Home Blog Page 3089

विद्यार्थ्यांना मिळणार छत्रीवर ‘कॅलिग्राफी’ चा वेगळा कार्यानुभव

0

पुणे :

‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्कूल ऑफ आर्ट’ च्या वतीने ‘ अंब्रेला पेंटींग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे.

एम सी ई सोसायटी मधील ‘हॉटेल मॅनेजमेंट बिल्डिंग’ जवळील ‘स्कूल ऑफ आर्ट’ , आझम कॅम्पस मध्ये ही कार्यशाळा होणार आहे. आर्टिस्ट रुपेश बसूतकर (मुंबई) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. छत्रीवर ‘कॅलिग्राफी’ हा वेगळा कार्यानुभव विद्यार्थ्यांना देणार आहेत, अशी माहिती ‘स्कूल ऑफ आर्ट’ च्या संचालक हेमा जैन यांनी पत्रकाद्वारे दिली.

कार्यशाळेत ‘लेट्स वॉक विथ कलर्स इन द रेन’ या संकल्पनेवर आधारित रंगकामाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना रंगकामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे हेमा जैन यांनी सांगितले.

बुधवार पेठेत दहीहंडी फुटल्यानंतर बक्षीस वाटप करताना स्टेज कोसळला ….(व्हिडीओ)

0

पुणे-दहीहंडी साजरी झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी स्टेज कोसळून 10 ते 15 जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास बुधवार पेठेतील एका दहीहंडी मंडळात घडली. दहीहंडीचा थरार संपल्यानंतर बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने बक्षिस वितरणाचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजवर कार्यकर्त्यांची संख्या जास्त झाल्याने तो भार जास्त झाल्यामुळे स्टेज क्षणार्धात खाली कोसळले. या घटनेत मंंडळाचे 14 ते 15 कार्यकर्ते जखमी झाले. त्यापैकी 4 ते 5 जणांंना गंभीर फॅक्चर झाले आहे.

दहीहांडीचा उत्साह शहरात सर्वत्र काल पाहायला मिळाला. रात्री उशीरा बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळाची दहीहांडी फाेडण्यात अाली. यावेळी माेठी गर्दी या भागात झाली हाेती. दहीहांडी फाेडल्यानंतर बक्षिस समारंभाचा कार्यक्रम सुरु हाेता. यावेळी अनेक कार्यकर्ते स्टेजवर अाल्याने स्टेज अचानक काेसळला. स्टेजवर जास्त वजन झाल्याने अधांतरी असलेला लाकडी स्टेज काेसळला. त्यानंतर एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात अाले. स्टेजवरील अनेकजण या अपघातात जखमी झाले असून काहींना गंभीर ईजा झाली अाहे. सुदैवाने यात काेणतीही जीवित हानी झाली नाही. स्टेज पडल्यानंतर एकच गाेंधळ झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरवातीला काेणालाच काहीच कळाले नाही. जखमींवर सध्या खाजगी  रुग्णालयात उपचार सुरु अाहेत.

कॉलेज तरुणींचे न्यूड व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला अटक

0

बेंगलोर -स्पाय कॅमेरा वापरुन कॉलेजमधल्या तरुणींचे हॉस्टेल बाथरुममधील व्हिडिओ शूट करणाऱ्या इंजिनिअरींगच्या एका विद्यार्थ्याला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ (२१) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा आहे. बंगळुरुतील कॉलेजमध्ये तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. हॉस्टेलमधल्या तरुणींचे व्हिडिओ बनवण्यासाठी तो त्याच्या प्रेयसीची मदत घेत होता. व्हिडिओ बनवल्यानंतर तो ते फेसबुकवर अपलोड करायचा अशी माहिती पारापान्न आग्रहारा पोलिसांनी दिली.

पोलिसांनी चौकशीसाठी सिद्धार्थच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. मी सिद्धार्थच्या प्रेमात असताना त्याला माझा न्यूड व्हिडिओ बनवून पाठवला होता असे तिने सांगितले. सिद्धार्थ दुसऱ्या मुलींचे बाथरुममधले व्हिडिओ शूट करण्यासाठी मला ब्लॅकमेल करत होता असे तिने पोलिसांना सांगितले. तपासात सिद्धार्थची प्रेयसी खोटे बोलत असल्याचे लक्षात आले तर तिला सुद्धा लगेच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. त्याची प्रेयसी सुद्धा तामिळनाडूची आहे.

कॉलेजमधली २१ वर्षीय विद्यार्थिनी फेसबुकवर सर्च करत असताना तिला तिचे न्यूड फोटो आढळले. हे बनावट अकाऊंट होते. तिने आणखी सर्च केले असता तिला तिचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ सापडले. ही विद्यार्थिनी मूळची आंध्र प्रदेशची आहे. जेव्हा पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला तेव्हा बदनामी होईल म्हणून त्यांनी तक्रार दाखल करु नको असे सांगितले.

