज्याबाहेर हलवले आहे. गेल्या ५६५ दिवसांपासून हिंसाचार सुरूच आहे. त्याची झळ राज्यातील भाजप सरकारपर्यंत पोहोचली आहे. सरकारमधील नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) रविवारी सायंकाळी सत्ताधारी भाजप सरकारचा पाठिंबा काढला. पक्षाने भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवून तसे कळवले. राज्याच्या विधानसभेत एनपीपीचे ७ आमदार आहेत. भाजपचे १४ व इतर पाच आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहेत. एक दिवस आधी भाजपच्या १९ आमदारांचे एक पत्र समोर आले होते. त्यात मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी आहे.
एनपीपीचे एक आमदार म्हणाले, शनिवारी मैतेईच्या आंदोलकांनी एनपीपी आमदार रामेश्वर सिंह यांना घरातून बाहेर काढून ट्रॅफिक पाॅइंटला बांधून बेदम मारहाण केली. त्यात आमदार गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षा व्यवस्थेची ही स्थिती आहे. येथे सामान्य नागरिकही सुरक्षित नाही. म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये राहण्याची इच्छा नाही.

रविवारी सकाळी पाेलिसांनी आसामच्या कछार जिल्ह्यातील बराक नदीपात्रातून आणखी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. परंतु मृतदेहाची आेळख पटलेली नाही. परंतु बेपत्ता सहा मैतेईंपैकी ही एक असावी, असा संशय आहे. मृतदेह सापडलेले ठिकाण जिरीबामच्या सीमेजवळ आहे. आणखी एक मृतदेह आढळल्याने जिरीबाममध्ये दहशत व तणावपूर्ण स्थिती आहे.

६० जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपचे ३२ आमदार आहेत. २०२२ मध्ये बिरेन सिंह सीएम बनले तेव्हा भाजपशिवाय नागा पीपल्स फ्रंटचे ५, एनपीपीचे ७, जदयू-५, ३ अपक्षांसह ५२ आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. त्यात २७ मैतेई व ७ कुकी आमदार आहेत. आता ७ एनपीपी व ३ अपक्षांनी पाठिंबा काढून घेतला. २०२३ पासून ७ कुकी आमदार बाहेर आहेत. म्हणजे एकूण १७ आमदार बाहेर पडले. आता भाजपसोबत ३५ आमदार आहेत. बहुमतासाठी ३१ संख्या हवी. शिवाय भाजपच्या १४ आमदारांनी बिरेन यांना हटवण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. त्यामुळे सरकार अडचणीत येऊ शकते.

शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर प्रकरणात दिल्लीत महत्त्वाची बैठक घेतली. सोमवारीही ते बैठक घेतील. सूत्रानुसार गृह मंत्रालयाने रविवारी सायंकाळी कुकी समुदायाने १० आमदारांशी संपर्क साधला. त्यात ७ भाजपचे आहेत.१५ ऑक्टोबरला गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कुकी-मैतेई तसेच नागा नेत्यांसोबत बैठक घेतली होती. मणिपूरमध्ये आता गोळीबार होणार नाही, असे ठरले होते. परंतु तेव्हापासून ८-१० हिंसक घटना घडल्या.

ज्या पक्षाने मला मोठं केलं; त्या पक्षाला मोठं करा!- मुरलीधर मोहोळ

चंद्रकांतदादांनी मुळशी तालुक्याला ५३५ कोटीचा निधी दिलाय

पुणे : मुळशी करांनी ठरवलंय आणि ते खरं झालं नाही असं कधीही झालं नाही. भारतीय जनता पक्षाने तुमच्यातल्या एका मुलाला संधी देऊन मोठं केलंय. त्यामुळे पक्षालाही आता मोठं करावं, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केले. तसेच, चंद्रकांतदादा पाटील यांनी पालकमंत्री आणि मंत्री म्हणून आतापर्यंत आपल्या तालुक्यातील विकासकामांना ५३५ कोटीचा भरीव निधी दिला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

भोर-मुळशी- मावळ तालुक्याचा मेळावा कोथरूडमधील आशिष गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील, खडकवासल्याचे भीमराव तापकीर, भोर मुळशीचे शंकर मांडेकर, बाबासाहेब कंधारे, अंकुश मोरे, माऊली साठे, धैर्यशील ढमाले, डॉ. संदीप बुटाला, गोविंद आंग्रे, सुशील मेंगडे, गणेश वर्पे, अजय मारणे, नितीन शिंदे, निलेश शिंदे, सौ. मोनिका मोहोळ, अल्पना वर्पे यांच्या सह मुळशी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की,‌ मुळशी करांनी ठरवलंय आणि ते खरं झालं नाही असं कधीही झालं नाही. २०१७ ची निवडणुकीत मुळशीकरांच्या निश्चयावर मी नगरसेवक होऊन राजकीय प्रवास सुरू झालो‌. आज तुमचा मुळशीकर माननीय नरेंद्र मोदीजींसोबत काम करतोय‌. तुमचा माणूस मोठा होतोय. हे सर्व भारतीय जनता पक्षाने घडवलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठं केलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, चंद्रकांतदादा महायुती सरकार मध्ये अडीच वर्षे मंत्री आहेत. या अडीच वर्षाच्या काळात आपल्या तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि सरपंच मुळशीच्या कामासाठी दादांना भेटत होते. त्या प्रत्येकाची कामे दादांनी करुन दिली आहेत. मागच्या काळातही सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ३८८ कोटींची रस्त्याची कामं मुळशीत झाली‌. त्याआधी ६३ कोटी, आणि आता अडीच वर्षात ८४ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे मुळशीच्या विकासासाठी दादांनी खूप योगदान दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, शरद ढमाले यांच्यानंतर शंकर मांडेकर यांच्या रुपाने १५ वर्षांनंतर तालुक्याला नेतृत्व मिळालं आहे. त्यामुळे मुळशीकरांनी विचारांनी एकत्र आलं पाहिजे. उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस संपल्यानंतर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचं आम्ही ठरवलं आहे. शंकरभाऊंचा शून्यातून प्रवास सुरू झालाय. त्यामुळे आता आलेली संधी कोणीही सोडू नये. ज्यांचं कोथरुड आणि खडकवासला अशा शहरी भागात मतदान आहे, त्यांनी शहरात मतदान करावे. तर ज्यांचं ग्रामीण भागात मतदान आहे; त्यांनी जास्तीत जास्त मतदान करुन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड आणि भोर विधानसभा मतदारसंघावर मुळशीकरांचा प्रचंड प्रभाव आहे. २०१९ मध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याची मदत झाली. त्या मेळाव्यात मी म्हटलं होतं. त्यानुसार तशी स्थिती आणण्यात देवेंद्रजी फडणवीस आणि मला संधी मिळाली. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार काम करण्याचा प्रघात आहे.‌ अडीच वर्षापैकी एक वर्षे मला पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं. तेव्हा मुळशीचा जो ही व्यक्ती काम घेऊन आल्यावर, ती पूर्ण केली.

