श्रीकृष्णाची ४० फुटी एलईडी वॉलवरील सजावट पाहण्यासाठी अलोट गर्दी
पुणे : गोविंदा आला रे आला… च्या जयघोषात मुंबईतील वरळीच्या शाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या गोविंदानी बुधवार पेठेतील . सोमवारी रात्री ९ वाजून ७ मिनिटांनी अवघ्या दुस-या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. मच गया शोर… चांदी की डाल पर… सारख्या गाण्यांप्रमाणेच मराठमोळ्या रिमिक्स गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव मोठया दिमाखात साजरा केला.
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यंदा देखील दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सुर्यवंशी, सचिन आखाडे, अक्षय गोडसे, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. वरळीच्या पथकातील विकी साळुंखे या गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक दहीहंडी फोडणा-या संघाला देण्यात आले.
सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पृथ्वीची प्रतिकृती असलेली १२ फूट मूर्ती आणि श्रीकृष्णाची २० फूट मूर्ती व इतर सजावट अशी तब्बल ४० फूट एलईडी वॉलवरील सजावट हे यंदाचे आकर्षण ठरले. मुंबईसह पुण्यातील कसबा पेठ, बारामती व इतर शहरांतून आलेल्या गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती.