Home Blog Page 1565

२८ एप्रिलला ‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘बोल हरी बोल’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची केमिस्ट्री!
प्रेम, क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट ‘बोल हरी बोल’. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर, चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी, ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्याबरोबरच प्रतिक सुरेश, मीरा पाथरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे. तर, काशी-रिचर्ड यांनी या चित्रपटाच संगीत केलं आहे.
हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ , ‘बोल हरी बोल’च्या रुपात एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.
“कलाकारांची उत्तम फळी लाभलेला ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाचे अनोखे कथानक आणि उत्तम संदेश सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखे आहे. सोबतच, ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट व अल्ट्रा झकासचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
वेगळा अनुभव
‘बोल हरी बोल’ चित्रपटातील माझी भूमिका मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. दिलखुलास आणि मनमौजी स्वभावाच्या हरी पोंक्षेची भूमिका साकारताना मला प्रचंड मजा आली. येत्या २८ एप्रिलपासून अल्ट्रा झकास या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आमचा हा चित्रपट पाहता येणार आहे. माझ्या आजवरच्या सगळ्या भूमिकांवर भरभरून प्रेम केलेले तुम्ही सगळे हरी पोंक्षेवरही तेवढंच प्रेम कराल अशी खात्री आहे.
-अक्षय केळकर (अभिनेता, बोल हरी बोल)

उत्सुकता शिगेला…
प्रिया मालेगावकर हे चित्रपटातील पात्र मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हे पात्र साकारण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. चित्रिकरणादरम्यान अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आता या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.
-आकांक्षा साखरकर (अभिनेत्री, बोल हरी बोल)

उत्तम मांडणी असलेला चित्रपट
घरोघरी घडणारी आणि आपल्या आसपास हमखास पहायला मिळणाऱ्या गोष्टींची उत्तम बांधणी म्हणजे ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट. नेहमी जगाच्या दृष्टीआड असणाऱ्या बाप-मुलाच्या नात्याची गोष्ट चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आली आहे. शेरास-सव्वाशेर असं बाप-मुलाचं नातं साकारताना मला समाधान मिळालं. २८ एप्रिलपासून, आपली आवड जपणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आमचा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
-रमेश वाणी (अभिनेता, बोल हरी बोल)

‘बोल हरी बोल’ सारखा आशयघन आणि कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला भेटीला घेऊन येताना अत्यंत आनंद होत आहे. कलाकारांची उत्तम फळी आणि चित्रपटाला लाभलेलं सुमधूर संगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल असा विश्वास वाटतो.
-अमोल बिडकर (दिग्दर्शक, बोल हरी बोल)

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी प्लॅटफोर्म अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे.

पुणेकरांच्या आरोग्य योजना महापालिकेने पुन्हा सुरु करा-माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आयुक्तांची भेट

पुणे –महापालिका हद्दीतील पुणेकरांसाठी पाच वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना बंद न करता पुनर्रचना करुन पुन्हा करा, अशी मागणी माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

माजी महापौर मोहोळ यांनी आयुक्तांकडे विमा आणि आरोग्य तपासणी योजना पनर्रचनेसर पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असून मा. महापौर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या योजना कार्यान्वित केल्या होत्या आणि सलग पाच वर्षे सुरुही ठेवल्या. मात्र प्रशासक म्हणून अंदाजपत्रक मांडताना या योजनांना तरतूद न दिल्याने योजना बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी भेट घेत मागणीचे निवेदन दिले आहे.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरु होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांची तातडीने अभ्यास करुन पुनर्रचना करावी. या योजना पुणेकरांसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे यावर लवकरच घेण्यात यावा’

‘ रजामुदतीच्या एकूण ९३ शिक्षकांना सेवेत कायम करणे आणि १५२ समूह संघटक आणि संघटिका यांना सेवेत कायम करणे, याही मागण्या आयुक्तांकडे केल्या आहेत. शिवाय बिबवेवाडी-धनकवडी पुनर्वसन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जवळपास ८ हजार निवासी आणि बिगरनिवासी गाळे हस्तांतरण प्रक्रियेची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशीही मागणी केल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

‘चांदणी चौकातील स्वराज्य शिल्पाचे काम त्वरित सुरु करा’

चांदणी चौकातील जिजाऊ मॅांसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य शिल्प साकारण्यात येणार असून या शिल्पाची निविदा प्रक्रिया लवकर करावी, अशीही मागणी मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.

सात- बारा किंवा मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंद घेण्यापूर्वी नोटीसीची गरज नाही

विभागांनी समन्वयांने काम करत मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेला गती द्यावी- अपर जिल्हाधिकारी अजय मोरे

पुणे, दि. २७: मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तसेच त्यातील सर्व सदनिकाधारकांच्या फायद्याची बाब असून त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेष मोहिमेत सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने अधिकाधिक संस्थांची मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.

मानीव अभिहस्तांतरण प्रकरणाबाबत गठित जिल्हास्तरीय समितीची सभा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पुणे शहरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, नोंदणी विभागाचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सूर्यकांत मोरे यांचसह पुणे शहरमधील सहकारी संस्थांचे उपनिबंधक उपस्थित होते.

एकिकृत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबत विचार
मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान होण्यासाठी सहकार, मुद्रांक व नोंदणी विभाग, महसूल, भूमि अभिलेख आदी सर्व संबंधित विभागांसाठी एकिकृत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. मोरे यांनी दिल्या.

सात- बारा किंवा मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंद घेण्यापूर्वी नोटीसीची गरज नाही
मानीव अभिहस्तांतरणाच्या आदेशानुसार नोंदणीकृत दस्ताच्या आधारे सात- बारावर किंवा मिळकत पत्रिकेत नोंदणी करण्यासाठी गृहनिर्माण संस्था तलाठी अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अर्ज करतात. या प्रकरणात महसूल विभागातून फेर फार नोंद अभिलिखित व निर्गमित करण्यापूर्वी अशा मिळकतीमधील संबंधितांना पुन्हा नोटीस देण्याची आवश्यकता नाही. त्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही श्री. मोरे यांनी सांगितले.

पुणे शहरात सुमारे १९ हजार ५०० नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी सुमारे 2 हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण किंवा विकसकाकडून हस्तांरण झालेले आहे. याव्यतिरिक्तच्या सुमारे साडेसतरा हजार संस्थांमधील ४० टक्के संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे. उर्वरित संस्थांबाबत सहकार विभाग प्रयत्नशील आहे. सहकार बरोबरच मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमि अभिलेख विभागाचाही यात महत्त्वाची भूमिका असून समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी दिली,

दस्त नोंदणी वेळेस मुद्रांक व नोंदणी विभागाकडून सदनिकेच्या खरेदी- विक्रीच्या दस्ताची ‘चेंज ऑफ ॲग्रीमेंट’ ची होणारी मागणीच्या अनुषंगाने सदनिकांचा मुद्रांक शुल्क भरणा करण्यात आला असेल अशा ठिकाणी शासन निर्णयानुसार कार्यवाही अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने याबाबतची प्रक्रिया अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्याच्यादृष्टीने उपाययोजना सुरु केली असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. हिंगाणे यांनी सांगितले.

या बैठकीस पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरणचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, पुणे शहरमधील उपनिबंधक सहकारी संस्था श्रीमती स्नेहा जोशी, नीलम पिंगळे, नागराथ कंजेरी, डी. एस. हौसारे, नारायण आघाव, डॉ. शीतल पाटील आदी उपस्थित होते.

अजय मोरे, अपर जिल्हाधिकारी, पुणे: सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारती ज्या भूखंडावर उभ्या आहेत त्या भूखंडाची मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या नावे होण्यासाठी मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची तरतूद आहे. जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेमध्ये सहभागी होत मोहिमेचा लाभ घ्यावा.

संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर: मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची संख्या अतिशय कमी करण्यात आली असून संस्थांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रकरणे दाखल करावीत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मानीव अभिहस्तांतरणाचा आदेश व प्रमाणपत्र देणे हा एक टप्पा असून त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनिर्णयाचा अंतिम आदेश देणे व त्यानुसार दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणी केल्यानंतरच सात बारा किंवा मिळकत पत्रिकेत भोगवटदार म्हणून नाव लागते. त्यामुळे संस्थांनी दस्त नोंदणी व त्यापुढील प्रकियेलाही तितकेच महत्त्व द्यावे.*
0000

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने माती कलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन

पुणे : दि.२७ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने हातकागद संस्था शिवाजीनगर येथे १ ते ३ मे दरम्यान मातीकला वस्तूंचे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते सोमवार १ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा, खादी आयोगाचे राज्य संचालक योगेश भामरे, उद्योजक श्रीकांत बडवे उपस्थित राहणार आहेत.