पाटील पुढे म्हणाले की, सध्या मी व्यक्ती विकासावर भर दिलाय. झाल उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबांना मदत केली. त्यासोबतच अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत करतो आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार हे नक्की आहे. हरियाणा मध्ये मतांचा टक्का वाढल्याने एनडीएचं सरकार आलं. हे सर्वेक्षणाच्या पकडीत येत नाही. त्यामुळे मताचा टक्का वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.‌

यावेळी खडकवासला मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर आणि भोर मुळशीचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी आपल्या मनोगतात जास्तीत जास्त मतदान करुन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.‌

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही – एकनाथ शिंदे

मुंबई- लाडकी बहिण योजना आणून ती बंद होऊ देणार नाही असे सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महाराष्ट्रात मतदानाच्या दोन दिवस आधी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले. आज तकशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार हेही निश्चित आहे. एक दिवसापूर्वी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एएनआयशी बोलताना असेच म्हटले होते.मुख्यमंत्री शिंदे यांनी आज तकला सांगितले – काँग्रेसचे धोरण फोडा आणि राज्य करा. राहुल गांधी हे बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार? शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी माझ्या पक्षाची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही, पण उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेससोबत गेले. शिंदे यांनीही पंतप्रधान मोदींच्या ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणेचे समर्थन केले.

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.

स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचाराच्या धडाक्याने बापूसाहेब पठारे गतिमान

पुणे:  
नियोजनबद्ध आखणी,पदयात्रा,धारदार मुद्दे आणि प्रचारसभाच्या धडाक्याने  वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे जोरात असून प्रचारात घेतलेल्या आघाडीने गतिमान झाले आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात  असून, त्यांच्या प्रचारसभांना मिळालेला चांगला प्रतिसाद त्यांना निवडणुकीत आघाडी मिळवूनदेऊ शकणार आहे.काही बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पठारे यांना पाठिंबा जाहीर करणे सुरु ठेवले आहे.

पठारे यांच्या प्रचारात बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, आणि संजय राऊत यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीने उत्साह भरला . त्यांच्या सभांमध्ये वडगाव शेरीतील स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांची आश्वासने दिली जात आहेत. विशेषतः स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट यावर भर दिल्यामुळे मतदारांमध्ये या मोहिमेचा चांगलाच प्रभाव पडत आहे.  

डॉ. विश्वंभर चौधरी (समाजसेवक) आणि अ‍ॅड. असीम सरोदे यांनी देखील पठारे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पठारे यांच्या शाश्वत विकासाच्या, सामाजिक न्यायाच्या आणि समावेशक प्रगतीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.  याशिवाय तरुण नेते नीलेश लंके यांच्या सोबत प्रचार करताना तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांच्या सहभागामुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, वडगाव शेरीच्या भौतिक सुविधा आणि टँकरमुक्त मतदारसंघाचे स्वप्न या मुद्द्यांवर चर्चा रंगत आहे.  पठारे यांच्या प्रचाराचा भर स्थानिक पातळीवरील पाणीटंचाई, वाहतूक समस्या आणि नागरी सुविधा सुधारणा या मुद्द्यांवर आहे. या प्रचारसभांनी मतदारांच्या मनात बदल घडवून आणला असून, त्यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे.  या प्रचारसभांना मिळालेला मोठा प्रतिसाद आणि नामवंत नेत्यांचा पाठिंबा बापूसाहेब पठारे यांना मजबूत उमेदवार म्हणून उभे करत आहे. त्यांच्या ‘जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध नेतृत्व’ या भूमिकेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

खराडीतील टँकरमाफियांना हद्दपार केल्या शिवाय पुन्हा मते मागायला येणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावले

घरच्या सुनेला न्याय न देऊ शकणारे महिलांचे काय संरक्षण करणार ; पठारेंवर जोरदार टिका

