पुणे-दहीहंडी साजरी झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी स्टेज कोसळून 10 ते 15 जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास बुधवार पेठेतील एका दहीहंडी मंडळात घडली. दहीहंडीचा थरार संपल्यानंतर बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने बक्षिस वितरणाचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजवर कार्यकर्त्यांची संख्या जास्त झाल्याने तो भार जास्त झाल्यामुळे स्टेज क्षणार्धात खाली कोसळले. या घटनेत मंंडळाचे 14 ते 15 कार्यकर्ते जखमी झाले. त्यापैकी 4 ते 5 जणांंना गंभीर फॅक्चर झाले आहे.
दहीहांडीचा उत्साह शहरात सर्वत्र काल पाहायला मिळाला. रात्री उशीरा बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळाची दहीहांडी फाेडण्यात अाली. यावेळी माेठी गर्दी या भागात झाली हाेती. दहीहांडी फाेडल्यानंतर बक्षिस समारंभाचा कार्यक्रम सुरु हाेता. यावेळी अनेक कार्यकर्ते स्टेजवर अाल्याने स्टेज अचानक काेसळला. स्टेजवर जास्त वजन झाल्याने अधांतरी असलेला लाकडी स्टेज काेसळला. त्यानंतर एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात अाले. स्टेजवरील अनेकजण या अपघातात जखमी झाले असून काहींना गंभीर ईजा झाली अाहे. सुदैवाने यात काेणतीही जीवित हानी झाली नाही. स्टेज पडल्यानंतर एकच गाेंधळ झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरवातीला काेणालाच काहीच कळाले नाही. जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु अाहेत.