Home Blog Page 575

खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग सज्ज

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहाय्यक अधिकारी किरण सुरवसे, सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील कार्य तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. या प्रक्रियेत नोडल अधिकारी रोहिदास जाधव, दीपक चव्हाण, सहाय्यक अधिकारी पल्लवी जोशी, शशिकांत कांबळे, शदरक करसुलकर, रवींद्र शिंदे, सागर शेवाळे,सचिन माने, अतुल भोसले, लीलाधर बावसकर, पद्मिनी मोरे, शिवाजी देशमुख अंकुश गुरव आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण कार्य:
निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभागाचे मुख्य काम म्हणजे निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्रे, मतपत्रिका, मतदार याद्या, शिक्के, शाई, सील, लेखन सामग्री आणि इतर आवश्यक वस्तूंची उपलब्धता वेळेत सुनिश्चित करणे होय. प्रत्येक मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी या वस्तूंच्या वितरणाचे सुयोग्य नियोजन केले गेले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी विभागाने चोख तयारी केली आहे.
साहित्य वितरणाची प्रक्रिया:
मतदान साहित्याचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करण्यात आले असून, मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवण्यापासून ते निवडणूक संपल्यानंतर परत आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी कामकाजावर सतत लक्ष ठेवले आहे.
तांत्रिक अडचणींसाठी उपाययोजना:
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभागाने यंत्रणेची पूर्वतपासणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर उपाय काढण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी सतर्क आहेत.

महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे यांनी केली प्रचाराची सांगता

वडगाव शेरी :

महाविकास आघाडीचे वडगाव शेरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार यांनी प्रचाराची सांगता करताना विजया बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या निवडणूक चिन्हावरच जास्तीत जास्त शिक्का पडणार असून माझा विजय पक्का आहे,आमचे दैवत शरद पवार महाविकास आघाडीचा प्रचार आणि मी राबवलेली नियोजनबद्ध प्रचार मोहीम याला यश मिळाले असल्याचे प्रतिपादन बापूसाहेब पठारे यांनी प्रचाराची सांगता करताना सांगितले.

निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि आम्हाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.सोबतीला स्थानिक प्रश्न देखील आम्ही जोरात उपस्थित केले. मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती, तळागाळात केलेल्या पदयात्रा आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे माझा विजय निश्चित झाला आहे,असेही त्यांनी सांगितले.

मतदार संघाबाहेरचे कोणतेही भावनिक प्रश्न आणि द्वेष निर्माण करणाऱ्या मोहिमा या विधानसभा मतदारसंघात चालल्या नाहीत,कारण हा विधानसभा मतदारसंघ मिनी इंडिया आहे आणि त्यांना सुरक्षित आणि प्रगतिशील कारभार देण्याचा निर्धार आम्ही केला आहे,असे त्यांनी आवर्जून सांगीतले. सर्वांचे आभार त्यांनी मानले आणि निकोप लोकशाही, संविधान प्रणित विकासाचा कारभार यासाठी सुजाण मतदार म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले

वडगावशेरीचा चेहरा – मोहरा बदलण्याचा आमदार सुनील टिंगरें यांचा संकल्प

जाहीरनाम्यात टँकरमुक्ती, सिग्नलमुक्ती, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण विकासाची ग्वाही

पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे महायुतीचे वडगाव शेरी मतदारसंघातील उमेदवार सुनील टिंगरे यांनी आपल्या जाहीरनाम्यातून वडगावशेरीचा चेहरा – मोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे. त्यामध्ये टँकरमुक्त मतदारसंघ, मेट्रोचे विस्तृत जाळे, सिग्नलमुक्त नगर रस्ता, महिला सक्षमीकरण, पब – बारवर बंदी, युवक कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा संकल्प करण्यात आला असून वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही जाहीरनाम्याद्वारे आमदार टिंगरे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप मतदार संघात कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागात प्रचारफेरीच्या माध्यमातून केला. या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आमदार टिंगरे यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यात मतदार संघातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना हात घालण्यात आला असून सर्व घटकांसाठी विविध प्रकल्प आणि योजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवरायांचे विचार जनमाणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी पार्क, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी मार्ग पूर्णपणे हटवून, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल उभारणी व मेट्रोचे विस्तारित जाळे याद्वारे नगर रस्ता सिग्नल मुक्त करणे, खराडी आयटी पार्कमध्ये ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती, खराडी, लोहगावसारख्या भागांना टँकरमुक्त करणे, मतदार संघातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय योजना, वैद्यकीय मदत केंद्र, मैदानांची उभारणी, विश्रांतवाडी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, माजी सैनिकांसाठी सांस्कृतिक भवन, कोकण भवन, धानोरी येथे भारताच्या विविधतेचे दर्शन घडविणारे मिनी इंडिया पार्क उभारणी, झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, डिजिटल शाळा, ग्रंथालय, युवकांसाठी जीम, नाट्यगृह, वन उद्यान, ॲडव्हेंचर पार्क, स्वच्छतागृह, हॉकर्स प्लाझा, अशा विविध योजना राबविण्याचा संकल्प टिंगरे यांनी आपल्या जाहीरनाम्यातून केला आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना टिंगरे म्हणाले, आपल्या आमदारकीच्या पहिल्या कार्यकाळात कोरोनामध्ये दोन वर्ष वाया गेली होती. त्यानंतर काही काळ विरोधातही बसावे लागले होते. तरीही महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ अडीच वर्षांमध्ये १५१० कोटींचा निधी मतदार संघामध्ये आणण्यात यश आले. लोहगाव येथील शंभर खाटांचे रुग्णालय पूर्ण झाले असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. लोहगाव पाणीपुरवठा योजना, नगर रस्त्यावरील व विश्रांतवाडी येथील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल यासारखी आणखी बरीच कामे येत्या काळात पूर्ण होत आहेत, असे टिंगरे यांनी सांगितले. अनेक प्रकल्पाची कामे सुरू आहेत, काही कामे सुरु होत आहेत. हे सर्व प्रकल्प पुढील पाच वर्षात पूर्ण करून वडगाव शेरी मतदार संघातील नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे पुढील कार्यकाळात वडगावशेरी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होणार आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.

शहरात महाविकास आघाडी आठही जागा जिंकणार महाविकास आघाडीतील नेत्यांचा विश्वास

पुणे : पुणे शहरातील नागरिक भाजप आणि महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळले आहेत. भाजपमुळे तीन वर्षे महापालिकेची निवडणूक झालेली नाही. भाजपने पक्ष फोडल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष असून
शहरात महाविकास आघाडी आठही जागा जिंकणार आहे, असा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

काँग्रेस भवन येथे सोमवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी उपस्थित होते. काँग्रेस भवन येथे दररोज पत्रकार परिषदांचे आयोजन तसेच प्रचाराचे नियोजन केल्याबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद यांचा अंकुश काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिंदे, काकडे आणि मोरे यांनी प्रचाराचा आढावा घेऊन महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, शहरात भाजपचे आमदार , मंत्री असतानाही भाजपच्या उमेदवारांना प्रचारासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर अवलंबून राहावे लागले. महायुती सरकारची एकही योजना पूर्ण झालेली नाही. बटेंगे तो कटेंगे , असे मुद्दे पुण्यात चालले नाहीत. भाजपचा एकही नेता महागाई, बेरोजगारविषयी बोलला नाही. भाजपकडे विकासाचा मुद्दा नव्हता. भाजपने प्रचाराची पातळी सोडली. आम्ही प्रचाराची पातळी सोडली नाही.

काकडे म्हणाले, हडपसर आणि वडगाव शेरीमधील महायुतीच्या उमेदवाराला गद्दारीचे फळ मिळेल. महायुती सरकारने महाविकास आघाडीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेलिकॉफ्टर उड्डाणाला अनेकवेळा परवानगी नाकारली. यामुळे अनेक ठिकाणच्या सभा रद्द झाल्या. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सरकारी यंत्रणेचा मोठा गैरवापर केला. भाजपने दोन पक्ष फोडले हे लोक विसरलेले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. फडणवीस यांना ही भाषा शोभत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल काय बोलतो याचे भान बाळगणे गरजेचे होते. भाजप आणि महायुतीच्या या घाणेरड्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. शहरातील आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. राज्यात जास्तीत जास्त जागा मिळवून महाविकास आघाडीचे सरकार येईल.

मोरे म्हणाले, महायुतीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी सतत आचारसंहितेचा भंग केला. त्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तरी कारवाई झाली नाही. आमच्याकडून थोडी कुठे चूक झाली की
लगेच कारवाई करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेलिकॉफ्टर उड्डाणाला अनेकवेळा परवानगी नाकारली. यामुळे अनेक ठिकाणच्या सभा रद्द झाल्या. पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही विरोधी बाकांवर होतो. काँग्रेसने शिवसेनेला कधीही अशी वागणूक दिली नाही, असे ते म्हणाले.


‘निष्ठा काय असते हे वडिलांकडून शिकायला हवे होते’ :चेतन तुपेंना टोला;

शरद पवारांकडून प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक 

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हडपसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांची ‘फुटीर’ अशी संभावना करत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक केले आहे. मतदानाचा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना पवार यांनी तुपे यांना स्व. विठ्ठलराव तुपे यांच्या निष्ठेची जाणीव करून दिली आहे.

पवार यांनी सोमवारी एक्स या समाजमाध्यमावर हडपसर मतदारसंघातील घडामोडींवर भाष्य करीत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, “प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष सोडला नाही. चेतन तुपेंनी मात्र फुटिरांना साथ दिली. वडील विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते?’ हे त्यांनी शिकायला हवे होते.”

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष यांच्यात ‘निष्ठा विरूद्ध गद्दारी’ असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांच्या गटाची गद्दार म्हणून होत असलेली संभावना एकीकडे या गटाच्या उमेदवारांना घायाळ करत असल्याचे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांबाबत सहानुभूती निर्माण करत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी सोमवारी प्रशांत जगताप यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक करीत पाठ थोपटणारे ट्विट केले आहे. तसेच, व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही केले आहे. 

