Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘२०१८ होंडा आफ्रिका ट्विन’साठी नोंदणी सुरू, नशीबवान ग्राहकांना ‘मोटोजीपी’ लाइव्ह थरार अनुभवता येणार

Date:

      २०१८ आफ्रिका ट्विनचा आनंद केवळ पहिल्या ५० स्पर्धकांना मिळणार

      नोंदणीप्रक्रिया विंग वर्ल्ड’ डीलरशीपच्या भारतामधील २२ शहरांमध्ये उपलब्ध

      नवीन २०१८ आफ्रिका ट्विन वैशिष्ट्ये

Ø  नवीन चालकांना मदत : चालविण्याचे ३ मार्गसातव्या पातळीपर्यंत होंडा टॉर्क नियंत्रण व्यवस्था

Ø  वाढीव कार्यपद्धती : नवीन पद्धतीची एलसीडी इन्स्ट्रुमेंटेशन पद्धतहलक्या वजनाची लिथीयम आयन बॅटरी

      किंमत – १३ लाख २३ हजार (एक्स शोरुम दिल्ली)

 गुरगांव : होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर प्रा. लि.ने आज आफ्रिका ट्विन २०१८साठीची नोंदणी सुरू झाली असल्याची घोषणा केली. या नोंदणीमधील नशीबवान ग्राहकांना मोटोजीपीमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या लाडक्या मोटाररायडर्सना पाहण्याची संधी मिळणार आहे.

 ही नोंदणी फक्त पहिल्या ५० नशीबवान ग्राहकांसाठी मर्यादित राहणार आहे. या नोंदणीसाठी ग्राहकवर्ग भारतामधील २२ शहरांमधील होंडाच्या विक्री आणि सेवा विभागाशी संपर्क साधू शकतात. त्याखेरीज ग्राहक अधिक माहितीसाठी Honda2WheelersIndia.com या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.

 २०१८ होंडा आफ्रिका ट्वीन’ ही मोटारसायकल पहिल्यांदा ऑटो एक्स्पो २०१८च्या प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. या मोटारसायकलला तीन दशकांची होंडाची परंपरा लाभली आहे. शक्तीआराम आणि नियंत्रण अशा तीनही सुविधा या मोटारसायकलमध्ये एकत्रित पाहायला मिळतात.

 भारतीय मोटारसायकलिंग क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडविणाऱ्या २०१८ आफ्रिका ट्विनबद्दल होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ

उपाध्यक्ष श्री. यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, “ज्या मोटारसायकलीची प्रतीक्षा ग्राहकांतर्फे सुरू होतीतीआफ्रिका ट्विन’ आता भारतीय ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. नवीन वैशिष्ट्यांसह ही मोटारसायकल ग्राहकांना आनंद देणार आहे. ही मोटारसायकल अत्यंत विश्वासार्हव्हर्सटाइल आणि साहसी प्रवासासाठी योग्य आहे. काही नशीबवान ग्राहकांना आपल्या लाडक्या मोटाररायडर्सना मोटोजीपीमध्ये लाइव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे.

 २०१८ आफ्रिका ट्विनची महत्त्वाची वैशिष्ट्ये :

इलेक्ट्रॉनिक्स ओव्हरहॉल

या मोटारसायकलीमध्ये थ्रॉटल बाय वायर’ (टीबीडब्ल्यू) ही नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याद्वारे मोटारसायकलस्वाराला इंजिन आउटपुटकडे तसेच व्हील ट्रॅक्टनकडे लक्ष देता यणार आहे. होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल’ (एचएसटीसी) ही नवीन पद्धत सात लेव्हलची आहे. लेव्हल १पासून रस्त्यावरील वेगवान प्रवासापासून ते सातव्या लेव्हलमुळे ओल्यानिसरड्या रस्त्यावरून प्रवास सुरक्षित होणार आहे. तसेच एचएसटीसी’ ही नवीन प्रणाली वाहनचालकाला बंददेखील ठेवणे शक्य आहे. लिथीयम-आयन बॅटरीमुळे मोटारसायकलचे एकंदरीत वजन २.३ किलोने कमी झाले आहे. तसेच इतर सुविधांमुळे मोटारसायकलीच्या ऑफ रोड’ सुरक्षितततेमध्ये भर पडली आहे.

 नियंत्रणात वाढ

या मोटारसायकलचे इंजिन पॅरलल ट्विन-९९९.११ सीसी आणि —- क्षमतेचे आहे. तसेच या मोटारसायकलमध्येड्युएल क्लच ट्रान्समीशन’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ऑटोमेटेड’ क्लच आणि शिफ्ट ऑपरेशनमुळे थेट वेग वाढविण्याची प्रणाली कायम राहणार आहे. तसेच मोटारसायकलचा वेग वाढविणेवळविणे आणि ब्रेक लावतानाही वाहनचालकाला कसलाही त्रास न होता उलट आनंदच मिळणार आहे.