२८ जुलैला या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली व व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. तपासामध्ये सिद्धार्थने आणखी तीन मुलींचे व्हिडिओ अपलोड केल्याचे समोर आले. या तिन्ही तरुणी सिद्धार्थच्या प्रेयसीच्या मैत्रिणी होत्या. सिद्धार्थ या तरुणींकडे लैंगिक सुखाची मागणी करायचा. तरुणीने नकार दिला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. पोलिसांनी हे सर्व व्हिडिओ आणि फोटो डिलीट केले आहेत. तो त्याच्या प्रेयसीकडे स्पाय कॅमेरा द्यायचा. त्याची प्रेयसी पीडित मुलींच्या बाथरुममध्ये तो कॅमरा ठेवायची.

कीर्तनाच्या माध्यमातून ‘विश्‍व बंधुत्वाचा संदेश’

0
 श्रेयस बडवे यांचे ८ सप्टेबर रोजी कीर्तन
पुणे :  ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ पुणे शाखा च्या वतीने ‘विश्‍व बंधुत्वाचा संदेश’ या विषयावर श्रेयस बडवे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तनकार श्रेयस बडवे हे संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माऊली आणि स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेला ‘विश्‍व बंधुत्वाचा संदेश’ कीर्तनाच्या माध्यमातून सादर करणार आहेत, अशी माहिती विवेकानंद केंद्र ,पुणे नगरचे संचालक जयंत कुलकर्णी यांनी दिली.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 8 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता टिळक स्मारक मंदीर, सदाशिव पेठ येथे होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

ब्राह्मण उद्योजकांच्या वस्तुंचे प्रदर्शन व उद्योजक संमेलन…..

0
पुणे-अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०१८ दरम्यान पुण्यातील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ब्राह्मण उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन व उद्योजकांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे असे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष उदय महा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.यावेळी महासंघाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर,महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष मोहिनीताई पत्की,पुणे जिल्हा संघटक विजय शेकदार,पुणे शहर अध्यक्ष मयुरेश अरगडे,पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष केतकी कुलकर्णी इ उपस्थित होते.२५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शनाचा उदघाटन समारंभ होइल व त्याच दिवशी सकाळी ११ ते ३ या वेळेत राज्यस्तरीय महिला संमेलन आयोजित करण्यात आल्याचे मोहिनीताई पत्की यांनी जाहीर केले. तर ३:३० ते ७ या वेळेत राज्यस्तरीय पुरोहित व याज्ञीकांचे संमेलन होणार असल्याचे विजय शेकदार म्हणाले.
२०१६ साली असे प्रदर्शन संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले होते,या दुसऱ्या प्रदर्शानात देशभरातून उद्योजक सहभागी होणार असून ब्राह्मण उद्योजकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे असे महासंघाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले,तसेच या प्रदर्शन व संमेलनास राष्ट्रीय स्तरावरील प्रतिथयश उद्योजकांसह नव्याने उभारी व भरारी घेउ पाहणाऱ्या उद्योजकांचा ही सहभाग असेल व त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी महासंघ प्रयत्नशील राहील असे ही खर्डेकर म्हणाले.
२६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह काश्मीर ते कन्याकुमारी सर्व ब्राह्मण संघाचे एकत्रीकरण व राष्ट्रीय स्तरावर ब्राह्मण समाजाच्या सक्षमीकरणासाठी सखोल चर्चा घडविण्यात येइल तर २७ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण उद्योजकांचे संमेलन व त्यांची व्यवसायिक चर्चा होइल असे प्रदेश अध्यक्ष उदय महा यांनी सांगितले.२८  ऱोजी उद्योजक व व्यवसायिक यांची आठ सत्रान्मधे चर्चा होइल एकमेकां साहाय्य करु अवघे होवु श्रीमंत या उक्ती प्रमाणे समाज बांधवांचे उत्तम जाळे बनविणे तसेच छोट्या व मोठ्या उद्योजकान्मधे सेतु बनविण्याचे कार्य महासंघाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
२९ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश जिल्हा व तालुका स्तरापर्यंतच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समाजाच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा घडविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाकरिता करवीर पीठाचे शंकराचार्य तसेच गोविंदगिरी महाराज तसेच महाराज चतुर्वेद स्वामींसह विविध राजकीय व उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ब्रह्मोदयोग च्या माहिती पत्रकाचे (Brochure) प्रकाशन करण्यात आले.

सेंट जोसेफ चर्चमध्ये वेलंकनी उत्सवाला सुरुवात

0

पुणे-घोरपडी गाव येथे सेंट जोसेफ चर्चमध्ये वेलंकनी उत्सवाला सुरुवात झाली . यानिमित्त चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती  सेंट जोसेफ चर्चचे फादर राजेश बनसोडे यांनी दिली .

अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध भागातून ख्रिश्चन बांधव सहभागी होतात . यावेळी चर्चच्या दारात असलेल्या देवीच्या झेंड्याची पूजा करून उत्सवाला प्रारंभ झाला . उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच अकरा दिवस विविध धर्मगुरूंचे प्रवचन होणार आहे . याकाळात चर्चच्या वतीने समाजातील वंचित , गरिबांना अन्न , कपडे व पुस्तक दान केले जातात . या उत्सवाच्या काळात चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते .

यावेळी शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने चर्चमध्ये अन्नदान करण्यात आले .या अन्नदान कार्यक्रमासाठी शालोम ख्रिश्चन असोसिएशनच अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी , विल्सन डॅनियल , यश नंदन , रिबेलो जेकब , अँग्लिस अँथोनी व जेम्स पॉल यांनी विशेष परिश्रम घेतले . 

