Home Blog Page 3137

‘झिपऱ्या’चा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा रंगला

 
– येत्या २२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित 
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ चित्रपट येत आहे. ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित व सहनिर्माता अथर्व पवार क्रिएशन्स तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित, प्रेरणादायी  चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच  सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.
मुंबईसह  अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील.  ‘झिपऱ्या’ चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे.  यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपऱ्याला पोलिसांची भीती का वाटू लागते? झिपऱ्या आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये नेमकं काय काय करतो? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात, या कथेत असलेलं एक गूढ आणि त्या भोवती घेरलेलं झिपऱ्या चं आयुष्य आहे. तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वतःसह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो  धडपड करत आहे. वास्तवदर्शी  चित्रीकरण, वेगवान कथानक आणि आयुष्याकडे पहाण्याची सकारात्मक दृष्टी देणाऱ्या ‘झिपऱ्या’ बद्दलची उत्कंठा या ट्रेलर मधून अधिकच वाढली आहे.
अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे.
‘झिपऱ्या’चे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ज्येष्ठ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांनी दिले आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय – अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत. तीन राज्य पुरस्कारांची मोहोर उमटलेला ‘झिपऱ्या’ येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

महिला बंदीच्या पुनर्वसनासाठी कौशल्य प्रशिक्षण हा योग्य पर्याय : स्वाती साठे

पुणे : बंदीवास संपल्यानंतर पुन्हा सामान्य नागरी जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी महिला बंदीसाठी सुरु करण्यात आलेले  कौशल्य प्रशिक्षण हे योग्य पुनर्वसनासाठी गरजेचे आहे मत पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक  स्वाती  साठे यांनी  व्यक्त केले.   येरवडा  कारागृहात महिला बंदीच्या पुनर्वसनासाठी सुरु करण्यात आलेल्या  ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्सच्या  पहिल्या  बॅचच्या प्रशस्तीपत्र प्रदान कार्यक्रमात त्या बोलत  होत्या.

अशा प्रकारच्या  कौशल्य प्रशिक्षणामुळे या महिलांना रोजगार संधी सहजगत्या प्राप्त होऊ शकते. तसेच बंदिवासामुळे  आलेले नैराश्य दूर होऊन पुन्हा एकदा स्वतःच्या आयुष्याकडे त्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकतात. म्हणूनच त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव मिळावा  या हेतूने  महाराष्ट्र कारागृह विभागाच्या बंदी कल्याण आणि पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत  यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सहकार्याने महिला बंदीसाठी शिवणकाम क्षेत्रातील ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स सुरु करण्यात आला  असे त्यांनी  सांगितले.

यावेळी बोलताना  बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प संचालिका  वर्षा  कणिकदळे  म्हणाल्या की, आपणही काहीतरी करू  नवीन शकतो असा आत्मविश्वास या महिलांना या प्रशिक्षणामुळे मिळाला आहे.

याप्रसंगी बोलताना  यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ म्हणाल्या की,  या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची संधी मिळाल्याचे खूप समाधान आहे.  विशेष बाब म्हणजे प्रशिक्षणादरम्यान  या महिलांचा उत्साह आणि  नवनवीन  ड्रेस चे प्रकार शिकण्याचे प्रयत्न खूप चांगले होते.

तर  येरवडा  मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक  यु. टी. पवार म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे या महिलांमध्ये स्वतःप्रती जागृत झालेला आत्मविश्वास त्यांना पुढील आयुष्यासाठी लाभदायक ठरेल.

याप्रसंगी महिला तुरुंग अधिकारी  स्वाती  पवार, टाटा ट्रस्टच्या कार्यक्रम अधिकारी मंगला होनावर, मुल्यांकन अधिकारी अनुराधा माने,  सामाजिक कार्यकर्त्या हिना सय्यद व  मीनाक्षी बडवाईक, ‘यशस्वी’ संस्थेच्या  प्रशिक्षिका स्वाती कांबळे,’यशस्वी’ च्या समन्वयक प्राची राऊत,यशस्वीच्या प्रशिक्षक प्रतिमा सातळकर आणि स्वाती कांबळे या उपस्थित होत्या.

” द आनंद मॅरेज (अमेनटमेन्ट) कायदा ” महाराष्ट्र सरकारने त्वरित लागू करण्याची मागणी

अजित पवार यांच्याकडे  केली पत्राद्वारे मागणी

पुणे-द आनंद मॅरेज (अमेनटमेन्ट)कायदा २०१२ केंद्रसरकारने समंत करण्यात आलेला आहे . तो महाराष्ट्र सरकारने त्वरित लागू करण्याची मागणी पुण्यातील शीख बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना पत्राद्वारे केली भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील असताना त्यांनी ८ जून २०१२ रोजी हा कायदा संमत केला . कायदा समंत केलेले गॅझेट सर्व राज्यांना लागू करावे असे नमूद करण्यात आले होते . आता हा कायदा फक्त पंजाब , हरियाणा व दिल्ली येथेच लागू आहे . तरी महाराष्ट्रात द आनंद मॅरेज (अमेनटमेन्ट)कायदा लागू करावा . अशी मागणी पुण्यातील शीख बांधवानी अजितदादा पवार यांच्याकडे केली .

यावेळी हारपालसिंग राजपाल , भोलासिंग अरोरा , रणजितसिंग अरोरा , , बलबीरसिंग व्होरा , सुरजितसिंग राजपाल , गुरुविंदरसिंग राजपाल , गुरुप्रीतसिंग राजपाल , गुरुप्रीतसिंग शर्मा व बॉबी सहानी आदी मान्यवर उपस्थित होते .

पुणे व पिंपरीमधील खोदकामात दोन वाहिन्या तोडल्याने वीज खंडित

पुणे: पुणे व पिंपरी शहरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या खोदकामामध्ये महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वाहिन्या तोडल्याने बुधवारी (दि. 6) सुमारे 8 हजार 700 वीजग्राहकांची खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय झाली.

