Home Blog Page 1566

उन्हाळ्यात जनावरांची देखभाल

राज्यासह अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होतो. सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे वातावरण बदलेले आहे.परंतु दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात उन्हामध्ये  चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील उष्णता शोषली जाते.शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते व  शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन ताण येतो. जनावरांचे शारिरीक तापमान (१०३ ते ११०अंश फॅरन्हाईट) वाढू शकते .

जनावरांच्या उष्माघाताची कारणे  

  • अति तापमान, आर्द्रता, अतिरिक्त स्नायू काम.
  •  मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारी जड कामे.
  • उन्हात अतिरिक्त काम, पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे किंवा पुरेसे न मिळणे.
  • उपाशी जनावरांकडून कामे करून घेणे.
  • बैलगाडीसह उन्हात उभे ठेवणे, बैलांवरील ओझे कमी न करता त्यांना उन्हात उभे ठेवणे, बांधणे.
  • गोठ्यांचे नियोजन व्यवस्थित नसणे, खेळत्या हवेचा अभाव, कोंदटपणा, पत्र्याचे छत.
  • दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे.
  • सूर्यप्रकाश सरळ गोठ्यात शिरणे.
  • गाई, म्हशींना भर उन्हात रानात चरायला नेणे. चरून आल्यावर मुबलक पिण्याचे पाणी न मिळणे.
  • भर उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओतणे.

उष्माघाताची लक्षणे

  • वाढलेले शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानाईट ) हे उष्माघाताचे प्रथम लक्षण आहे.
  • जनावराच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनाचा वेग वाढतो व धापा टाकते, तोंडावाटे श्वास घेतो.
  • त्वचा कोरडी व गरम पडते.
  • खुराक, चारा खाणे कमी अथवा बंद करते.
  • सुरवातीला अतिरिक्त घाम व तोंडातून सतत लाळ गळते.
  • जनावरास तहान लागते, जनावर हे पाण्याच्या स्त्रोताकडे जाते, पाण्यामध्ये बसण्याचा किंवा पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करते.
  • जसजशी शारीरिक तापमानात (१०७ अंश फॅरन्हाईट) वाढ होते, तसतसे जनावर धाप टाकते. अशा अवस्थेत कोसळून खाली पडणे, ग्लानी येणे.
  • घाम गेल्यामुळे, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे असंतुलन होऊन अशक्तपणा येतो.
  • सोडियमची कमतरता झाल्यास जनावरांमध्ये पाणी पिण्याची इच्छा मरते. पाण्याची कमतरता निर्माण होते.
  • तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे पोटदुखीची लक्षणे दिसतात. प्रामुख्याने उठबस कारणे, पाय झाडणे, थेंब थेंब लघवी करणे, घट्ट शेण टाकणे ही लक्षणे दिसून येतात.

उपचार

  • जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असतांना चरण्यास सोडावे.
  • हवामानपुरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची ऊंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.
  • छप्पराला शक्यतो पांढरा चुना/ रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा/ तुराट्या/ पाचट टाकावे, ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल.
  • बर्फाचे खडे हे चघळावयास द्यावेत. त्याचप्रमाणे ते अंगावर, डोक्यावर फिरवावेत
  • परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत, मुक्त संचार गोठयाचा अवलंब करावा.
  • गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा.
  • दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाने, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील.
  • जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.
  • बैलाकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. त्यांना पिण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा.
  • उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे शक्यतो गारवा असलेल्या भागात त्यांना चारा टाकावा.
  • म्हशीच्या कातडीचा काळारंग व घामग्रंथींच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गाईपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी,
  • योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळवणे शक्य आहे.
  • पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत.

चारा व पाण्याचे व्यवस्थापन

  • जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून ३ ते ४ वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर ३० टक्के वाया जातो.
  • हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे.
  • वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात.
  • अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे

प्रतिबंधात्मक उपाय

  • भर उन्हामध्ये जनावरांना चालवण्याचे टाळावे.
  • दुपारच्या वेळी उष्णतामान जास्त असते. जनावरांद्वारे अतिरिक्त स्नायूकाम करून घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम हा त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रण क्षमतेवर होतो.
  • सकाळचा खुराक न देता उपाशीपोटी जड कामे करून घेतल्यास उष्माघाताची शक्यता दाट असते.
  • जनावरांचा गोठा हा सुद्धा उष्माघात, ताण तणाव याचा एक प्रमुख घटक आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करून वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • छताच्या पत्र्यांवर शेतातील तुराट्या, पराट्या, कडबा किंवा इतर वनस्पतींचा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यात तापमान कमी होते.
  • जनावरांच्या शरीरावर दिवसातून २ ते ३ वेळ थंड पाणी फवारावे.
  • गोठ्यांमध्ये हवा खेळती राहावी यासाठी पंखा, कूलरची सोय करावी.
  • दुपारच्यावेळी वातावरणातील उष्णतेच्या झळा लागू नये म्हणून गोठ्यामध्ये पाण्याने ओले केलेले गोणपाटाची पडदे लावावीत. यामुळे गोठ्यातील वातावरण थंड राहील.
  • माजावर असलेल्या गाई, म्हशींना सकाळी, सायंकाळच्या वेळी कृत्रीम रेतन करावे.
  • दूध देणाऱ्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास त्यावरील शारीरिक ताण हा कमी होतो.दूध  उत्पादनात वाढ होते.

लेखकः- डॉ .कोमल महेश बेंद्रे,                     

पशुधन विकास अधिकारी ,

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय,अकोला.

(संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.)

अविनाश नारकर यांच्या आवाजात ‘झोंबी: एक बाल्य हरवले बालकांड’ आणि इतर मजेदार गोष्टी 

आपल्याला पुल देशपांडेंबद्दल माहिती आहे, त्यांच्याविषयी प्रेम, आवड आणि आस्था आहे. कोट्याधीश पुल म्हणून ते प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या शाब्दिक विनोद आणि त्यांच्या अनेक कोट्या या प्रसिद्ध आहेत. साधारण एप्रिल महिना हा सुट्ट्यांचा असतो, मोकळा असतो आणि सांस्कृतिक वातावरणदेखील सुरु झालेले असेते. एप्रिल मे मध्ये अनेक उपक्रम होत असतात. त्यातूनच संपूर्ण महिनाभर चालेल असा उपक्रम करावा करण्याचे ‘स्टोरीटेल’ने ठरविले. त्यानुसार ‘एप्रिल पुल’ ही संकल्पना राबवली जात आहे.

पुल देशपांडे हे अख्या विश्वातील मराठी रसिकांचे लाडके व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या साहित्याने अबालवृद्धांना वेड लावलेलं आहे. सहज सध्या प्रसंगांतून, व्यक्तिचित्रांतून विनोद निर्मिती करून पुलंनी सर्वांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांच्या अनेक लोकप्रिय कथा मातब्बर नामवंत कलावंतांच्या आवाजात स्टोरिटेलवर ऐकताना रसिकांना खळखळून हास्यानंद मिळत आहे. ‘एप्रिल पुल’ या संकल्पनेला रसिकांनाच भन्नाट प्रतिसाद लाभत असून दर काही दिवसानी प्रकाशित होणारे नवे ‘ऑडिओ बुक्स’ ऐकण्यासाठी त्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे जाणवत आहे.

‘एप्रिल पुल’ मध्ये स्टोरीटेलने रिलीज केलेल्या ऑडिओ बुक्समध्ये ‘गुण गाईन आवडी’, ‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘खिल्ली’, ‘उरलं सुरलं’, ‘चार शब्द’, पूर्वारंग या पुस्तकांचा समावेश आहे. लोकप्रिय जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अविनाश नारकर, अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, आस्ताद काळे, सौरभ गोगटे, नचिकेत देवस्थळी, संदीप खरे यांनी पुलंच्या लोकप्रिय साहित्यकृतींना आपल्या आवाजाचा नवा साज स्टोरिटेल मराठीचे व्यासपीठ निवडले आहे. या दिग्गजांच्या आवाजात पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांतील कथांचे तीसहून अधिक ‘ऑडिओ बुक्स’ स्टोरिटेल रिलीज करीत आहे. येत्या आठवड्यात अभिनेते अविनाश नारकर यांच्या आवाजात ‘चार शब्द’ मधील ‘झोंबी: एक बाल्य हरवले बालकांड’, त्यासोबतच ‘पूर्वारंग’ मधील कथा ऐकता येणार आहेत.

एप्रिल पुल मधील ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी

https://www.storytel.com/in/en/authors/53909-Pu-La-Deshpande

https://www.storytel.com/in/en/books/char-shabd-zombi-2379325

https://www.storytel.com/in/en/books/char-shabd-mama-aani-tyanchi-gajali-2379398

शालेय शिक्षण विभागाकडून दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी कार्यशाळेचे आयोजन

पुणे: शालेय शिक्षण विभागाच्यावतीने स्टार व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोणावळा येथील द अॅम्बी व्हॅली सिटी येथे २८ व २९ एप्रिल रोजी दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे शालेय उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यशाळेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील मनपाचे आयुक्त, जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षण विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आदी अधिकारी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे व डॉ. नेहा बेलसरे घेणार आहेत. प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापनाचे शास्त्र या विषयावर क्वेस्ट या सामाजिक संस्थेचे निलेश निमकर उपस्थितांशी संवाद साधतील. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलास पगारे हे ‘निपुण भारत’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. दुपारच्या सत्रात यवतमाळ, सिंधुदूर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील उत्तम शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर मुक्त चर्चासत्रे होतील.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे हे स्टार प्रकल्प समग्र शिक्षेशी संबंधित प्रकल्प, ‘पीएमश्री शाळा’ या विषयावरील सादरीकरण करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण व भाषा गणिताची स्थिती या विषयावर तसेच बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील हे बालभारतीशी संबधित विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने शाळा समूह या विषयावर सादरीकरण करणार आहे. योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर नवभारत साक्षरता अभियान या विषयावर सादरीकरण करणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका या विषयावर शिक्षण आयुक्त श्री. मांढरे व एससीईआरटीचे संचालक श्री. दिवेगावकर हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात आदर्श शाळांची सद्यस्थिती यावर चर्चा होणार असून शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, योजना शिक्षण संचालक, बालभारतीचे संचालक, राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासह राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, मनपा व नगरपरिषदेचे शिक्षण प्रमुख, प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातील अधिकारी वर्ग आदी अधिकारी या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी दिली आहे.

केनिया संघाला दुहेरी मुकुट

सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा : भारत उपविजेता

रोलबॉल खेळाचा ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.

पुणे : केनिया संघाने भारताला अंतिम लढतीत पराभूत करताना सहाव्या विश्वकरडंक रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मागील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत केनियाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते. यास्पर्धेत मात्र केनियाने भारतावर विजय मिळविताना पराभवाची परतफेड केली.

म्हाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने भारताला ७-४ असे पराभूत केले. मध्यंतराला केनिया संघ ४-२ अशी २ गोलची आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफिंसने ३ (१.२५, २३.२५ व २४.००), बोनफेसने २ (२१.०० व २२.००) तर मोझेसने (१०.३६) व ब्रीयान (१२.२८) यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून सचिन सैनीने २ (२२.४० व ३८.२०), आदित्य सुतार (५.०८) व आकाश गणेशवाडे (११.२०) यांनी प्रत्येकी १ गोल केला.

पुरुष गटाचे विजेत्यांचे पुरस्कार वितरण उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्याचे माजी महापौर आणि भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राज्य भाजपाचे चिटणीस धीरज घाटे, भारतीय रोलबॉल संघटनेचे चेयरमन सुर्यकांत काकडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, उपाध्यक्ष मनोज यादव, सचिव चेतन भांडवलकर, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रोलबॉल खेळाचा ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले
पुण्यात जन्मेलेला रोलबॉल हा खेळ सध्या ५० पेक्षा जास्त देशात खेळला जात आहे. असे असून देखील या खेळाचा समावेश ऑलिम्पिक व आशियाई क्रीडा स्पर्धेत झालेला नाही, मात्र, या खेळाला या दोन्ही प्रतिष्ठीत स्पर्धामध्ये सहभागी होता यावे, यासाठी आम्ही सर्वजन प्रयत्नशील असल्याचे, सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात केनिया संघाने विजेतेपद पटकावले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.

२१ एप्रिल पासून या विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडीयम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटना, भारतीय रोलबॉल संघटना व महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुषांचे २३ व महिलांचे ११ असे २७ संघ सहभागी झाले होते. रोलबॉल सोबत जोडले गेल्याने निश्चितच आनंद होत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ यानुसार रोलबॉल खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आगामी वर्षात हा भारतातील खेळ निश्चित जगावर आपली छाप सोडेल, असा विश्वास देखील यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील रोलबॉल खेळासोबत जोडले गेल्याने विश्वकरंडकासारखी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करता आले. भारतीय खेळाडूना आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबत खेळण्याचा आनंद घेता आला. तसेच यावेळी १७ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने आलेले भारतातील खेळाडूंना देखील भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पहाता आला, असे सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेचे संयोजन समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी बोलताना सांगितले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत सेनेगल संघाने लॅटव्हिया संघाला ८-५ असे पराभूत केले. मध्यंतराला सेनेगल संघाने ५-० अशी आघाडी घेतली होती. सेनेगल संघाकडून क्रिस्ट रोबर्टने ६ (१.२८, २.००, ५.३५, ६.००, २६.१०, २७.००) तर मौहामेट व खादीम यांनी प्रत्येकी एक गोल केला. लॅटव्हिया संघाकडून इगोरस सोकोव्ह्जने ४ (१६.०२,१६.१२, २०.००, २०.४८ ) तर व्हिस्टरुउस सिमेरमणीसने एक गोल केला.

तत्पूर्वी पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने सेनेगलला १०-७ असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ५-३ अशी दोन गोलची आघाडी घेतली होती. भारताकडून आकाश गणेशवाडेने ३ (९.३२, ३१.४७, ४०.००), मिहीर साने (९.३२ व ३१.१०) व सचिन सैनी (१४.४०, ३६.३८) यांनी प्रत्येकी २ तर श्रीकांत साहू (४२.११) आदित्य सुतार (७.१४) व हर्षल घुगे (२४.०२) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सेनेगल संघाकडून मौहामेटने तब्बल सहा (१३.५२, १९.०२, १९.४५, २७.४८, ३४.३० व ४८.४३) गोल मारले. मामाडौऊ अलिओने (४३.५९) एक गोल केला.