 सुट युवरसेल्फ रायडिंग मोड्स

ड्युएल क्लच ट्रान्समिशनद्वारे (डीसीटी) तीन कार्यपद्धती उपलब्ध होणार आहेत. ऑटोमॅटिक डी’ पद्धत ही शहरातील तसेच हायवेवरील प्रवासासाठी योग्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना इंधनबचतीचा लाभ होणार आहे.ऑटोमॅटिक एस’ पद्धतीमुळे वाहनचालकांना स्पोर्टियर’ प्रवासाचा अनुभव घेता येईल. एमटी’ मोडद्वारे वाहनचालकांना मॅन्युएल’ नियंत्रणाची सुविधा उपलब्ध आहे. रायडिंग मोड्स’ हे पॉवर (पी) आणि इंजिन ब्रेकिंग (इबी)च्या विविध पातळ्यांशी संलग्न ठेवण्यात आले आहेत.

 या मोटारसायकलमध्ये पॉवर आणि इंजिन ब्रेकिंगमध्ये तीन पातळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ वेगवेगळ्या वातावरणातील प्रवासासाठी होणार आहे.

टूरअर्बन. ग्राव्हेल

चौथ्या मोडद्वारे वाहनचालकाला पॉवरइबी आणि एचएसटीसी’ पातळ्यांचे नियंत्रण स्वत: करता येणे शक्य आहे. तसेच रायडिंग मोड’ आणि एचएसटीसीची पातळी वाहनचालकाला कोणत्याही क्षणी स्विचगीअरजवळील कंट्रोल्सचा वापर करून बदलणे शक्य होणार आहे.

मॅन्युएल शिफ्ट इंडिकेटडी’ किंवा एस’ मोडमध्ये डीसीटीद्वारे वाहनचालकाला गरज वाटल्यास तातडीने मॅन्युएल पद्धतीचा अवलंब करता येईल. डाव्या हॅंडल बारवरील शिफ्ट गिअर्सचा वापर करून या पद्धतीचा उपयोग करणे शक्य आहे. योग्य वेळी तसेच थ्रॉटल अॅंगलवाहनाचा वेग आणि गीअर स्थिती लक्षात घेताडीसीटी’ ऑटोमॅटिक पद्धतीने कार्यान्वित होईल.

 वाढीव कार्यप्रणाली

रॅली स्टाइल निगेटिव्ह एलसीडी इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेमध्ये रायडिंग मोड्सस्पीडोमीटरटॅकोमीटरइंधनगीअर स्थितीएचएसटीसीओडोमीटरट्रीप मीटरघड्याळ आणि एबीएस इंडिकेटरचा समावेश करण्यात आला आहे.

फ्रंट शोआ ४५ एसएम काट्रीज टाइप इन्व्हर्टेड टेलीस्कोपिक फोर्कडायल स्टाईल प्री लोड अॅडजस्टरडीएफ अॅडजस्टमेंट२३० एमएम स्ट्रोक. रीअर : मोनोब्लॉक कास्ट अल्युम्युनियम

स्विंग आर्म- गॅसचार्जित डॅम्परसह. हायड्रॉलिक डायल स्टाइल प्री लोड अॅडजस्टर आणि रिबाउंड डॅम्पिंग अॅडजस्टमेंट. २२० एमएम रीअर व्हील प्रवास.

ब्रेक्स :

३१० एमएम वेव्ह’ स्टाइल ब्रेक्सट्विन फ्लोटिंग फ्रंट डिस्क्सनिस्सीनचे ४-पॉट रॅडियल कॅलिपर्स. रीअर डिस्क – २५६ वेव्हस्टाईल१ पॉट कॅलिपरसह. रीअर ब्रेकवर एबीएस’ ऑफ. ३६० डिग्री व्हॅल्यू अॅडिशनमुळे २०१८ आफ्रिका ट्वनची किंमत १३ लाख २३ हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली) एवढी ठेवण्यात आली आहे. ही मोटारसायकल जीपी लाल रंगात उपलब्ध आहे.

 भारतामधील आफ्रिका ट्विन  :

जुलै २०१७ मध्ये ही मोटारसायकल भारतात लॉंच करण्यात आली. ड्युएल क्लच ट्रान्समीशन’ (डीसीटी) तंत्रामुळे देशभरातील ग्राहक या मोटारसायकलच्या प्रेमात पडले. यापूर्वीचे सगळे ठराविक मापदंड तोडीत अवघ्या १०० दिवसांमध्ये ८० वाहने विकली गेली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ -अमृता फडणवीस

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने लक्ष्मीबाई...

‘माझ्या हत्येचा कट ही त्यांच्या शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज...

संजीवन वनउद्यान येथे ५०० देशी झाडांची वृक्षलागवड  

महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि...

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि.१३: राज्यातील बेरोजगार युवकांला रोजगार उपलब्ध करुन त्यांचे...