एकपात्री महोत्सवाला सुरुवात

Date:

पुणे : एकपात्री या कलाप्रकाराला आजच्या काळात भरपूर वाव आहे. त्यामुळे एकपात्री कलाकाराने आलेली कुठलीही संधी न दवडता कार्यक्रमाची उत्तम तयारी व प्रभावी सादरीकरण केल्यास यश नक्कीच मिळेल, असा सल्ला सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य श्याम भुर्के यांनी दिला.  स्व. मधुकर टिल्लू यांनी आपल्याला कायम प्रोत्साहित केल्याची आठवण जागवत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

मराठी रंगभूमीवर एकपात्री कलाप्रकार रुजवणारे पहिल्या पिढीतील ज्येष्ठ एकपात्री कलाकार स्व. मधुकर टिल्लू यांचा १ जून हा स्मृतिदिन. या निमित्ताने दरवर्षी हा दिवस एकपात्री कलाप्रसार दिन म्हणून साजरा केला जातो. एकपात्री कलाकार परिषद, राष्ट्रसेवा दल सांस्कृतिक विभाग, निळू फुले कला अकादमी यांच्या सहकार्याने एकपात्री कलाप्रसार दिनाचे औचित्य साधून एकपात्री महोत्सवाचे बॅरिस्टर नाथ पै सभागृह, साने गुरुजी स्मारक, राष्ट्रसेवा दल येथे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्‌घाटन आज (दि. १) प्राचार्य श्याम भुर्के यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. दि. १, दि. २, दि. ३ व दि. ५ या कालावधीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्ताने ‘आर्टिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने नाना गुजराथी (संगमनेर) आणि लक्ष्मीकांत रानडे (पुणे) यांचा गौरव करण्यात आला. या वेळी निळू फुले अकादमीचे सुरेश देशमुख, मकरंद टिल्लू, एकपात्री कलाकार परिषदेच्या उपाध्यक्ष मंजुषा जोशी मंचावर होते. शाल, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्राचार्य श्याम भुर्के यांनी आपली कला कशी बहरत गेली हे सांगताना, नकलाकार म्हणून काम करताना नाटकाकडे वळलो आणि पुढे नोकरीत असताना व्याख्याने देऊ लागलो. हा प्रवास साकारताना प्राचार्य शिवाजीराव भोसले, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे अशा दिग्गज व्यक्तींच्या सहवासातून आपले व्यक्तिमत्त्व घडत गेले. मधुकर टिल्लू यांचा वारसा टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या ही कला जोपासत आहेत. मकरंद टिल्लू उत्तम संघटकाच्या भूमिकेतून सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रास्ताविकात मकरंद टिल्लू म्हणाले, विनोदी प्रसंगांची गुंफण करत एकपात्री कला सादर करण्याची कला मधुकर टिल्लू यांनी विकसित केली होती. महाराष्ट्रातील एकपात्री कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी ते सातत्याने कार्यशील होते. आज एकपात्री कलेला सुवर्णकाळ आलेला आहे, अशा काळात कला आणि गुणवत्ता वाढवत समोरच्याला अवाक करण्याचे कसब साधणे आवश्यक आहे. एकपात्री कलाकार परिषद कलाकारांना एकत्र आणून एकमेकांना मदत करत कार्यशील राहण्याचे प्रयत्न करत आहे.

उद्घाटन समारंभानंतर भाग्यश्री देशपांडे, अतुल कुलकर्णी, राहुल भालेराव या कलाकारांचे सादरीकरण झाले.

पुरस्काराला उत्तर देताना नाना गुजराथी आणि लक्ष्मीकांत रानडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप रत्नपारखे, सतिश कारेकर यांनी केले. पल्लवी परब, नरेंद्र लवाटे यांनी आयोजन केले. सुरुवातीस नटराज पूजन आणि मधुकर टिल्लू यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दहावी-बारावीनंतर करिअर निवडताना आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक : आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नियमित...

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

पुणे, दि. 1 : हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील (ग्रामा-४५...