याबाबत माहिती अशी, की पुणे महानगरपालिकेकडून लुल्लानगर येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामासाठी कंत्राटदाराकडून जेसीबीने खोदकाम सुरु असताना सकाळी 11.30च्या सुमारास कोंढवा 22 केव्ही वीजवाहिनी तुटली व 20 रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. यातील 8 रोहित्रांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र लुल्लानगर ते एनआयबीएम रोडवरील 12 रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित राहिला. त्यामुळे सुमारे 1200 वीजग्राहकांची गैरसोय झाली. सायंकाळी 5.15 पर्यंत दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर या वाहिनीवरील वीजपुरवठा पूर्ववत होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्राधीकरण भागात महानगरपालिकेकडून पाईपलाईनचे काम सुरु आहे. या कामाच्या खोदकामात प्राधीकरण स्विचिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारी इनकमर भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे या स्विचिंग स्टेशनमधील आऊटगोईंग तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणकडून यातील दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. परंतु विकासनगर व देहूरोड परिसरातील सुमारे 7500 वीजग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या एका वाहिनीवरील वीजपुरवठा दुपारी 3 तास खंडित होता.

कन्याकुमारी-लेह सायकल मोहिमेचे पुण्यात आगमन

सायकलस्वार  प्रा . वासंती जोशी  यांचा लायन्स क्लब औंध -पाषाण तर्फे सत्कार 
पुणे :’भीतीवर मात करा ‘ असा महिलांसाठी संदेश देत कन्याकुमारी ते लेह मार्गावर निघालेल्या सायकल मोहिमेचे आज पुण्यात आगमन झाले . लायन्स क्लब ऑफ पुणे औंध -पाषाण च्या वतीने मंगळवारी रात्री मोहिमेचे स्वागत करण्यात आले आणि सायकलस्वार प्रा . वासंती जोशी यांचा सत्कार करण्यात आला  .
प्रा . वासंती जोशी यांच्यासमवेत त्यांच्या  चमूतील शुभदा जोशी ,केतकी जोशी ,गायत्री फडणीस यांचाही सत्कार करण्यात आला .
लायन्स क्लब चे प्रांतपाल रमेश शहा ,लायन्स क्लब ऑफ पुणे औंध -पाषाण  चे अध्यक्ष डॉ सतीश देसाई ,एड . सतीश धोका यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी मोहिमेसाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला .
ग्राहकपेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक ,काका धर्मावत ,प्रदीप बर्गे यावेळी उपस्थित होते . हा स्वागत कार्यक्रम मंगळवारी रात्री गिरिकंद ट्रॅव्हेल्स च्या कार्यालयात करण्यात झाला .
२८ मे ते ५ जुलै अशी ही मोहीम असून ‘ येस वुई कॅन :काँकरिंग नोन अँड अननोन फिअर ‘ असा या मोहिमेचा संदेश आहे . दररोज किमान १५० किलोमीटर सायकलिंग केले जात असून या मोहिमेची लिम्का बुक रेकॉर्ड्स ‘ मध्ये नोंद होणार आहे . कन्याकुमारी ते लेह  मोहिमेचे हे अंतर ४२७५ किलोमीटर आहे .
प्रा . वासंती जोशी या एस एन डी टी विद्यापीठ पुण्यात अकाउंट्स विषयाच्या प्राध्यापक आहेत . महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या संस्थांचा ५
जुलै रोजी स्थापना दिन असून त्यांनी महिलांप्रती केलेल्या योगदानाला मानवंदना म्हणून या मोहिमेचा समारोप ५ जुलै रोजी होणार आहे .
लेह मधील उमलिंग खिंड ला जाणाऱ्या त्या पहिल्या सायकलस्वार ठरणार असून ही खिंड १९ हजार ३०० फूट उंचावर आहे .
प्रा . वासंती जोशी या बुधवारी ६ जून रोजी एस एन डी टी विद्यापीठ कर्वे रस्ता येथे सायंकाळी ४ ते ५ वेळात पुणेकरांना भेटणार आहेत ,असे यावेळी गिरिकंद ट्रॅव्हल्स च्या संचालक शुभदा जोशी यांनी सांगितले .

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 200 रोपांचे वाटप

पुणे : ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी’ पर्यावरण विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी रोप वाटप करण्यात आले. यावेळी पराग आठवले (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग) यांच्या हस्ते गणेश पेठ येथील स्थानिक महिलांना रोपे देण्यात आली. एकूण 200 रोपांचे वाटप करण्यात आले.
पर्यावरण दिनी ‘झाडे लावा झाडे जगवा, प्रदुषण टाळा’ हा संदेश देण्याच्या उद्देशाने हा रोप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्ष कमल व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे रोप वाटप झाले. याप्रसंगी प्रतिभा शिंदे, भारती कोंडे, गीता तारु, सारिका गोरड, सुनिता गुजर, सुरेखा शिंदे आणि डॉ.पल्लवी शिंदे उपस्थित होते.

कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये महिलांसाठी विशेष कर्करोग तपासणी शिबीर संपन्न

पुणे- येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र व प्रयास या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हिंगणे – कर्वेनगर परिसरातील महिलांसाठी गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

देशातील विविध प्रकारच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता विशेषतः महिलांमध्ये वाढणाऱ्या विविध प्रकारच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी पुणे शहरामध्ये प्रयास या संस्थेने पुढाकार घेतला असून संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी महिलांसाठी गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मोफत तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. प्रयास व कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल कर्वेनगर-हिंगणे-श्रमिक वसाहत या परिसरामधील महिलांसाठी तसेच कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्रास भेट देणाऱ्या सर्व महिलांसाठी याप्रकारचे मोफत तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते व त्याचा लाभ बहुतांशी महिलांनी घेतला.

कर्वे समाज सेवा संस्थेचे सचिव एम. शिवकुमार, संचालक डॉ दीपक वलोकर, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे मानद संचालक डॉ. देवानंद शिंदे, समुपदेशक वृषाली दिवाण, समन्वयक प्रसाद कोल्हटकर व प्रयास चे समुपदेशक मुफीद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करून घेतली. परिसरातील महिलांमध्ये जनजागृती व समुपदेशन करून शिबिराच्या माध्यमातून चाचणी करून घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या समुपदेशिका वृषाली दिवाण व प्रयास चे समुपदेशक मुफीद बेग यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘२०१८ होंडा आफ्रिका ट्विन’साठी नोंदणी सुरू, नशीबवान ग्राहकांना ‘मोटोजीपी’ लाइव्ह थरार अनुभवता येणार

      २०१८ आफ्रिका ट्विनचा आनंद केवळ पहिल्या ५० स्पर्धकांना मिळणार

      नोंदणीप्रक्रिया विंग वर्ल्ड’ डीलरशीपच्या भारतामधील २२ शहरांमध्ये उपलब्ध

      नवीन २०१८ आफ्रिका ट्विन वैशिष्ट्ये

Ø  नवीन चालकांना मदत : चालविण्याचे ३ मार्गसातव्या पातळीपर्यंत होंडा टॉर्क नियंत्रण व्यवस्था

Ø  वाढीव कार्यपद्धती : नवीन पद्धतीची एलसीडी इन्स्ट्रुमेंटेशन पद्धतहलक्या वजनाची लिथीयम आयन बॅटरी

      किंमत – १३ लाख २३ हजार (एक्स शोरुम दिल्ली)

 गुरगांव : होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर प्रा. लि.ने आज आफ्रिका ट्विन २०१८साठीची नोंदणी सुरू झाली असल्याची घोषणा केली. या नोंदणीमधील नशीबवान ग्राहकांना मोटोजीपीमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या लाडक्या मोटाररायडर्सना पाहण्याची संधी मिळणार आहे.

