पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही केले नाही. महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश बागवे यांनी या मतदारसंघाचा मोठा विकास केला. तसेच आता निवडून आल्यानंतरही ते करतील. त्यामुळे त्यांना विजयी करा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज केले. रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीत ते बोलत होते.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण अशांनी पक्षाशी गद्दारी केली. अशा गद्दारांना धडा शिकवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वीरांच्या महाराष्ट्राला ते बदनाम करत आहेत. ते निवडून आले तर गुजरातचे गुलाम बनतील. मोदी आणि अदानी महाराष्ट्र आणि मुंबईला लुटण्याचे काम करत आहेत. म्हणूनच या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे असून, त्यासाठी निवडून देण्यासाठी रमेश बागवे यांना विजयी करा. त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच मागासवर्गाला न्याय मिळेल. या निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चित विजयी होणार असून, रमेोशळ बागवे यांच्या विजयानंतर जल्लोष व्यक्त करण्यासाठी मी पुन्हा येथे येईन, असे ते म्हणाले.
या रॅलीच्या प्रारंभी घोरपडी येथील श्री बालाजी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तेथून रॅली निघाली. बी. टी. कवडे रोड, संविधान चौक, पूलगेट, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, काशेवाडी, जुना मोठा स्टँड, निशाद टॉकीज, भीमपुरा, शिवाजी मार्केट, डॉ. आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन, पंचशील चौक, जीपीओ, अपोलो टॉकीजमार्गे मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे झेंडे घेऊन तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. मार्गावर दुतर्फा नागरिक नागरिकांना गर्दी केली होती. नागरिकांनी हात उंचावून रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘रमेशदादा झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाऴासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे जाहीर सभा झाली. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे व विकासाची दृष्टी असणारे रमेश बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे प्रारंभीच आवाहन करून सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या, आजपर्यंत ‘ईडी’ हा शब्द जनतेला माहीत नव्हता. देवेंद्र फडणवीस व मंडळींनी कट-कारस्थाने करून शिवसेना व राष्ट्वादी पक्ष फोडले. त्यांची चिन्हे पळवली. महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार सुरू असून, पोलीस दलात त्यांचा मोठा हस्तक्षेप आहे. त्यामुळे पोलिसांचा आता धाक उरला नाही, असे सांगून ‘देवेंद्रबाबा आणि चाळीस गद्दार’ असा सिने्मा मी कढणार असल्याचे त्या म्हाणाल्या.
मी सपंर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरले असून, जनतेत मोठा असंतोष आहे, असे सागंून त्या म्हणाल्या की, त्यांच्या राजवटीत तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार होतो, ६० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार होतो. मात्र महायुतीचे सरकार त्वरित गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतो, याची चीड आता जनतेत निर्माण झाली आहे. आता सरकारी नोकऱ्या ठेकेदारांकडून भरल्या जात असून, ही पद्धत तातडीने बंद करून महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर सरकार थेट नोकरभरती करेल, असे टाळ्यांच्या गजरात त्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र हा अठरापगड जाती, बारा बलुतेदार आणि सर्व जाती-धर्मीयांचा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मात्र जाती-धर्मात भांडणे लावून विद्वेशाचे राजकरण करत आहेत. त्यांना अद्दल शिकवण्याची नामी संधी या निवडणुकीत आहे, असे सांगून सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारे आणि विकासाची दृष्टी आणि अनुभव असणारे रमेश बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.