‘गाव गाता गजाली’ पुन्हा येणार!

0

‘मॅड झालास काय’, ‘व्हतला व्हतला सगळा व्हतला’ आणि ‘मी कधी कुणाक काय सांगतंय काय’ हे संवाद लवकरच रसिकांच्या कानावर पडणार आहेत. कारण संदीप, वामन्या, आबा, क्रिश हि पात्र नव्या रूपात तुमच्या भेटीला येणार आहेत. गाव गाता गजालीच्या चाहत्यांसाठी आता खूशखबर आहे. कोकणच्या निसर्गसौंदर्यात चित्रित झालेली आणि कोकणच्या मातीचा सुगंध असलेली ‘गाव गाता गजाली’ हि मालिका लवकरच झी मराठीवर कमबॅक करणार आहे. मालिका संपतानाच ‘लवकरच आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येऊ’, असे अश्वासन दिलं होतं. अखेर मालिकेच्या संपूर्ण टीमने हे अश्वासन पूर्ण केलं आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री १० वाजता ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे. या मालिकेच्या नव्या भागांचे चित्रीकरण कोकणातच करण्यात आले आहे.

या गजालींमध्ये नावीन्य असेल आणि कोकणातील गावाकडची माणसे पुन्हा एकदा बघायला मिळतील. नव्या कथा प्रेक्षकांना पाहता येतील. यावेळी लेखकांच्या टीममध्ये नवे लेखक असणार आहेत. प्रभाकर भोगले, अंबर हडप आणि ओंकार दीक्षित यांच्यासोबत कोकणातील इतर काही स्थानिक लेखकही लेखन करणार आहेत, असे या मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी सांगितले. याविषयी ‘झी मराठी’चे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर म्हणाले की, ‘गाव गाता गजाली’मालिका प्रेक्षकांची आवडती होती. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ती पुन्हा सुरू करत आहोत.

आपत्कालीन उद्यान वाहन महानगरपालिकेत दाखल

0

पुणे- महापालिका उद्यान विभाग यांच्या वतीने महाराष्ट्रातील पहीले सुसज्ज असे आपत्कालीन उद्यान वाहन आज पुणे महानगरपालिकेत आज दाखल झाले. त्यामुळे पुणे महापालिका उद्यान विभागाच्या वतीने पुणे शहरातील उद्यान विभागातील आपत्कालीन व्यवस्था मजबूत होणार आहे. त्या आपत्कालीन वाहनाचे आज प्रभाग क्र 28 मध्ये सभागृहनेता श्रीनाथ भिमाले व यांच्या हस्ते पुणे शहरातील नागरिकांनसाठी लोकार्पण करण्यात आले. या वेळी उद्यान अधीक्षक श्री अशोक घोरपडे व मोटर वाहन व्यवस्थेचे श्री.पोळ आणि प्रभागातिल नागरिक उपस्थित होते

महिंद्रा मराझ्झो चे नाशकात लाँचींग

0

भारतात सर्वत्र 9.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या आकर्षक दरामध्ये उपलब्ध

 नाशिक: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या भारतातील प्रीमिअम एसयूव्ही उत्पादकाने आज मराझ्झो दाखल केली. मराझ्झोमध्ये सर्वोकृष्ट अभियांत्रिकीचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आरामदायी व तत्पर नियंत्रण, शांत केबिन, शीघ्र कूलिंग व आतमध्ये ऐसपैस जागा अशा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजपासून, भारतभरातील महिंद्रा डीलरशिपमध्ये मराझ्झो M2 प्रकारासाठी 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किमतीपासून उपलब्ध होणार आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितले, “मराझ्झो दाखल करणे, हा महिंद्राच्या केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील वाटचालीतला अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिका (एमएएनए) आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) यांचा उत्पादन विकसित करण्याचा पहिला संयुक्त प्रयत्न असलेली मराझ्झो आमच्या ‘राइज’ या विचासरणीचे हुबेहूब प्रतिबिंब आहे. आमच्यासाठी कायापलट ठरेल, असे वाहन तयार करण्यासाठी आमच्या टीमनी चाकोरीबाहेर विचार केला व सर्व मर्यादांवर मात केली. आम्ही नव्या विश्वामध्ये प्रवेश करत आहोत आणि यापुढेही अशी वाहने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

 वाहन दाखल करत असातना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी सांगितले, “महिंद्राच्या नव्या, जागतिक दृष्टिकोनाची झलक मराझ्झोमध्ये दिसून येते. हे वाहन उत्कृष्ट ठरण्यासाठी डेट्रॉइटमध्ये तयार केले आहे, त्याची आखणी इटलीतील पिनिनफरिनाच्या सहयोगाने आमच्या इन-हाउस टीमने केली आहे, तसेच हा संपूर्ण प्रकल्प चेन्नईजवळील एमआरव्ही या आमच्या अद्ययावत संशोधन व विकास प्रकल्पात साकारला आहे. ग्राहकांना अद्वितीय गुणवत्ता व खऱ्या अर्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या आमच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनांना मराझ्झोमुळे नवी दिशा मिळाली आहे.

 महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले, महिंद्राच्या यूव्ही श्रेणीच्या वाटचालीमध्ये मराझ्झोने नवा अध्याय रचला आहे. उत्तमोत्तम उत्पादने निर्माण करणे व नव्या श्रेणी तयार करणे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. मराझ्झोच्या निमित्ताने आम्ही ही परंपरा कायम राखली आहे. आकर्षक स्टाइल, आरामदायी प्रवास, तत्पर नियंत्रण, ऐसपैस जागा, उत्तम एनव्हीएच स्तर व आकर्षक किंमत अशा खास वैशिष्ट्यांमुळे मराझ्झो सर्वांची पसंती मिळवणार आहे, असा विश्वास आहे”.

मराझ्झोविषयी:शार्कपासून प्रेरित डिझाइन: मराझ्झोचे शार्कपासून प्रेरित असलेले डिझाइन वाहनाच्या स्लीक व स्ट्रीमलाइन्ड आकारातून अधोरेखित होते.  फ्रंट ग्रिल शार्कच्या दातासारखे दिसते, तर टेल लॅम्प शार्कच्या शेपटीसारखे व अँटिना शार्क-फिनप्रमाणे आहे. प्रोजेक्टर हेडलॅम्प, डेटाइम रनिंग लॅम्प असलेले फॉग लॅम्प, बाह्यभागावर देखणे क्रोम फिनिश, ट्विन-स्पोक 17” मशीन्ड अलॉय व्हील्स यामुळे मराझ्झो अधिक रूबाबदार दिसते.

 पेटण्टेड बॉडी-ऑन-फ्रेम, फ्रंट-व्हील ड्राइव्ह रचना: मराझ्झोमध्ये विशेष, जगातील पहिली रचना केलेली असून त्यामुळे चालकाला एखादी कार चालवल्याप्रमाणे अनुभव येतो, या श्रेणीतील अन्य वाहनांच्या तुलनेत हे वाहन वजनाने हलके आहे, शिवाय बॉडी-ऑन-फ्रेम कॉन्फिगरेशनमुळे त्यास दणकटपणा मिळाला आहे.

आरामदायी व सोपे नियंत्रण: मराझ्झोच्या रिअर सस्पेन्शन रचनेमध्ये वजनाने हलके “ट्विस्ट बीम” आहे व त्यामुळे गाडी चालवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे सोयीचे होते, तसेच या श्रेणीतील 245 मिमी इतके सर्वाधिक सस्पेन्शन ट्रॅव्हल मिळते. मराझ्झोच्या चासीमध्ये फुल्ली बॉक्स्ड फ्रेमचा वापर केला असून त्यामध्ये फोर्ज्ड अल्युमिनिअम फ्रंट सस्पेन्शन कम्पोनंट्सचा समावेश आहे, ज्यामुळे वाहनाचे नियंत्रण वाढते.  फ्रंट व्हील ड्राइव्ह रचनेमुळे पुढील चाकांना ताकद पुरवली जाते व त्यामुळे वाहन हाताळणे सोपी व सुरक्षित ठरते.

या श्रेणीतील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंगमुळे मायलेज, स्टीअरिंगचा अनुभव व मॅन्युव्हरिंग यामध्ये सुधारणा होते. मराझ्झोला सर्वोत्कृष्ट 5.25 मीटरचा टर्निंग रेडिअस असल्याने चालकाला प्रतिकूल स्थितीतही गाडी सहज चालवणे शक्य होते.

8 प्रवासी बसू शकतील इतकी ऐसपैस जागा: मराझ्झोच्या विशिष्ट डिझाइनमुळे केबिनमधील सर्व 3 रांगांमधील जागा वाढली आहे व वाहनाची लांबी न वाढवताही 8 प्रवासी आरामात बसू शकतात. यामुळे हे वाहन या श्रेणीतील सर्वात आटोपशीर, तरीही ऐसपैस ठरते. मराझ्झो आपल्या श्रेणीतील उत्तम दर्जाची पहिल्या व दुसऱ्या रांगेतील शोल्डर रूम प्रदान करते आणि आरामदायी लेगरूममुळे 6 फूट उंच असलेल्या व्यक्तीलाही पाय लांब करून निवांत बसता येऊ शकते. याचबरोबर, वाहनाची स्टेप-इन हाइट 465 मिमी आहे व त्यामुळे साडी नेसलेल्या महिला किंवा वयस्कर व्यक्तीलाही फूटबोर्डचा वापर न करता गाडीत बसणे शक्य होते.

मराझ्झो 7-आसनी व 8-आसनी या पर्यायांत उपलब्ध होईल, तसेच 7-आसनी पर्यायात दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीटची व्यवस्था आहे. 8-आसनी पर्यायात दुसऱ्या व तिसऱ्या रांगा पूर्णतः दुमडल्यानंतर 60:40 विभागात सामानासाठी 1055 लिटर जागा उपलब्ध होते.

या श्रेणीतील सर्वात शांत केबिन: मराझ्झोच्या एअरोडायनॅमिक डिझाइनमुळे, पॉवरट्रेन व रोड एनव्हीएचचा आवाज गाडीच्या आतमध्ये येणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. मराझ्झोमध्ये 1.5 लिटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन असून ते कमी आवाज, कमी कंपने या दृष्टीने तयार केले आहे. यामुळे या वाहनातील केबिन या श्रेणीतील सर्वात शांत केबिन ठरते. चालकाला एकूण येणारा आवाज केवळ 43 डेसिबल्स इतकाच असतो (लो आयडलवर असतानाचा).