 ही नोंदणी फक्त पहिल्या ५० नशीबवान ग्राहकांसाठी मर्यादित राहणार आहे. या नोंदणीसाठी ग्राहकवर्ग भारतामधील २२ शहरांमधील होंडाच्या विक्री आणि सेवा विभागाशी संपर्क साधू शकतात. त्याखेरीज ग्राहक अधिक माहितीसाठी Honda2WheelersIndia.com या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.

 २०१८ होंडा आफ्रिका ट्वीन’ ही मोटारसायकल पहिल्यांदा ऑटो एक्स्पो २०१८च्या प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. या मोटारसायकलला तीन दशकांची होंडाची परंपरा लाभली आहे. शक्तीआराम आणि नियंत्रण अशा तीनही सुविधा या मोटारसायकलमध्ये एकत्रित पाहायला मिळतात.

 भारतीय मोटारसायकलिंग क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडविणाऱ्या २०१८ आफ्रिका ट्विनबद्दल होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ

उपाध्यक्ष श्री. यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, “ज्या मोटारसायकलीची प्रतीक्षा ग्राहकांतर्फे सुरू होतीतीआफ्रिका ट्विन’ आता भारतीय ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. नवीन वैशिष्ट्यांसह ही मोटारसायकल ग्राहकांना आनंद देणार आहे. ही मोटारसायकल अत्यंत विश्वासार्हव्हर्सटाइल आणि साहसी प्रवासासाठी योग्य आहे. काही नशीबवान ग्राहकांना आपल्या लाडक्या मोटाररायडर्सना मोटोजीपीमध्ये लाइव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे.

 २०१८ आफ्रिका ट्विनची महत्त्वाची वैशिष्ट्ये :

इलेक्ट्रॉनिक्स ओव्हरहॉल

या मोटारसायकलीमध्ये थ्रॉटल बाय वायर’ (टीबीडब्ल्यू) ही नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याद्वारे मोटारसायकलस्वाराला इंजिन आउटपुटकडे तसेच व्हील ट्रॅक्टनकडे लक्ष देता यणार आहे. होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल’ (एचएसटीसी) ही नवीन पद्धत सात लेव्हलची आहे. लेव्हल १पासून रस्त्यावरील वेगवान प्रवासापासून ते सातव्या लेव्हलमुळे ओल्यानिसरड्या रस्त्यावरून प्रवास सुरक्षित होणार आहे. तसेच एचएसटीसी’ ही नवीन प्रणाली वाहनचालकाला बंददेखील ठेवणे शक्य आहे. लिथीयम-आयन बॅटरीमुळे मोटारसायकलचे एकंदरीत वजन २.३ किलोने कमी झाले आहे. तसेच इतर सुविधांमुळे मोटारसायकलीच्या ऑफ रोड’ सुरक्षितततेमध्ये भर पडली आहे.

 नियंत्रणात वाढ

या मोटारसायकलचे इंजिन पॅरलल ट्विन-९९९.११ सीसी आणि —- क्षमतेचे आहे. तसेच या मोटारसायकलमध्येड्युएल क्लच ट्रान्समीशन’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ऑटोमेटेड’ क्लच आणि शिफ्ट ऑपरेशनमुळे थेट वेग वाढविण्याची प्रणाली कायम राहणार आहे. तसेच मोटारसायकलचा वेग वाढविणेवळविणे आणि ब्रेक लावतानाही वाहनचालकाला कसलाही त्रास न होता उलट आनंदच मिळणार आहे.

 सुट युवरसेल्फ रायडिंग मोड्स

ड्युएल क्लच ट्रान्समिशनद्वारे (डीसीटी) तीन कार्यपद्धती उपलब्ध होणार आहेत. ऑटोमॅटिक डी’ पद्धत ही शहरातील तसेच हायवेवरील प्रवासासाठी योग्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना इंधनबचतीचा लाभ होणार आहे.ऑटोमॅटिक एस’ पद्धतीमुळे वाहनचालकांना स्पोर्टियर’ प्रवासाचा अनुभव घेता येईल. एमटी’ मोडद्वारे वाहनचालकांना मॅन्युएल’ नियंत्रणाची सुविधा उपलब्ध आहे. रायडिंग मोड्स’ हे पॉवर (पी) आणि इंजिन ब्रेकिंग (इबी)च्या विविध पातळ्यांशी संलग्न ठेवण्यात आले आहेत.

 या मोटारसायकलमध्ये पॉवर आणि इंजिन ब्रेकिंगमध्ये तीन पातळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ वेगवेगळ्या वातावरणातील प्रवासासाठी होणार आहे.

टूरअर्बन. ग्राव्हेल

चौथ्या मोडद्वारे वाहनचालकाला पॉवरइबी आणि एचएसटीसी’ पातळ्यांचे नियंत्रण स्वत: करता येणे शक्य आहे. तसेच रायडिंग मोड’ आणि एचएसटीसीची पातळी वाहनचालकाला कोणत्याही क्षणी स्विचगीअरजवळील कंट्रोल्सचा वापर करून बदलणे शक्य होणार आहे.

मॅन्युएल शिफ्ट इंडिकेटडी’ किंवा एस’ मोडमध्ये डीसीटीद्वारे वाहनचालकाला गरज वाटल्यास तातडीने मॅन्युएल पद्धतीचा अवलंब करता येईल. डाव्या हॅंडल बारवरील शिफ्ट गिअर्सचा वापर करून या पद्धतीचा उपयोग करणे शक्य आहे. योग्य वेळी तसेच थ्रॉटल अॅंगलवाहनाचा वेग आणि गीअर स्थिती लक्षात घेताडीसीटी’ ऑटोमॅटिक पद्धतीने कार्यान्वित होईल.