पुरुष गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत केनिया संघाने लॅटव्हिया संघाला १४-१ असे पराभूत केले. मध्यंतराला केनियाने ९-१ अशी विजयी आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफिंसने ६ (२१.३४, २३.४२, २४.१९, २५.३४, २७.२०, ३१.३३), जोशुआ ओयांगोने ३ (८.४६, १५.१३, १९.४२), जोशुआ चोटीने २ (१३.५४, २२.५४), तर मोजेस (२८.४३), जेम्स म्वंगी (३०.१२) व बोनफेस (०.५९) यांनी प्रत्येकी एक गोल केला. लॅटव्हियाकडून व्हिस्टरुउस सिमेरमणीसने (१९.१७) एक गोल केला.

स्वाधार योजनेचे ५ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

पुणे दि.२६-समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाने २४ तास काम करून १ हजार २३२ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या ५ कोटी रुपयांचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. यासाठीची देयके कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत.

गेले २४ तासांमध्ये १ हजार २३२ व त्याआधी १३६ असे १ हजार ३६८ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे स्वतः रात्री उशिरापर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे येथे उपस्थित होते. पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या नियंत्रणाखाली पुणे विभागातील सहाय्यक आयुक्त पुणे, सातारा ,सोलापूर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुणे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे अर्ज तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले होते. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ३ हजार अर्जांची तपासणी करण्यात आली आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे-विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणतेही अडचण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध आहे. राज्यासाठी नुकताच रुपये १५ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी पुणे जिल्ह्यासाठी रुपये ५ कोटी देण्यात आले असून त्यातून १ हजार ३६८ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. उर्वरित निधीची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातील कामकाज आणि जपान अभ्यास दौऱ्याच्या अहवालाचे प्रकाशन

मुंबई, ता. २६ : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ मध्ये झालेल्या “अर्थसंकल्पीय अधिवेशन” काळात उपसभापती ना. डॉ. गोऱ्हे यांनी विधान परिषदेत केलेल्या कामकाज अहवालाचे आणि ११ ते २१ एप्रिल २०२३ दरम्यान झालेल्या ‘जपान अभ्यास दौऱ्या’ त तेथील पर्यटन, सामाजिक विकास, उद्योग संधी याविषयी केलेल्या कामकाजाच्या अहवालाचेही मातोश्रीवर आज प्रकाशन करण्यात आले.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘या दोन्ही अहवालांचे प्रकाशन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होत आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आपल्यामुळेच जपानला जाण्याची संधी मिळाली असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी आवर्जून सांगितले. जुलै २०२३ मध्ये होणाऱ्या विधी मंडळाच्या अधिवेशनासाठी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना निमंत्रित केले. यावेळी श्री. उद्धवजी ठाकरे यांनी पुढील कार्यासाठी डॉ.गोऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी आ. दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना पदाधिकारी भाऊ कोरगावकर, रवी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांचे आदेश

पुणे,दि.२६ : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी १५ हजार घरकुलांसाठी मंजुरी देण्यात आली असून उर्वरित कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या ५ हजार अर्जांच्या कागदपत्रांची पूर्तता तातडीने करुन कार्यादेश देण्यात यावेत, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहूल महिवाल, सहआयुक्त स्नेहल बर्गे, माजी आमदार बाळासाहेब भेगडे, बाळासाहेब घोटकुले उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष घरकुल बांधकाम सुरु केलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण फार कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक प्रतिनिधी नियुक्त करावा. त्या प्रतिनिधीने त्या तालुक्यातील कामावर लक्ष दिल्यास कामे लवकर होऊन लाभार्थींना वेळेत लाभ मिळेल.असेही ते म्हणाले. नियुक्त संस्था काम करत नसतील तर त्यांच्याकडून कामे काढून घ्यावीत. कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी यंत्रणा वाढवून घरकुलांच्या कामाला गती द्यावी. याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाचा प्रगती अहवाल सादर केला व सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.
000000

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास ३० मे पर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. २६: राज्याच्या युवा धोरणाअंतर्गत देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार अंतर्गत २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षाच्या पुरस्काराकरीता जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणारे युवक, युवती व संस्था यांना अर्ज करण्यासाठी ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी कळविले आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही ३१ मार्च रोजी ३५ वर्षापर्यंत असावी. जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव असावे. पुरस्कार हा विभागून दिला जाणार नाही किंवा मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. पुरस्कारार्थीच्या कार्याचे सबळ पुरावे आवश्यक असून पुरस्कार दिल्यानंतर दोन वर्ष क्रियाशील राहणे आवश्यक आहे. संस्था पुरस्कारासाठी संस्था नोंदणीकृत आणि किमान पाच वर्ष कार्यरत असावी. संस्थेने स्वयंस्फूर्तीने कार्य केलेले असावे.

