पुणे- या विधानसभा निवडणुकीत DSK चे दुर्भागी ठेवीदार NOTA चे बटन दाबून सर्वपक्षीय नेत्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करून ठेंगा दाखवणार आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सहित मनोज तारे ,विवेक परदेशी,विद्या घटवाई,सुर्यकांत कुंभार,नितीन शुक्ल,आदिती जोशी तसेच ठेवीदार संघटने कडून दिपक फडणवीस ,शरद नातू ,सुधीर गोसावी ,नितीन मोरे यांनी उपस्थित राहून दिली.(NOTA चे बटन यापैकी कोणीही उमेदवार पसंतीचा नाही या साठी कायद्याने दिलेले आहे. सगळेच उमेदवार सारखे वाटल्यास त्यातील एकही पसंतीचा नसेल, तर बळजबरी कोणाला तरी मतदेण्याची गरज नाही पण मतदान करावे आणि सरकारी यंत्रणांना समाजाला हि भावना कळावी म्हणून NOTA चे बटन दाबून हि मतदान नोंदविता येते . )
या संदर्भात त्यांनी सांगितले कि,’ २०१७ पासून डी एस कुलकर्णी यांच्या DSK Group कंपनीने ठेवीदारांची ठेव बरोबरच व्याजही देण्याची असमर्थतता दाखवल्यानंतर सुरू झालेला लढा आजही सुरूच आहे.DSK group मध्ये गुंतवणूक करणारे ३२ हजार ठेवीदार गुंतवणूक केलेल्या १२०० कोटीच्या परताव्याकरिता कायदेशीर लढाई लढत आहेत.DSK group विरूद्ध झालेल्या तक्रारी,नंतर दाखल झालेले गुन्हे ,सर्व संचालकांना अटक त्यानंतर न्यायालयाने १६ हजार कोटींची मालमत्ता फक्त ८२८ कोटींना ठराविक बांधकांम व्यवसायिकांना ७ वर्षाच्या मुदतीसह देण्याचा निर्णय घेताना कुठेही ठेवीदारांचा विचार न करणे संशयास्पद आहे या प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा स्पर्श दिसत आहे. म्हणूनच ठेवीदारांना त्यांचे पैसे अजूनही दिले गेले नाहीत अगर देण्यासाठी कोणी उत्साही दिसत नाही , सर्व ठेवीदारांना वार्यावर सोडून त्यांची रक्कम हवेत गायब झाली काय ? असा सवाल यावेळी करण्यात आला .
या परिस्थितीची चर्चा संपुर्ण राज्यात सुरू असतानामागील ७ वर्षात कुठल्याही लोकप्रतिनिधी ,राजकीय नेते व सहकार महर्षींना आभाळ कोसळलेल्या ज्यांचे कष्टाची ठेव बुडतेय यांची दखल घेण्याची इच्छा झाली नाही या विषयाचे गांभीर्य कोणालाही नसून सातत्याने अनेक बँका अचानक बंद होणे सहकार माध्यमात ठेवीदारांची ठेव बुड्ल्यास विश्वासआर्हता संपुन सहकारी क्षेत्रात ठेवीदार गुंतवणूक करणे बंद होतील .मागील महिन्यात हिंदू महासंघ व ठेवीदार यांनी आयोजित मेळाव्यात आवाहन करूनही अगदी विधानसभेच्या निवडणूका असताना देखील ३२ हजार कुटुंब म्हजेच १.५० लाख जनतेच्या गंभीर विषयाकडे बघण्यास कुणालाही वेळ नाही हिंदू महासंघ मात्र ठेवीदारांसाठी सर्वच स्तरावर ठेवीदारांचा लढा पुढे नेण्याचे काम सातत्याने करीत आहे
नुकत्याच झालेल्या हिंदू महासंघ व ठेवीदारांच्या बैठकीत लोकशाही ने दिलेल्या हक्कातील मतदानात NOTA चा वापर करायचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार १.५० लाख लोक या निवडणूकीत गैर हजर राहतील किंवा लोकशाहीनेच ने दिलेला NOTA वापरण्याचे निश्चित केले आहे.