 वाढीव कार्यप्रणाली

रॅली स्टाइल निगेटिव्ह एलसीडी इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेमध्ये रायडिंग मोड्सस्पीडोमीटरटॅकोमीटरइंधनगीअर स्थितीएचएसटीसीओडोमीटरट्रीप मीटरघड्याळ आणि एबीएस इंडिकेटरचा समावेश करण्यात आला आहे.

फ्रंट शोआ ४५ एसएम काट्रीज टाइप इन्व्हर्टेड टेलीस्कोपिक फोर्कडायल स्टाईल प्री लोड अॅडजस्टरडीएफ अॅडजस्टमेंट२३० एमएम स्ट्रोक. रीअर : मोनोब्लॉक कास्ट अल्युम्युनियम

स्विंग आर्म- गॅसचार्जित डॅम्परसह. हायड्रॉलिक डायल स्टाइल प्री लोड अॅडजस्टर आणि रिबाउंड डॅम्पिंग अॅडजस्टमेंट. २२० एमएम रीअर व्हील प्रवास.

ब्रेक्स :

३१० एमएम वेव्ह’ स्टाइल ब्रेक्सट्विन फ्लोटिंग फ्रंट डिस्क्सनिस्सीनचे ४-पॉट रॅडियल कॅलिपर्स. रीअर डिस्क – २५६ वेव्हस्टाईल१ पॉट कॅलिपरसह. रीअर ब्रेकवर एबीएस’ ऑफ. ३६० डिग्री व्हॅल्यू अॅडिशनमुळे २०१८ आफ्रिका ट्वनची किंमत १३ लाख २३ हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली) एवढी ठेवण्यात आली आहे. ही मोटारसायकल जीपी लाल रंगात उपलब्ध आहे.

 भारतामधील आफ्रिका ट्विन  :

जुलै २०१७ मध्ये ही मोटारसायकल भारतात लॉंच करण्यात आली. ड्युएल क्लच ट्रान्समीशन’ (डीसीटी) तंत्रामुळे देशभरातील ग्राहक या मोटारसायकलच्या प्रेमात पडले. यापूर्वीचे सगळे ठराविक मापदंड तोडीत अवघ्या १०० दिवसांमध्ये ८० वाहने विकली गेली.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ची ‘डॉट नेक्स्ट अपग्रेड’च्या मदतीने वाढीची योजना

·         डॉट नेक्स्ट अपग्रेडची दुसरी आवृत्ती पुण्यात सादरभारतातील अन्य शहरांमध्ये लवकरच होणार उपलब्ध

 ·         स्मार्ट इनडोअर्स अॅन्ड कनेक्टेड आउटडोअर्स या संकल्पनेनुसार, ‘आयओटी व आयबीएमएसवर आधारीत अनेक स्मार्ट इनडोअर सोल्युशन्सचे तसेच कनेक्टेड आऊटडोअर सोल्युशन्सचे सादरीकरण.

 ·         गेल्या वर्षीपेक्षा यंदा पुण्याच्या लाइटिंग बाजारपेठेत 30 टक्के वाढ होण्याची बजाज इलेक्ट्रिकल्सला अपेक्षा.

 पुणे- पंखेलाइटिंग आणि अभियांत्रिकी प्रकल्प या क्षेत्रांमध्ये देशात अग्रणी असलेल्या बजाज इलेक्ट्रिकल्स लि. या कंपनीने डॉट नेक्स्ट अपग्रेड या संकल्पनेची दुसरी आवृत्ती स्मार्ट इनडोअर्स अॅन्ड कनेक्टेड आऊटडोअर्स या विषयाखाली आज पुण्यात सादर केली. हॉटेल कॉनरॅड येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रख्यात आर्किटेक्ट्सकन्सल्टंट्सस्पेसिफायर्सविविध उद्योगांमधील वरिष्ठ अधिकारीउच्च सरकारी अधिकारीधोरणात्मक निर्णय घेणारे अधिकारी तसेच वितरक आदी उपस्थित होते.

 देशातील शंभर स्मार्ट शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुण्यात आठहून अधिक नामवंत विद्यापीठे आहेत. तसेच वाहन उत्पादनडिझाईन व ग्राहकोपयोगी वस्तू यांच्या दिग्गज कंपन्या पुण्यात व पुणे परिसरात आहेत. त्यामुळे पुणे हे वास्तव्य व व्यवसाय करण्यासाठीचे आदर्श शहर बनले आहे. शिक्षणाचे माहेरघर व आयटी कंपन्यांचे प्रमुख केंद्र अशी ओळख पुणे शहराची झाल्याने त्याचा भौगोलिक विस्तारही झाला आहे. शहराच्या चहुबाजूंना वेगवेगळ्या टाऊनशिप्स उभ्या राहिल्या असून त्यामुळे कनेक्टिव्हिटीची गरज अधिक प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर या सर्व परिसराचा स्मार्ट पध्दतीने होणे अनिवार्य झाले आहे. स्मार्ट लाटिंगइंटिग्रेटेड बिल्डींग मॅनेजमेंट सोल्युशन्स (आयबीएमएस)तसेच अभियांत्रिकी व बांधकाम सेवा (इपीएस) यांची उपलब्धता वाढवून पुण्यातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देणेहाच बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे आयोजित डॉट नेक्स्ट अपग्रेड या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. पुणेकरांना शाश्वत व आधुनिक विकासाची फळे मिळावीत याकरीता अत्याधुनिक अशा डॉट नेक्स्ट आयओटीया तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे बजाज इलेक्ट्रिकल्सने ठरविले आहे.

नव्या शहरी विकासाची गरज लक्षात घेत, ‘स्मार्ट सिटीज, ‘स्मार्ट बिल्डिंग, ‘ह्युमन सेंट्रिक लाइटिंग, ‘स्पोर्ट्स लाइटिंग, ‘आर्किटेक्चरल लाइटिंगफळ उद्योगआरोग्य सेवा व अन्य उद्योगांना लागू पडेल असे प्रभावी तंत्रज्ञान बजाज इलेक्ट्रिकल्स देत आहे. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षाततसेच क्लाऊड कनेक्टिव्हिटी, ‘वायरलेस सोल्युशन्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही वापरण्याजोगे आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढल्याचा आणि आरामदायीसोप्यासुलभस्मार्ट जीवनशैलीचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे.