या श्रेणीतील शीघ्र कूलिंग: मराझ्झोमध्ये या उद्योगातील पहिलीसराउंड कूल टेक्नालॉजी’ वापरली आहे, याचसोबत फुल्ली ऑटोमॅटिक टेम्प्रेचर कंट्रोलच्या (एफएटीसी) सहाय्याने या श्रेणीतील अन्य वाहनांच्या तुलनेत या वाहनाचे केबिन वेगाने थंड होते (प्रति सेकंद 36 मीटर हवेचा प्रवाह). ‘सराउंड कूल टेक्नालॉजी’च्या मदतीने प्रवाशांना डायरेक्ट मोड व डिफ्युज्ड मोड या पर्यायांची सुविधा प्राप्त होते.

 प्रीमिअम इंटिरिअर्स:

  1. पर्ल व्हाइट, पियानो ब्लॅक व क्रोम फिनिश असलेले प्रीमिअम ड्युएल-टोन्ड इंटिरिअर
  2. चालकासाठी उंची कमी-अधिक करता येईल व कंमबरेला आधार मिळेल अशी रचना असलेली काँटोर-मॅप्ड लेदर सीट
  3. जांभळा प्रकाश असलेले भविष्यात्मक क्लस्टर व विमानापासून प्रेरित असलेले पार्किंग ब्रेक
  4. तिसऱ्या रांगेतील प्रवाशाला आत जाणे व बाहेर येणे शक्य होण्यासाठी दुसऱ्या रांगेत डावीकडील सीटला वन-टच टम्बल डाउन लिव्हर आहे
  5. दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी या श्रेणीतील पहिलेवहिले सनशेड

कार्यक्षमता: मराझ्झोचे दर्जेदार 1.5 लिटर 4-सिलिंडर इंजिन हे आडवे (पूर्व-पश्चिम) असून, त्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा उपलब्ध होते.  हे इंजिन 90.2kW (121 BHP) ताकद व 300 Nm टॉर्कची निर्मिती करते आणि त्याची रचना कमी आवाज, कंपने होतील, या दृष्टीने केली आहे. हे इंजिन एआरएआय-प्रमाणित 17.3 किमी प्रति लिटर मायलेज देते.

सर्वांच्या सुरक्षेची दक्षता: मराझ्झोच्या सर्व प्रकारांमध्ये सुरक्षाविषयक पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे

  1. ड्युएल फ्रंट एअरबॅग
  2. सर्व 4 चाकांवर या उद्योगातील पहिलेवहिले डिस्क ब्रेक
  3. ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स
  4. फुल्ली-बॉक्स्ड फ्रेम असलेले अत्यंत ताकदीचे स्टील स्ट्रक्चर, कोलॅप्सिबल स्टीअरिंग कॉलम, क्रम्पल झोन्स, साइड-इम्पॅक्ट बीम्स
  5. इम्पॅक्ट-सेन्सिटिव्ह डोअर लॉक्स
  6. अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस)

M6 व M8 प्रकारांमध्ये रिअर पार्किंग कॅमेरा व सेन्सर्स, या श्रेणीतील पहिले इमर्जन्सी कॉल व कॉर्नरिंग लॅम्प यांचा समावेश

 तंत्रज्ञान:18 सेमी (7″) कलर टच स्क्रीन इन्पोटेन्मेंट सिस्टीम: हॅप्टिक्स व कॅपसेन्स तंत्रज्ञान, आयपॉड तंत्रज्ञान, पिक्चर व्ह्यूअर, यूएसबी ऑडिओ/व्हीडिओ, ब्लुटूथ ऑडिओ

  1. ऑन-बोर्ड नेव्हिगेशनसह क्लस्टरमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन इंडिकेटर
  2. कनेक्टिविटीमध्ये अँड्रॉइड ऑटो, इमर्जन्सी कॉल असलेले महिंद्रा ब्लु सेन्स अॅप
  3. म्युझिक सिस्टीमसाठी व्हॉइस अॅक्टिव्हेटेड कंट्रोल्स आणि इन्फोटेन्मेंट व एसएमएस रीड आउट यासाठी व्हॉइस रेकगनिशन अशी व्हॉइस असिस्ट फीचर्स
  4. स्टीअरिंग-माउंटेड ऑडिओ व फोन कंट्रोल्स

सोयीची वैशिष्ट्ये: साइड टर्न इंडिकेटर्स व एन्ट्री असिस्ट लॅम्प असलेले पॉवर-फोल्डेबल ओआरव्हीएम, फॉलो-मी-होम व लीड-मी-टू-व्हेइकल हेडलॅम्प, सर्व्हिस रिमांइडर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, सनग्लास होल्डर, कॉन्व्हर्सेशन मिरर, प्रत्येक रांगेत कप-होल्डर व सर्व 4 दारांमध्ये बॉल-होल्डर, मल्टिपल चार्जिंग व मीडिया आउटलेट.

