Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स सादर करीत जर्मनीतील ‘लीभेर’ कंपनीचा भारतीय बाजारपेठेला ‘हॅलो

Date:

  ग्राहकांसाठी १९ विविध श्रेणीतील फ्रीज २३ हजार ५०० रुपयांपासून उपलब्ध

  • जर्मन फ्रीजमधील तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेशी मिळतेजुळते
  • विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स देशातील ५० शहरे आणि ५०० शो रुम्समध्ये उपलब्ध

 मुंबई: जर्मनीतील रेफ्रिजरेटर निर्मिती क्षेत्रातील प्रख्यात लीभेर’ कंपनीने आज भारतीय बाजारपेठेसाठी आपली विविध उत्पादने लॉंच केली. या कंपनीचे विविध श्रेणीतील फ्रीज भारतामधील दक्षिण,  पश्चिम आणि उत्तर अशा रीजन्सच्या महत्त्वाच्या सर्व शहरांमधील विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहेत. या रेफ्रिजरेटर्सच्या श्रेणीची सुरुवात २३ हजार ५०० रुपयांपासून सुरू होणार असून टॉप एन्ड’ श्रेणीतील मॉडेलची किंमत १ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. ही सर्व उत्पादने औरंगाबाद येथील लीभेर’ कंपनीच्या फॅक्टरीमध्ये निर्मिली जात आहेत. गेल्या महिन्यामध्ये या फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले होते.

 लीभेर’ प्रॉडक्ट्स भारतीय बाजारपेठेच्या पसंतीस उतरण्यामागची काही प्रमुख कारणे म्हणजे त्यांची विशेष रचना. तसेच तब्बल ३ वर्षांच्या संशोधनानंतर या उपकरणामधील जर्मन तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेस लागू पडले आहे. या कंपनीने २२० लिटर क्षमतेपासून ते ४४२ लिटर क्षमतेपर्यंतचे १९ मॉडेल्सचे रेफ्रिजरेटर्स बाजारात आणले आहेत. या रेफ्रिजरेटर्समध्येसेंट्रल पॉवर कुलिंग’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रेफ्रिजरेटरला बीइइचे फाइव्ह स्टार’ रेटिंग मिळाले आहे. तसेच भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा तसेच त्यांच्या सांस्कृतिक आवडीनिवडी लक्षात घेऊन इतर श्रेणीतील रेफ्रिजरेटर्सची रचना करण्यात आली आहे. हे सर्व रेफ्रिजरेटर्स ग्राहकांच्या आवडीनिवड लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील फिनीश’, ‘ब्ल्यू लॅंडस्केप’ आणि रेड बबल’ या तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. लीभेर’ कंपनीने हे विविध श्रेणीतील रेफ्रिजरेटर्स ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी वितरणाचे उत्तम जाळे तयार केले आहे. हे रेफ्रिजरेटर्स देशातील ५०हून अधिक शहरे आणि ५०० शो रुम्समध्ये उपलब्ध होणार आहेत.

 लीभेर अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि.चे मुख्य विक्री अधिकारी श्री. राधाकृष्ण सोमय्याजी यावेळी म्हणाले, “ ‘लीभेरने कायमच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्यावर भर दिला आहे. आमच्या कंपनीने जर्मन तंत्रज्ञानाचा अंगिकार करीत भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडीला साजेसे असे रेफ्रिजरेटर्स भारतीय बाजारपेठेत आणले आहेत. हे रेफ्रिजरेटर्स उत्कृष्ट स्पाइकबॉक्सेस’, ‘अल्ट्रा प्रोटेक्टिव्ह व्हेरिओसेफ’, ‘युनिक कुलपॅक’ या फिचर्सने नटले आहेत. भाज्यांची विभागणीदेखील यात करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे या रेफ्रिजरेटर्ससाठी वीजेचा कमीत कमी उपयोग केला जाणार आहे.

 लीभेर’ या ब्रॅण्डच्या भारतामधील प्रवासाबद्दल श्री. सोमय्याजी म्हणाले, “ ‘ली भेर अप्लायन्सेस इंडिया’ या प्रकल्पाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. Engineered in Germany, designed for India’ या कल्पनेवर या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. ग्राहक हाच आमच्या केंद्रस्थआनी आहे. लीभेरमध्ये आम्ही कायम उत्तम सेवा आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या समाधानाला प्राधान्य देतो.