या व्यवसायातील कारागिरांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनात सुमारे तीस स्टॉल असणार आहेत. कुंभारी पारंपरिक भांडी, माठ ते अत्याधुनिक अशा विविध कलात्मक वस्तूंचा समावेश असणार आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दु.क्र.०२०-२९७०१८३८ वर संपर्क साधावा. या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावे, असे आवाहन सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.
000

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी २८ आणि ३० एप्रिल रोजी मतदान

पुणे, दि. २७: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून याअंतर्गत १४७ बाजार समित्यांचे मतदान २८ एप्रिल तर ८८ बाजार समित्यांचे मतदान ३० एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे.

प्राधिकरणाने २१ मार्चच्या आदेशानुसार २५३ कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यतील १८ बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित २३५ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे.

या निवडणुकीअंतर्गत एकूण ४ हजार ५९० जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये २ हजार ८०५ पदांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी ६ हजार २३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात १ हजार २० पदांपैकी २१ जागा बिनविरोध झाल्या असून २ हजार ४५७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात ५१० पदांपैकी ४९ बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी १ हजार ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हमाल/मापारी मतदार संघामध्ये २५५ पदांपैकी ६४ जागा बिनविरोध झाल्या असून ६०६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

२८ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी ३७ बाजार समित्यांची मतमोजणी २८ एप्रिल रोजी, ९५ समित्यांची मतमोजणी २९ एप्रिल रोजी तर १५ समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे. ८८ पैकी ७८ समित्यांची मतमोजणी ३० एप्रिल रोजी तर १० समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे, असेही डॉ. खंडागळे यांनी कळविले आहे.
0000

उर्मिला मातोंडकरांनी मीडिया, मंत्र्यांना विचारला सवाल,’बेटी बचाव’च्या घोषणांना अर्थ काय?

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. न्यायासाठी हे खेळाडू दिल्लतील जंतरमंतर मैदानावर आंदोलनासाठी बसल्या आहेत. या खेळाडूंना अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच मीडिया, गृहमंत्री अमित शहा, क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांना काही सवालही केले आहेत.मातोंडकर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. यात त्या म्हणतात, “या देशाच्या मुली तसेच तुमच्या आणि माझ्या घरात बसलेल्या प्रत्येक मुलींच्यावतीनं मी आज तुमच्याशी बोलत आहे. आपल्या देशाच्या त्या मुली ज्यांनी देशासाठी मान-सन्मान आणि अनेक मेडल्स आणले. त्या मुली जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करत आहेत, कारण त्यांना न्याय हवा आहे.

“त्या अशा देशात न्यायाची भीक मागत आहेत जिथं प्रत्येक स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. या मुलींना समाजात येऊन आपलं लैंगिक शोषण झाल्याचं सांगणं ही खूप मोठी गोष्ट असते. आपल्या क्षेत्रात झालेल्या चुकीच्या गोष्टींवर आज या मुली आवाज उठवत आहेत. उद्या याच गोष्टी दुसऱ्या मुलींबाबतही होऊ शकतात. इतरही ठिकाणी होऊ शकतात. आज जर या मुलींसोबत न्याय झाला नाही तर खूपच उशीर होईल”

“मला तुम्हाला आज हे विचारायचं आहे की, या मुली जेव्हा देशासाठी मेडल्स घेऊन येतात. तेव्हा सर्व मंत्री त्यांच्यामागे पुढे पळत असतात कारण त्यांच्यासोबत फोटो काढून ट्विट करता यावं, आज हे सर्वजण कुठे गेलेत? ते सर्व मीडियाचे लोक कुठे आहेत? जे छोट्या छोट्या गोष्टींच्या मोठमोठ्या बातम्या करतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. मीडियासाठी ही इतकी मोठी बातमी देशासमोर आणावीशी वाटत नाही का?”