  • डेट्रॉइटमधील महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिका (एमएएनए) आणि चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) यांच्यातील अभियांत्रिकीविषयक सहयोगातून निर्माण झालेल्या मराझ्झोची निर्मिती करताना आरामदायी प्रवास, तत्पर नियंत्रण, केबिनमध्ये शांतपणा, जलद कूलिंग व ऐसपैस जागा या वैशिष्ट्यांची दक्षता घेतली आहे
  • इटलीतील पिनिनफरिना व मुंबईतील महिंद्रा डिझाइन स्टुडिओ यांच्या सहयोगातून तयार झालेले मराझ्झोचे शार्ककडून प्रेरित असलेले व लक्षवेधक डिझाइन स्ट्रीमलाइन्ड व एअरोडायनॅमिक आहे. गाडीचे ग्रिल शार्कच्या दातांप्रमाणे आक्रमक दिसते व टेल लॅम्प शार्कच्या शेपटीसारखे दिसतात.
  • मराझ्झोचे पेटण्टेड बॉडी-ऑन-फ्रेम-फ्रंट-व्हील-ड्राइव्ह रचनेचे दोन फायदे मिळतात, तत्पर व कारसारखे नियंत्रण मिळते, तसेच बॉडी-ऑन-फ्रेम कॉन्फिगरेशनमुळे टिकाऊपणा व दणकटपणा मिळतो
  • या श्रेणीतील सर्वाधिक सस्पेन्शन ट्रॅव्हल (245 मिमी) देणाऱ्या ‘ट्विस्ट बीम’ रिअर सस्पेन्शनमुळे मराझ्झो आरामदायीपणे चालवता येते
  • मराझ्झोच्या पहिल्या व दुसऱ्या रांगेत सर्वोत्तम शोल्डर रूम उपलब्ध असल्याने 8 जण आरामात बसू शकतात. मराझ्झोच्या कमी स्टेप-इन उंचीमुळे, फूटबोर्डची मदत न घेता गाडीमध्ये बसणे व उतरणे अधिक आरामदायी होते.
  • गाडीमध्ये वापरलेली या उद्योगातील पहिलीवहिली सराउंड कूल टेक्नालॉजी तुम्हाला डायरेक्ट व डिफ्युज्ड मोड असे पर्याय देते व या श्रेणीतील शीघ्र कूलिंगही देते
  • मराझ्झोचे 4-सिलिंडर इंजिन हे 90.2kW (121 BHP) ताकद व 300 Nm टॉर्क या श्रेणीतील सर्वाधिक ताकद व टॉर्क देते
  • मराझ्झोचे एअरोडायनॅमिक डिझाइनव नवे, आधुनिक, कमी-एनव्हीएच इंजिन यामुळे प्रवाशांना या श्रेणीतील सर्वात शांत केबिनचा अनुभव मिळतो
  • मराझ्झोच्या सर्व प्रकारांमध्ये सर्व 4 चाकांसाठी या श्रेणीतील पहिलेवहिले डिस्क ब्रेक, ड्युएल फ्रंट एअरबॅग, या श्रेणीतील पहिलीवहिली इमर्जन्सी कॉल, एबीएस व ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स ही वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हे वाहन ऑक्टोबर 2020 मधील सुरक्षाविषयक नियमांचे पालन करते.
  • स्पोर्ट्स प्रीमिअम ड्युएल टोन इंटिरिअर व काँटोर-मॅप्ड लेदर सीट, हॅप्टिक व कॅपसेन्स तंत्रज्ञानाचा वापर केलेले 18 सेमी कलर टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट, पियानो ब्लॅक डॅशबोर्ड, दुसऱ्या रांगेसाठी या श्रेणीतील पहिलीवहिली सन शेड्स, अशी मराझ्झोची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
  • 7 आसनीमध्ये दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट पर्याय उपलब्ध असून, 7 व 8 आसनी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध
  • 4 प्रकारांमध्ये उपलब्ध – M2, M4, M6, M8 – व 6 रंगांमध्ये उपलब्ध – मरिनर मरून, पोसिडन पर्पल, अक्वा मरिन, आइसबर्ग व्हाइट, ओशियानिक ब्लॅक व शिमरिंग सिल्व्हर

वरळीच्या शाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या गोविंदांनी फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची मानाची दहीहंडी(व्हिडीओ)

0
श्रीकृष्णाची ४० फुटी एलईडी वॉलवरील सजावट पाहण्यासाठी अलोट गर्दी 
पुणे : गोविंदा आला रे आला… च्या जयघोषात मुंबईतील वरळीच्या शाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या गोविंदानी बुधवार पेठेतील  . सोमवारी रात्री ९  वाजून ७ मिनिटांनी अवघ्या दुस-या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. मच गया शोर… चांदी की डाल पर… सारख्या गाण्यांप्रमाणेच मराठमोळ्या रिमिक्स गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव मोठया दिमाखात साजरा केला.
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यंदा देखील दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सुर्यवंशी, सचिन आखाडे, अक्षय गोडसे, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. वरळीच्या पथकातील विकी साळुंखे या गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक दहीहंडी फोडणा-या संघाला देण्यात आले.
सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पृथ्वीची प्रतिकृती असलेली १२ फूट मूर्ती आणि श्रीकृष्णाची २० फूट मूर्ती व इतर सजावट अशी तब्बल ४० फूट एलईडी वॉलवरील सजावट हे यंदाचे आकर्षण ठरले. मुंबईसह पुण्यातील कसबा पेठ, बारामती व इतर शहरांतून आलेल्या गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती.
बाबू गेनू मंडळाची दहीहंडी