पुणे :
खराडी, चंदननगर भागात टँकरवाल्यांचा धंदा चालवायचा म्हणून म्हणून तुम्हाला जाणिवपुर्वक पाण्यापासून वंचित ठेवले गेले. वडगाव शेरी करांनी आता खुप सहन केले. तुम्ही महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांना साथ द्या. टँकरमाफिया वाल्यांना हद्दपार केल्याशिवाय मी पुन्हा मत माघायला येणार नाही असे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
वडगाव शेरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ चंदननगर पवार यांनी जाहिर सभा घेतली. माजी आमदार जगदिश मुळीक यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आमदार टिंगरे यांनी मतदारसंघात केलेल्या ऑक्सीजन पार्क, लोहगाव उपजिल्हा रुग्णालय, शास्त्रीनगर चौक, विश्रांतवाडीतील उड्डाणपूल अशा दिड हजार कोटींच्या विकासकामांची यादीच वाचून दाखविली. महाविकास आघाडीचे उमेदवार बापु पठारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत पवार म्हणाले, 30 वर्ष सत्ता असून त्यांनी या भागातील पाणी प्रश्न सोडविला नाही. बरोबर पाच वर्षांपुर्वी हे महाशय विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात माझ्याबरोबर आणि संध्याकाळी वर्षांवर जाऊन पोहचले, मग ही गद्दारी नाही का असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, या मैदानावर पाच वर्षांपुर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका माई-माउलीने उभा राहून न्याय देण्याची मागणी केली होती. जे घरच्या सुनेला न्याय देऊ शकत नाही ते मतदारसंघातील महिलांना काय न्याय देणार अशी टिकाही पवार यांनी केली. तर आमदार टिंगरे यांचा ज्या घटनेशी संबध नाहीत त्यात त्यांना बदनाम करण्याचे काम केले असे सांगत त्यांनी त्यांची पाठराखण केली.

महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीसह विविध कल्याणीकारी योजना राबविल्या. तुम्ही महायुतीचे सरकार निवडून द्या, पुढच्या पाच वर्ष या योजना सुरूच राहिल याची हमी मी देतो. असे सांगत लोकसभेत संविधान बदलाचा खोटा प्रचार केला गेला. खोटा नेरेटिव्ह पसरविला जात आहे. तुम्ही त्याला बळी पडला, आता तुम्ही नीट विचार करा आणि मतदान करा. आम्ही सर्व अल्पसंख्याकांसह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले असे सांगत येत्या 20 तारखेला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून आमदार सुनिल टिंगरे यांना विजयी करा असे आवाहनही पवार यांनी केले.

चाकणकरांनी थेट पुरावेच सादर केले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट महाविकास आघाडीचे उमेदवार पठारे यांच्या विरोधातील दाखल झालेला एफआरआय न. 144 चा पुरावे सभेत सादर केले. तुमच्या विरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत कुठे भेटायचे सांगा असे थेट आवाहन चाकणकर यांनी दिले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी जाणिवपुर्वक महिलांची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाची सेवा हाच ध्यास- चंद्रकांतदादा पाटील

गोसावी वस्ती, नवीन शिवणे मध्ये पदयात्रा आणि चौक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कोथरुड मधील प्रत्येक नागरिक सुखी आनंदी राहण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून; कोथरुडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असल्याचा संकल्प भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केला. महायुतीच्या प्रचारार्थ आज कोथरूड मधील गोसावी वस्ती, नवीन शिवणे भागात चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, प्रभाग १३ च्या अध्यक्षा ॲड प्राची बगाटे, सरचिटणीस गिरीश खत्री, दिपक पवार यांच्या सह भागातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरूड हे कुटुंब मानून गेल्या पाच वर्षांत जी काही कामे किंवा उपक्रम कोथरुड विधानसभा मतदारसंघात राबविले; ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविले नाहीत. उलट सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केले. त्यामुळे कोथरूडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असून; पुढेही कोथरुड मतदारसंघातील सेवा उपक्रम सुरुच राहणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना ही उच्च शिक्षणाची संधी मिळावी, अशी माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. कोविडनंतर मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी लोकसहभागातून अनेक आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींची शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत केली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला‌. त्यासाठी ९०० कोटींची तरतूद केली. याशिवाय कोविडनंतर अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊन हातभार लावला, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पोटे म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे समाजासाठी समर्पित व्यक्तीमत्व आहे. सेवा आणि समर्पण हाच त्यांचा जीवनाचा मंत्र आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील एकही नागरिक दु:खी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजासाठी समर्पित होऊन करणाऱ्या व्यक्तीच्या पाठिशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मंडलाचे सरचिटणीस दिपक पवार यांनीही चंद्रकांतदादा पाटील यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती देऊन चंद्रकांतदादा पाटील यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.

इस्कॉनसारख्या संस्थांकडून लहान मुलांवर उत्तम संस्कार- चंद्रकांतदादा पाटील

पुणे- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड मधील इस्कॉन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिरात आलेल्या बालसाधकांची वेशभूषा पाहून त्याबद्दल आनंद व्यक्त करत; संस्थेकडून लहान मुलांवर उत्तम संस्कार होत असल्याची भावना व्यक्त केली.

पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. फॅशनच्या नावावर काहीही गोष्टी घडत आहेत. अशा काळात इस्कॉन सारख्या संस्थामुळे भारतीय संस्कृतीची जपणूक केली जाते हे अतिशय कौतुकास्पद आणि आनंददायी आहे, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी पाटील इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू पाद यांचे दर्शन घेतले. तसेच, सुंदर शाम प्रभू यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी इस्कॉनचे संजय भोसले हे देखील उपस्थित होते.

कँटोन्मेंटच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार-रमेश बागवे

रमेश बागवे यांच्या जाहीरनाम्याचे दिमाखात प्रकाशनया निवडणुकीत विजयी झाल्यानंतर करावयाच्या अनेक योजना व विकासकामे याची ब्लू प्रिंट मी तयार केली आहे. रस्तारुंदीकरण, नवीन वाहनतळांची निर्मिती, पुरेशा दाबाने मुबलक पाणीपुरवठा, रस्त्यांवर दिवे, विपुल सार्वजनिक बससेवा, क्रीडांगणांचा विस्तार, जुन्या वाड्यांच्या विकासासाठी नवीन धोरण आखून निधी उपलब्ध करणे अशा नागरी सुविधांबरोबरच तरुण-तरुणीसाठी शाश्वत रोजगार, महिलांना सुरक्षा व सार्वजनिक स्वच्छतागृहे, व्यायामशाळांची उभारणी, ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांसाठी विरंगुळा केंद्रे अशा अनेक प्रकल्पांवर मी भर देणार आहे. जुन्या बाजाराचा विकास, तसेच घोरपडी, वानवडी, फातिमानगर, सॅलिसबरी पार्क अशा उपभागांसाठी विशेष विकास प्रकल्प राबवण्याचे मी योजले आहे. माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे या मतदारसंघातील प्रत्येक झोपडप‌ट्टीवासीयाला हक्काचे घर त्याच जागी मोफत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच झोपडप‌ट्टीवासीयांना ५५० चौरस फुटांचे घर मिळावे व मध्यमवर्गीयांच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मिळकतकर रद्द करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही रमेश बागवे यांनी दिली.

