‘गोदरेज अप्लायन्सेस’जलसंवर्धन मोहीम – दररोज ५ कोटी लिटर पाण्याची बचत होणार

Date:

पुणे-जागतिक पाणी समस्या दैनंदिन उग्र रूप धारण करीत आहे. दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊन सारख्या विकसनशील शहरालाही आता पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून तेथील पाणीसाठी पुढील वर्षी संपुष्टात येण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास पाणीकमतरतेमुळे यंदा केरळ राज्यामधील ९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एकूण जागतिक लोकसंख्येच्या १/५ लोकांना (सुमारे १.२ अब्ज लोकसंख्या) पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. भारतामधील ३३ कोटी लोकांना दररोज पाणीपुरवठ्याची समस्या तसेच शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळविण्यासाठी झुंजावे लागते. त्यामुळेच जलसंवर्धन ही आताच्या काळाची मोठी गरज बनली आहे. त्यामुळेच गृहवस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोदरेज अप्लायन्सेस ने लोकांमध्ये या विषयाबद्दल जागृती करण्यासाठी#MyACSavesWater हा उपक्रम लॉंच केला आहे.

 एका एअरकंडिशनरद्वारे पाण्याची बचत होऊ शकते काहा उपक्रम सुरू करण्यामागचा विचार म्हणजे – एसीच्या आतील भागामध्ये एव्हॅपोरेटर कॉइल्सअसतात. या कॉइलवर येणारे गरम वारे थंड करण्याचे काम केले जाते. त्यामुळे कॉईलवरकॉन्डेसेशनमुळे पाण्याचे थेंब जमा होतात. जसे उन्हाळ्यात थंड पाण्याच्या ग्लासवर पाण्याचे थेंब निर्माण होतात. एखादा एसी आठ तास चालल्यास कॉन्डेसेशनमुळे १० लिटर पाणी निर्माण होते. हे पाणी घराबाहेर नेऊन ड्रेन पाईपद्वारे फेकून देण्यात येते. भारतामध्ये दरवर्षी ५० लाख एसींची विक्री होते. म्हणजेच त्यामधून बाहेर पडणाऱ्या ५ कोटी लिटर पाण्याची बचत होऊन त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. पाणीबचतीच्या या आकड्यांमध्ये सध्याच्या एसीचा विचार करण्यात आलेला नाही.

 ही गोष्ट लक्षात घेऊन जलसंवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीने गोदरेज अप्लायन्सेसद्वारे #MyACSavesWaterहा उपक्रम लॉंच करण्यात आला. आपल्या एसीमधून बाहेर पडणारे पाणी वाचविण्यासाठी सर्वसामान्य लोकांना या उपक्रमाद्वारे शिक्षीत केले जाणार आहे. तसेच गोदरेजद्वारे १ हजार ग्राहकांना १० लिटर पाण्याची साठवणूक असलेले ग्रीन बॅलन्स रेंजमधील एसी पुरविण्यात आले आहेत. एसीमध्ये साठलेले पाणी ग्राहकांना घरांमधील फुलझाडांसाठी वापरता येईल तसेच घराच्या साफसफाईसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. पाणीपुरवठ्याच्या मूलभूत गरजांबद्दलच्या भारतीय स्टॅंडर्ड कोडनुसार एक व्यक्ती दररोज अंघोळ तसेच इतर गोष्टींसाठी १२५ लिटर पाण्याचा उपयोग करते. एसी युनिटमधून निर्माण झालेल्या १० लिटर पाण्याचा वापर या व्यक्तीने सदर कामांसाठी केल्यास नळामधून येणाऱ्या पाण्यामध्ये ८ टक्क्यांची बचत होऊ शकते.

 गोदरेज अप्लायन्सेसचे बिझीनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष श्री. कमल नंदी म्हणाले, “ग्राहकांना चांगली जीवनशैली उपलब्ध करून देणे हे आमचे आश्वासन आहे. त्याच्या पूर्ततेसाठी कल्पक उपक्रम आणि तंत्रज्ञानाची जोड आम्ही देतो. तसेच याचवेळी आम्ही पर्यावरणालाही तितकेच महत्त्व देतो. जलसंवर्धन ही सध्या काळाची गरज असून त्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. सोच के बनाया है’ या आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे #MyACSavesWater या उपक्रमाद्वारेही ग्राहकांना पाणीसमस्येबाबत जागृत करणे तसेच त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

 गोदरेज अप्लायन्सेसच्या विपणन प्रमुख् स्वाती राठी म्हणाल्यागोदरेज अप्लायन्सेस मध्ये पर्यावरणाला खूप महत्त्व दिले जाते. ग्राहकांना आम्ही जे एक हजार कॅन पुरविले आहेतत्याद्वारे या उपक्रमाला चालना मिळेल आणि त्यातून इतरांना जलसंवर्धनाची प्रेरणा मिळेल. प्रत्येक घरातील एसीद्वारे दररोज १० लिटर पाण्याची बचत करणे शक्य आहे. हा अगदी सोपा विचार समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो आणि पर्यावरणाच्या संरक्षणाताही मोठी भूमिका निभावू शकतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहाटे 3.28 वाजता सुनीता विल्यम्स सुखरूप परतल्या…

सुनीता विल्यम्सच्या वडिलांच्या गावी मिरवणूक, दिवाळीसारखा आनंदोत्सव वाशिंग्टन-तब्बल नऊ महिने...

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...