कीर्तनाच्या माध्यमातून ‘विश्व बंधुत्वाचा संदेश’
श्रेयस बडवे यांचे ८ सप्टेबर रोजी कीर्तन
पुणे : ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ पुणे शाखा च्या वतीने ‘विश्व बंधुत्वाचा संदेश’ या विषयावर श्रेयस बडवे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तनकार श्रेयस बडवे हे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेला ‘विश्व बंधुत्वाचा संदेश’ कीर्तनाच्या माध्यमातून सादर करणार आहेत, अशी माहिती विवेकानंद केंद्र ,पुणे नगरचे संचालक जयंत कुलकर्णी यांनी दिली.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 8 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता टिळक स्मारक मंदीर, सदाशिव पेठ येथे होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.