पुरस्काराच्या मूल्यांकनासाठी युवा अथवा नोंदणीकृत संस्थाचे ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य विचारात घेतले जाईल. राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य असावे. समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, जनजाती व आदिवासी भागात कार्य केलेले असावे. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रृण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मेस प्रोत्साहन देणारे, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपटी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवांच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य, साहसबाबतचे कार्य आदी क्षेत्रातील कार्य असावे.

पुरस्काराचे स्वरुप युवक व युवतींसाठी गौरवपत्र, सन्मानपत्र व प्रती सदस्य १० हजार रुपये व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मान चिन्ह रक्कम ५० हजार रुपये असे आहे.

उमेदवारांनी मुलाखती व कार्याची पीपीटीद्वारे सादरीकरण केलेल्या कामाची सीडी व इतर सबळ पुरावे पृष्ठांकन करुन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत. अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, स.नं १९१, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर, येरवडा पुणे- ४११००६ येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जाच्या विहित नमुन्यासाठी व अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२९३१११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

काढा ते अनधिकृत जाहिरात फलक,वायरींचे जाळे-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून हिंजवडी गावातील सुविधांचा आढावा

पुणे,दि.२६ : हिंजवडी गावातील कस्तुरी चौक, वाकड उड्डाणपूलाजवळील वाढते वायरचे जाळे तसेच लावण्यात आलेले जाहिरात फलक याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहूल महिवाल, हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल सी.एस. भोगल, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या भागातील अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात यावेत. आवश्यकता भासल्यास फलक काढताना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी. सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करुन एमआयडीसीने संपूर्ण खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्यास संबंधितांना नोटीस बजवावी. एमआयडीसी हिंजवडी मध्ये बांधण्यात आलेला नवीन उड्डाणपूल वाहतूकीस लवकरात लवकर सुरु होईल याचे नियोजन करावे. खाजगी एजन्सीच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी कचऱ्याची समस्या, वाकड चौकातील वाहतुकीची समस्या, सर्कल- नांदेड रोड, माण रोड, आदीबाबतही आढावा घेण्यात आला.

पुरस्कारामुळे या पुढील काळात काम करण्यास बळ मिळेल–आशा खाडिलकर

पुणे:ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे आणि पं. जीतेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्षांनामुळे संगीतनाटक क्षेत्रात नाट्यपदे सादर करण्याची संधी मिळाली हा माझासाठी आशीर्वाद आहे. तसेच मा. दीनानाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिळालेल्या ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर पुरस्कारा’ने या पुढील काळात काम करण्यास बळ मिळाले आहे अशी भावना ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांनी व्यक्त केली. दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील स .प . महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सिनेसंगीत अभ्यासक सुलभा तेरणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जुन्या रेकॉर्डचे संग्राहक आणि संगीत नाटकांचे अभ्यासक राजेंद्र ठाकूरदेसाई, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल आणि स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे व्यासपीठावर उपस्थीत होते. या कार्यक्रमात ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर’ पुरस्कार गायिका आशा खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह,अकरा हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 या पुरस्कारामुळे नक्कीच आनंद झाला आहे असे सांगून त्या म्हणाल्या, ‘हा पुरस्कार म्हणजे शाबासकी आहे. मी अजूनही विध्यार्थिनी आहे आणि या पुढील काळातही शिकत राहणार आहे. हा पुरस्कार माझे आई-वडील,गुरुजन आणि रसिक यांच्यामुळे मिळाला आहे. त्यामुळे कै.पं. वसंतराव देशपांडे यांच्या चरणी अर्पण करते. पं. वसंतराव देशपांडे यांच्या बरोबर काम करण्याची आणि बालगंधर्व यांच्या रचना सादर करण्याची संधी मिळाली, तसेच मा. दीनानाथ यांच्या रचना देखील गाता आल्या. पं. वसंतरावांनी माझा कडून नाट्यपदे तयार करून घेतली आणि पं. अभिषेकीबुवा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पाच संगीत नाटकांचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली असे त्या म्हणाल्या’. रसिकांच्या आग्रहसत्व ‘शतजन्म शोधिताना’ हे नाट्यपद टाळ्यांच्या गजरात त्यांनी सादर केले.

 सिने संगीताच्या अभ्यासक सुलभा तेरणीकर याप्रसंगी म्हणाल्या कि, ‘संगीत कलेवर प्रेम करणाऱ्या गायिकेचा   या पुरस्काराने गौरव झाला आहे. नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीताची वाट अवघड आहे तरी देखील संगीत रंगभूमीची सेवा आशा खाडिलकर यांनी मनापासून केली आहे.’

पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ आता मागे पडला असला तरी  आजच्या काळातही नाट्यसंगीत आपलेसे वाटते. हा वारसा पुढे नेण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनीही महत्वपूर्ण योगदान दिले आहे’. आशा खाडिलकर यांनी पुण्यात लवकरच नाट्य-संगीताचा कार्यक्रम करावा अशी विनंती त्यांनी केली.

‘स्वरप्रतिभा’चे संपादक आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे म्हणाले की, ‘संगीताला समर्पित स्वरप्रतिभा दिवाळी अंक २० वर्ष पूर्ण करीत असून, आतापर्यंत दीनानाथ मंगेशकर,लता मंगेशकर यांच्यावरील तीन अंक, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुमन कल्याणपूर, गीतरामायण अंक तीन वेळापुनर्मुद्रित करावे लागले. महाराष्ट्रात सर्वत्र या अंकांचे स्वागत करण्यात आले.’ लवकरच पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील  विशेषांकाचे प्रकाशन करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

प्रारंभी युवा गायिका तन्मयी मेहेंदळे यांनी राग बागेश्री मधील ‘याद करो ध्यान, धरो माता सरस्वती’ ही मध्य तीनतालातील बंदिश सादर केली. आशा खाडिलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नीलिमा बोरवणकर यांनी सूत्रसंचालन केले, टीम स्वरप्रतिभाच्या वतीने श्रुती तिवारी यांनी आभार मानले.

यानंतर सुलभा तेरणीकर आणि राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी ‘मा. दीनानाथ जीवन आणि संगीत – वसा आणि वारसा’ हा श्राव्य कार्यक्रम सादर केला. मा. दीनानाथ चरित्र आणि त्यांची कन्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी सांगितलेल्या आठवणी सुलभा तेरणीकर यांनी सांगीतल्या. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी मा. दीनानाथ यांच्या नाटक आणि संगीताबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन केले.दीनानाथ यांचे सुपुत्र आणि सुकन्या यांनी पुढे नेलेल्या संगीत वारश्याबद्दल आणि संगीताबद्दलही विवेचन केले. मानापमान, रणदुंदुभी ,भावबंधन, संन्यस्तखड्ग अशी संगीत नाटके आणि पं. हृदयनाथ तसेच मीना मंगेशकर खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या रचना त्यांनीऐकवल्या. मंगेशकरी संगीत  निरूपणासह ऐकवण्यात आले. रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती आणि उत्तम दादही दिली.

सिगारेटचे बॉक्स चोरणाऱ्या राजस्थानच्या टोळीला पकडले

पुणे-किराणा मालांचे दुकान फोडून विक्रीसाठी प्रतिबंधित नसलेल्या सिगारेटचे बॉक्स चोरणार्‍या एका आंतरराज्य टोळीला पुणे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून चार लाख दहा हजारांचा ऐवज जप्त केला आहे. चोरलेल्या सिगारेटचे बॉक्स कमी किंमतीत विकून चोरटे पैसे मिळवित असल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी येथे दिली आहे.

पुण्यात १० घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार बुधाराम बियाराम चौधरी (वय -४५ रा.वडगाव शेरी, पुणे, मुळ-रा. राणी वाल, ता. जितारण, जि. पोली, राजस्थान) ; रामलाल ढगळाराम चौधरी वय २९ आणि महाविर बगदाराम मेघवंशी (वय -१९ दोघेही रा.दत्तवाडी, पुणे,मूळ-राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.पुण्यातील नानापेठमधील जय अंबे ट्रेडर्स किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी पाच लाख दहा हजारांची सिगारेट पाकिटे चोरुन नुकतीच नेली होती. युनीट एककडून याबाबत आरोपींचा शोध सुरु होता. तांत्रिक विश्लेषणाव्दारे तीन जण रिक्षातून प्रवास करीत वडगाव शेरीत उतरल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार पोलीस अंमलदार आण्णा माने, अमोल पवार यांना आरोपींची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी बुधारामला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने नाना पेठेतील दुकानातून सिगारेटची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनाही पथकाने अटक केली.पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी बुधारामने मंडईतील दुकानातूनही सिगारेट चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वी विश्रामबाग, कोंढवा, समर्थ,हडपसर परिसरात घरफोडी, चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद, एपीआय आषिश कवठेकर, उपनिरीक्षक अजय जाधव, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी,इम्रान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई,दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, अय्याज दड्डीकर, अभिनव लडकत,राहुल मखरे,शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाकडून जागा मालकाची 15 कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

पुणे-जॉईंट वेंचर करारनाम्याचे उल्लंघन करून मिळकतीच्या करारनाम्यात फेरबदल करून जागा मालकाची बांधकाम व्यवसायिकडून 15 कोटीची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर शेषमल पोरवाल ( वय-60) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी विकास नेमचंद छाजेड (वय -38, रा.निगडी ,पुणे) यावर गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 1/4/2023 ते 1/10/22 या दरम्यान घडला आहे.