 बजाज इलेक्ट्रिकल्सचे उपाध्यक्ष व इल्युमिनेशन इपीसी विभागाचे प्रमुख संजय भगत या कार्यक्रमात म्हणालेकी या वर्षी आम्ही आमचे सर्व लक्ष इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानावर चालणाऱ्या स्मार्ट उत्पादनांवर वआयबीएमएस सोल्युशन्सवर केंद्रीत केले आहे. स्मार्ट आऊटडोअर लाइटिंग या क्षेत्रात आम्ही अजूनही निर्विवाद नेते आहोत. आधुनिक कार्यालयेउद्योगरिटेल स्टोअर आदी ठिकाणी लाइटिंग उभारण्याचा आम्हाला मोठा अनुभव आहे. उपलब्ध स्रोतांचा योग्य तो लाभ घेत सर्व क्षेत्रांना जागतिक दर्जाची उत्पादने व सेवा पुरविण्याची आमची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेवू. स्मार्ट सिटी प्रकल्पात आमचा सहभाग हा सर्व स्तरांवर असणार आहे. अगदी सबस्टेशन उभारण्यापासूनवीज वितरणलाइटिंग आणि विद्युत उपकरणे उपलब्ध करून देणे ही आमच्या कामाची व्याप्ती असणार आहे. हेच आमच्या व्यवसायाचे सूत्र आहे.

 बजाज इलेक्ट्रिकल्सच्या या सादरीकरणाच्या कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील व सरकारी खात्यांमधील धोरण निर्मितीउत्पादनडिझाईनप्रकल्पलेखा परीक्षण आदी क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती होती. 

 पुण्यातील मोठ्या कंपन्यांच्या गरजांना अनुरुप अशा उर्जा बचतीच्या शाश्वत अशा उपाययोजना बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे दिवस-रात्र उपलब्ध करून दिल्या जातात. केपजेमिनीहनीवेलआयटीसीटाटाहायरएम्बसी इंडस्ट्रीइंडो स्पेसकमिन्सएमईएसमहानगर पालिकानगर परिषदा आणि विविध सरकारी खाती या सर्वांना बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे सेवा व उत्पादने पुरविली जातात.

 बजाज इलेक्ट्रिकल्स या समुहाचे पुणे परिसरात रांजणगाव व चाकण या दोन ठिकाणी कारखाने आहेत. तेथे हजारोजणांना रोजगार पुरविला जातो. पुण्या लाइटिंग क्षेत्राच्या आपल्या व्यवसायात यंदा 30 टक्क्यांची वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

बजाज इलेक्ट्रिकल्स लि. विषयी :

 भारतात विश्वासार्ह नाव असलेल्या बजाज समुहातील बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी आहे,  जागतिक स्तरावरही ख्याती पावलेली ही कंपनी ग्राहकोपयोगी उत्पादने (उपकरणेपंखे व लाइटिंग)प्रकाश दिवेइपीसी (इल्युमिनेशनविजेचे मनोरे व वीज वितरण) तसेच निर्यात या क्षेत्रात आपला दबदबा राखून आहे. देशाच्या विविध भागांत बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या 20 शाखा आहेत. या शाखांना वितरक व विक्रेत्यांच्या मोठ्या साखळीचे सहकार्य होत असते. देशात सुमारे शंभर ठिकाणी बजाज वर्ल्ड या नावाने बजाज इलेक्ट्रिकल्सची स्वतंत्र शोरुम्स आहेत.

विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स सादर करीत जर्मनीतील ‘लीभेर’ कंपनीचा भारतीय बाजारपेठेला ‘हॅलो

  ग्राहकांसाठी १९ विविध श्रेणीतील फ्रीज २३ हजार ५०० रुपयांपासून उपलब्ध

  • जर्मन फ्रीजमधील तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेशी मिळतेजुळते
  • विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स देशातील ५० शहरे आणि ५०० शो रुम्समध्ये उपलब्ध

 मुंबई: जर्मनीतील रेफ्रिजरेटर निर्मिती क्षेत्रातील प्रख्यात लीभेर’ कंपनीने आज भारतीय बाजारपेठेसाठी आपली विविध उत्पादने लॉंच केली. या कंपनीचे विविध श्रेणीतील फ्रीज भारतामधील दक्षिण,  पश्चिम आणि उत्तर अशा रीजन्सच्या महत्त्वाच्या सर्व शहरांमधील विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहेत. या रेफ्रिजरेटर्सच्या श्रेणीची सुरुवात २३ हजार ५०० रुपयांपासून सुरू होणार असून टॉप एन्ड’ श्रेणीतील मॉडेलची किंमत १ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. ही सर्व उत्पादने औरंगाबाद येथील लीभेर’ कंपनीच्या फॅक्टरीमध्ये निर्मिली जात आहेत. गेल्या महिन्यामध्ये या फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले होते.

 लीभेर’ प्रॉडक्ट्स भारतीय बाजारपेठेच्या पसंतीस उतरण्यामागची काही प्रमुख कारणे म्हणजे त्यांची विशेष रचना. तसेच तब्बल ३ वर्षांच्या संशोधनानंतर या उपकरणामधील जर्मन तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेस लागू पडले आहे. या कंपनीने २२० लिटर क्षमतेपासून ते ४४२ लिटर क्षमतेपर्यंतचे १९ मॉडेल्सचे रेफ्रिजरेटर्स बाजारात आणले आहेत. या रेफ्रिजरेटर्समध्येसेंट्रल पॉवर कुलिंग’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रेफ्रिजरेटरला बीइइचे फाइव्ह स्टार’ रेटिंग मिळाले आहे. तसेच भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा तसेच त्यांच्या सांस्कृतिक आवडीनिवडी लक्षात घेऊन इतर श्रेणीतील रेफ्रिजरेटर्सची रचना करण्यात आली आहे. हे सर्व रेफ्रिजरेटर्स ग्राहकांच्या आवडीनिवड लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील फिनीश’, ‘ब्ल्यू लॅंडस्केप’ आणि रेड बबल’ या तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. लीभेर’ कंपनीने हे विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी वितरणाचे उत्तम जाळे तयार केले आहे. हे रेफ्रिजरेटर्स देशातील ५०हून अधिक शहरे आणि ५०० शो रुम्समध्ये उपलब्ध होणार आहेत.

 लीभेर अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि.चे मुख्य विक्री अधिकारी श्री. राधाकृष्ण सोमय्याजी यावेळी म्हणाले, “ ‘लीभेरने कायमच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्यावर भर दिला आहे. आमच्या कंपनीने जर्मन तंत्रज्ञानाचा अंगिकार करीत भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडीला साजेसे असे रेफ्रिजरेटर्स भारतीय बाजारपेठेत आणले आहेत. हे रेफ्रिजरेटर्स उत्कृष्ट स्पाइकबॉक्सेस’, ‘अल्ट्रा प्रोटेक्टिव्ह व्हेरिओसेफ’, ‘युनिक कुलपॅक’ या फिचर्सने नटले आहेत. भाज्यांची विभागणीदेखील यात करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे या रेफ्रिजरेटर्ससाठी वीजेचा कमीत कमी उपयोग केला जाणार आहे.

 लीभेर’ या ब्रॅण्डच्या भारतामधील प्रवासाबद्दल श्री. सोमय्याजी म्हणाले, “ ‘ली भेर अप्लायन्सेस इंडिया’ या प्रकल्पाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. Engineered in Germany, designed for India’ या कल्पनेवर या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. ग्राहक हाच आमच्या केंद्रस्थआनी आहे. लीभेरमध्ये आम्ही कायम उत्तम सेवा आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या समाधानाला प्राधान्य देतो.

 लीभेरचे रेफ्रिजरेटर्स जून २०१८च्या दुसऱ्या आठवड्यापासून भारतामधील विविध शहरांच्या शो-रुम्समध्ये उपलब्ध होतील. या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी एक अनोखी मोहिम आखण्यात आली आहे. त्यामध्ये प्रेस कॅम्पेनबरोबरच उत्कृष्ट डिजीटल कॅम्पेनविभागवार आऊटडोअर प्रसिद्धी आणि बीटीएलचा समावेश आहे. आपली जागतिक पातळीवर कस्टमर सर्व्हिस राखण्यासाठी लीभेरने सर्व ठिकाणी सर्व्हिस सेंटरचालू केले आहेत. १८०० २३३३ ४४४ हा हेल्पलाईन’ क्रमांक ग्राहकांसाठी चालू झाला असून ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या शंकांचे समाधान या क्रमांकावर करता येईल.

 

लीभेर’ ग्रुप बद्दल : ‘लीभेर’ हा समूह ५० देशांमध्ये कार्यरत असून त्याच्या १३० कंपनीज आहेत. बहुतेक सर्व खंडांमध्ये या ग्रुपचे अस्तित्व असून त्यामध्ये ४४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. लीभेरची एकूण वार्षिक उलाढाल ९.८ अब्ज युरो एवढी आहे. या ग्रुपचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून काही युनिट्सना स्वतंत्र दर्जा देण्यात आला आहे. जमिनीवरची यंत्रेखाणमोबाइल क्रेन्सटॉवर क्रेन्सकॉंक्रेट तंत्रज्ञानसमुद्रामधील क्रेनएअरोस्पेस आणि वाहतूक पद्धतमशिन टुल्सस्थानिक उपकरणेकॉम्पोनंट्स आणि हॉटेल्स आदी क्षेत्रात हा ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपची मुख्य कंपनी आहे – लीभेर इंटरनॅशनल एजी.’ या कंपनीचे भागधारक हे लीभेर’ कुटुंबीयांचे सदस्य आहेत. ली भेर-इंटरनॅशनल एजी’ ही कंपनी स्वित्झर्लंडमधील बुले येथे स्थित आहे.

 

लीभेर’ डोमेस्टिक अप्लायन्सेबद्दल :

इंजिनिअर हान्स लीभेर यांनी १९५४ मध्ये जर्मनीतील ओस्सेनहॉसेन येथे ही कंपनी स्थापन केली. गेल्या साठहून अधिक वर्षांमध्ये स्थानिक आणि खासगी क्षेत्रांसाठी विविध पद्धतीच्या रेफ्रिजरेटर्सची निर्मिती करण्यात ही कंपनी आघाडीवर आङे. सध्याच्या काळात दरवर्षी या कंपनीच्या विविध प्लॅंटमधून २२ लाख उपकरणांची निर्मिती केली जाते. डोमेस्टिक प्रॉडक्ट अप्लायन्सेस’ विभागातर्फे रेफ्रिजरेटर्स आणि फ्रीजर्सची चार देशांमध्ये निर्मिती केली जाते. औरंगाबाद येथील प्रकल्पामुळे या कंपनीच्या निर्मिती प्रकल्पांची संख्या पाचवर जाऊन पोचली आहे. या कंपनीची विभागीय नियंत्रण कंपनी ली भेर-हौसरेट’ आहे.

‘लँड १८५७ ‘शुक्रवारी पडद्यावर …

पुण्यातील विजयालक्ष्मी जाधव यांनी “लँड १८५७” या त्यांच्या पहिल्याच  मराठी भाषिक चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट ८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे त्या निमित्याने  जाधव यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया च्या सभागृहात चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रसार माध्यमे यांच्यातील बातचीतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अनिल नगरकर, विठ्ठल काळे, मानिनी दूर्गे, इतर कलाकार, तंत्रज्ञ, फिल्म अँड टेलिविजन इन्स्टिट्युट चे डॉ. चंद्रशेखर जोशी आणि  मराठी चित्रपट महा-मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी चित्रीकरणाच्या  वेळी आलेले अनुभव,  काही रंजक किस्से ऐकवले.

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर म्हणाले “पूर्वी काम करताना निर्मात्या कडून कलाकारांना त्यांची  कारकीर्द पाहून वागणूक दिली जायची. त्या मुळे समान गुणवत्ता असून ही कुठे तरी जेष्ठ आणि कनिष्ठ अशी दरी असायची. आजच्या काळात निर्मात्या कडून दिल्या जाणाऱ्या समान वागणूकी मुळे ही दरी नष्ट झाली  आहे आणि हा सकारात्मक बदल मनाला समाधान देणारा आहे”. चित्रपट महा-मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी महा-मंडळाच्या काम काजा विषयी सांगितले. ते म्हणाले की “काही समस्या किंवा अडथळे आल्या नंतर महा मंडळा कडे धाव घेण्या पेक्षा प्रत्येक निर्मात्या ने महा-मंडळाच्या सम्पर्कात सुरवाती पासुनच रहायला हवे”. छोटे मोठे असे चार हजाराहून अधिक चित्रपट निर्माते आपल्या महाराष्ट्रात आहेत पण महा मंडळाच्या कामा  विषयी माहिती आणि जागृकता फार कमी निर्मात्यां मध्ये आढळून येते अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. चित्रपट निर्मात्या विजयालक्ष्मी जाधव आपल्या पहिल्या वाहिल्या चित्रपट निर्मिती बद्धल बोलताना म्हणाल्या, ”कले वर निस्सीम प्रेम असणाऱ्या कलाकारांना मानधन किंवा चित्रीकरण दरम्यान दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या बाबत तक्रार नसते. आपली भूमिका चोख पार पाडण्याला हे कलाकार प्राधान्य देतात आणि माझ्या पहिल्याच चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी मला असे कलेवर प्रेम करणारे सर्व कलाकार, तंत्रज्ञ लाभले. चित्रीकरण कोल्हापूर मध्ये पार पडले त्या वेळी सुद्धा तिथल्या स्थानिक कलाकार आणि रहिवाशांनी खूप सहकार्य केले.