‘हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला मतदान करण्यासाठी तुम्हा सर्व सहकाऱ्यांची तयारी झाली असेल. या मतदारसंघात निष्ठेची प्रतिष्ठा ठेवायची असेल, तर महाविकास आघाडीच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर प्रशांत जगताप यांना आम्ही सर्वांनी उमेदवारी दिली आहे. पक्षामध्ये राहून जे काम करतात, त्या निष्ठावंतांचा सन्मान होईल. निष्ठा बाजारात विकतात, असा ज्यांचा समज असेल, तर त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकवल्यासारखे होईल. त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये प्रशांत जगताप यांना मोठ्या मतांनी विजयी करा,’ असे आवाहन पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीस ४५ जागा मिळतील – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे –
पश्चिम महाराष्ट्रात युतीचे ४२ आमदार असून आघाडीचे १६ आमदार आहे.पश्चिम महाराष्ट्रात ४५ जागा आम्ही यंदा निवडून आणू. लोकसभा निवडणुकीत आमच्या दहा जागा कमी झाल्या पण विरोधक यांचे फेक नरेटिव्ह संभ्रम दूर करू शकलो. पश्चिम महाराष्ट्रात भाजप २६ जागा, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९ जागा आणि जनसुराज्य पक्ष दोन जागा लढत आहे. आम्ही जे काम करणार आहे आणि केलेले काम जनते समोर ठेवले आहे. जनता सुज्ञ असून त्यांना काम करणारे कोण आहे हे बरोबर माहिती आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, राज्यातील प्रचारास आज विश्रांती मिळत असून २० नोव्हेंबर रोजी जनता कोणाला कौल देईल उत्सुकता सर्वांना आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५८ मतदारसंघ आहे. शहर आणि ग्रामीण भागात महायुती उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहे. अनेक नेत्यांच्या सभा झाल्या आहे. मागील निवडणुकीत युतीला स्पष्ट जनादेश जनतेने दिला पण उध्दव ठाकरे यांनी आघाडी सोबत जात त्यांनी जनतेचा निकालाचा अनादर करत सत्ता स्थापन केली. ठाकरे यांनी गद्दरी करत लोकशाहीचा अपमान केला. पण अडीच वर्षात जनतेच्या मनात नियतीने जे होते तेच झाले. आघाडीच्या काळात कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प स्थगिती दिली गेली. पण युतीच्या काळात विकासाला गती मिळाली आणि विविध पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. सर्वाधिक परकीय गुंतवणूक देखील आली. आघाडीचे सरकार आणि युतीचे सरकार यातील बदल लोकांसमोर आहे. जनता पुन्हा महायुतीवर विश्वास ठेवेल अशी अपेक्षा आहे. महायुती आगामी काळात देखील एकत्रित काम करेल. लोकसभा निवडणुकीत मनसे यांनी आम्हाला साथ दिली असून त्याची जाणीव आम्हाला नेहमी राहील. त्यांचा स्वतंत्र पक्ष असून ते देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आहे.

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात ऐतिहासिक विजयाचा शिरोळे यांना विश्वास

पुणे, दि. १८ नोव्हेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे, ठिकठीकाणी नागरिकांचा मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद, राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेची सकारात्मकता आणि महायुतीमधील तीनही प्रमुख नेत्यांनी राज्यातील जनतेचा संपादन केलेला विश्वास यांच्या जोरावर निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वास छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला. आज राज्यभरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होत असताना आयोजित पत्रकार परिषदेत शिरोळे बोलत होते. मतदार संघाचे प्रचारप्रमुख दत्ता खाडे, भाजपा शहर अध्यक्ष गणेश बगाडे आणि शहर सरचिटणीस रवींद्र साळेगांवकर यावेळी उपस्थित होते.

प्रचारा दरम्यान जसे जसे दिवस संपत जात होते तसतसा मतदार संघातील नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या देहबोलीमधून त्यांची महायुतीला विजयी करून देण्याची धारण जाणवत होती. नागरिकांच्या या प्रतिसादाने मी भारावून गेलो असे सांगत सिद्धार्थ शिरोळे पुढे म्हणाले, “शिवाजीनगर मतदार संघात महायुतीसाठी पोषक वातावरण असून लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही ज्या उर्जेने काम करीत आहेत त्याचे प्रतिबिंब आम्ही स्थानिक पातळीवर पाहू शकतोय. या तिघांचाही संपर्क, दूरदृष्टी आणि प्रशासनावर असलेली पकड नागरिक पाहत आहेत. त्यांनी योग्य वेळी आणलेल्या योजना आणि त्या राबविण्याची केलेली व्यवस्था यामुळे महायुती सरकारचे वेगळेपण त्यांच्या कामातून जनतेला दिसत आहे. पुण्यातील आठही महायुतीच्या जागा निवडून येतीलच शिवाय राज्यातही आम्ही बहुमताचे सरकार स्थापन करू.”

मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात मी केलेली विकासकामे मतदार संघातील नागरिकांना माहिती आहेत. या काळात अनेक मोठे विकासात्मक प्रकल्प मार्गी लागले आहेत. मेट्रोची तीस पैकी दहा स्थानके ही शिवाजीनगर मतदारसंघात आहेत. याच जोडीला आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे कामदेखील विक्रमी वेळेत पूर्ण होताना दिसत आहे. या मेट्रो मार्गामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना मेट्रोची आणखी तीस स्थानके उपलब्ध होणार आहेत. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवारीत ते पूर्ण होईल. याबरोबरच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सोबतच खडकी व रेंज हिल्स येथील अंडर ब्रिजच्या विस्तारीकरणाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या एकत्रीकरणाचे काम सुरू असून त्यालाही लवकरच गती येईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.

माझ्या आमदार विकास निधीतील मोठा वाटा हा सेवा वस्त्यांसाठीच्या विकासकामांसाठी खर्च केला असून या भागात मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यावर मी यानंतरही भर देणार आहे. पुढील २ ते तीन वर्षांत शिवाजीनगर मतदार संघाचा कायापायाल करू असेही शिरोळे यांनी नमूद केले. मागील लोकसभा निवडणुकीत कमी टक्के मतदान झाल्याची आकडा आता नागरिक स्वत:च भरून काढतील. यावेळी मतदानाचा टक्का वाढून ५१ टक्के मते मला मिळतील असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे समाधान शिरोळे यांनी व्यक्त केले.

जागतिक दर्जाचे हॉर्टीकल्चरचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाचे आयोजन

(२१ ते २४  नोव्हेंबर रोजी नवीन कृषी  महाविद्यालय मैदान (सिंचनगर) येथे पार पडणार)

  पुणे-  वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी  व  महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्यावतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानवरती प्रदर्शनाचे आयोजन २१ ते २४ नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान (सिंचगर) येथे पार पडणार आहे. याचे उद्घाटन २१ नोव्हेबर रोजी सकाळी ११.०० वा. सीमा सुरक्षा दलाचे उपायुक्त राजा बाबू सिंग, यांच्या शुभहस्ते पार पडणार असून यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विजय बोत्रे, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप हे असणार आहेत.

सदरील हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणार असून या वेळी हॉर्टिकल्चर तज्ञ हे शेतकरी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने,  महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, नेहा त्यागी असे मान्यवर उपस्थित होते. सदरील प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असून सकाळी १० ते ७ पर्यंत पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीतजास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

रमेश बागवेंना विजयी करण्याचेतेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आवाहन

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही केले नाही. महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश बागवे यांनी या मतदारसंघाचा मोठा विकास केला. तसेच आता निवडून आल्यानंतरही ते करतील. त्यामुळे त्यांना विजयी करा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज केले. रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण अशांनी पक्षाशी गद्दारी केली. अशा गद्दारांना धडा शिकवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वीरांच्या महाराष्ट्राला ते बदनाम करत आहेत. ते निवडून आले तर गुजरातचे गुलाम बनतील. मोदी आणि अदानी महाराष्ट्र आणि मुंबईला लुटण्याचे काम करत आहेत. म्हणूनच या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे असून, त्यासाठी निवडून देण्यासाठी रमेश बागवे यांना विजयी करा. त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच मागासवर्गाला न्याय मिळेल. या निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चित विजयी होणार असून, रमेोशळ बागवे यांच्या विजयानंतर जल्लोष व्यक्त करण्यासाठी मी पुन्हा येथे येईन, असे ते म्हणाले.

या रॅलीच्या प्रारंभी घोरपडी येथील श्री बालाजी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तेथून रॅली निघाली. बी. टी. कवडे रोड, संविधान चौक, पूलगेट, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, काशेवाडी, जुना मोठा स्टँड, निशाद टॉकीज, भीमपुरा, शिवाजी मार्केट, डॉ. आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन, पंचशील चौक, जीपीओ, अपोलो टॉकीजमार्गे मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे झेंडे घेऊन तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. मार्गावर दुतर्फा नागरिक नागरिकांना गर्दी केली होती. नागरिकांनी हात उंचावून रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘रमेशदादा झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाऴासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे जाहीर सभा झाली. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे व विकासाची दृष्टी असणारे रमेश बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे प्रारंभीच आवाहन करून सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या, आजपर्यंत ‘ईडी’ हा शब्द जनतेला माहीत नव्हता. देवेंद्र फडणवीस व मंडळींनी कट-कारस्थाने करून शिवसेना व राष्ट्वादी पक्ष फोडले. त्यांची चिन्हे पळवली. महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार सुरू असून, पोलीस दलात त्यांचा मोठा हस्तक्षेप आहे. त्यामुळे पोलिसांचा आता धाक उरला नाही, असे सांगून ‘देवेंद्रबाबा आणि चाळीस गद्दार’ असा सिने्मा मी कढणार असल्याचे त्या म्हाणाल्या.
मी सपंर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरले असून, जनतेत मोठा असंतोष आहे, असे सागंून त्या म्हणाल्या की, त्यांच्या राजवटीत तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार होतो, ६० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार होतो. मात्र महायुतीचे सरकार त्वरित गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतो, याची चीड आता जनतेत निर्माण झाली आहे. आता सरकारी नोकऱ्या ठेकेदारांकडून भरल्या जात असून, ही पद्धत तातडीने बंद करून महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर सरकार थेट नोकरभरती करेल, असे टाळ्यांच्या गजरात त्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र हा अठरापगड जाती, बारा बलुतेदार आणि सर्व जाती-धर्मीयांचा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मात्र जाती-धर्मात भांडणे लावून विद्वेशाचे राजकरण करत आहेत. त्यांना अद्दल शिकवण्याची नामी संधी या निवडणुकीत आहे, असे सांगून सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारे आणि विकासाची दृष्टी आणि अनुभव असणारे रमेश बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सतार, सरोद आणि व्हायोलिन वादन ऐकण्याची संधी

पुणे : ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे शनिवारी ‌‘त्रिवेणी‌’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले असून यात सतार, सरोद आणि व्हायोलिन वादनातून रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. ‌‘त्रिवेणी‌’ या विशेष सांगीतिक मैफलीची सुरुवात नेहा महाजन यांच्या सतार वादनाने होणार असून त्यांना अनिरुद्ध शंकर तबला साथ करणार आहेत. त्यानंतर अनुपम जोशी यांचे सरोद होणार असून त्यांना महेशराज साळुंखे तबला साथ करणार आहेत. ‌‘त्रिवेणी‌’ मैफलीचा समरोप पंडित मिलिंद रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होणार असून त्यांना पंडित विश्वनाथ शिरोडकर यांची तबलासाथ असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

कलाकारांविषयी…
नेहा महाजन यांचे सतार वादनातील प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील आणि बीनकर घराण्याचे प्रवर्तक विदुर महाजन यांच्याकडे झाले. मैहर घराण्याची वादन परंपरा समजून घेत नेहा यांनी शास्वती साहा यांच्याकडून मार्गदर्शन घेतले असून सेनिया घराण्याच्या रवी गाडगीळ यांच्याकडूनही त्यांना वादनाचे धडे मिळाले आहेत. मैहर घराण्याचे सतार वादक उस्ताद जुनैद खान यांनी नेहा यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.

अनुपम जोशी हे सरोद वादनाचे सखोल अभ्यासक असून युवा पिढीतील सरोद वादकांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सुरुवातीस प्रसिद्ध सतार वादक पंडित सुधीर फडके यांच्याकडे त्यांनी सरोद वादनाचे धडे गिरवले तेथे त्यांना गुरूमा अन्नपूर्णादेवी यांच्या दुर्मिळ रचना समजून घेता आल्या. पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार, पंडित राजीव तारानाथ तसेच उस्ताद अली अकबर खान यांचे ज्येष्ठ शिष्य झुकरमन यांचेही मार्गदर्शन अनुपम यांना लाभले. अनुपम जोशी यांनी अनुमोहिनी वीणा हे रुद्र वीणेच्या जवळ जाणारे वाद्य निर्मित केले असून याची मूळ संकल्पना राधिका मोहन मोईत्रा यांची आहे.

स्वरप्रज्ञा पंडित मिलिंद रायकर हे आजच्या पिढीतील प्रसिद्ध व्हायोलिन वादक आहेत. रायकर यांना पद्मश्री पंडित डी. के. दातार तसेच पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यातूनच रायकर यांनी मधुर, सुरेल आणि भावपूर्ण अशी गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची शैली विकसित केली. सुरुवातीस गोवा येथील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रा. ए. पी. डिकोस्टा यांच्याकडून त्यांनी पाश्चात्य पद्धतीने व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. यानंतर वडिल अच्युत रायकर व पंडित बी. एस. मठ (धारवाड) आणि पंडित वसंतराव कडणेकर (गोवा) या तिघांच्याही सक्षम मार्गदर्शनाखाली रायकर यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या अंगाने व्हायोलिन वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.

भाजपने जाती-धर्मावरून लोकांमध्ये भांडणे लावली-विनेश फोगट

पुणे : सरकारने काय काम केले हे सांगण्याऐवजी भाजपकडून जात-धर्मावर समाजाची विभागणी करण्याचे काम सुरू आहे. भाजपचे नेते जाती-धर्मावरून लोकांमध्ये भांडणे लावत आहेत. भाजपने देशात द्वेष पेरण्याचे काम केले आहे. भाजपने विकासकामांचा प्रचार करून मते मागितली असती तर खेळाडू म्हणून मी देखील भाजपला दाद दिली असती , असे मत हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सोमवारी व्यक्त केले.

काँग्रेस भवन येथे विनेश फोगट यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी आणि शहर काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे यावेळी उपस्थित होते.

फोगट म्हणाल्या, सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महाराष्ट्रात‌ शेतकरी आणि सामान्य माणूस भरडला जात आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. भाजप आणि महायुती सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत.

भाजपचे नेते एक हैं तो सेफ हैं ही घोषणा देतात. दुसरीकडे देशातील महिला सुरक्षित नाहीत. नेते महिलांचे शोषण थांबवतील तेव्हा महिला सुरक्षित होतील. या अशा नेत्यांकडून महिला खेळाडूंना शोषणाला बळी पडावे लागले आहे.

सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

महायुती सरकार सामान्यांच्या कल्याणासाठी काम करत नाही. या सरकारचे खेळाडूंना प्रोत्साहन मिळ‌त नाही. भाजप सत्तेत येण्याआधी देशातील निवडणूक चांगल्या वातावरणात व्हायच्या. भाजपने द्वेष पेरल्यामुळे राजकारणाची पातळी खालावली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने काय काम केले हे सांगण्याऐवजी भाजपकडून जात-धर्मावर विभागणी करण्याचे काम सुरू आहे. देशामध्ये द्वेष पेरण्याचे काम भाजपने केले आहे. हिंदू-मुस्लिम भेद करून निवडणूक जिंकता येत नाही. निवडणूक विकासावर जिंकता येते. भाजपने मतांसाठी विकासाचा प्रचार केला असता तर खेळाडू म्हणून मीही दाद दिली असती.

निवडणूक जवळ आली की लाडकी बहीण आठवते. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून शंभर फुटांच्या अंतरावर महिला शोषणाविरोधात आवाज उठवत होत्या तेव्हा भाजपला बहिणीची आठवण आली नाही.
मतांसाठी निवडणुकीच्या आधी तीन महिने लाडकी बहीण योजना लागू करणे , हा भाजपचा लोकांना फसविण्याचा डाव आहे.

मी राजकारणात मोठे स्वप्न घेऊन आलेले नाही. खेळाडू म्हणून लैंगिक शोषणाविरोधात संघर्ष केला. ही लढाई कोणत्याही खेळाडूला लढावी लागू नये म्हणून मी राजकारणात आले आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठी आम्ही संघर्ष केला. महिलांवरील अत्याचाराच्या घटना नागरिकांनी विसरू नयेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फोडण्याचे काम भाजपने पैशांच्या जोरावर केले. सरकारच्या विरोधात बोलले म्हणून
भाजपमुळ‌े आम्ही देशद्रोही ठरलो आहोत.

उज्ज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केले पाहिजे. महाविकास आघाडी सरकार येताच प्रत्येक शहरात चांगली मैदाने बांधण्यात येतील आणि खेळाडूंना दर्जेदार सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाल्या.

निवडणूकीत दुर्भागी DSK ठेवीदार राजकारण्यांना दाखविणार ठेंगा-वापरणार NOTA चा पर्याय !!!

पुणे- या विधानसभा निवडणुकीत DSK चे दुर्भागी ठेवीदार NOTA चे बटन दाबून सर्वपक्षीय नेत्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करून ठेंगा दाखवणार आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सहित मनोज तारे ,विवेक परदेशी,विद्या घटवाई,सुर्यकांत कुंभार,नितीन शुक्ल,आदिती जोशी तसेच ठेवीदार संघटने कडून दिपक फडणवीस ,शरद नातू ,सुधीर गोसावी ,नितीन मोरे यांनी उपस्थित राहून दिली.(NOTA चे बटन यापैकी कोणीही उमेदवार पसंतीचा नाही या साठी कायद्याने दिलेले आहे. सगळेच उमेदवार सारखे वाटल्यास त्यातील एकही पसंतीचा नसेल, तर बळजबरी कोणाला तरी मतदेण्याची गरज नाही पण मतदान करावे आणि सरकारी यंत्रणांना समाजाला हि भावना कळावी म्हणून NOTA चे बटन दाबून हि मतदान नोंदविता येते . )

या संदर्भात त्यांनी सांगितले कि,’ २०१७ पासून डी एस कुलकर्णी यांच्या DSK Group कंपनीने ठेवीदारांची ठेव बरोबरच व्याजही देण्याची असमर्थतता दाखवल्यानंतर सुरू झालेला लढा आजही सुरूच आहे.DSK group मध्ये गुंतवणूक करणारे ३२ हजार ठेवीदार गुंतवणूक केलेल्या १२०० कोटीच्या परताव्याकरिता कायदेशीर लढाई लढत आहेत.DSK group विरूद्ध झालेल्या तक्रारी,नंतर दाखल झालेले गुन्हे ,सर्व संचालकांना अटक त्यानंतर न्यायालयाने १६ हजार कोटींची मालमत्ता फक्त ८२८ कोटींना ठराविक बांधकांम व्यवसायिकांना ७ वर्षाच्या मुदतीसह देण्याचा निर्णय घेताना कुठेही ठेवीदारांचा विचार न करणे संशयास्पद आहे या प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा स्पर्श दिसत आहे. म्हणूनच ठेवीदारांना त्यांचे पैसे अजूनही दिले गेले नाहीत अगर देण्यासाठी कोणी उत्साही दिसत नाही , सर्व ठेवीदारांना वार्यावर सोडून त्यांची रक्कम हवेत गायब झाली काय ? असा सवाल यावेळी करण्यात आला .
या परिस्थितीची चर्चा संपुर्ण राज्यात सुरू असतानामागील ७ वर्षात कुठल्याही लोकप्रतिनिधी ,राजकीय नेते व सहकार महर्षींना आभाळ कोसळलेल्या ज्यांचे कष्टाची ठेव बुडतेय यांची दखल घेण्याची इच्छा झाली नाही या विषयाचे गांभीर्य कोणालाही नसून सातत्याने अनेक बँका अचानक बंद होणे सहकार माध्यमात ठेवीदारांची ठेव बुड्ल्यास विश्वासआर्हता संपुन सहकारी क्षेत्रात ठेवीदार गुंतवणूक करणे बंद होतील .मागील महिन्यात हिंदू महासंघ व ठेवीदार यांनी आयोजित मेळाव्यात आवाहन करूनही अगदी विधानसभेच्या निवडणूका असताना देखील ३२ हजार कुटुंब म्हजेच १.५० लाख जनतेच्या गंभीर विषयाकडे बघण्यास कुणालाही वेळ नाही हिंदू महासंघ मात्र ठेवीदारांसाठी सर्वच स्तरावर ठेवीदारांचा लढा पुढे नेण्याचे काम सातत्याने करीत आहे
नुकत्याच झालेल्या हिंदू महासंघ व ठेवीदारांच्या बैठकीत लोकशाही ने दिलेल्या हक्कातील मतदानात NOTA चा वापर करायचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार १.५० लाख लोक या निवडणूकीत गैर हजर राहतील किंवा लोकशाहीनेच ने दिलेला NOTA वापरण्याचे निश्चित केले आहे.

खेळाडूंच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या-विनेश फोगट

पुणे : हरियाणापेक्षा महाराष्ट्रात जास्त चांगले खेळाडू आहेत. परंतु, त्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंना कसल्याही सोयी-सुविधा हे सरकार देत नाही. खेळाडूंसाठी चांगली मैदानेही नाहीत. खेळाडूंच्या विकासासाठी खेळाच्या मैदानात आम्हा खेळाडूंना आशीर्वाद देता तसा महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतांमधून आशीर्वाद द्या, असे आवाहन हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सोमवारी केले.

महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर, पर्वती विधानसभा मतादरसंघातील उमेदवार अश्विनी कदम, हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दत्ता बहिरट, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत मोकाटे, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील बापू पठारे आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनेश फोगट यांच्या उपस्थितीत खेळाडू मेळाव्याचे काँग्रेस भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विनेश फोगट यांना गदा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चवधरी, महिला काँग्रेसच्या प्रभारी शहराध्यक्ष संगीता तिवारी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय शिंदे, रफीक शेख, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद तसेच मेळाव्याचे आयोजक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, शहर काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे, उपाध्यक्ष लतेंद्र भिंगारे, ओम भवर आदी उपस्थित होते.

राजकारणात येईन, असे मला कधी वाटले नव्हते. मी आता राजकारणात असले तरी आधी खेळाडू आहे. आता राजकारणातील जबाबदारी वाढली आहे. मैदानावर संघर्ष केल्यानंतर महिलांच्या शोषणाविरोधात रस्त्यावर संघर्ष करावा लागला. क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये, यासाठी मी संघर्ष करायला तयार आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या तसेच चांगल्या वातावरणात त्यांना आपला खेळ वाढवता यावा यासाठी मी खेळाडूंबरोबर कायम मैदानात उभी असेन. चांगले शिक्षण आणि प्रशिक्षण दिले तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशात घडतील, अशी भावना फोगट यांनी व्यक्त केली. भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन पक्ष फोडले. या महायुतीला धडा शिकवण्याती वेळ आली आहे. मतदानात मोठी ताकद असते. ही ताकद महायुतीला दाखविण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.

उज्ज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा,असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकार येताच प्रत्येक शहरात चांगली मैदाने बांधण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. विनेश फोगट यांच्याशी संवाद साधण्यासाठी खेळाडूंची या मेळाव्याला उपस्थिती होती. विविध पदक विजेत्या दिग्गज आणि ज्येष्ठ खेळाडूंपासून लहान मुलांची यावेळी गर्दी झाली होती.

राज्यात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल: आमदार थोरात

असंविधानिक भ्रष्टाचारी महायुतीला खाली खेचणे हे पहिले उद्दिष्ट

जिल्ह्यामध्ये सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणार

35 वर्षे सत्ता असून राहता तालुक्यात विकास नाही

संगमनेर– विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी राज्यभर प्रचार दौरा केला. राज्यात सर्वत्र महायुती सरकार बद्दल प्रचंड राग असून निवडणुकीत महाराष्ट्रात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करताना असविधानिक व भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.संगमनेर मधील सुदर्शन निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात उपस्थित होत्या.

याप्रसंगी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यामध्ये महागाई ,बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे.शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. इंधन दरवाढ, ठप्प झालेला विकास यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 जागांसह विजयी होईल.