“सर्वांत महत्वाची गोष्ट मी गृहमंत्री आणि क्रिडा मंत्री यांना नम्रपणे निवेदन करते की, कृपया या मुलींना न्याय मिळवून द्यावा. त्यांची साकडं ऐकावं. कारण जर तुम्हीच त्यांच्यासोबत उभे राहिला नाहीत तर याच क्षेत्रात काय इतर कुठल्याही क्षेत्रात ‘बेटी बचाव’च्या घोषणा देण्याचा अर्थ काय राहतो?” असा सवालही उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.

काँग्रेसने अमित शहांवर दाखल केला FIR:द्वेष पसरवण्याचा ठपका

अमित शहांसह भाजपच्या इतर नेत्यांविरोधातही तक्रार

बंगलोर-काँग्रेसने गुरुवारी बेंगळुरूत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यात अमित शहा यांच्यावर प्रक्षोभक विधाने करणे, द्वेष पसरवणे व विरोधकांची प्रतिमा डागाळण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमित शहा यांनी कर्नाटकातील एका सभेत राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास जातीय दंगली होतील, असे विधान केले होते. काँग्रेसने त्यांच्या याच विधानाप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, डॉ. परमेश्वरा व कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी बंगळुरू येथील हाय ग्राउंड पोलिस ठाण्यात अमित शहांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अमित शहा यांच्याशिवाय भाजपच्या इतर बड्या नेत्यांसह विजयपुरा रॅलीचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही या प्रकरणी नाव घेण्यात आले आहे.

डीके शिवकुमार म्हणाले की, अमित शहा अशी कशी विधाने करू शकतात. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही एका जाहीर सभेत शहा यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमित शहा यांचे भाषण खोट्या दाव्यांनी भरलेले होते. खोटे व निराधार आरोप करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करणे हा त्यामागील उद्देश होता. शहा यांना या माध्यमातून रॅलीत सहभागी झालेले लोक व इतर व्यासपीठांवरून भाषण पाहणाऱ्यांत जातीय विसंवादाचे वातावरण निर्माण करायचे होते.

शहा यांच्या भाषणाचा व्हिडिओही तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कलम 153, 505(2), 171G व 120B चा उल्लेख आहे.

प्रभाकर महाजन यांचे निधन

0

पुणे-प्रभाकर नरहर महाजन (वय ९३) यांचे २६ एप्रिल रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. राजगुरुनगर जवळील कडूस येथील रामभाऊ म्हाळगी हायस्कूलचे ते माजी विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, वैवाहित मुलगा, वैवाहित मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांचे ते वडील होत. वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

पुण्यातील ‘स्वरस्वप्न’ बाल व्हायोलिन वाद्यवृंदाचे जर्मनीत महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

पुणे-

पुण्यातील ‘स्वरस्वप्न’ संस्थेतर्फे १३-१४ वर्षाची १० मुले-मुली व २० वर्षांची २ मुले यांचा व्हायोलिन वाद्यवृंद आज जर्मनीतील स्टुटगार्ट कडे रवाना झाला. व्हायोलिन वादक स्वप्ना दातार यांच्या ‘स्वरस्वप्न’ या संस्थेत ही सर्व मुले-मुली व्हायोलिनचे शिक्षण घेत असून जर्मनीतील स्टुटगार्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन  व म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळ यांच्या निमंत्रणावरून तेथे जात आहेत. स्टुटगार्ट येथील संगीत विद्यालयाच्या श्रीमती स्टेफी ब्रॉयनिंग यांचा ‘दि टेलीमॅनर’ हा ऑर्केस्ट्रा वाद्यवृंद ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदासमवेत आपली कला सादर करेल.  ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदात १२ व्हायोलिन वादक मुले-मुली, २ तबला वादक, १ पखवाज वादक, १ साईड रिदम, २ ड्रम वादक यांचा समावेश आहे. स्वप्ना दातार तेथे सादर होणाऱ्या कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन करणार आहेत. दि. २९ एप्रिल रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट आणि दि. १ मे या महाराष्ट्र दिनी जर्मनीतील म्युनिक येथे हा वाद्यवृंद आपली कला सादर करेल. या दोन्ही ठिकाणी भव्य अॅम्फीथिएटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे बुकिंग हाउसफुल झाले आहे. ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाचा 2 तासांचा हा कार्यक्रम दोन भागात होणार असून पहिल्या भागात शास्त्रीय व उपशास्त्रीय आणि दुसऱ्या भागात अभंग, देशभक्तीची गीते, भावगीत, भक्तीगीत तसेच हिंदी चित्रपटातील शास्त्रीय रागांवर आधारित जुनी गाणी तसेच महाराष्ट्राची लावणी आणि गुजरात, बंगाल, काश्मीर, राजस्थान, गोवा या राज्यांमधील लोकसंगीत व्हायोलिनवर सादर करणार आहेत. ‘संधीकाली या अशा’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सावरे’ अशी वन्समोअर मिळणारी गाणी  हे देखील या वाद्यवृंदाचे आकर्षण आहे. देशात अनेक ठिकाणी ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाच्या बाल कलाकारांनी आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. दि. ८ मे रोजी हा वाद्यवृंद पुण्यात परत येईल अशी माहिती ‘स्वरस्वप्न’च्या संचालिका स्वप्ना दातार यांनी दिली.

