पुणे –
पश्चिम महाराष्ट्रात युतीचे ४२ आमदार असून आघाडीचे १६ आमदार आहे.पश्चिम महाराष्ट्रात ४५ जागा आम्ही यंदा निवडून आणू. लोकसभा निवडणुकीत आमच्या दहा जागा कमी झाल्या पण विरोधक यांचे फेक नरेटिव्ह संभ्रम दूर करू शकलो. पश्चिम महाराष्ट्रात भाजप २६ जागा, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९ जागा आणि जनसुराज्य पक्ष दोन जागा लढत आहे. आम्ही जे काम करणार आहे आणि केलेले काम जनते समोर ठेवले आहे. जनता सुज्ञ असून त्यांना काम करणारे कोण आहे हे बरोबर माहिती आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, राज्यातील प्रचारास आज विश्रांती मिळत असून २० नोव्हेंबर रोजी जनता कोणाला कौल देईल उत्सुकता सर्वांना आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५८ मतदारसंघ आहे. शहर आणि ग्रामीण भागात महायुती उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहे. अनेक नेत्यांच्या सभा झाल्या आहे. मागील निवडणुकीत युतीला स्पष्ट जनादेश जनतेने दिला पण उध्दव ठाकरे यांनी आघाडी सोबत जात त्यांनी जनतेचा निकालाचा अनादर करत सत्ता स्थापन केली. ठाकरे यांनी गद्दरी करत लोकशाहीचा अपमान केला. पण अडीच वर्षात जनतेच्या मनात नियतीने जे होते तेच झाले. आघाडीच्या काळात कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प स्थगिती दिली गेली. पण युतीच्या काळात विकासाला गती मिळाली आणि विविध पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. सर्वाधिक परकीय गुंतवणूक देखील आली. आघाडीचे सरकार आणि युतीचे सरकार यातील बदल लोकांसमोर आहे. जनता पुन्हा महायुतीवर विश्वास ठेवेल अशी अपेक्षा आहे. महायुती आगामी काळात देखील एकत्रित काम करेल. लोकसभा निवडणुकीत मनसे यांनी आम्हाला साथ दिली असून त्याची जाणीव आम्हाला नेहमी राहील. त्यांचा स्वतंत्र पक्ष असून ते देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आहे.