जलसंपदा मंत्री शिवतारे यांच्याकडून विकासकामांची पहाणी

0

पुणे,दि.3: जिल्हयातील जेजुरी भुलेश्वर आणि श्री. क्षेत्र वीर या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी संख्या असते. भाविकांच्या सोईकरीता पायाभुत सुविधा पुरविण्याकरीता शासनाकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानातून करण्यात येणाऱ्या वेगवेगळया विकास कामांची पहाणी करुन विश्वस्त ग्रामस्थ यांच्याशी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच या कामांबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.मित्रगोत्री, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसिलदार सचिन गिरी, गट विकास अधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंबावी आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीमार्फत यापूर्वी श्री क्षेत्र वीर या ठिकाणाकरीता 93 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापी जिल्हाधिकारी यांचा सहभाग असलेल्या इतर संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांची समिती लगेच नेमण्यात येवून यात्रा कालावधीमध्ये भाविकांना राहाण्याकरीता भक्तनिवास, रस्ते दुरुस्ती व इतर आवश्यक सोयी सुविधा तसेच ग्रामस्थांमार्फत सूचविलेल्या गरजा आणि सूचना लक्षात घेवून नव्याने आराखडा तयार करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री.शिवतारे यांनी देवून वाढीव निधीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. समितीमार्फत सूचविलेल्या कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घेण्याचा प्रयत्न करावा, असेही सांगितले.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी देशपातळीवर पुणे जिल्हयातील प्रत्येक तालुक्याचे, गावांचे आगळेवेगळे वैशिष्टय आहे. श्री क्षेत्र वीर येथे वर्षभरात 25 ते 30 लाख भाविक दर्शनाकरीता येत असतात. त्यांच्या गरजांनुसार वाढीव कामाकरीता समिती गठीत करण्यात येईल. तसेच या ठिकाणच्या कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात येवून ही प्रस्तावित कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येतील असे सांगितले.

गोविंदा रक्षक उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत !

0
पुणे 
‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत थरारवर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत असताना गोविंदासह नागरिकांच्या जीवासाठी तैनात असलेल्या गोविंदा रक्षक उपक्रमाचे पर्वती विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी स्वागत केले.
दहीहंडीच्या उत्सवाला कोणत्याही अपघाताचे गालबोट लागू नये आणि गोविंदा असो किंवा नागरिक प्रत्येकाचा जीव महत्वाचा ही भूमिका घेऊन माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि ह्यूमन हेल्थ सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवादरम्यान सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत पर्वती विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी  गोविंदा रक्षक उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टरांचे पथक ,रुग्णवाहिका व स्वयंसेवकांचा ताफा तैनात करण्यात आला होता आणि हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले शिवाय दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनीही कौतुक केले. या उपक्रमाबाबत अमित बागुल म्हणाले कि, दहीहंडी उत्सवावेळी थरावर थर रचताना अनेक गोविंदा जायबंदी होतात तसेच नागरिकांनाही दुखापत होते. त्यामुळे अशा घटना घडल्यास जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. 

लिपिकांची पहिली राज्यस्तरीय एल्गार परिषद संपन्न

0

जुनी पेन्शन योजना , समान वेतन लागू करण्याची मागणी

पुणे-राज्यातील सर्वच कार्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक , वरिष्ठ लिपिक , अधीक्षक , प्रथम लिपिक आणि कक्ष अधिकारी कार्यरत आहेत . काही कार्यालयामध्ये पदनाम बदल आहे . मात्र वेतनश्रेणी सारखीच दिली आहे . तर काही ठिकाणी पदनाम बदल असल्याने इतर विभागातील लिपिकापेक्षा जास्त वेतनश्रेणी दिली आहे . या सर्व लिपिकांची भरती प्रक्रिया , शैक्षणिक पात्रतासुद्धासारखी असताना दुजाभाव केला जात आहे . ग्रामपंचायत ते मंत्रालयापर्यंत कार्यरत लिपिक , कर्मचारी यांचे समान पदनाम व समान वेतन करणे , अंशदाय निवृत्तीवेतन बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांसह एकूण ११ मागण्या या महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक  सवर्गीय हक्क परिषदेत करण्यात आल्या .

महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय लिपिकवर्गीय कर्मचारी यांचे समान काम , समान वेतन या उद्देशाकरिता शासकीय निमसाशकीय लिपिक हक्क परिषद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडली . यामध्ये राज्यातील २५ विविध विभागांतील लिपिक संघटनेचे राज्य प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती आमदार डॉ. सुधीर तांबे , संघटनेचे अध्यक्ष विजय बोरसे , कोषाध्यक्ष सूर्यकांत इंगळे , राज्य संघटक शिवाजी खांडेकर , सरचिटणीस उमाकांत सूर्यवंशी , विभागीय अध्यक्ष महेश शिंदे ,पुणे जिल्हा अध्यक्ष  प्रसन्न कोतूळकर ,  डॉ गजानन देसाई ,मुकुंद पालटकर , बापूसाहेब कुलकर्णी , संजय केणेकर , नागेश सांगळे , प्रविणकुमार सोनार , दिलीप अनर्थे , सचिव अविनाश पारळकर , दिलीप विश्वासू , शंकरराव खैरनार , अशोक झुरावत, कारभारी नेटके , योगेश गणोरे  आदी मान्यवर उपस्थित होते .