हॉर्निमन सर्कल येथे बुल आणि कॉमन मॅन शिल्पाचे अनावरण

मुंबई- २७ एप्रिल २०२३ : मुंबई फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कल येथे चार्जिंग बुल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंगचा गॉ‌ंग आणि कॉमन मॅनच्या शिल्पाचे महाराष्ट्र सरकारचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि महिला व बाल विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या समारंभाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंग चे चेअरमेन एस एस मुंद्रा, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मनपा अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा हे देखिल उपस्थित होते.

चार्जिंग बुल” हे शेअर बाजाराचे प्रतिष्ठित प्रतीक आहे. जे भारतीय शेअर बाजाराचे समृद्धीचे प्रतीक आहे आणि आर्थिक आशावाद देखील दर्शविते आणि या प्रमुख स्थानावरील बुलचे शिल्प सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक समृद्धीची सुलभता दर्शवितो. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी तयार केलेले “सामान्य माणूस”, हे व्यंगचित्र सामान्य माणसाच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतीक आहे.

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंग च्या समृद्ध प्रवासातील महत्वाचा दिवस म्हणून मानला जाईल कारण आज आपला प्रसिद्ध चार्जिंग बुल सर्वसामन्यांपर्यंत पोहचत आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज चा चार्जिंग बुल आणि गॉ‌ंगची प्रतिकृती सार्वजनिक रिंगणात ‘कॉमन मॅन’ सोबत ठेवून आमचा वारसा अधिक बळकट केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगर पालिकेचे अत्यंत आभारी आहोत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना आर्थिक बाजारपेठांशी संबंध ठेवण्याची संधी मिळते. अशी भावना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री सुंदररामन राममूर्ती यांनी व्यक्त केली

उद्धव ठाकरे गटाचे सर्व 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; उदय सामंतांकडून राजकीय भूकंपाचे भाकित

मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, याची चर्चा या दाव्याने रंगली आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सावंत म्हणाले. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधल्यानंतर हा दावा केला. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवणार. त्यांच्यावर भाजपचे हायकमांड नाराज आहे, असा प्रश्न उदय सामंत यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व तेरा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस आमदार संपर्कात आहेत. काँग्रेसचे अनेक बडे नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात तोडफोडीचे राजकारण रंगणार का, असा सवाल निर्माण केला जात आहे.

उदय सामंत यांनी संजय राऊत हे विद्वानांचे महामेरू आहेत, असे म्हणत त्यांचा समाचार घेतला. सामंत म्हणाले की, जगातले सगळ्यात शहाणे आणि विद्वानांमध्ये संजय राऊतांची गणना होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणे सोडून दिले आहे. त्यांसमोर स्पर्धक म्हणून एकही विद्ववान नाही. जगात सगळ्यात जास्त अक्कल राऊतांना आहे. त्यांच्यावर आता काय बोलणार. मात्र, त्यांनी सरकारी कागद दाखवून शहापणा दाखवू नये, असे शब्दांत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. या नाराजीतून ते सुटीवर होते. शिंदे म्हणावे तसे काम करत नाहीत, अशी भाजप हायकमांडला वाटते. सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात लागला, तर शिंदे यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चा सुरू आहेत

 होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे नागपूर झोनल ऑफिसचे उद्घाटन

नागपूर, 27 एप्रिल २०२३ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या दुचाकी ब्रँडने नागपूर येथे आपल्या नव्या झोनल ऑफिसचे (विभागीय कार्यालय) उद्घाटन केले.