 लीभेरचे रेफ्रिजरेटर्स जून २०१८च्या दुसऱ्या आठवड्यापासून भारतामधील विविध शहरांच्या शो-रुम्समध्ये उपलब्ध होतील. या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी एक अनोखी मोहिम आखण्यात आली आहे. त्यामध्ये प्रेस कॅम्पेनबरोबरच उत्कृष्ट डिजीटल कॅम्पेनविभागवार आऊटडोअर प्रसिद्धी आणि बीटीएलचा समावेश आहे. आपली जागतिक पातळीवर कस्टमर सर्व्हिस राखण्यासाठी लीभेरने सर्व ठिकाणी सर्व्हिस सेंटरचालू केले आहेत. १८०० २३३३ ४४४ हा हेल्पलाईन’ क्रमांक ग्राहकांसाठी चालू झाला असून ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या शंकांचे समाधान या क्रमांकावर करता येईल.

 

लीभेर’ ग्रुप बद्दल : ‘लीभेर’ हा समूह ५० देशांमध्ये कार्यरत असून त्याच्या १३० कंपनीज आहेत. बहुतेक सर्व खंडांमध्ये या ग्रुपचे अस्तित्व असून त्यामध्ये ४४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. लीभेरची एकूण वार्षिक उलाढाल ९.८ अब्ज युरो एवढी आहे. या ग्रुपचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून काही युनिट्सना स्वतंत्र दर्जा देण्यात आला आहे. जमिनीवरची यंत्रेखाणमोबाइल क्रेन्सटॉवर क्रेन्सकॉंक्रेट तंत्रज्ञानसमुद्रामधील क्रेनएअरोस्पेस आणि वाहतूक पद्धतमशिन टुल्सस्थानिक उपकरणेकॉम्पोनंट्स आणि हॉटेल्स आदी क्षेत्रात हा ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपची मुख्य कंपनी आहे – लीभेर इंटरनॅशनल एजी.’ या कंपनीचे भागधारक हे लीभेर’ कुटुंबीयांचे सदस्य आहेत. ली भेर-इंटरनॅशनल एजी’ ही कंपनी स्वित्झर्लंडमधील बुले येथे स्थित आहे.

 

लीभेर’ डोमेस्टिक अप्लायन्सेबद्दल :

इंजिनिअर हान्स लीभेर यांनी १९५४ मध्ये जर्मनीतील ओस्सेनहॉसेन येथे ही कंपनी स्थापन केली. गेल्या साठहून अधिक वर्षांमध्ये स्थानिक आणि खासगी क्षेत्रांसाठी विविध पद्धतीच्या रेफ्रिजरेटर्सची निर्मिती करण्यात ही कंपनी आघाडीवर आङे. सध्याच्या काळात दरवर्षी या कंपनीच्या विविध प्लॅंटमधून २२ लाख उपकरणांची निर्मिती केली जाते. डोमेस्टिक प्रॉडक्ट अप्लायन्सेस’ विभागातर्फे रेफ्रिजरेटर्स आणि फ्रीजर्सची चार देशांमध्ये निर्मिती केली जाते. औरंगाबाद येथील प्रकल्पामुळे या कंपनीच्या निर्मिती प्रकल्पांची संख्या पाचवर जाऊन पोचली आहे. या कंपनीची विभागीय नियंत्रण कंपनी ली भेर-हौसरेट’ आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानी खासदार पलवाशा खान बरळल्या – बाबरीची पहिली वीट पाक सैनिक लावणार:असीम मुनीर देणार अज़ान

इस्लामाबाद-पाकिस्तानमधील बिलावल भुट्टो यांच्या पक्षाच्या नेत्या पलवाशा खान यांनी...

