पुणे –
महाराष्ट्र आणि पुणे मध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहे. देश परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी भेटी देतात. पुण्यातील ऐतिहासिक वारसा हा देशातील पर्यटन केंद्राशी जोडला जाईल. राज्यातील ११ किल्ले जागतिक वारसा स्थळ होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पास राज्य सरकारने ५० कोटी मदत केली असून केंद्रीय पर्यटन विभागाने ८० कोटी रुपये साह्य करण्यात आले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पुणे आगामी काळात अधिक वेगाने विकसित करण्यात येईल.
विविध राज्यानी आठ हजार कोटींचे पर्यटन प्रकल्प माहिती प्रस्ताव दिले आहे त्याबाबत विचार होऊन त्यावर लवकरच एकत्रित निर्णय घेण्यात येईल
असे मत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.
शेखावत म्हणाले, सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेने विश्वास टाकत बहुमत दिले. देशातील राजकीय नरेटीव्ह बदलला गेला आणि विकास सरकार अस्तित्वात आले. सन २०१९ मध्ये देखील जनतेने मोदी सरकारला साथ दिली आणि सरकारने वेगवेगळ्या योजना राबवत विकास तळागाळापर्यंत पोहचवला. जनतेने महाराष्ट्र मध्ये युतीला स्पष्ट बहुमत दिले पण राजकीय घडामोडी होऊन राज्याच्या विकासाला ब्रेक लागला. आघाडी सरकारने युतीच्या विविध कामे स्थगिती करणे, अडथळे निर्माण करण्याचे काम केले त्यामुळे विकास मंदावला आणि भ्रष्टाचार वाढला. आघाडी सरकारने लोकशाही विरोधी काम केले आणि १२ भाजप आमदार निलंबित केले. सर्वच्च न्यायलयाने याबाबत सदर निर्णयास रद्द केले.कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घरात बसून राहिले आणि अनेकजण मयत झाले. याकाळात कोविड कामात देखील मोठा भ्रष्टाचार झाला. बार आणि हॉटेल मधून कोट्यवधी रुपये वसुली प्रकरण उघडकीस येऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात जावे लागले. सरकारच्या संरक्षणात भ्रष्टाचार झाला आणि जनतेचे प्रश्न दुर्लक्षित केले गेले. महायुती सरकारच्या काळात लाडकी बहिण योजनेस आघाडी नेत्यांनी विरोध केला आणि न्यायालयात गेले. पण आता स्वतःच्या जाहीरनाम्यात ही योजना त्यांनी टाकणे हास्यास्पद आहे. महायुतीने सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल अशाप्रकारे विविध योजना सुरू केल्या असून आणखी योजना बाबत जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे. काँग्रेसने अनेक खोटे आश्वासने जाहीरनाम्यात दिले आहे. त्यांनी इतर राज्यात ज्या ठिकाणी त्यांची सत्ता आहे तिथे जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची कोणती पूर्तता केलेली नाही. शेतकरी कर्ज माफी नाही, पीक विमा नाही, वीज दर वाढ, महालक्ष्मी योजना अंमलबजावणी नाही असे प्रकार त्यांनी केले आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने देशात फूट पाडा आणि राज्य करा तत्त्वानुसार काम केले आहे.