१८ वा मजला, वेद सोलेटेयर, नीव मलिका अपार्टमेंट, ५ वे क्रॉस बी स्टेशन, धर्मपेठ एक्सटेन्शन, धर्मपेठ येथे वसलेल्या या झोनल ऑफिसचे उद्घाटन होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे (एचएमएसआय) अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. त्सुत्सुमु ओतानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. विनय धिंग्रा – वरिष्ठ संचालक, एचआर, अडमिन, आयटी आणि कॉर्पोरेट अफेयर्स, एचएमएसआय, श्री. ताकेशी कोबायाशी – संचालक, विपणन आणि विक्री, एचएमएसआय आणि श्री. योगेश माथुर – संचालक, विक्री आणि विपणन, एचएमएसआय आदी उपस्थित होते.

होंडा हा महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांसह संपूर्ण पश्चिम भागातील सर्वात विश्वासार्ह दुचाकी ब्रँड आहे. नव्या झोनल ऑफिसमुळे एचएमएसआयला राज्यात सर्वदूर विस्तार करणे आणि ११०० टचपॉइंट्सच्या मदतीने पश्चिम भागातील ग्राहकांना सेवा देणे शक्य होणार आहे.

नागपूर झोनल ऑफिस हा एचएमएसआयच्या रुपंतर प्रकल्पाचा भाग आहे आणि त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आल्यामुळे रियल टाइम अनुभवासह व्हर्च्युअल प्रशिक्षण देणे सहज शक्य होते. नव्या ऑफिसमुळे वितरकांचा कौशल्य विकास करणे आणि पर्यायाने ग्राहकांना जास्त चांगली सेवा देणे शक्य होणार आहे.

एचएमएसआयच्या नागपूर येथील नव्या झोनल ऑफिसचे उद्घाटन करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे (एचएमएसआय) अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, पश्चिम भागातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडचे स्थान मिळवण्यासाठी योगदान देणाऱ्या ग्राहकांचे मी आभार मानतो. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य वाहन उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे आणि हे राज्य एचएमएसआयसाठी महत्त्वाच्या  बाजारपेठांपैकी एक आहे. नागपूरमध्ये नवे झोनल ऑफिस सुरू करून पश्चिम भागातील आमची व्याप्ती वाढवण्याचे आणि ग्राहकांना जास्त प्रभावीपणे सेवा देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया – महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा आणि सर्वात लोकप्रिय ब्रँड

बाजारपेठेपेक्षा जास्त वेगाने विकसित होत असलेला होंडा हा ब्रँड महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांसह पश्चिम भागातील सर्वात लोकप्रिय दुचाकी ब्रँड बनला आहे. होंडा महाराष्ट्रातील पहिल्या पसंतीचा ब्रँड असून आज प्रत्येक तिसरा ग्राहक केवळ होंडाची दुचाकी खरेदी करणे पसंत करतो. या प्रगतीशील राज्यात स्कूटरायझेशन घडवून आणल्यानंतर एचएमएसआय आता १२५ सीसी मोटरसायकल क्षेत्रात बाजारपेठेतील ६५ टक्के हिश्श्यासह आघाडीवर असून राज्याच्या एकंदर बाजारपेठेतील कंपनीचा हिस्सा ३५ टक्के आहे.

एयर इंडियातर्फे दिल्ली आणि मुंबई ते दुबई मार्गावरील विमानसेवेत वाढ

●        विमानाच्या वेळा दिवसभरात वेगवेगळ्या

●        ट्विन- आयल बोईंग ७८७ ड्रीमलायनर एयरक्राफ्टवरील विमानसेवांत वाढ

●        विमानसेवांच्या वेळा एयर इंडिया एक्सप्रेस नेटवर्कसह सुसंगत असतील 

नवी दिल्ली२७ एप्रिल २०२३ – एयर इंडियाने दिल्ली आणि मुंबई ते दुबईयुएईपर्यंतच्या नॉन- स्टॉप विमानसेवेत वाढ केली आहे. एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेस यांच्यातील नेटवर्क परस्परांशी सुसंगत करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही वाढ केली जाणार आहे.

