● विमानाच्या वेळा दिवसभरात वेगवेगळ्या
● ट्विन- आयल बोईंग ७८७ ड्रीमलायनर एयरक्राफ्टवरील विमानसेवांत वाढ
● विमानसेवांच्या वेळा एयर इंडिया एक्सप्रेस नेटवर्कसह सुसंगत असतील
नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२३ – एयर इंडियाने दिल्ली आणि मुंबई ते दुबई, युएईपर्यंतच्या नॉन- स्टॉप विमानसेवेत वाढ केली आहे. एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेस यांच्यातील नेटवर्क परस्परांशी सुसंगत करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही वाढ केली जाणार आहे.
सध्याच्या उन्हाळ्याच्या वेळापत्रकात एयर इंडियाने दिल्ली आणि दुबईदरम्यानच विमानसेवा (दोन्ही मार्गांवर) दैनंदिन पातळीवर १० विमानसेवांपर्यंत वाढवली असून त्यात २९ एप्रिल २०२३ पासून सुरू होत असलेल्या नव्या विमानसेवेचाही समावेश आहे. मुंबई आणि दुबईदरम्यान एयर इंडिया ६ दैनंदिन विमानसेवा (दोन्ही मार्गावर) पुरवते. म्हणजेच संपूर्ण आठवड्यात दोन भारतीय शहरांतून दुबईला प्रत्येक मार्गावर एकूण आठ विमानसेवा कार्यरत आहेत.
दुबईपर्यंत आणि दुबईहून निघणाऱ्या विमानसेवेच्या दिवसभरातील ठेवण्यात आल्या असून त्यामुळे एयर इंडियाच्या ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार सकाळ, दुपार आणि संध्याकाळी निघण्याचा पर्याय निवडता येईल.
दुबई विमानसेवेचा विस्तार हा एयर इंडिया आणि एयर इंडिया एक्सप्रेस यांच्यातील नेटवर्कमध्ये परस्परपूरक सुसंगती आणण्याचा भाग असून त्याद्वारे गरजेच्या ठिकाणी विमानसेवेचे प्रमाण वाढवून व्यावसायिकदृष्ट्या लाभदायक मार्गावर पुनरावृत्ती टाळणे हा हेतू आहे.
एयर इंडियातर्फे दिल्ली आणि मुंबईतून दुबईला जाणाऱ्या विमानसेवेसाठी प्रामुख्याने ट्विन- आयल बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर एयरक्राफ्ट (बिझनेस क्लासमध्ये १८ पूर्णपणे- फ्लॅट बेड्स आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीट्स) तैनात करण्यात आले आहे. उर्वरित विमानसेवांसाठी एयरबस A320/321 एयरक्राफ्ट्स वापरले जाणार आहे.
SCHEDULE OF DELHI-DUBAI FLIGHTS | SCHEDULE OF DUBAI-DELHI FLIGHTS | |||||||
Flight # | Departure | Frequency | Aircraft | Flight # | Departure | Frequency | Aircraft | |
AI929 | 0640 HRS | Daily | Boeing 787 | AI996 | 0015 HRS | Daily | Boeing 787 | |
AI917 | 0950 HRS | Daily | Airbus A320/A321 | AI930 | 1010 HRS | Daily | Boeing 787 | |
AI915 | 1645 HRS | Daily | Boeing 787 | AI918 | 1310 HRS | Daily | Airbus A320/A321 | |
AI947 | 1910 HRS | 4x Weekly | Airbus A320/A321 | AI916 | 2040 HRS | Daily | Boeing 787 | |
AI995 | 2030 HRS | Daily | Boeing 787 | AI948 | 2250 HRS | 4x Weekly | Airbus A320/A321 |
SCHEDULE OF MUMBAI-DUBAI FLIGHTS | SCHEDULE OF DUBAI-MUMBAI FLIGHTS | ||||||||
Flight # | Departure | Frequency | Aircraft | Flight # | Departure | Frequency | Aircraft | ||
AI909 | 0825 HRS | 5x Weekly | Boeing 787 | AI910 | 1200 HRS | 5x Weekly | Boeing 787 | ||
AI919 | 1610 HRS | Daily | Airbus A320/A321 | AI920 | 1855 HRS | Daily | Airbus A320/A321 | ||
AI983 | 2030 HRS | Daily | Boeing 787 | AI984 | 2340 HRS | Daily | Boeing 787 |
*The exact time of departure of some flights may vary on some days of the week