टायटन वॉचेसचे नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन

अचूकपणा ज्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जे अर्थपूर्ण शैलीतून स्वतःला अभिव्यक्त करू इच्छितात अशा पुरुषांसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन बंगलोर, : मेकॅनिकल विश्वाविषयी पुरुषांना वाटणारे आकर्षण सर्वश्रुत आहे. हे आकर्षण घड्याळांमध्ये साकार करून टायटन वॉचेसने आपले नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन सादर केले आहे. मेकॅनिकल वॉचमेकिंगचे नाजूक सौंदर्य अधोरेखित करत हे कलेक्शन व्हिजिबल मेकॅनिक्सचा सोहळा साजरा करते. कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळामध्ये मनमोहक स्केलेटल डायल्स आहेत, ज्यामध्ये नाजूक इंजिनीयरिंग हे प्रत्येक शैलीचे सार आहे. इंटिग्रेटेड ब्रेसलेट्सपासून ड्युअल फिनिश सॉलिड लिंक स्ट्रॅप्सपर्यंत प्रत्येक डिझाईन त्यामधून विविध व्यक्तिमत्त्वे प्रतिबिंबित होतील अशाप्रकारे अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. २१ ज्वेल बेयरिंग्स, दर तासाला २१६०० बीट्सची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आणि ४२ तासांचे पॉवर रिझर्व्ह असलेले हे कलेक्शन अचूकपणा, कारीगरी आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करते, चोखंदळ घड्याळप्रेमींसाठी तयार करण्यात आले आहे. टायटनच्या ऑटोमॅटिक्स कलेक्शनमध्ये चार अनोख्या श्रेणी आहेत, अनोखी व्यक्तिमत्त्वे दर्शवण्यासाठी त्या खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. यिन यांग स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच या अतुलनीय कलेक्शनचा केंद्रबिंदू आहे, संतुलनाचा कलात्मक सन्मान करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, असामान्य यिन यांग स्केलेटल डायल डिझाईन आणि रिफाईंड प्रेस-पॅटर्न डिटेलिंग यामध्ये दर्शवण्यात आले आहे. सुबक स्टेनलेस स्टील आणि शानदार रोज गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असलेली ही श्रेणी औपचारिक वातावरणासाठी उत्कृष्ट आहे. फिनिक्स स्केलेटल ऑटोमॅटिक घड्याळ हे फिनिक्स पक्षापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे, हे शक्तीचे आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्याचे प्रतीक आहे. याची बोल्ड स्केलेटल डायल फिनिक्स पक्षाच्या पंखांप्रमाणे नाजूक डिझाईन करण्यात आली आहे. नर्ल्ड क्राऊन याचे सोफिस्टिकेटेड डिझाईन अधिक शानदार बनवतो. मोनोक्रोमॅटिक एक्लिप्स ब्लॅक आणि ऑप्युलँट एम्बर रोज गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याचे प्रभावी डिझाईन आणि उत्कृष्ट फिनिश यामुळे हे घड्याळ संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या पेहरावांसाठी आणि महत्त्वाच्या प्रसंगांसाठी उत्तम ठरते. नेक्सस स्केलेटल ऑटोमॅटिकमध्ये आधुनिक सौंदर्य आणि चिरंतन प्रतीकात्मकता यांचा मिलाप आहे. याची अनोखी स्केलेटल डायल जहाजाच्या सुकाणूपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहे, जे हालचाली आणि प्रगती दर्शवते, नाजूक ऑटोमॅटिक हालचाली दर्शवते. कॉफी ब्राऊन, गनमेटल आणि मिडनाईट ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्पोर्टी अपील आणि इंटिग्रेटेड ब्रेसलेट असलेले हे घड्याळ स्मार्ट कॅज्युअल लूक्स आणि दररोज वापरण्यासाठी साजेसे आहे. गोल्डन हार्ट स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच सोनेप्रेमींसाठी बनवण्यात आले आहे. बाय-मेटल आणि फुल गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध असून गिल्टेड स्केलेटल डायलमधून विलक्षण जागरूकतेने तयार करण्यात आलेले बारकावे दिसून येतात. फॉर्मल प्रसंग, समारंभ आणि सांज सोहळ्यांमध्ये तुमच्या पेहरावाला अत्यावश्यक असलेला उठावदार, लक्झरियस स्पर्श देण्यासाठी हे अगदी योग्य आहे. टायटन वॉचेसच्या मार्केटिंग हेड अपर्णा रवी म्हणाल्या, "टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन हा आमच्या वाटचालीतील एक लक्षणीय टप्पा आहे, प्रगत, सोफिस्टिकेटेड होरोलॉजी आणि आधुनिक शैली यांचा समन्वय दर्शवणारी घड्याळे तयार करून नावीन्य घडवत राहण्याप्रती टायटनची वचनबद्धता यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. चोखंदळ आणि शैलीविषयी जागरूक असलेले पुरुष, ज्यांना घड्याळ हे स्व-अभिव्यक्तीचे माध्यम वाटते, अशांसाठी हे तयार करण्यात आले आहे, यांची कारीगरी तुम्ही काहीही बोलण्याआधी खूप काही व्यक्त करते.” प्रत्येक घड्याळामध्ये ल्युमिनस काटे, स्पष्टपणे अप्लाय करण्यात आलेले इन्डायसेस आणि ड्युएल-फिनिश्ड सॉलिड स्टेनलेस स्टील स्ट्रॅप्स आहेत, दिवसभर आणि रात्रीदेखील प्रीमियम फील देणाऱ्या या घड्याळांच्या किमती १८,३२५ रुपयांपासून २२,१५० रुपयांपर्यंत आहेत. टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन सर्व टायटन स्टोर्स आणि www.titan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी देवेन भारती

मुंबई-मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारतीय यांची...