सध्याच्या उन्हाळ्याच्या वेळापत्रकात एयर इंडियाने दिल्ली आणि दुबईदरम्यानच विमानसेवा (दोन्ही मार्गांवर) दैनंदिन पातळीवर १० विमानसेवांपर्यंत वाढवली असून त्यात २९ एप्रिल २०२३ पासून सुरू होत असलेल्या नव्या विमानसेवेचाही समावेश आहे. मुंबई आणि दुबईदरम्यान एयर इंडिया ६ दैनंदिन विमानसेवा (दोन्ही मार्गावर) पुरवते. म्हणजेच संपूर्ण आठवड्यात दोन भारतीय शहरांतून दुबईला प्रत्येक मार्गावर एकूण आठ विमानसेवा कार्यरत आहेत.

दुबईपर्यंत आणि दुबईहून निघणाऱ्या विमानसेवेच्या दिवसभरातील ठेवण्यात आल्या असून त्यामुळे एयर इंडियाच्या ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार सकाळ, दुपार आणि संध्याकाळी निघण्याचा पर्याय निवडता येईल.

दुबई विमानसेवेचा विस्तार हा एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेस यांच्यातील नेटवर्कमध्ये परस्परपूरक सुसंगती आणण्याचा भाग असून त्याद्वारे गरजेच्या ठिकाणी विमानसेवेचे प्रमाण वाढवून व्यावसायिकदृष्ट्या लाभदायक मार्गावर पुनरावृत्ती टाळणे हा हेतू आहे.

एयर इंडियातर्फे दिल्ली आणि मुंबईतून दुबईला जाणाऱ्या विमानसेवेसाठी प्रामुख्याने ट्विन- आयल बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर एयरक्राफ्ट (बिझनेस क्लासमध्ये १८ पूर्णपणे- फ्लॅट बेड्स आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीट्स) तैनात करण्यात आले आहे. उर्वरित विमानसेवांसाठी एयरबस A320/321 एयरक्राफ्ट्स वापरले जाणार आहे.

SCHEDULE OF DELHI-DUBAI FLIGHTS SCHEDULE OF DUBAI-DELHI FLIGHTS
Flight #DepartureFrequencyAircraft Flight #DepartureFrequencyAircraft
AI9290640 HRSDailyBoeing 787 AI9960015 HRSDailyBoeing 787
AI9170950 HRSDailyAirbus A320/A321 AI9301010 HRSDailyBoeing 787
AI9151645 HRSDailyBoeing 787 AI9181310 HRSDailyAirbus A320/A321
AI9471910 HRS4x WeeklyAirbus A320/A321 AI9162040 HRSDailyBoeing 787
AI9952030 HRSDailyBoeing 787 AI9482250 HRS4x WeeklyAirbus A320/A321
SCHEDULE OF MUMBAI-DUBAI FLIGHTS SCHEDULE OF DUBAI-MUMBAI FLIGHTS
Flight #DepartureFrequencyAircraft Flight #DepartureFrequencyAircraft 
AI9090825 HRS5x Weekly Boeing 787 AI9101200 HRS5x WeeklyBoeing 787 
AI9191610 HRSDailyAirbus A320/A321 AI9201855 HRSDailyAirbus A320/A321 
AI9832030 HRSDailyBoeing 787 AI9842340 HRSDailyBoeing 787 


*The exact time of departure of some flights may vary on some days of the week

छाती चिरून दाखवली, तर हृदयात राधाकृष्ण विखे; पाटलांनी मुख्यमंत्रीपदापेक्षा पुढे जावे, सत्तारांच्या पोटातले आले ओठावर

अहमदनगर-राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्रीच काय या पदापेक्षा पुढे जावे. माझी छाती चिरून दाखवली, तर माझ्या हृदयात राधाकृष्ण विखे-पाटील दिसतील, अशा शब्दांत कृषीमंत्री अब्दुस सत्तार यांनी स्तुतीसुमने उधळली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारला असता अब्दुल सत्तार यांनी आपल्या शैलीत विधाने केली.

सोयगाव येथे उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.तसेच शिवना ता. सिल्लोड येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा.दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या शेतकरी मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. या निमिताने येथे आलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार माध्यमांशी बोलत होते , तेम्हणले,’ म्हणाले की, कदाचित मी एखादा हनुमान महाराजांसारखा त्यांचा एखादा भक्त असतो, तर छाती चिरून दाखवले असते की, माझ्या ह्रदयात राधाकृष्ण विखे-पाटील आहेत. आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना महसूल मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महसूलमध्येअत्याधुनिक बदल होऊ लागल्याचेही त्यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, मी ही अनेक दिवसांपासून राजकारण करतो आहे. राधाकृष्ण विखे – पाटील मराठा नेते आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा मराठा नेते आहेत. आमचे मार्गदर्श सासूबाई हे सुद्धा मराठे आहेत. हे लोकप्रिय मराठे नेते माझ्या हृदयात आहेत. कोणाला वाटणार नाही, आपल्या मित्र काही तरी व्हावं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पुढे जाऊन यावे. मात्र, ते अडचणीत येतील असे प्रश्न विचारू नका, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्या होत्या. शिवाय अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा नाव समोर आलं होतं.दरम्यान सत्तार हे शिंदे गटाचे नेते असून त्यांनीच असं विधान केल्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना बळ मिळते आहे.

सौर ऊर्जेने कृषी पंप चालविण्याचे ‘मिशन 2025’ शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवेल-विश्वास पाठक

पुणे, 27 एप्रिल 2023 – शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत किमान 30 टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविण्याचे शिंदे फडणवीस सरकारचे ‘मिशन 2025’ शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवेल, असे प्रतिपादन महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ सोमवारी मुंबईत झाला. त्या अंतर्गत ‘मिशन 2025’ पूर्ण करण्यात येणार आहे. या अभियानात सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व भरवशाचा वीजपुरवठा होईल. त्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होईल. राज्यात सध्या ४५ लाख कृषी पंपधारक शेतकरी वीज ग्राहक आहेत.
त्यांनी सांगितले की, या अभियानाच्या अंतर्गत राज्यात सौर ऊर्जेद्वारे 7000 मेगावॅट वीज निर्माण करून कृषी पंपांना पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी राज्यात वीजनिर्मिती क्षेत्रात 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ग्रामीण भागात हजारो रोजगार निर्माण होतील. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन भाड्याने देऊन हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी मिळेल. कृषी क्षेत्राला पाठबळ, उद्योगांना रास्त दरात वीजपुरवठा, ग्रामीण विकास, राज्य सरकारवरील अनुदानाचा बोजा करणे असे या योजनेचे अनेक लाभ आहेत. 
ते म्हणाले की, शेतीसाठी सध्या सरासरी दीड रुपये प्रती युनिटने वीज पुरवठा होत असला तरी ती वीज महावितरणला सरासरी साडे आठ रुपये प्रती युनिट दराने मिळते. दरातील फरक राज्य सरकारचे अनुदान आणि उद्योगांसाठीच्या वीजदरावर लावलेला क्रॉस सबसिडीचा भार यातून भरून काढला जातो. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे तीन रुपये तीस पैसे प्रति युनिट दरापर्यंत मिळणार असल्याने भविष्यात उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन उद्योग व्यवसायांच्या वीज दरात घट होऊ शकेल.
ते म्हणाले की, सध्या तांत्रिक व आर्थिक कारणांमुळे कृषी पंपांना दिवसा आणि रात्री वीज पुरवठा केला जातो. शेतीसाठी दिवसा आठ तास भरवशाचा वीजपुरवठा व्हावा अशी अनेक वर्षांची मागणी आहे. क्रॉस सबसिडीचा भार कमी करून उद्योगांना स्पर्धात्मक दरात वीजपुरवठा करावा अशीही मागणी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात जून 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली होती. योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत केली जाते. योजनेत आतापर्यंत 553 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले असून 230 कृषी फीडर्सवर एक लाख शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.