या परिषदेमध्ये लिपिक सवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करून ७ वा वेतन आयोग  लागू करणे , समान काम समान वेतन या धर्तीवर सर्व स्तरावर लिपिकाचे वेतन एकसमान करणे , जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करणे , केंद्रीय लिपिक कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ १० , २० , ३० या तीन टप्प्यात देणे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्याप्रमाणे लिपिक सवर्गीय  कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सर्व स्तरावर निशुल्क शिक्षण सवलत मिळणे , अर्जित रजा साठविण्याची मर्यादा काढून टाकणे , सुधारित आकृतिबंध लागू करताना लिपिक सवर्गांची पदे बाह्य यंत्रणेमार्फत / कंत्राटी निर्माण न करता ती स्थायी स्वरूपाची निर्माण करण्यात यावी . लिपिक सवर्गासाठी नियमित प्रशासकीय प्रशिक्षण देण्यात यावे . सर्व कार्यालयांतील लिपिक सवर्गीय कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा व सेवा पुरविण्यात याव्यात आदी मागण्या मांडण्यात आल्या .

 या परिषदेमध्ये  प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुकुंद पालटकर यांनी सांगितले कि , शिक्षण संस्थांमध्ये लिपिकांकडूनच सर्व कामे करून घेतली जातात मात्र त्यांचा पगार संस्थाचालक वेळेवर करत नाहीत . लिपिकाची सर्वबाजूने गळचेपी केली जात आहेत . ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयातील लिपिकांना समान वेतन असणे आवश्यक आहे . कुणामध्ये दुजभाव करू नये . याशिवाय पदोन्नतीच्या वेळी देखील अगोदर मंत्रालयातील लिपिकांचा विचार केला जातो . तसे न करता सर्वाना समान वागणूक मिळणे आवश्यक आहे .

येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये एल्गारची क्रांती म्हणून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . २७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील लिपिक एकत्र येऊन हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी लिपिकांचे क्रांती धरणे आंदोलन करण्याचा ठराव या एल्गार परिषदेमध्ये करण्यात आला . त्याचबरोबर सहावा वेतन आयोगातील त्रुटीसह लिपिकांना फरक मिळणार नाही तोपर्यँत कुणालाच सातवा वेतन आयोग लागू न करू देण्याचा ठराव देखील करण्यात आला .

या परिषदेचे प्रास्तविक सूर्यकांत इंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार संजय कडाळे यांनी मानले .

पुण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक

0

पुणे : बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, न्यायालयाचे खंडपीठ यासह पुण्यातील महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी अकरा सप्टेबर रोजी मंत्रालयात खास बैठक बोलवण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश  बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुण्यातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावी यासाठी पालकमंत्री बापट यांनी १७ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशावरून  बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत ही बैठक ११ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुण्यातील मेट्रो प्रकल्प व चांदणी चौक येथील उड्डाणपूल हे दोन्ही प्रकल्प मार्गी दृष्टीने जमीन संपादित करून बीडीपी बाबत निर्णय घेणे, चांदणी चौक येथील उड्डाणपुलाबाबत चर्चा करणे. पुणे शहरामध्ये एकूण ४० टक्के झोपड्या आहेत या झोपड्या निर्मूलनाच्या कामांमध्ये गती आणणे, मेट्रोसाठी बालेवाडी येथील शासकीय जागा तत्काळ हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेणे, पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करणे,पिंपरी चिंचवड येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या पोलीस आयुक्तालायातील कर्मचारी व अधिकारी यांच्या कमतरतेबाबत आढावा घेणे,पुरंदर येथील विमानतळासाठी भूसंपादनाबाबत चर्चा करणे,  भामा आसखेड पुनर्वसनाबाबत निर्णय घेणेबाबत चर्चा करण्यासाठी बापट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.  तसेच शहरातील विविध विकास कामाच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळ घेण्याबाबत या  बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधीक्षक अभियंता, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी या बैठ्कीमध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. अशी माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रश्न सोडविण्यात मदत करु : खा. वंदना चव्हाण

0
पुणे :सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना विविध प्रश्नात मार्गदर्शन करण्याचे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे काम महत्वपूर्ण  आहे, त्यामुळे जीएसटी पासून केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन खा. वंदना चव्हाण यांनी केले.
सोमवारी सकाळी खा. चव्हाण यांनी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाच्या नारायण पेठ येथील कार्यालयाला भेट दिली आणि गृहनिर्माण सहकारी संस्था चे  केंद्र सरकारशी  प्रश्न समजावून घेतले. आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचे प्रशिक्षण, जनजागृती, पर्यावरण रक्षण यासाठी एकत्रित प्रयत्नांबाबत यावेळी चर्चा झाली. तसेच गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांसंदर्भात राष्ट्रीय चर्चासत्र ऑक्टोबरमध्ये घेण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी जमा केलेल्या देखभाल खर्चावर जीएसटीमध्ये सवलत मिळावी, या साठी दिल्लीत प्रयत्न करू, असे खा. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मनिषा कोष्टी, गृहनिर्माण महासंघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.