पुणे : पुणे कँटोन्मेंटच्या विकासाला गेल्या दहा वर्षांत खीळ बसली आहे. भाजपच्या दोन आमदारांना कँटोन्मेटच्या विकासासाठी निधी आणता आला नाही. ही परिस्थिती लवकरच बदलणार असून कँटोन्मेंटचा विकास आता थांबणार नाही. मी आमदार म्हणून विजयी होताच मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे सुरू होतील. कँटोन्मेंटचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी दिली.

पुणे कँटोन्मेंटच्या बदलासाठी मत, पुणे कँटोन्मेंटच्या विकासासाठी मत या रमेश बागवे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन गेली ४० वर्षे मी पुणे शहरात आणि विशेषतः पुणे कँटोन्मेंट परिसरात जनसेवेचे काम करत आहे. पुणे महानगरपालिकेचा दीर्घकाळ नगरसेवक, आमदार, गृहराज्यमंत्री अशा विविध पदांवर काम करताना आपल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच जीवनध्येय मानून मी काम करत राहिलो. आपल्या सर्वांची मला मोलाची साथ लाभली, याब‌द्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. अशीच साथ यापुढेही द्या, अशी भावना बागवे यांनी व्यक्त केली. आपण आशीर्वाद देऊन मला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रात, राज्यात व पुणे महानगरपालिकेत गेली दहा वर्षे भाजपची सता असूनही कँटोन्मेंटच्या विकासाबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. जीवघेणी वाहतूक कोंडी, कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा, जुन्या घरांचा प्रश्न, अपुरे वाहनतळ, अपुरी सार्वजनिक बससेवा अशा नागरी प्रश्नांसोबतच महिलांची सामाजिक सुरक्षा, वाढती बेरोजगारी, गरिबांसाठी अपुरी आरोग्यसेवा, भाजीमंडई, रिक्षातळ, उ‌द्याने यांची दुरवस्था असे अनेक प्रश्न जटिल झाले आहेत. कँटोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल (सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल) चा विकास व विस्तारही रखडला आहे. भाजपच्या निष्क्रिय आमदारांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे ही सारी बिकट परिस्थिती ओढावली आहे, अशी टीका बागवे यांनी केली.

‘हमराज’-‘अदिश्री’मध्ये अंतिम लढत

एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा – निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजन
पुणे : हमराज मृत्युंजय आणि अदिश्री इंटरप्राइजेस यांच्यात निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड रोडवरील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या उपांत्य लढतीत प्रशांत शुक्लाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अदिश्री संघाने अलोक इलेव्हन संघावर ३८ धावांनी मात केली. अदिश्री संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ५ बाद १०० धावांपर्यंत मजल मारली. प्रशांतने सहा चेंडूंत तीन षटकारांसह १९ धावा फटकारल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अलोक इलेव्हनचा डाव ७.२ षटकांत ६२ धावांत संपुष्टात आला. प्रशांतने दोन षटकांत केवळ नऊ धावा देऊन चौघांना बाद केले.
यानंतर दुसऱ्या उपांत्य लढतीत अनिकेत ताकवणेच्या फटकेबाजीच्या जोरावर हमराज मृत्युंजय संघाने बारामती ब्लास्टर्स संघाचे आव्हान सात गडी राखून परतवून लावले. बारामती संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ९ बाद ७५ धावा केल्या. यानंतर हमराज संघाने विजयी लक्ष्य तीन गडींच्या मोबदल्यात ७.१ षटकांतच पूर्ण केले. अनिकेतने १२ चेंडूंत नाबाद ३३ धावांची खेळी केली. यात त्याने चार षटकार व एक चौकार लगावला.

धावफलक : उपांत्य फेरी – अदिश्री इलेव्हन – ८ षटकांत ५ बाद १०० (आदित्य जाधव ३६, आकाश काळे नाबाद २६, प्रशांत शुक्ला १९, दत्ता पवार १४, अभिषेक कुजुर २-३३, क्षितिज दिवेकर १-१९ ) वि. वि. अलोक इलेव्हन – ७.२ षटकांत सर्वबाद ६२ (राजू पाटे २३, निखिल चव्हाण १३, प्रशांत शुक्ला ४-९, राजू पेरुमल १-६, उमेश नायडू १-३). 
बारामती ब्लास्टर्स – ८ षटकांत ९ बाद ७५ (अक्षय तावरे २५, संतोष लष्कर १४, राजेश सोरटे १२, ओंकार साळुंके ३-२१, वसीक शेख २-७, महेश नानगुडे १-६) पराभूत वि. हमराज मृत्यूंजय – ७.१ षटकांत ३ बाद ७९ (अनिकेत ताकवणे नाबाद ३३, किसन मरगळे नाबाद १३, वसीक शेख १३, महेश नानगुडे ११, ). 

मुंबई अदानीकडे ठेवली गहाण ,९९० एकर जमीन अदानीच्या घशात.

मुंबईतील टोलमाफी एक लॉलीपॉप, एमएमआर भागातील रस्त्यांवर ३५ वर्षांसाठी टोल वसुलीचे दिले कंत्राट.

मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२४
भाजपा शिंदे सरकारच्या काळात मुंबई व महाराष्ट्रात गुंडगिरी वाढली असून कुख्यात गुन्हेगार खुलेआमपणे फिरत आहेत. लॉरेन्स बिन्शोई साबरमतीच्या जेलमधून बॉलिवूडला धमक्या देत आहे. फेसबुक लाईव्हवर हत्या, पोलीस स्टेशनमध्ये खुलेआमपणे गोळीबार, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या अशा गंभीर घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर कुख्यात गुंडांचा वावर व मंत्रालयात गुंड रिल बनवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा कुख्यात गुंड गजा मारणेला भेटतो हे राजकीय नेते व गुंडांच्या भ्रष्ट युतीमुळेच शक्य झाले आहे. महायुती सरकारच्या काळात राजकीय आशिर्वादने गुंडगिरी फोफावून महाराष्ट्रात बंदूक संस्कृती व गुंडाराज निर्माण झाले आहे असा तुफान हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे.
टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, महायुती सरकारच्या बी कंपनीने राज्यातील टेंडर व कंत्राट वाटपात मोठा भ्रष्टाचार केला आहे. या बी कंपनीने महाराष्ट्रातील औद्योगीक प्रगतीला खिळ घातली असून महाराष्ट्रातील उद्योग धंदे, गंतुवणूक, नोकऱ्या दुसऱ्या राज्यात पाठवल्या आहेत. तसेच महायुतीच्या काळात महागाई प्रचंड वाढवून जनतेचे जगणे नरक बनवले आहे. या बी कंपनीने मुंबई गहाण ठेवली असून २०२० मध्ये जीव्हीके कंपनीकडून ईडी सीबीआयची कारवाई करून मुंबई विमानतळ अदानींच्या घशात घातला. आता धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली जात आहे, धरावीच्या ४२९ एकर जमिनीच्या बदल्यात अदानीला मुंबईतील कुर्ला डेअरी, म़ड आयलंड, मुलुंड, कांजुर मार्ग, देवनार डंपिंग ग्राऊंड, मिठागरांची अशी मिळून तब्बल ९९० एकर जमीन बहाल केली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली अदानीला ७८६ लाख चौरस फूट जमीन दिली आहे. मुंबईवर अदानीचे राज्य बनवले आहे यामुळे मुंबईतील कोणत्याही बिल्डरला अदानीकडूनच ४० टक्के टीडीआर घ्यावा लागणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच नाक्यांवरील पथकर लहान वाहनांसाठी बंद केल्याची घोषणा केली आहे, ही घोषणा एक लॉलीपॉप असून टोलमाफ करत असतानाच एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडी भागातील रस्त्यांवर ३५ वर्ष टोल वसुलीचे कंत्राट दिले आहे. जयंत म्हैसकर यांची कंपनीकडे मुंबईच्या पाच टोल नाक्याचे कंत्राट होते. ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या टोलमाफीतून म्हैसरकर यांच्या कंपनीला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे ठाणे बोरिवली बोगद्याचे काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीला दिले आहे, ज्या कंपनीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ९९० कोटींची देणगी दिली होती. शिंदे भाजपा सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राला सर्व बाजूनी लुटले आहे.
महायुतीच्या काळात महागाई गगणाला भिडली आहे. जिवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत, भाजीपाला, कांदा लसूणही आवाक्याबाहेर गेला असून शाळेची भरमसाठी फी वाढली आहे. शिंदे भाजपा सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. सर्वसामन्यांवर जीएसटीचा ओझे टाकून जनतेला लुटले जात आहेत या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबावर १ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे, अशा सरकारला आता घरी बसवा असे आवाहन सुरजेवाला यांनी केले.

शरद पवारांच्या पत्नीला चक्क सुनेच्या मालकीच्या टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यास केला प्रतिबंध

बारामतीच्या मोठ्या घरात सुरु झाली सासू सुनेची टीव्ही सीरिअल ?

शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या त्यांची नात रेवती सुळे हिच्यासोबत बारामतीतील टेक्सटाईल पार्क येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर वॉचमनने त्यांना आत सोडले नाही. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याची माहिती आहे. प्रतिभा पवार आणि त्यांच्या नातीला अर्धा तास गेटवरच ताटकळत ठेवले. त्यानंतर आत सोडण्यात आले. बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली आहे, अशी टीका महाविकास आघाडीने केली आहे.

प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना अडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रतिभा पवार या नात रेवती सुळेंसह शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये आल्या होत्या. गेटवर आल्यानंतर त्यांची गाडी अडवण्यात आली, त्याचबरोबर गेट पुढे केले, असा दावा व्हिडीओमध्ये केला जात आहे. तर गेटवरील सुरक्षारक्षकाला याबाबत प्रश्न विचारले असता, आम्हाला वरुन आदेश आलेत, फोन आला, त्यामुळे गेट लावले, असे गेटवर तैनात सुरक्षा रक्षकाने सांगितल्याचे दिसून येत आहे.तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद केले का? तुम्हाला गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितले. तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने बंद आहेत का? आमची गाडी आल्यावर गेट बंद केले का? असे प्रश्न प्रतिभा पवार यांनी सुरक्षा रक्षकाला विचारले. आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे. आम्हाला त्या बॅगच्या शॉपमध्ये जायचे आहे, असेही प्रतिभा पाटील व्हिडिओमध्ये बोलल्याचे दिसत आहेदरम्यान, या सर्व प्रकारावरून महाविकास आघाडीने अजित पवारांवर टीका केली आहे. आज बारामतीत दडपशाहीची हद्द ओलांडली, असे मविआने म्हटले आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची पत्नी प्रतिभकाकी पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले व आतमध्ये सोडले नाही. ह्या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आहेत सौ. सुनेत्रा पवार. ज्यांनी तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवले त्यांचा रस्ता तुम्ही आज अडवला आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या एक्स वर पोस्ट करण्यात आली आहे.

ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका:खासदार संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई-ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका, महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला आहे. आम्हाला ईडीने अटक केली होती, पण आम्ही XX सारखे वागलो नाही, तुम्हाला ईडीने एकदा बोलावले, तर तुम्ही दोन वर्ष कोमात गेला आणि आता भाजपची सुपारी घेत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

ठाकरे गटाचे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील राऊत यांचा प्रचारार्थ संजय राऊत यांची सभा झाली. यावेळी संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज ठाकरे हे सुनील राऊत यांच्याविरोधात सभा घेत आहेत. राज ठाकरे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नरेंद्र मोदी, अमित शाहांचे बूट चाटत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. राज ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना स्वप्नात मीच दिसतो. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही, ही निष्ठावंतांची ताकद आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली. मग आता आपल्या सभेत त्यांच्यासाठी खाट ठेऊया. कारण 23 तारखेला आपण त्यांची खाट टाकणारच आहोत. आम्ही बाळासाहेबांची कडवट निष्ठावंत आहे. आम्ही आमची निष्ठा आणि इमान विकले नाही. आम्हीला ईडी घेऊन गेली म्हणून घाबरलो नाही. तुम्हाला ईडीने एकदा बोलवले, तर दोन वर्ष कोमात गेलात, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणताय, हे तुमचे बाळासाहेबांवरचे प्रेम आहे का?.
येथे एक भिकारडा संपादक राहतो, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भिकारी केला आहे. त्या मोदींचे आपण पाय चाटत आहात. बाळासाहेब ठाकरे यांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणताय, हे तुमचे बाळासाहेबांवरचे प्रेम आहे का?. तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. महाराष्ट्राच्या दुश्मनांचे बुट चाटू नका, अशी माझी नम्र विनंती आहे.

भाजपचे आमदार व्यापाऱ्यांना धमकावतात

पुणे : काँग्रेसने नेहमी व्यापाऱ्यांचा सन्मान केला आहे. काँग्रेसने व्यापाऱ्याचे विकेंद्रीकरण केले. मात्र भाजप सरकारने व्यापाऱ्याचे केंद्रीकरण केले आहे. भाजपने व्यापाऱ्यांना आर्थिक आंतकवादाच्या स्थितीत आणले आहे. व्यापाऱ्यांना घाबरवले जात आहे. देशातील छोटे व्यापारी सुरक्षित नाहीत. जीएसटीमुळे व्यापारी भरडला जात आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन यांनी केली. भाजपच्या काळात पुण्याची दुर्दशा झाली आहे. भाजपचे आमदार व्यापाऱ्यांना धमकावतात, अशीही टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडीचे पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सरदार भोलासिंग अरोरा, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्राहक संरक्षक सेलचे अध्यक्ष अरुण कटारिया आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची व्यापारी आघाडी यांच्यातर्फे गुलटेकडी येथील महावीर प्रतिष्ठानमधील पारख सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते टी. एस. सिंगदेव, ज्येष्ठ व्यापारी देवीचंद भन्साळी, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, डॉ. जितेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सचिन सावंत, गौरव जैन आणि नितीन कदम उपस्थित होते.

काँग्रेसने जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा दिला. माजी मंत्री प्रतीक पाटील आणि अभय छाजेड यांनी यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. जैन समाज संख्येमुळे नाही, तर गुणवत्तेमुळे ओळखला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी व्यापाराचे विकेंद्रीकरणाचे केले. देशात छोटे-छोटे उद्योग विकसित व्हावेत, यासाठी त्यांनी व्यापारपूरक धोरण अवलंबले, असे जैन यांनी सांगितले. भाजपने व्यापाराचे केंद्रीकरण केले आहे. चुकीच्या जीएसटी धोरणामुळे व्यापारी भरडला जात असून, काही व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

सिंगदेव म्हणाले, व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढवून समाजासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी सरकारने व्यवसायपूरक धोरण राबविले पाहिजे. सरकारकडे करातून पैसा येणार नाही तोपर्यंत सरकार विकास धोरण राबवू शकत नाही. मात्र कररचना संतुलित पाहिजे. जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिलमध्ये मी उत्तराखंड सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. दिवंगत अरुण जेटली अध्यक्ष असताना वातावरण वेगळे होते. सर्वानुमते निर्णय घेतले जात होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अध्यक्ष झाल्यापासून बिगरभाजप सरकारच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. व्यापारपूरक धोरणांसाठी जीएसटी कौन्सिलमध्ये चांगला प्रतिनिधी पाठविण्याची गरज आहे. त्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या.

लोंढे म्हणाले, जैन समाजाची लोकसंख्या कमी आहे; पण हा समाज देशाला मोठा कर देऊन देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहे. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चुकीच्या जीएसटी रचनेमुळे व्यापारी अडचणीत आहेत.

एलबीटी असता तर आज ही परिस्थिती नसती. भाजपने एलबीटीवरून व्यापाऱ्यांना भडकवले. जीएसटीमुळे महापालिकांकडे आज पैसा नाही. १९ प्रकारचे कर संपून जीएसटी लागू होणार होता. क्रयशक्ती वाढली नाही, मागणी वाढली नाही, तरी कर वाढला आहे. काँग्रेस सरकार असते तर कर दहशतवाद दिसला नसता. जीएसटीची योग्य अंमलबजावणी केली असती. काँग्रेस दोन नाही, तर सर्व व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भगवान महावीरांनी अहिंसेची शिकवण दिली. भाजपच्या काळात सगळीकडे हिंसा वाढली आहे.

सावंत म्हणाले, महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. व्यापारपूरक धोरणांसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या.

सत्ताधारी गुंडांचा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना त्रास

व्यापारी हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. शरद पवारांनी व्यापाऱ्यांना कायम मदत केली आहे. पर्वती मतदारसंघातील सत्ताधारी गुंडांचा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना त्रास होतो. व्यापाऱ्यांना तक्रारही करता येत नाही, अशी टीका अंकुश काकडे यांनी केली. महाविकास आघाडी व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून, महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सर्व अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्वासन काकडे यांनी दिले.