एमबीए प्रवेश प्रक्रियेबाबत आयआयएमएस चे मोफत मार्गदर्शन.

पिंपरी :  एम.बी.ए.अभ्यासक्रमासाठी सीईटी उतीर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेशनिश्चित होइपर्यन्त ज्या विविध प्रवेश प्रक्रियेच्या पाय-या आहेत याबाबत विद्यार्थांना व पालकांना सविस्तर माहितीउपलब्ध व्हावी यासाठी यशस्वी एज्यूकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ  मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस ) तर्फे  एमबीए प्रवेश प्रक्रियेसंदर्भात  विनामूल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

 दिनांक  जून  २०१८ रोजी   चिंचवड येथील संस्थेच्या सभागृहात  होणाऱ्या या मार्गदर्शन सत्रात  ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया, एआरसी, कॅप राऊंड, ईबीसी तसेच शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप) आणि एमबीए प्रवेश स्वरूप,  तसेच प्रवेशप्रक्रियेदरम्यान सादर  करावयाची आवश्यक कागदपत्रे,संस्थास्तरावरील  प्रवेश  याविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थी वपालकांना  देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहासमोरील आयआयएमएस संस्थेच्या कॅम्पसमध्येच हे मार्गदर्शन सत्र  होणार आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी  पुढील  मोबाईल क्रमांकावर 7350014526/7350014512 संपर्क साधावा.

आता अवयव प्रत्यारोपणासाठी ”हेली अँम्ब्युलन्स”ला चालना द्या,नव्याने उभारणाऱ्या हॉस्पिटलमध्ये हेलिपॅड बंधनकारक करा

माजी उपमहापौर आबा बागुल यांची पालिका प्रशासनाला सूचना 
पुणे –
क्षेत्रफळाच्यादृष्टीने मुंबईपेक्षा पुणे मोठे ठरले आहे आणि दिवसेंदिवस ते विस्तारत आहे. आता  हॉस्पिटलसाठी ४ एफएसआय उपलब्ध होणार असल्याने ३६ मजली इमारत होणार आहे. सध्या वाहतुकीचे प्रमाण पाहता अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीनकॅरिडॉर निर्माण करणे जवळजवळ अशक्य होत जाणार आहे. त्यामुळे  नवीन हॉस्पिटलच्या बांधकामांना परवानगी देताना इमारतीवर हेलिपॅड बंधनकारक करण्याची मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भांत आयुक्तांना दिलेल्या पत्रात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, रुग्णांना अत्यावश्यक सेवा त्याही वेळेत मिळण्यासाठी आता ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत आणि त्यासाठी एअरअँब्युलन्सची सुविधा उभारण्याला चालना द्यावी लागणार आहे. त्यानुसारच  बांधकाम नियंत्रण नियमावलीत सवलत देणे  आवश्यक आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या हॉस्पिटलला ४ एफएसआय दिल्याने ३६  मजली  होणाऱ्या इमारतींवर हेलिपॅड उभारणे सहजशक्य आहे. परिणामी अवयव प्रत्यारोपण असेल किंवा रुग्णांना तातडीचे उपचार मिळेल त्यासाठी कॅरिडॉर करण्याची गरज भासणार नाही. सद्यस्थितीत   एअरअँब्युलन्सची सुविधा आहे मात्र हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड मर्यादित आहेत किंवा ते कुठे उतरवावे हा प्रश्न आहे आणि  हॉस्पिटलपर्यंत येण्यास ग्रीनकॅरिडॉर करणे अनिवार्य आहे ;पण वाढत्या  वाहतुकीचा विचार करता भविष्यात  ते अशक्य ठरणार आहे. त्यामुळे नवीन हॉस्पिटलला बांधकाम परवानगी देताना इमारतीवर हेलिपॅड बंधनकारक करावे, असे आबा बागुल यांनी पत्रात म्हटले आहे.

कॅन्टोमेंटच्या विकासासाठी राज्याकडून खास निधी : गिरीश बापट

पुणे : राज्यातील सात कॅन्टोमेंट बोर्डांच्या विकासासाठी खास निधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.त्यामध्ये देहूरोड ,खडकी, व पुणे कॅन्टोन्मेटच्या समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच विशेष बाब म्हणून हा विकास निधी  द्यावा. असा निर्णय राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री  गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

बापट पुढे म्हणाले की , या निर्णयामुळे देहू ,खडकी, पुणे,  यांच्या सोबत औरंगाबाद, अहमदनगर,देवळाली, कामठी येथील कॅन्टोमेंट बोर्डांना विकास निधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक कॅन्टोमेंटबोर्डाच्या अखत्यारीत मुलभूत सेवा सुविधांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याचा खर्च नगरविकास विभागाच्या मंजूर तरतुदी मधून करण्यात येईल. सात कॅन्टोमेंट बोर्डा पैकी देहू ,खडकी, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर हे पाच बोर्ड महापालिका क्षेत्रालगत आहेत. त्यांना“महानगरपालिका मुलभूत सुविधा योजना या योजनेतून निधी प्राप्त होईल. तर देवळाली व कामठी हे दोन बोर्ड नगरपरिषदेच्या क्षेत्रालगत आहेत. त्यांना नगरपरिषद योजनेतून निधी दिला जाईल. या निर्णयाची अमलबजावणी २०१८-१९ या वर्षापासून केली जाईल. याबाबत लोकप्रतिनिधींकडून विशेषत: आमदार, खासदार यांच्या कडून सतत मागणी होत होती. राज्यातील सर्वात मोठे तीन कॅन्टोन्मेट पुणे व परिसरात असल्याने या निर्णयाचा लाभ येथील सर्वसामान्य जनतेला होईल. असा मला विश्वास आहे. याबाबत पालकमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.  यापुढे कॅन्टोन्मेटच्या  परिसरात राहणाऱ्या लोकांच्या नागरी विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

