अहमदनगर-राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्रीच काय या पदापेक्षा पुढे जावे. माझी छाती चिरून दाखवली, तर माझ्या हृदयात राधाकृष्ण विखे-पाटील दिसतील, अशा शब्दांत कृषीमंत्री अब्दुस सत्तार यांनी स्तुतीसुमने उधळली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारला असता अब्दुल सत्तार यांनी आपल्या शैलीत विधाने केली.
सोयगाव येथे उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.तसेच शिवना ता. सिल्लोड येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा.दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या शेतकरी मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. या निमिताने येथे आलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार माध्यमांशी बोलत होते , तेम्हणले,’ म्हणाले की, कदाचित मी एखादा हनुमान महाराजांसारखा त्यांचा एखादा भक्त असतो, तर छाती चिरून दाखवले असते की, माझ्या ह्रदयात राधाकृष्ण विखे-पाटील आहेत. आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना महसूल मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महसूलमध्येअत्याधुनिक बदल होऊ लागल्याचेही त्यांनी सांगितले.
अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, मी ही अनेक दिवसांपासून राजकारण करतो आहे. राधाकृष्ण विखे – पाटील मराठा नेते आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा मराठा नेते आहेत. आमचे मार्गदर्श सासूबाई हे सुद्धा मराठे आहेत. हे लोकप्रिय मराठे नेते माझ्या हृदयात आहेत. कोणाला वाटणार नाही, आपल्या मित्र काही तरी व्हावं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पुढे जाऊन यावे. मात्र, ते अडचणीत येतील असे प्रश्न विचारू नका, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
मागील काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्या होत्या. शिवाय अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा नाव समोर आलं होतं.दरम्यान सत्तार हे शिंदे गटाचे नेते असून त्यांनीच असं विधान केल्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना बळ मिळते आहे.