यातील तक्रारदार व आरोपी यांचेमध्ये झालेल्या जॉईन्ट व्हेंचर करारनाम्यानुसार 18 महिन्यांचे आतमध्ये तक्रारदार यांना ठरलेल्या प्रमाणे कोणताही मोबदला न देता, करारामध्ये ठरल्याप्रमाणे विलंबाबाबत व्याज दिले नाही. तसेच इतर जागामालक छाया पोपटलाल गांधी आणि सुरेश अशोक गांधी व अबिदा लतिफ मुलाणी यांचेकडुन तक्रारदार यांनी घेतलेल्या एकुण क्षेत्र 05.85 आर या मिळकतीचे नकाशे मंजुर करुन घेतले.

आरोपीने त्याचे तक्रारदार यांचेकडुन रजिस्टर अधिकार न घेता, संबंधित मिळकतीच्या एफएसआयचे विकसनाकरीता असलेल्या जागेमध्ये, मंजुर बांधकाम नकाशा प्रमाणे बांधकाम न करता, स्वतःहुन प्लॅन बदलुन संपुर्ण ईमारतीमध्ये फर्निचर केले. सदरची मिळकत ही तक्रारदार यांच्या परस्पर लिव्ह इट या कंपनी बरोबर करारनामा करुन तक्रारदार यांची फसवणूक करुन तक्रारदार व आरोपी यांनी त्याठिकाणी घेतलेली इतर मिळकत ही ठरलेल्या अटि व शर्तीप्रमाणे अग्रीमेंट करुन घेणे गरजेचे असताना आरोपी यांनी आजपर्यंत त्या करीता होकर किंवा नकार देणे क्रमप्राप्त असताना सुध्दा त्याबाबत कोणताही निर्णय न देता सुमारे 25 हजार ते 30 हजार स्वेअर फूटचे बांधकाम तक्रारदार यांना करता येत नसल्याने आरोपी यांनी तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन त्या मिळकती पासून चांगला आर्थिक फायदा होईल असे प्रलोभन दाखवले.

अशाप्रकारे तक्रारदार यांची सर्व बाजूने आर्थिक नुकसान व फसवणूक करुन सुमारे 15 कोटी रुपयाची फसवणूक केली आहे.याबाबत पुढील तपास सहा्यक पोलिस निरीक्षक एस.कांबळे पुढील तपास करत आहे.

महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील प्रलंबित कामांचा आढावा बैठक राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अस्तित्वात असलेले रस्ते दुरुस्तीसाठी वन विभागाने परवानगी विचारू नये अशा सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मंजूर केलेल्या कामांच्या लवकरात लवकर निविदा काढाव्यात, पार्किंगला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी नगरपरिषदेने शंभर वाहतूक वॉर्डन पूर्वावेत, पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवित, साबणे रस्त्याचे काम नियोजन प्रमाणे गटार ते गटार करण्यात यावे अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीमध्ये वेण्णा लेक परिसर विकास, पार्किंग, तसेच सुशोभीकरण या विषयी ही चर्चा करण्यात आली.

पुणे परिमंडलात ६.६० लाखांवर वीजग्राहकांकडे १३३ कोटींची थकबाकी

पुणे, दि. २६ एप्रिल २०२३: पुणे परिमंडलातील ६ लाख ६० हजार ५२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १३३ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु आहे. यात २२०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण २ लाख ८८ हजार २३६ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ९ हजार ७७१ ग्राहकांकडे ३५ कोटी ३७ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार १०५ ग्राहकांकडे १० कोटी २१ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ९४९ ग्राहकांकडे ५ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ हजार ५१८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ३८ हजार ४६६ वीजग्राहकांकडे ३५ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख १६ हजार ९२६ ग्राहकांकडे १९ कोटी १२ लाख रुपये, वाणिज्यिक १७ हजार ६६५ ग्राहकांकडे ७ कोटी ७८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ८७५ ग्राहकांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४५७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ३३ हजार ८२५ वीजग्राहकांकडे ५१ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ९ हजार ७७१ ग्राहकांकडे ३५ कोटी ३७ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार १०५ ग्राहकांकडे १० कोटी २१ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ९४९ ग्राहकांकडे ५ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर २२५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

उबरने पुण्यासह भारतातील आणखी सहा शहरांमध्ये ‘रिझर्व्ह’चा विस्तार केला

·         रिझर्व्ह मुळे १३ शहरांमध्ये ३० मिनिटे ते ९० दिवस अगोदर खात्रीपूर्वक राइड प्री-बुकिंग शक्य

·         रोख पेमेंटद्वारे रिझर्व्ह इंटरसिटी, रेनटल्स किंवा उबर प्रीमियर राइड्स उपलब्ध

पुणे- २६ एप्रिल २०२३: रायडर्सना ३० मिनिटांपासून ते ९० दिवसांपर्यंत त्यांच्या राइड्सचे प्री-बुकिंग करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत उबरने आज भारतातील आणखी ६ शहरांमध्ये रिझर्व्हचा विस्तार करण्याची घोषणा केली. विश्वसनीय, आगाऊ नोंदणी केलेल्या राइड्ससह उबर रिझर्व्ह आता रायडर्सना कॅश पेमेंटसाठी उपलब्ध असेल. ही सेवा आता मुंबई, बंगलोर, दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, पुणे, हैदराबाद, कोची, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, लखनौ आणि गुवाहाटी या भारतातील १३ शहरांमध्ये सुरू आहे.

बाजारपेठेतील गरजांना अनुकूल अशा नवनवीन जागतिक योजना सादर करत रिझर्व्ह सेवेचा विस्तार उबरची भारताप्रती असलेली बांधिलकी दर्शवितो. ऑन-डिमांड ट्रिपच्या जोडीला रिझर्व्ह पर्यायासह, ड्रायव्हर्स त्यांच्या रस्त्यावरील वेळेसाठी सर्वात योग्य असलेल्या ऑफरमधून निवड करू शकतात. उबर रिझर्व्ह ड्रायव्हर्सना त्यांची मिळकत आणि ड्रायव्हिंग वेळापत्रक अगोदर निश्चित करण्यात मदत करण्यासाठी ७ दिवस अगोदर पर्यंत ट्रिप स्वीकारण्याचा अतिरिक्त पर्याय पुरविते.

रिझर्व्ह आता उबर अॅपच्या नवीन आवृत्तीमध्ये एक नवीन पर्याय म्हणून दिसत आहे आणि उबर प्रीमियर, उबर इंटरसिटी, उबर रेंटल्स आणि उबर एक्सएल वर उपलब्ध आहे. नवीन उत्पादन पूर्वनियोजित प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले असून त्यात कामाच्या सहली, विमानतळावर सोडणे, डॉक्टरांच्या भेटी आणि इतर नियोजित भेटींचा समावेश आहे. नियोजित राइड पर्याय विविध उत्पादन श्रेणींमध्ये आकर्षक किंमतींवर उपलब्ध असतील.

या नवीन योजनेच्या सादरीकरणाबद्दल बोलताना उबरचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग म्हणाले, “उबर रिझर्व्हचा भारतातील आणखी शहरांमध्ये विस्तार करण्यास आम्ही उत्सुक आहोत. रिझर्व्हमुळे रायडर्स राइड्सची प्री-बुकिंग करू शकतात आणि त्यायोगे मन:शांती, निश्चितता आणि त्यांच्या ट्रीपवर अतिरिक्त नियंत्रण सुनिश्चित करू शकतात. रिझर्व्हमुळे ड्रायव्हर्सना ऑन डिमांड आणि प्री-बुक केलेल्या ट्रिपमधून निवडण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होतात. रायडर्स, ड्रायव्हर्स आणि शहरे सगळ्यांसाठीच योग्यपणे कार्यरत राहील अशा प्रकारे आम्ही उबरमध्ये नेहमी गतिशीलतेची पुनर्कल्पना करत असतो. जेव्हा तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा रिझर्व्हसह आम्ही आणखी निश्चितता खुली करत आहोत.”

सर्वसमावेशक सुरक्षा उपायांसह, सोयीस्कर पिक-अप, किफायतशीर किमती आणि एका बटणाच्या क्लिक वर डिजिटल पेमेंट पर्यायांसह, रायडर्स आणि ड्रायव्हर त्यांच्या इतर लोकप्रिय उत्पादनांचा लाभ घेऊ शकतील अशा नवीन श्रेणीमध्ये एक अखंड, विनाअडथळा उत्पादन अनुभव सादर करण्याची उबरला आशा आहे.

उबर रिझर्व्ह ट्रिप कशी बुक करावी:

·         अपडेट केलेल्या उबर अॅपमधील रिझर्व्ह चिन्हावर टॅप करा. शेड्यूल ९० दिवसांपासून किमान ३० मिनिटे अगोदर करता येईल. 

·         प्रवासाच्या वेळेनुसार नियुक्त केलेल्या ड्रायव्हरसह अॅपमधील बुकिंग तपशीलांचे पुनरावलोकन करा. १ तास आधी पर्यंत ट्रीप विनामूल्य रद्द करता येईल.

·         आरक्षणामध्ये समाविष्ट केलेल्या प्रतीक्षा वेळेत ड्रायव्हर-पार्टनरची प्रतीक्षा करा.

·         राईडचा आनंद घ्या

·         उबर रिझर्व्हद्वारे तुमच्या पुढील प्रवासाची पूर्व-योजना करता येऊ शकते !