ते पूढे म्हणाले की राज्यातील  सातही कॅन्टोमेंट बोर्डाचे नागरी व्यवस्थापन केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. लष्करी क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेसाठी केंद्राने कॅन्टोमेंट बोर्डाची स्थापना केली असून केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या अधिपत्याखाली हे व्यवस्थापन काम करते. त्यामुळे त्यांना पूर्णपणे केंद्र शासनाकडून अर्थ सहाय्य मिळते. त्यांना विविध विकास कामांकरिता निधी देण्याबाबत राज्य वित्त आयोगाची स्पष्ट शिफारस नव्हती. त्यामुळे राज्यशासनाकडून कॅन्टोमेंट बोर्डांना निधी मिळत नव्हता.  राज्यातील आमदार खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. कॅन्टोमेंट बोर्डाच्या विकासासाठी येणारी अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्र्यांना याबाबत विनंती केली होती. राज्याच्या या विनंतीला मान देऊन संरक्षण मंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या निधीवर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. हा निधी येथील रस्ते,पाणी अशा मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.

‘गोदरेज अप्लायन्सेस’जलसंवर्धन मोहीम – दररोज ५ कोटी लिटर पाण्याची बचत होणार

पुणे-जागतिक पाणी समस्या दैनंदिन उग्र रूप धारण करीत आहे. दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊन सारख्या विकसनशील शहरालाही आता पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून तेथील पाणीसाठी पुढील वर्षी संपुष्टात येण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास पाणीकमतरतेमुळे यंदा केरळ राज्यामधील ९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एकूण जागतिक लोकसंख्येच्या १/५ लोकांना (सुमारे १.२ अब्ज लोकसंख्या) पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. भारतामधील ३३ कोटी लोकांना दररोज पाणीपुरवठ्याची समस्या तसेच शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळविण्यासाठी झुंजावे लागते. त्यामुळेच जलसंवर्धन ही आताच्या काळाची मोठी गरज बनली आहे. त्यामुळेच गृहवस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोदरेज अप्लायन्सेस ने लोकांमध्ये या विषयाबद्दल जागृती करण्यासाठी#MyACSavesWater हा उपक्रम लॉंच केला आहे.

 एका एअरकंडिशनरद्वारे पाण्याची बचत होऊ शकते काहा उपक्रम सुरू करण्यामागचा विचार म्हणजे – एसीच्या आतील भागामध्ये एव्हॅपोरेटर कॉइल्सअसतात. या कॉइलवर येणारे गरम वारे थंड करण्याचे काम केले जाते. त्यामुळे कॉईलवरकॉन्डेसेशनमुळे पाण्याचे थेंब जमा होतात. जसे उन्हाळ्यात थंड पाण्याच्या ग्लासवर पाण्याचे थेंब निर्माण होतात. एखादा एसी आठ तास चालल्यास कॉन्डेसेशनमुळे १० लिटर पाणी निर्माण होते. हे पाणी घराबाहेर नेऊन ड्रेन पाईपद्वारे फेकून देण्यात येते. भारतामध्ये दरवर्षी ५० लाख एसींची विक्री होते. म्हणजेच त्यामधून बाहेर पडणाऱ्या ५ कोटी लिटर पाण्याची बचत होऊन त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. पाणीबचतीच्या या आकड्यांमध्ये सध्याच्या एसीचा विचार करण्यात आलेला नाही.

 ही गोष्ट लक्षात घेऊन जलसंवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीने गोदरेज अप्लायन्सेसद्वारे #MyACSavesWaterहा उपक्रम लॉंच करण्यात आला. आपल्या एसीमधून बाहेर पडणारे पाणी वाचविण्यासाठी सर्वसामान्य लोकांना या उपक्रमाद्वारे शिक्षीत केले जाणार आहे. तसेच गोदरेजद्वारे १ हजार ग्राहकांना १० लिटर पाण्याची साठवणूक असलेले ग्रीन बॅलन्स रेंजमधील एसी पुरविण्यात आले आहेत. एसीमध्ये साठलेले पाणी ग्राहकांना घरांमधील फुलझाडांसाठी वापरता येईल तसेच घराच्या साफसफाईसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. पाणीपुरवठ्याच्या मूलभूत गरजांबद्दलच्या भारतीय स्टॅंडर्ड कोडनुसार एक व्यक्ती दररोज अंघोळ तसेच इतर गोष्टींसाठी १२५ लिटर पाण्याचा उपयोग करते. एसी युनिटमधून निर्माण झालेल्या १० लिटर पाण्याचा वापर या व्यक्तीने सदर कामांसाठी केल्यास नळामधून येणाऱ्या पाण्यामध्ये ८ टक्क्यांची बचत होऊ शकते.

 गोदरेज अप्लायन्सेसचे बिझीनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष श्री. कमल नंदी म्हणाले, “ग्राहकांना चांगली जीवनशैली उपलब्ध करून देणे हे आमचे आश्वासन आहे. त्याच्या पूर्ततेसाठी कल्पक उपक्रम आणि तंत्रज्ञानाची जोड आम्ही देतो. तसेच याचवेळी आम्ही पर्यावरणालाही तितकेच महत्त्व देतो. जलसंवर्धन ही सध्या काळाची गरज असून त्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. सोच के बनाया है’ या आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे #MyACSavesWater या उपक्रमाद्वारेही ग्राहकांना पाणीसमस्येबाबत जागृत करणे तसेच त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

 गोदरेज अप्लायन्सेसच्या विपणन प्रमुख् स्वाती राठी म्हणाल्यागोदरेज अप्लायन्सेस मध्ये पर्यावरणाला खूप महत्त्व दिले जाते. ग्राहकांना आम्ही जे एक हजार कॅन पुरविले आहेतत्याद्वारे या उपक्रमाला चालना मिळेल आणि त्यातून इतरांना जलसंवर्धनाची प्रेरणा मिळेल. प्रत्येक घरातील एसीद्वारे दररोज १० लिटर पाण्याची बचत करणे शक्य आहे. हा अगदी सोपा विचार समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो आणि पर्यावरणाच्या संरक्षणाताही मोठी भूमिका निभावू शकतो.