मी राज्यभर प्रचार करत असताना संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळले आहे. संगमनेर मधून नक्कीच मोठा विजय होणार असून अहमदनगर जिल्ह्यात सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. याचबरोबर शेजारी राहता तालुक्यामध्ये प्रचंड दहशत आणि दडपशाही आहे. 35 वर्ष एका घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष असे विविध पदे असताना सुद्धा त्यांना राहता तालुक्याचा विकास करता आला नाही. नगर मनमाड रस्त्याची मोठी दुरावस्था असून यामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेले आहे. साई संस्थान मधील 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. शहराचा आराखडा विकसित झालेला नाही. साई संस्थांचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खाजगी 200 बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज काय. असे विचारताना साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकले असते मात्र तेथे ते होऊ दिले जात नाही. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जातो आहे.

मूळचे भाजपचे कार्यकर्ते यांची दुरावस्था करून टाकली आहे. शिर्डीच्या अनेक जमिनींवर आरक्षण टाकून जनतेला वेठीस धरले आहे. शिर्डीमध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी वाढली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर सर्वांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवून प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.

संगमनेर मध्ये ज्याप्रमाणे शांतता सुव्यवस्था आणि विकास आहे. तसे काम राहता तालुक्यात करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राहता तालुक्यातील प्रश्नांसाठी वेळेला रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी मी तयार आहे.

ही राहता तालुक्यातील जनतेच्या स्वातंत्र्याची लढाई असून सर्वांनी सहभागी होऊन सौ. घोगरे यांना विजयी करावे असे आव्हान त्यांनी केले.

आचारसंहितेच्या काळातही प्रशासन कुणाच्यातरी दबावाखाली

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणांमध्ये चांगला पाऊस आहे असे असताना सुद्धा आमच्या तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिले जात नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन ही मागणी टाळत आहे. राजकारणासाठी जनतेशी कोणी खेळू नये. प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे हे कळाले पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रशासनाने असे एकतर्फी वागणे अत्यंत चुकीची आहे. प्रशासनाने नेहमी जनतेच्या हितासाठी काम केले पाहिजे असे ही ते म्हणाले.

पुण्यातील ऐतिहासिक वारसा हा देशातील पर्यटन केंद्राशी जोडला जाईल – केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत

पुणे –
महाराष्ट्र आणि पुणे मध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहे. देश परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी भेटी देतात. पुण्यातील ऐतिहासिक वारसा हा देशातील पर्यटन केंद्राशी जोडला जाईल. राज्यातील ११ किल्ले जागतिक वारसा स्थळ होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पास राज्य सरकारने ५० कोटी मदत केली असून केंद्रीय पर्यटन विभागाने ८० कोटी रुपये साह्य करण्यात आले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पुणे आगामी काळात अधिक वेगाने विकसित करण्यात येईल.
विविध राज्यानी आठ हजार कोटींचे पर्यटन प्रकल्प माहिती प्रस्ताव दिले आहे त्याबाबत विचार होऊन त्यावर लवकरच एकत्रित निर्णय घेण्यात येईल
असे मत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.

शेखावत म्हणाले, सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेने विश्वास टाकत बहुमत दिले. देशातील राजकीय नरेटीव्ह बदलला गेला आणि विकास सरकार अस्तित्वात आले. सन २०१९ मध्ये देखील जनतेने मोदी सरकारला साथ दिली आणि सरकारने वेगवेगळ्या योजना राबवत विकास तळागाळापर्यंत पोहचवला. जनतेने महाराष्ट्र मध्ये युतीला स्पष्ट बहुमत दिले पण राजकीय घडामोडी होऊन राज्याच्या विकासाला ब्रेक लागला. आघाडी सरकारने युतीच्या विविध कामे स्थगिती करणे, अडथळे निर्माण करण्याचे काम केले त्यामुळे विकास मंदावला आणि भ्रष्टाचार वाढला. आघाडी सरकारने लोकशाही विरोधी काम केले आणि १२ भाजप आमदार निलंबित केले. सर्वच्च न्यायलयाने याबाबत सदर निर्णयास रद्द केले.कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घरात बसून राहिले आणि अनेकजण मयत झाले. याकाळात कोविड कामात देखील मोठा भ्रष्टाचार झाला. बार आणि हॉटेल मधून कोट्यवधी रुपये वसुली प्रकरण उघडकीस येऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात जावे लागले. सरकारच्या संरक्षणात भ्रष्टाचार झाला आणि जनतेचे प्रश्न दुर्लक्षित केले गेले. महायुती सरकारच्या काळात लाडकी बहिण योजनेस आघाडी नेत्यांनी विरोध केला आणि न्यायालयात गेले. पण आता स्वतःच्या जाहीरनाम्यात ही योजना त्यांनी टाकणे हास्यास्पद आहे. महायुतीने सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल अशाप्रकारे विविध योजना सुरू केल्या असून आणखी योजना बाबत जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे. काँग्रेसने अनेक खोटे आश्वासने जाहीरनाम्यात दिले आहे. त्यांनी इतर राज्यात ज्या ठिकाणी त्यांची सत्ता आहे तिथे जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची कोणती पूर्तता केलेली नाही. शेतकरी कर्ज माफी नाही, पीक विमा नाही, वीज दर वाढ, महालक्ष्मी योजना अंमलबजावणी नाही असे प्रकार त्यांनी केले आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने देशात फूट पाडा आणि राज्य करा तत्त्वानुसार काम केले आहे.