Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ची ‘डॉट नेक्स्ट अपग्रेड’च्या मदतीने वाढीची योजना

Date:

·         डॉट नेक्स्ट अपग्रेडची दुसरी आवृत्ती पुण्यात सादरभारतातील अन्य शहरांमध्ये लवकरच होणार उपलब्ध

 ·         स्मार्ट इनडोअर्स अॅन्ड कनेक्टेड आउटडोअर्स या संकल्पनेनुसार, ‘आयओटी व आयबीएमएसवर आधारीत अनेक स्मार्ट इनडोअर सोल्युशन्सचे तसेच कनेक्टेड आऊटडोअर सोल्युशन्सचे सादरीकरण.

 ·         गेल्या वर्षीपेक्षा यंदा पुण्याच्या लाइटिंग बाजारपेठेत 30 टक्के वाढ होण्याची बजाज इलेक्ट्रिकल्सला अपेक्षा.

 पुणे- पंखेलाइटिंग आणि अभियांत्रिकी प्रकल्प या क्षेत्रांमध्ये देशात अग्रणी असलेल्या बजाज इलेक्ट्रिकल्स लि. या कंपनीने डॉट नेक्स्ट अपग्रेड या संकल्पनेची दुसरी आवृत्ती स्मार्ट इनडोअर्स अॅन्ड कनेक्टेड आऊटडोअर्स या विषयाखाली आज पुण्यात सादर केली. हॉटेल कॉनरॅड येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रख्यात आर्किटेक्ट्सकन्सल्टंट्सस्पेसिफायर्सविविध उद्योगांमधील वरिष्ठ अधिकारीउच्च सरकारी अधिकारीधोरणात्मक निर्णय घेणारे अधिकारी तसेच वितरक आदी उपस्थित होते.

 देशातील शंभर स्मार्ट शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुण्यात आठहून अधिक नामवंत विद्यापीठे आहेत. तसेच वाहन उत्पादनडिझाईन व ग्राहकोपयोगी वस्तू यांच्या दिग्गज कंपन्या पुण्यात व पुणे परिसरात आहेत. त्यामुळे पुणे हे वास्तव्य व व्यवसाय करण्यासाठीचे आदर्श शहर बनले आहे. शिक्षणाचे माहेरघर व आयटी कंपन्यांचे प्रमुख केंद्र अशी ओळख पुणे शहराची झाल्याने त्याचा भौगोलिक विस्तारही झाला आहे. शहराच्या चहुबाजूंना वेगवेगळ्या टाऊनशिप्स उभ्या राहिल्या असून त्यामुळे कनेक्टिव्हिटीची गरज अधिक प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर या सर्व परिसराचा स्मार्ट पध्दतीने होणे अनिवार्य झाले आहे. स्मार्ट लाटिंगइंटिग्रेटेड बिल्डींग मॅनेजमेंट सोल्युशन्स (आयबीएमएस)तसेच अभियांत्रिकी व बांधकाम सेवा (इपीएस) यांची उपलब्धता वाढवून पुण्यातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देणेहाच बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे आयोजित डॉट नेक्स्ट अपग्रेड या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. पुणेकरांना शाश्वत व आधुनिक विकासाची फळे मिळावीत याकरीता अत्याधुनिक अशा डॉट नेक्स्ट आयओटीया तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे बजाज इलेक्ट्रिकल्सने ठरविले आहे.

नव्या शहरी विकासाची गरज लक्षात घेत, ‘स्मार्ट सिटीज, ‘स्मार्ट बिल्डिंग, ‘ह्युमन सेंट्रिक लाइटिंग, ‘स्पोर्ट्स लाइटिंग, ‘आर्किटेक्चरल लाइटिंगफळ उद्योगआरोग्य सेवा व अन्य उद्योगांना लागू पडेल असे प्रभावी तंत्रज्ञान बजाज इलेक्ट्रिकल्स देत आहे. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षाततसेच क्लाऊड कनेक्टिव्हिटी, ‘वायरलेस सोल्युशन्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही वापरण्याजोगे आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढल्याचा आणि आरामदायीसोप्यासुलभस्मार्ट जीवनशैलीचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे.