…तर बसप सरकारमध्ये शामिल होणार! मायावतींचे मोठे संकेत

 वडगाव शेरीचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादींना निवडून आणण्याचे आवाहन
पुणे, दिनांक १७ नोव्हेंबर २०२४-

राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतींनी आज, रविवारी (ता.१७) पुण्यात वडगाव शेरीचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांच्यासह राज्यातील बसप उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहिर ‘महासभा’ घेतली.सभेदरम्यान त्यांनी बसप सत्तेत शामिल होईल असे थेट भाष्य केले.स्वबळावर सरकार आणण्याचा प्रयत्न बसपचा आहे, पंरतु, योग्य संख्याबळ आले नाही तर ‘बॅलेसिंग पॉवर’ म्हणून सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असे आश्वासन यावेळी उपस्थितांना मायावतींनी दिले.

मतं ‘ट्रान्सफर’ होत नसल्यामुळे इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवण्यावर विश्वास नसल्याचे मायावती म्हणाल्या. यापूर्वी जेव्हाजेव्हा इतर पक्षांसोबत मिळून बसप ने  निवडणूक लढवली तेव्हातेव्हा दलितांचे मत सोबत असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला गेली. पंरतु जातीवादी मानसिकतेमुळे त्यांच्या पक्षाचे बहुतांश मत आम्हच्या पक्षाला मिळत नाही. त्यांची मत अंतर्गत रित्या दुसऱ्या उमेदवाराला जातात. अनेक जागांवर बसपचे उमेदवार त्यामुळे  निवडून येत नाही. पक्षाच्या मतांची टक्केवारी देखील कमी होते.म्हणून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे मायावती म्हणाल्या.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात जावून आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्याचे भाष्य केले होते. गांधींच्या वक्तव्याचा देखील मायावतींनी महासभेतून समाचार घेतला. राहुल यांचे वक्तव्य चिंताजनक असून कॉंग्रेसची जातीयवादी मानसिकता दाखवणारी असल्याचे मायावती म्हणाल्या.राज्यात आतापर्यंत कॉंग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांचे ‘गठबंधन’ सरकार राहीले आहे. मात्र, जातीवादी, भांडवलशाही विचारांमुळे दलित, आदिवासी,अल्पसंख्यांक, मुस्लिम तसेच ओबीसींच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. बेरोजगार, शेतकरी, मजूरांची स्थिती हलाखीची आहे. म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होवू नका. डॉ.बाबासाहेबांनी या वर्गांच्या उन्नतीसाठी संविधानात कायदेशीर अधिकार दिले असल्याचे मायावती म्हणाल्या.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणातील वर्गीकरण आणि क्रिमिलेयर संबंधीच्या निकालाशी बसपा सहमत नाही. केंद्रातील भाजप सरकारला न्यायालयाचा निकाल निष्प्रभावी करण्यासाठी संशोधित विधेयक आणण्याची मागणी केली होती. पंरतु, भाजप तसेच इतर विरोधी पक्ष या मुद्दयावर गप्प असल्याचे मायावती म्हणाल्या. अनेक राज्य सरकारांनी आरक्षणातील वर्गीकरणाचा निर्णय लागू करण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकार त्यांच्या फायद्यासाठी जातीजातींमध्ये ‘फुट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे. दलित, आदिवासी, ओबीसींच्या उन्नतीसाठी डॉ.बाबासाहेबांनी संविधानात कायदेशीर अधिकार देण्यात आले आहे. पंरतु, उपेक्षितांना दिलेल्या अधिकारांना विविध प्रयत्न करीत सर्वपक्षांनी संपवण्याचा घाट घालत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांना एकत्रित येवून बसपाला पुर्णपणे मजबूत करीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर आणावे लागेल, असे आवाहन यावेळी मायावतींनी केले.

बसपामुळे देशातील इतर मागासवर्गीयांना मंडल आयोगाच्या शिफारसीनूसार आरक्षण मिळाले.तत्कालीन केंद्रातील कॉंग्रेस सरकारवर बसपच्या दबावामुळे हे शक्य झाले. पंरतु, आतापर्यंत जातीयवादी पक्षांमुळे ओबीसींना संपूर्ण न्याय मिळालेला नाही. केंद्र-राज्यातील जातीवादी मानसिकतेमुळे दलित,आदिवासी, ओबीसींचे शोषण करणाऱ्या शक्तींचे मानसिक बळ वाढले असल्याच्या मायावती म्हणाल्या.

बसपा हा भांडवलदारांच्या नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आर्थिक मदतीवर चालणारा देशातील एकमेवर राजकीय पक्ष आहे. बसप सत्तेत आल्यावर भांडवलदारांचा दबाव राहणार नाही.गरीब आणि शेती करण्यासाठी ज्याच्याकडे साधन नव्हते, त्यांना ‘जो जमीन सरकारी है , वो जमीन हमारी है’ या घोषणेनूसार बसपने यूपीत जमिनी उपलब्ध करवून दिल्या. यातील एक इंच जमिनही आपल्या लोकांना वाटली नाही. राजकीय पक्ष गोरगरिबांना पक्के घर देण्याचे आश्वासन देत आहेत. पंरतु, याची सुरूवात बसप सत्तेत असतांना उत्तर प्रदेशातून करण्यात आली होती. महाराष्ट्र असो वा इतर राज्यातील जातीयवादी राजकीय मानसिकतेमुळे दलितांच्या वस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. पंरतु, बसपाने त्यांच्या कार्यकाळात सम्रग विकासानूसार दलित वस्ती सुधारणेचा कार्यक्रम हाती घेतला होता, असे मायावती म्हणाल्या.

यूपीत  बसपाच्या सत्ताकाळात सर्वसमाजाच्या लोकांना सोबत घेवून सद्धभावना निर्माण करण्यात आली. आता महारष्ट्रातील समस्यामुक्तीसाठी उत्तर प्रदेशप्रमाणे बसपाच्या ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ विचारधारेच्या मागे उभं राहण्याचे आवाहन मायावतींनी केले. संपूर्ण निवडणूकीपर्यंत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या साम-दंड-भेद नितीपासून दूर राहवे. सर्व विरोधी पक्षांनी बसपाला सत्तेत येण्यापासून रोखण्याकरिता दलित मत विभाजनासाठी षडयंत्र आखले असल्याचे मायावती म्हणाल्या. डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीला कमकुवत करण्यासाठी त्यांच्या हयातीत त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने बाबू जगजजीवन राम यांना मोठ्या मोठ्या पदावर संधी दिल्याचे मायावती म्हणाल्या.

प्रसिद्धीमाध्यमे, ओपिनियन पोल, विविध सव्र्हे, सोशल मीडियांच्या माध्यमातून मत प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाईल. यापासून सावध राहण्याचे आवाहन मायावती यांनी केले. महाराष्ट्राच्या हितासाठी बसपाला सत्तेत आणणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे महत्वाचे कार्य आपण सर्वांना मिळून करायचे आहे.डॉ.आंबेडकरांची महान चळवळ पुढे नेण्याचे कार्य मान्यवर कांशीराम यांनी महाराष्ट्रातूनच सुरू केले होते. बाबासाहेबांप्रमाणे कांशीराम यांची देखील ही कर्मभूमी राहीली आहे. अशात बसपा उमेदवारा समोरील पक्षचिन्हाचे हत्ती बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे तसेच पक्षाचे एकही मत सुटणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी मायावती यांनी केले.

महासभेत मायावती यांच्या सह पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद, राज्यसभा खासदार आणि केंद्रीय समन्वयक रामजी गौतम, केंद्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव काळुराम चौधरी, प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे व पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी प्रामुख्याने उपस्थित होते.

कुठल्याही वर्गावर आता अन्याय होणार नाही-आकाश आनंद
राज्यातील सर्व कार्यकर्ते बसप उमेदवाराला विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत. आता बहनजींनी ज्याप्रमाणे अन्यायमुक्त समाज उभारला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही आता कुणावर अन्याय होणार नाही, असे प्रतिपादन बसपचे राष्ट्रीय समन्वय आकाश आनंद यांनी यावेळी व्यक्त केले. दलित-आदिवासी तसेच इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी महान संत गुरू, महापुरूष फुले-शाहू-नारायण गुरू-आंबेडकर आणि कांशिराम साहेबांनी कष्ट घेतले.त्यांच्याच कष्टामुळे मायावतीजींनी देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवून उपेक्षितांना बळ दिले. त्या मुख्यमंत्री असतांना समाजातील कुठल्याही वर्गावर त्यांनी अन्याय होवू दिला नाही.आता असेच कार्य महाराष्ट्रातही बघायला मिळेल. त्यामुळे बसपचे हत्ती निवडणूक चिन्ह दाबून पक्षाच्या उमेदवरांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन यावेळी आकाश आनंद यांनी केले.

देशाची आर्थिक राजधानी गुजरातला घेऊन जाण्याचे भाजपाचे षडयंत्र, भाजपाकडून महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक: रागिनी नायक

0

भाजपा सरकारचा घोटाळ्यांचा विक्रम, कामगारांसाठीच्या भांड्याचे सेट दुप्पट किमतीला खरेदी करून २२५ कोटींचा घोटाळा.

मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२४
नागपुरमध्ये होणाऱ्या टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरातच्या बडोद्यात उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मोदी सरकारने हिरे उद्योग, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रासह, वेदांता फॉक्सकॉन सारखे १७ मोठे प्रकल्प गुजरातला पळवले. राजकीय लाभासाठी भाजपा महाराष्ट्रातील उद्योग, वित्तीय संस्था गुजरातला पळवून महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे. या भेदभावामागे एक मोठे षडयंत्र असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून गुजरातकडे घेऊन जाण्याचा डाव आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिनी नायक यांनी केला आहे.

टिळक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रागिनी नायक म्हणाल्या की. महाराष्ट्रातील भाजपा सरकारने मागील १० वर्षात ५ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रावर २.९ लाख कोटींचे कर्ज होते ते वाढून आता ७.८२ लाख कोटी झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढवून भाजपा सरकारने स्वतःचे खिसे भरले व सरकाराची तिजोरी रिकामी केली आहे. भाजपा सरकारच्या भ्रष्टाचाराचे एक एक कारनामे पुढे आले आहेत. नागपूर व संभाजीनगरच्या इमारत बांधकाम कामगारांना ३० भांड्यांचा एक सेट भेट देण्याचा निर्णय झाला. यासाठी २७ ऑक्टोबर २०२० ला एक बैठक घेऊन टेंडर मागवण्यात आले. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने २०२१ साली याला मंजूरी दिली. स्टेनलेस स्टीलचे पाच लाख सेट वाटण्याचे निश्चित केले आणि पण हे काम स्टेनलेस स्टिल कंपनीला दिले नाही तर कापड उद्योगातील अग्रेसर मफतलाल कंपनीला देण्यात आले. ३० भांड्यांच्या एका सेटची किंमत ८८२० निश्चित केली गेली, म्हणजे ४४१ कोटींचे हे टेंडर निघाले. हाच दर बाजारात ५२५० रुपये होता आणि मोठ्या प्रमाणात खरेदी असल्याने त्याचा भाव कमी करून तो ४५०० रुपयांना मिळू शकला असता पण त्याकडे दुर्लक्ष करून तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपयांची लूट केली गेली. ही भांडी लाभार्थ्यांपर्यंत पोहचली की नाही हेही स्पष्ट झालेले नाही. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील भाजपा सरकारने जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून खिसे भरण्याचे काम केले आहे, असे रागिनी नायक यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चरणसिंह सप्रा, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते उपस्थित होते.