 बजाज इलेक्ट्रिकल्सचे उपाध्यक्ष व इल्युमिनेशन इपीसी विभागाचे प्रमुख संजय भगत या कार्यक्रमात म्हणालेकी या वर्षी आम्ही आमचे सर्व लक्ष इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानावर चालणाऱ्या स्मार्ट उत्पादनांवर वआयबीएमएस सोल्युशन्सवर केंद्रीत केले आहे. स्मार्ट आऊटडोअर लाइटिंग या क्षेत्रात आम्ही अजूनही निर्विवाद नेते आहोत. आधुनिक कार्यालयेउद्योगरिटेल स्टोअर आदी ठिकाणी लाइटिंग उभारण्याचा आम्हाला मोठा अनुभव आहे. उपलब्ध स्रोतांचा योग्य तो लाभ घेत सर्व क्षेत्रांना जागतिक दर्जाची उत्पादने व सेवा पुरविण्याची आमची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेवू. स्मार्ट सिटी प्रकल्पात आमचा सहभाग हा सर्व स्तरांवर असणार आहे. अगदी सबस्टेशन उभारण्यापासूनवीज वितरणलाइटिंग आणि विद्युत उपकरणे उपलब्ध करून देणे ही आमच्या कामाची व्याप्ती असणार आहे. हेच आमच्या व्यवसायाचे सूत्र आहे.

 बजाज इलेक्ट्रिकल्सच्या या सादरीकरणाच्या कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील व सरकारी खात्यांमधील धोरण निर्मितीउत्पादनडिझाईनप्रकल्पलेखा परीक्षण आदी क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती होती. 

 पुण्यातील मोठ्या कंपन्यांच्या गरजांना अनुरुप अशा उर्जा बचतीच्या शाश्वत अशा उपाययोजना बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे दिवस-रात्र उपलब्ध करून दिल्या जातात. केपजेमिनीहनीवेलआयटीसीटाटाहायरएम्बसी इंडस्ट्रीइंडो स्पेसकमिन्सएमईएसमहानगर पालिकानगर परिषदा आणि विविध सरकारी खाती या सर्वांना बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे सेवा व उत्पादने पुरविली जातात.

 बजाज इलेक्ट्रिकल्स या समुहाचे पुणे परिसरात रांजणगाव व चाकण या दोन ठिकाणी कारखाने आहेत. तेथे हजारोजणांना रोजगार पुरविला जातो. पुण्या लाइटिंग क्षेत्राच्या आपल्या व्यवसायात यंदा 30 टक्क्यांची वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

बजाज इलेक्ट्रिकल्स लि. विषयी :

 भारतात विश्वासार्ह नाव असलेल्या बजाज समुहातील बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी आहे,  जागतिक स्तरावरही ख्याती पावलेली ही कंपनी ग्राहकोपयोगी उत्पादने (उपकरणेपंखे व लाइटिंग)प्रकाश दिवेइपीसी (इल्युमिनेशनविजेचे मनोरे व वीज वितरण) तसेच निर्यात या क्षेत्रात आपला दबदबा राखून आहे. देशाच्या विविध भागांत बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या 20 शाखा आहेत. या शाखांना वितरक व विक्रेत्यांच्या मोठ्या साखळीचे सहकार्य होत असते. देशात सुमारे शंभर ठिकाणी बजाज वर्ल्ड या नावाने बजाज इलेक्ट्रिकल्सची स्वतंत्र शोरुम्स आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जा मोदींना जाऊन सांग,शिवमोग्गाच्या मंजुनाथ यांना मारल्यावर त्यांच्या पत्नीला आतंकवादी म्हणाला…

काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनी सांगितले कि,', महाराष्ट्रातील...

पत्नी मुलांसमोरच दहशत वाद्यांनी घातल्या IB अधिकाऱ्याला गोळ्या

नवी दिल्ली- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात...

देश विदेशातून हल्ल्याची गंभीर दखल,मेहबूबा मुफ्तींकडून काश्मीर बंदचे आवाहन

मुंबई- पहलगाम येथी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची देशातूनच नव्हे तर...

नावे विचारून घातल्या गोळ्या,महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध...