· रिझर्व्ह मुळे १३ शहरांमध्ये ३० मिनिटे ते ९० दिवस अगोदर खात्रीपूर्वक राइड प्री-बुकिंग शक्य
· रोख पेमेंटद्वारे रिझर्व्ह इंटरसिटी, रेनटल्स किंवा उबर प्रीमियर राइड्स उपलब्ध
पुणे- २६ एप्रिल २०२३: रायडर्सना ३० मिनिटांपासून ते ९० दिवसांपर्यंत त्यांच्या राइड्सचे प्री-बुकिंग करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत उबरने आज भारतातील आणखी ६ शहरांमध्ये रिझर्व्हचा विस्तार करण्याची घोषणा केली. विश्वसनीय, आगाऊ नोंदणी केलेल्या राइड्ससह उबर रिझर्व्ह आता रायडर्सना कॅश पेमेंटसाठी उपलब्ध असेल. ही सेवा आता मुंबई, बंगलोर, दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, पुणे, हैदराबाद, कोची, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, लखनौ आणि गुवाहाटी या भारतातील १३ शहरांमध्ये सुरू आहे.
बाजारपेठेतील गरजांना अनुकूल अशा नवनवीन जागतिक योजना सादर करत रिझर्व्ह सेवेचा विस्तार उबरची भारताप्रती असलेली बांधिलकी दर्शवितो. ऑन-डिमांड ट्रिपच्या जोडीला रिझर्व्ह पर्यायासह, ड्रायव्हर्स त्यांच्या रस्त्यावरील वेळेसाठी सर्वात योग्य असलेल्या ऑफरमधून निवड करू शकतात. उबर रिझर्व्ह ड्रायव्हर्सना त्यांची मिळकत आणि ड्रायव्हिंग वेळापत्रक अगोदर निश्चित करण्यात मदत करण्यासाठी ७ दिवस अगोदर पर्यंत ट्रिप स्वीकारण्याचा अतिरिक्त पर्याय पुरविते.
रिझर्व्ह आता उबर अॅपच्या नवीन आवृत्तीमध्ये एक नवीन पर्याय म्हणून दिसत आहे आणि उबर प्रीमियर, उबर इंटरसिटी, उबर रेंटल्स आणि उबर एक्सएल वर उपलब्ध आहे. नवीन उत्पादन पूर्वनियोजित प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले असून त्यात कामाच्या सहली, विमानतळावर सोडणे, डॉक्टरांच्या भेटी आणि इतर नियोजित भेटींचा समावेश आहे. नियोजित राइड पर्याय विविध उत्पादन श्रेणींमध्ये आकर्षक किंमतींवर उपलब्ध असतील.
या नवीन योजनेच्या सादरीकरणाबद्दल बोलताना उबरचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग म्हणाले, “उबर रिझर्व्हचा भारतातील आणखी शहरांमध्ये विस्तार करण्यास आम्ही उत्सुक आहोत. रिझर्व्हमुळे रायडर्स राइड्सची प्री-बुकिंग करू शकतात आणि त्यायोगे मन:शांती, निश्चितता आणि त्यांच्या ट्रीपवर अतिरिक्त नियंत्रण सुनिश्चित करू शकतात. रिझर्व्हमुळे ड्रायव्हर्सना ऑन डिमांड आणि प्री-बुक केलेल्या ट्रिपमधून निवडण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होतात. रायडर्स, ड्रायव्हर्स आणि शहरे सगळ्यांसाठीच योग्यपणे कार्यरत राहील अशा प्रकारे आम्ही उबरमध्ये नेहमी गतिशीलतेची पुनर्कल्पना करत असतो. जेव्हा तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा रिझर्व्हसह आम्ही आणखी निश्चितता खुली करत आहोत.”
सर्वसमावेशक सुरक्षा उपायांसह, सोयीस्कर पिक-अप, किफायतशीर किमती आणि एका बटणाच्या क्लिक वर डिजिटल पेमेंट पर्यायांसह, रायडर्स आणि ड्रायव्हर त्यांच्या इतर लोकप्रिय उत्पादनांचा लाभ घेऊ शकतील अशा नवीन श्रेणीमध्ये एक अखंड, विनाअडथळा उत्पादन अनुभव सादर करण्याची उबरला आशा आहे.
उबर रिझर्व्ह ट्रिप कशी बुक करावी:
· अपडेट केलेल्या उबर अॅपमधील रिझर्व्ह चिन्हावर टॅप करा. शेड्यूल ९० दिवसांपासून किमान ३० मिनिटे अगोदर करता येईल.
· प्रवासाच्या वेळेनुसार नियुक्त केलेल्या ड्रायव्हरसह अॅपमधील बुकिंग तपशीलांचे पुनरावलोकन करा. १ तास आधी पर्यंत ट्रीप विनामूल्य रद्द करता येईल.
· आरक्षणामध्ये समाविष्ट केलेल्या प्रतीक्षा वेळेत ड्रायव्हर-पार्टनरची प्रतीक्षा करा.
· राईडचा आनंद घ्या
· उबर रिझर्व्हद्वारे तुमच्या पुढील प्रवासाची पूर्व-योजना करता येऊ शकते !
कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे निर्देश
पुणे, दि. २६: यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे .मात्र तरीही पुण्यात महापालिकेतील पाणीपुरवठा खात्याच्या हालचालीनुसार पुण्यात छुप्या पाणीकपातीची यंत्रणा तयार होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. एकूणच नेहमीप्रमाणे पाउस जर यंदाही जोरदार झाला तर अर्थातच पाणी कपातीची यंत्रणा करण्याचे महापालिका प्रशासकांचे श्रेय अर्थातच वाया मात्र जाणार आहे .
जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहूल कुल, भिमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.
पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.
खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन १ मेपासून खडकवासला प्रकल्पातील ४ धरणात मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.
बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
मुंबई-रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प घाईत करू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांनी चर्चा करूनच पुढे जावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सांगितले की, माझी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्य केली आहे. त्यानुसार उद्या बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत अधिकारी प्रकल्पाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना समजावून सांगणार आहेत. त्यातून सर्वांना मान्य असा तोडगा निघाला तर चांगलेच आहे. अन्यथा इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल.
शरद पवार म्हणाले, बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीची केवळ चाचपणी सुरू आहे. कुणाचीही जमिन अजून ताब्यात घेतली नाही, अशी माहिती मला उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, याबाबत आम्ही लोकांची समजूत घातल्यावर त्यांचा आता विरोध नाही, असेही सामंतानी मला सांगितले. त्यावर प्रकल्प करण्याबाबत घाईघाईने कोणतीही भूमिका घेऊ नका, अशी सूचना आपण उदय सामंतांना केली आहे.शरद पवार म्हणाले, उद्या बारसू येथे प्रकल्पाच्या स्थळीच आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यातून काय निष्कर्ष ते बघूया. चर्चेतून काही प्रश्न समोर आले तर ते सोडवण्यासाठी राज्य सरकराने प्रयत्न केले पाहीजेत किंवा इतर पर्यायांचा शोध घेतला पाहीजे. एखादा प्रकल्प राज्यासाठी महत्त्वाचा असला तरी स्थानिकांना विश्वासात घेऊनच सरकारने प्रकल्प राबवला पाहीजे. विशेषत: कोकणात एखादा नवा प्रकल्प गेला तर तेथे स्थानिकांच्या भावना तीव्र असतात, याची नोंद सरकारने घेतली पाहीजे. त्यामुळे प्रकल्पाबाबत स्थानिकांचे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
दरम्यान, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत ठाकरे गट असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तर, कोकणातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी व खासदार विनायक राऊत यांनी मात्र बारसू रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे. यावर शरद पवार म्हणाले, याबाबत राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्याशी बोलावे लागेल. त्यानंतरच त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे समजेल.
रत्नागिरी-बारसू रिफायनरी प्रोजेक्टला सुरू असलेला विरोध शिंदे सरकारला बळाचा वापर करून मोडीत काढायचा आहे. मात्र, घाबरून जाऊ नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे. वेळ पडली, तर मुंबईतली अख्खी शिवसेना बारसूमध्ये उतरवू, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाने बारसू प्रकल्पाविरोधात उघडपणे दंड थोपटलेत.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सरकार गडगडणार, असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केला. मात्र, बारसूविरोधातल्या भूमिकेमुळे ठाकरे गट पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सरकार गडगडणार आहे. त्यामुळे यापूर्वी शेवटचा हात धूवुन घ्यावा यासाठी मिंधे सरकार बारसू येथे येणाऱ्या कंपनीकडून लाच घेऊन हा प्रकल्प राबवत आहे. असा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.विनायक राऊत म्हणाले, बारसू येथे होणाऱ्या मोर्चात आम्ही सहभागी होऊ. फडणवीस कर्नाटकातून अकलेचे तारे तोडत आहेत. त्यांना म्हणाव तेच हेलिकॉप्टर घेऊन येथे या. हा प्रकल्प राज्यसरकारचा आहे कि रत्नागिरीच्या एसपींचा आहे? जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर एसपी उत्तर देत होते. कर्तव्याचे पालन करताना राजकारणाचा बळी होऊ नका, असे म्हणत विनायक राऊतांनी रत्नागिरीच्या पोलिस आयुक्तांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, बारसू प्रकल्पाबाबत ठाकरे गटाची भूमिका अजिबात दुटप्पी नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. कोकणवासीय आता प्रकल्प आमच्यासाठी घातक आहे, असे म्हणत असतील तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्यासोबत आहे. या प्रकल्पासाठी पहिली गोळी आम्ही झेलू. पुढे संजय राऊत म्हणाले, पर्यावरणासाठी घातक असलेले प्रकल्प कोकणात आणण्याऐवजी टाटा एअरबस, फॉक्सकॉन, ड्रग्ज पार्क असे स्वच्छ प्रकल्प उद्योगमंत्री राज्यात का आणत नाहीत? हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले?, यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावे.
मुंबई, दि. २६ : सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ नस्तींचा निपटारा केला.
मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स (नस्ती) येत असतात. त्यांचा विनाविलंब नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ नस्तींचा निपटारा केला. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले.
· संपूर्ण महिनाभर दररोज अधिक जास्त डेटा व त्यासोबत मनोरंजन देणाऱ्या ‘वी’च्या स्मार्ट रिचार्ज प्लॅन्सचा आनंद घ्या.
· ‘वी’ ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे, जी क्षेत्रीय कन्टेन्टचा लाभ घेता यावा यासाठी आपल्या ग्राहकांना सन एनएक्सटी बंडल्ड प्लॅन्स प्रस्तुत करत आहे.
भारतातील आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार ‘वी’ने मनोरंजनाचा खजिना असणारे दोन मासिक रिचार्ज प्लॅन्स सुरु केले आहेत. देशभरातील आपल्या प्रीपेड युजर्सना मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी ‘वी’ ने ही अनोखी संधी उपलब्ध करवून दिली आहे. १ महिन्याची वैधता असलेल्या या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉल्स, दर दिवशी १०० एसएमएस, ओटीटी लाभ आणि दररोज २ जीबी डेटा या आकर्षक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
‘वी’च्या ३६८ रुपयांच्या रिचार्जसोबत प्रीपेड युजर्सना सन एनएक्सटीची सबस्क्रिप्शन टीव्ही आणि मोबाईलवर मिळत आहे. त्यामुळे त्यांना तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, मराठी व बांग्ला या भाषांमध्ये भरपूर उत्तमोत्तम सिनेमे, टीव्ही शो, म्युझिक व्हिडीओचा आनंद घेता येईल. त्याशिवाय दररोज २जीबी डेटा + अनलिमिटेड कॉल्स + दर दिवशी १०० एसएमएस हे लाभ देखील मिळत आहेत. या सर्व टेल्को व नॉन-टेल्को लाभांची वैधता ३० दिवस आहे.
४००० पेक्षा जास्त सिनेमे, १०००० पेक्षा जास्त तासांचा व्हिडिओ ऑन डिमांड कन्टेन्ट आणि ३३ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स देणारे सन एनएक्सटी हे क्षेत्रीय मनोरंजनाची आवड असणाऱ्या दर्शकांचे अतिशय आवडीचे ऍप आहे. दक्षिण भारतीय कन्टेन्टच्या चाहत्यांसाठी सन एनएक्सटीच्या विशाल आणि सर्वसमावेशक पोर्टफोलिओमध्ये रांगी, लाथथती चार्ज, बघीरा, महावीरयर, थिरुचित्रबलम, अब्बार, अन्नातथे, बीस्ट, डॉक्टर यासारखे नवनवीन ब्लॉकबस्टर, एथिर नीचल, सुंदरी, प्रेमास रंग यावे, वोंतरी गुलाबी, कालीवीदू, कनलपूवु, राधिका यासारखे लोकप्रिय टीव्ही शो देखील आहेत.
‘वी’च्या ३६९ रुपयांच्या रिचार्जमध्ये प्रीपेड ग्राहकांना सोनी लिवच्या अतिशय लोकप्रिय कन्टेन्टबरोबरीनेच वेगवेगळ्या खेळांचे सामने लाईव्ह पाहण्याचा आनंद आपल्या मोबाईलवर मिळवता येईल, त्यासोबत दररोज २जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स व दर दिवशी १०० एसएमएस यांचा देखील समावेश आहे.
हे रिचार्ज घेणाऱ्या ‘वी’ युजर्सना सोनी लिवचे लोकप्रिय ओरिजिनल्स, सिनेमे, शो, खेळांचे लाईव्ह सामने, एक्सक्लुसिव्ह कन्टेन्ट आणि इतरही बरेच मनोरंजन मोबाईलवर मिळवता येईल. युईएफए चॅम्पियन्स लीग, डब्ल्यूडब्ल्यूई, बुंदेस्लिगा, यूएफसी यासारख्या खेळांपासून ते स्कॅम १९९२ द हर्षद मेहता स्टोरी, महारानी, रॉकेट बॉईज, गुल्लक यासारखे ओरिजिनल्स, गार्गी सॅल्यूट, कानेक्काने, शांतीत क्रांती आणि जेम्स हे क्षेत्रीय भाषांमधील शोज, द गुड डॉक्टर, अक्युज्ड, लकी हँक, अ डिस्कव्हरी ऑफ विचेस यासारखे आंतरराष्ट्रीय शोज, एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ऍट वन्स, द व्हेल यासारखे ऑस्कर विजेते सिनेमे असा विविधरंगी व विविधढंगी कन्टेन्ट सोनी लिववर उपलब्ध असल्याने वेगवेगळ्या आवडीनिवडी असणाऱ्या, वेगवेगळ्या वयोगटातील युजर्सना मनोरंजनासाठी हे ऍप हवेहवेसे वाटेल असे आहे.
आपल्या युजर्सना अनलिमिटेड डेटाचा खरा अनुभव मिळवून देणाऱ्या ‘वी’च्या नवीन ३६८ आणि ३६९ रुपयांच्या रिचार्जेसच्या पोर्टफोलिओमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता २०० जीबीपर्यंत वीकएंड डेटा रोलओव्हर, रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट टाईम अनलिमिटेड डेटा हे देखील लाभ मिळतात.
इतकेच नव्हे तर, या रिचार्ज प्लॅन्ससोबत ‘वी’ एमटीव्ही ऍपची व्हीआयपी सबस्क्रिप्शन देखील मिळते. ‘वी’ एमटीव्ही अर्थात ‘वी’ मुव्हीज अँड टीव्ही ऍप आणि ‘वी’ ऍपवर अतिशय उत्तम कन्टेन्टची विशाल लायब्ररी उपलब्ध आहे. ‘वी’ एमटीव्हीमध्ये ४५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनेल्स आहेत. त्याशिवाय शेमारू, लायन्सगेट, झी५, अतरंगी, हंगामा प्ले, डिस्कव्हरी आणि इतरही अनेक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ऍक्सेस याठिकाणी मिळतो.
पुणे, दि. २६: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
या लोक अदालतमध्ये प्रलंबित असलेली मोटार वाहन, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज वितरण कंपनीची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२० अनुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाऊंन्सची प्रकरणे अशी पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली एकूण ४४ हजार ६१६ प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत.
बँक, वीज कंपनी, महानगरपालिका व ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीची तसेच विविध वित्तीय संस्थाची व मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी अशी एकूण १ लाख २६ हजार ५९७ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आलेली आहेत.
नागरिकांना आपली प्रकरणे लोकन्यायालयामध्ये तडजोडीकरीता ठेवावयाची असल्यास त्यांनी संबंधित न्यायालयामध्ये किंवा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे तसेच तालुका विधि सेवा समिती येथे संपर्क साधुन आपली प्रकरणे लोकन्यायालयामध्ये ठेवावीत.
लोकन्यायालयामध्ये प्रकरणे ठेवण्याकरीता पक्षकार त्यांच्या वकिलांशी संपर्क करु शकतात. तसेच त्यांची मदत देखील घेवू शकतात. लोकन्यायालयामध्ये प्रकरणे मिटल्यास कोर्ट फी नियमाप्रमाणे परत मिळू शकते आणि प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. लोकन्यायालयाच्या निकालावर अपील नाही. परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपआपसात कटुता निर्माण होत नाही. वेळ व पैसा दोघांचीही बचत होते.
जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल कश्यप यांनी केले आहे.
पुणे, दि. २६: भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, व्यवहारात उपयोगी पडणारे, रोजगारक्षम, संशोधनवृत्तीला चालना देणारे शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह तथा आमदार डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंद पाटील, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात माणूस घडविणारे आणि भविष्याचा वेध घेण्याची ताकत निर्माण करणे, नैतिक शिक्षणाबरोबर संशोधनावर भर देणे यासारख्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. भारती विद्यापीठात मोठ्याप्रमाणात पायाभूत सुविधा असून या सुविधेचा उपयोग करुन विद्यार्थ्यांच्या संसोधनवृत्तीला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करावे. संरक्षण क्षेत्रासह अन्य विविध क्षेत्रात निर्यातीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शांतीलाल मुथा आणि जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या क्षेत्रात मौलिक कार्य केल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.
स्व.पतंगराव कदम यांनी स्वतःच्या हिमतीवर शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी १२ शहरात ८८ संस्था, १८० शाखा, ९९ शाळा स्थापन केल्या त्यामध्ये असून सुमारे ४७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजकरणापलीकडे जाऊन त्यांनी सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जपले. राजकारणासह त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही रचनात्मक काम केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
श्री. कदम म्हणाले, भारती विद्यापीठ सामाजिक बांधिलकी मानणारी एक शैक्षणिक संस्था आहे. विद्यापिठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देश विदेशात कार्यरत आहेत याचा अभिमान आहे. भारती विद्यापीठाची ओळख उच्च शिक्षण देणारी संस्था म्हणून असून विविध शाखेतून उच्च शिक्षण देण्याचे काम करीत आहेत.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराचे वितरण
पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी श्री . मुथा आणि श्री. पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरु डॉ. सावजी यांनी केले.
मुंबई, दि. 25 : “विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची यशस्विता ही लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून निष्पन्न होत असते. या पार्श्वभूमीवर, लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा प्रभावीरित्या वापर करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी येथे केले.
विधानभवन येथे आयोजित वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्यातर्फे विधानपरिषद सदस्यांसाठीच्या कृतिसत्र कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सन्माननीय आमदार ॲड. अनिल परब, विक्रम काळे, विलास पोतनीस, किरण सरनाईक, सुधाकर आडबाले, अरुण लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, वजहात मिर्झा, अभिजित वंजारी, आमशा पाडवी, श्रीमती. उमा खापरे, ॲड. मनिषा कायंदे, धिरज लिंगाडे विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, सहसचिव शिवदर्शन साठे, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, संचालक निलेश मदाने, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, सेवानिवृत्त सहसचिव डॉ. विलास आठवले, सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील हे उपस्थित होते.
कृतिसत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात अॅड. नार्वेकर म्हणाले की, कायदेमंडळ नियमावलीच्या अभ्यासातून लोकप्रतिनिधी अधिक उत्तमरित्या विधानपरिषद सदस्य म्हणून काम करु शकतात. आपल्या मतदार संघातील प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी करुन त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने अधिवेशनचा उपयोग शक्य होतो, हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींना, प्रामुख्याने नवनिर्वाचित आमदारांना संसदीय आयुधांची माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. त्यादृष्टीने हे कृतिसत्र निश्चितच उपयुक्त, दिशादर्शक असून संसदीय लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. याची व्याप्ती ही केवळ उपस्थित विधानपरिषद सदस्यांपुरतीच नसून त्यांच्या माध्यमातून राज्यातील तेरा कोटी जनतेला त्यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवून घेण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होत आहे.
सभागृहाच्या कामकाजात सहभागी होताना सदस्यांना संसदीय आयुधांचा अभ्यास असल्यास जनतेच्या प्रश्नांची प्रभावी मांडणी, सोडवणूक यासह पीठासीन अधिकाऱ्यांद्वारा करण्यात देण्यात येणारा निर्णय नियमानुसार आहे का, आपण मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित मंत्र्यांकडून देण्यात येणारे उत्तर, स्पष्टीकरण हे चौकटीत आहे का, याची शहानिशाही सदस्य करु शकतात. ‘लक्षवेधी’ हे सभागृहात आपले प्रश्न मांडण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहेच, त्या व्यतिरिक्त ही इतर अनेक संसदीय आयुधे आहेत. त्यांच्या योग्य वापरातून आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून घेऊ शकतो. विशेषाधिकार समिती, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार देण्यामागचा उद्देश त्यांना दबावविरहीत काम करता यावे असा आहे. त्याचसोबत विशेषाधिकार अबाधित रहावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी संतुलितपणे विशेषाधिकारांचा वापर करावा. संसदीय लोकशाही जपण्याची जबाबदारी लोकप्रतिनीधींवर आहे, हे लक्षात घेऊन संसदीय आयुधांचा अभ्यास आणि वापर करण्याचे आवाहन यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी केले. तसेच लोकप्रतिनिधींना संसदीय आयुधांची माहिती देणारे उपयुक्त कृतिसत्र आयोजित केल्याबद्दल ॲड.नार्वेकरांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन केले.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, विधान परिषद सदस्यांना संसदीय आयुधांची, कार्यपद्धतीची माहिती, नियमावलीचा अभ्यास असणे गरजेचे आहे. सभागृहाचा वेळ अधिकाधिक फलद्रुप होण्याच्या दृष्टीने नेमकेपणाने प्रश्न उपस्थित करणे, मंत्र्यांनी जबाबदारीपूर्वक उत्तर देणे, सदस्यांनी चर्चेत सहभाग घेणे, सभागृहाच्या कामकाजात सक्रियपणे सहभाग नोंदवला पाहिजे. लक्षवेधी, इतर प्रश्न हे किती संख्येने उपस्थित करतो याचा नवनिर्वाचित सदस्यांनी आर्वजून विचार करावा. आपल्या मतदार संघाच्या प्रश्नांसोबतच राज्यातील महत्त्वाचे प्रश्नदेखील सभागृहात चर्चेला आलेच पाहिजेत, याची एकत्रित जबाबदारी घेऊन सर्व सदस्यांनी प्रश्न, लक्षवेधी उपस्थित करावी. प्रभावीपणे काम करण्यासाठी नियमावलीचा अभ्यास, प्रश्नांची मांडणी यासोबतच सुसंवादीपणा जपावा, याच्या माध्यमातून विधायक कामे पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधीं आग्रही राहावे,असे श्रीमती गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, संसदीय आयुधे शक्तिशाली असून लोकप्रतिनिधींनी त्याचा प्रभावीपणे जनसामान्यांच्या हितासाठी वापर केल्यास निश्चितच अधिक गतीने जनसामान्यांचे प्रश्न आपण व्यापक प्रमाणात सोडवू शकतो,हे लक्षात घेऊन सदस्यांनी जबाबदारीपूर्वक सर्व आयुधांची माहिती करुन घेत त्यांच्या सुयोग्य वापर करावा, असे सांगितले.
आमदार अनिल परब यावेळी म्हणाले की, एक चांगला आमदार म्हणून जनसामान्यांच्या प्रश्नांना पुरेपूर न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधींना असलेले विशेष अधिकार, संसदीय आयुधे सहायक ठरणारी आहे. त्यांची अधिकृत माहिती देणारी कृतिसत्रे, सभागृहाची कार्यपद्धती,अधिवेशनाचे कामकाजाची माहिती या सर्व गोष्टी निश्चितच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.
कृतिसत्राच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना विधीमंडळाचे सेवानिवृत्त सचिव अनंत कळसे म्हणाले की, विधान परिषद या वरिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्या विधानसभेच्या तुलनेत अल्प असल्याने संसदीय आयुधाचा वापर अधिक प्रमाणात करणे शक्य असते. लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न,अल्पसूचना,औचित्याचा मुद्दा, विशेष उल्लेख याची कार्यपद्धती,महत्व आणि प्रभाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विधिमंडळातील प्रत्येक सदस्यांनी आपण उत्कृष्ट संसदपटू आहोत असा आत्मविश्वास ठेवून काम करावे, असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवनात विधानपरिषद सदस्यांसाठीच्या कृतिसत्राच्या समारोपाप्रसंगी व्यक्त केले.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, विधिमंडळात मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावित विधेयकांच्या वर्तमानपत्रातील बातम्यांबाबत आधी संबंधित संस्थाकडून माहिती घेणे, विधिज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते. मूळ कायदा का बदलला जातोय, हे लक्षात घेवून नवीन कायदा विधिमंडळात येण्याअगोदरच त्याचा अभ्यास सदस्यांना असला पाहिजेत. नवीन कायदे करण्याचे काम सदस्यांचे आहे. त्यासाठी इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करुन कायद्याचा मसुदा तयार करणे तितकेच महत्त्वाचे असते. आपल्या जिव्हाळ्याच्या एखाद्या विषयाबाबत सदस्यांना अभ्यासपूर्ण विधेयक सभागृहात आणण्याची संधी असते. कायदा आणि धोरण यामध्ये फरक आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यासाठी सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केले.
अधिवेशनातून लोकहित साध्य करण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून एखाद्या विषयाची निवड करुन तो विषय सभागृहात उपस्थित करण्यासाठी प्रयत्न करावा. यामुळे सभागृहात सदस्यांकडे अधिक लक्ष वेधले जाते. यामुळे प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत होते. विधानपरिषद आणि कामकाजावर माझी तीन पुस्तके आहेत. विधिमंडळ सदस्यांनी देखील आपल्या कामकाजाचे पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन सदस्यांचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल, असेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
विधिमंडळाची आयुधे शिकण्यासारखी
वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत विविध संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके याबाबत विधानभवनात आयोजित एक दिवसीय कृतिसत्रात विधिमंडळाची आयुधे शिकण्यासारखी आहेत, असे मत कृतिसत्रात सहभागी झालेल्या विधानपरिषद सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.
मुंबई, दि. 25 : नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती/वाळू मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.
महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल कार्यालयातील उपायुक्त, विभागीय आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्ती नष्ट करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे; असे सांगून श्री. विखे- पाटील म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेती, वाळू धोरणानुसार रेतीचे-वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती/ वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी यावर राज्य शासनाने भर दिला आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून या धोरणाची अंमलबजावणी करताना काय अडचणी येत आहेत याबाबतचा अभ्यास करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पूर परिस्थितीचा धोका कमी करणे, नदीपात्रातील दिशा सरळ करण्यासाठी आवश्यक असलेली रेती /वाळू नदीपात्रातून काढणे यासाठी जलसंपदा विभागाची मदत घेऊन अशी कामे प्राधान्याने करणेबाबत निर्देश दिले. वैयक्तिक घर बांधकामासाठी ठराविक प्रमाणात वाळू उपलब्ध करणे, तसेच नवीन वाळू धोरण करताना सामाजिक स्वास्थ्य राखावे, कमीत-कमी दरात वाळू उपलब्ध देण्याचा शासनाचा मानस आहे, असे महसूल मंत्री म्हणाले.
सुधारित रेती, वाळू धोरणाची वैशिष्ट्ये
या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये (रुपये 133 प्रति मेट्रिक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी केल्या.
नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल. विकास कामांसाठी वाळू उपलब्ध करण्याबरोबरच आजुबाजूच्या परिसरात पुरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून वाळूचे उत्खनन केले जाते. राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा बसणार आहे.
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व ‘स्टार्स’ प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-२०२३ ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उद्घाटन मेळावा आज (दिनांक २५ एप्रिल २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळेमध्ये पार पडला. यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. केसरकर बोलत होते.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड, मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक श्रीमती मनीषा पवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी श्रीमती मालती टोणपे, प्रथम संस्थेच्या सचिव श्रीमती फरिदा लांबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.केसरकर म्हणाले की, मातृभाषेचा सतत अभिमान बाळगायला हवा. ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे आपण आपली मातृभाषा म्हणजेच माय मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राइल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. कारण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले.
व्यावसायिक शिक्षण मोलाचे
भारत हा तरूणांचा देश आहे. आपल्या देशातील तरूणांना स्वावलंबी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण मोलाचे आहे. त्यामुळे येणारी पिढी ही तंत्रकुशल असायला हवी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. राज्य शासन तरूणांना रोजगार मिळावा, यासाठीच्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना गणवेश, बूट-मोजे, वह्या-पुस्तके शासनामार्फत दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
‘पहिले पाऊल’ ठरणार ऐतिहासिक पाऊल
शिक्षण विभागातील ‘पहिले पाऊल’ हा उपक्रम ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगून मुलांसाठी प्रशासनाने सुरू केलेली ही पूर्वतयारी त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला. ‘पहिले पाऊल’ या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याची अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तयारी दर्शविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. येत्या २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांनी उपस्थित चिमुकल्यांशी संवाद साधला. सेल्फी घेताना श्री. केसरकर यांनी चिमुकल्यांना उचलून घेतले. त्यामुळे लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मान्यवरांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशपात्र मुलांच्या क्षमतांची तपासणी करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विविध संचांना भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती निशा म्हात्रे यांनी संयोजन केले. किसन पावडे यांनी सूत्रसंचालन केले.
सहावी रोलबॉल विश्व करंडक स्पर्धा : महिला विभागात भारत तिसऱ्या स्थानी : पुरुष गटात भारत, केनिया उपांत्य फेरीत.
पुणे : महिला गटाच्या अंतिम फेरीत केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करताना सहाव्या विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटातून भारत व केनिया संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
विश्वचषक विजेते केनिया,उपविजेते इजिप्त व तृतीय स्थान पटकवलेल्या भारतीय संघासोबत मान्यवर…
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडीयम येथे सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने इजिप्तला ५-० असे परभूत केले. मध्यंतराला केनिया संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवताना केनिया संघाने विजय साकारला. केनिया संघाकडून व्ही साटीया (३९.१० व ४३.४५) व कैथीन्जी (०.३२ व २५.२४) यांनी प्रत्येकी २ व रोप ज्युडिथने १ (१.३२) गोल केला. इजिप्त संघाला लढतीमध्ये एकाही गोल करता आला नाही.
ब्रांझ मेडल विजेत्या भारतीय संघासोबत मान्यवर…
महिला गटाचे विजेत्यांचे पुरस्कार वितरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज यादव, युगांडा रोलबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा पेनिना काबेंगे, बेलारूस रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष अलेक्सी खाटीलेव्ह, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज चौधरी, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष व विश्वचषकाचे संयोजक संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, आर पी आय चे मंदार जोशी, लहू बालवडकर, सचिव अमोल काजळे पाटील, सतीश कोंडाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
देशात खेळाला प्रोत्साहन देण्यात येत असून त्याअंतर्गत रोलबॉलच्या ६ व्या विश्वकरंडक स्पर्धेचे २१ एप्रिलपासून पुण्यात आयोजन करण्यात आले. राजू दाभाडे यांनी हा खेळ पुण्यात विकसित केला असून हा खेळ सुमारे ५० पेक्षा जास्त देशात खेळला जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आज झालेल्या महिला गटातील अंतिम सामन्यात केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करुन विजेतेपद पटकावले. त्याबद्दल केनिया संघाचे अभिनंदन सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये भारताने पोलंड संघावर १२-१ अशी एकतर्फी मात केली. मध्यंतराला भारतीय संघाने ७-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून इशिका शर्माने ७ (०.३४, १५.२५, ३३.२५,३४.४९, ३५.२५, ३७.९० व ४६.२१) गोल केले. सुहानी सिंग (२३.१७ व २४.५१) व पूजा चौधरी (१०.३३ व ११.१२) यांनी प्रत्येकी २ तर श्रुती भगतने (२१.२१) एक गोल केला. पोलंड संघाकडून सायनोविक मारियाने (४४.५०) एक गोल केला.
तत्पूर्वी, महिला गटाच्या पहिल्या उपांत्य लढतीमध्ये केनिया संघाने पोलंड संघाला २-१ असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पोलंड संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर मात्र, केनिया संघाच्या सटीया मारियाने सलग दोन (३२.४० व ३३.३०) गोल करताना संघाला आघाडी मिळवून दिली. पोलंड संघाकडून नायाचेविझ मलास्काने (३.००) एक गोल केला.
महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये इजिप्त संघाने भारताला ४-३ असे पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या अतितटीच्या लढतीत मध्यंतराला दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. त्यानंतर मात्र दोन्ही संघांनी जोरदार आक्रमण केले. इजिप्त संघाकडून हबीब केंझी अहमदने २ (४२.२१ व ४६.४९), एल्डेक्कर नेजर (४९.२१) व मुस्तफा रितीज (३३.२८) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताकडून इशिका शर्माने २ (४४.१८, ४६.१९) तर पूजा चौधरीने १ (३६.४८) गोल केला. अंतिम लढत ही केनिया व इजिप्त दरम्यान होणार आहे.
पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने इराण संघाला अतिरिक्त वेळेत ७-५ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ३-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र इराणने जोरदार प्रतिआक्रमण करताना जोरदार खेळ केला. त्यामुळे लढत वेळेत दोन्ही संघांनी ५-५ अशी बरोबरी साधली. अतिरिक्त वेळेत भारतीय खेळाडूंनी जोरदार खेळ करताना सलग २ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून आदित्य सुतार (००.४५, ४३.३९ व ५५.२३) व हर्षल घुगे (१७.५०, ३६.३६ व ५२.२९) यांनी प्रत्येकी ३ तर सचिन सैनीने १ (२४.००) गोल केला. इराण संघाकडून ओमीद डावरीने ३ (१०.५०, १६.१० व ४१.००) तर साईद मोहसीन (३५.१०) व यासीन खरगरअजीदाबी (३९.१०) यांनी प्रत्येकी १ गोल केला.
पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत केनिया संघाने इजिप्त संघाला ७-४ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यापासून केनिया संघाने आक्रमक खेळ करताना मध्यंतराला ५-२ अशी आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफ्फिन एसने ४ (४.३०, १३.०५, २२.४२, २७.३७) तर बोनफेसने २ (११.०१, २३.५०) तर केविन मोझेसने १ (४४.३२) गोल केला. इजिप्त संघाकडून हसन अहमद (५.०१, ४९.१३) व ए एम हसन (२.१३, ४७.५३) यांनी प्रत्येकी २ गोल केले.
मुंबई, दि.25 : “विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत आणि आदर्श जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ब्रिटिश कौन्सिलचे निदेशक राशी जैन यांनी आज मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी ब्रिटिश कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जागतिक पातळीवर स्टार्टअप, नवीन संशोधन, इनोव्हेशन याला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना अधिक कुशल करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. या करारामुळे नवीन संशोधनाला चालना मिळेल आणि कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच परदेशी विद्यापीठाकडून महाराष्ट्रातील विद्यापींठाना शैक्षणिक सहकार्य मिळेल,” असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
श्री. रस्तोगी म्हणाले की, महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांचे जागतिकीकरण व्हावे, ही शासनाची भूमिका आहे. या करारामुळे भारत आणि युके यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक वाढेल आणि अधिक नवीन शैक्षणिक संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
ब्रिटिश कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई म्हणाले की, महाराष्ट्रासोबत केलेल्या या करारामुळे भारत आणि युके या दोन देशांमधील शैक्षणिक संबंध अधिक दृढ होऊन जागतिक आव्हानांचा सामना करण्यास यामुळे मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचा अनुभव आणि रोजगारक्षमता सुधारणे आणि यातून महाराष्ट्रासाठी चांगले सामाजिक – आर्थिक भविष्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
ब्रिटिश कौन्सिलचे श्री. राशी जैन म्हणाले की, उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांना नवीन कौशल्य व तंत्रज्ञानासह उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रासोबत हा करार केला आहे.
मुंबई, दि. २५ : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता एकत्रित २ हजार २ उमेदवारांना नियुक्ती पत्रप्रदान करणे सोयीचे नसल्याने, मुंबई तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी १० उमेदवारांना पालकमंत्री यांच्या हस्ते तर, २ व ३ मे रोजी नियुक्ती प्राधिकारी यांच्या हस्ते उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
शासनाद्वारे आयोजित विविध परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. महसूल विभागातील भूकरमापक (गट क) या पदाच्या 1,268 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत. तर, मराठी भाषा विभागातील सहायक भाषा संचालक (गट ब) पदासाठी एक उमेदवार, औषधी द्रव्ये (गट ब) वैज्ञानिक अधिकारी या पदाचे 5 उमेदवार, राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट क) या पदाचे 114 उमेदवार, परिवहन विभागातील सहायक मोटर वाहन निरीक्षक (गट क) या पदाचे 177 उमेदवार, वित्त विभागातील राज्यकर निरीक्षक (गट क) 697 उमेदवार, विधि व न्याय विभागातील अवर सचिव (गट अ) या पदाचे 11 उमेदवार, सार्वजनिक आरोग्य विभागातील (गट अ) पदाच्या 224 उमेदवार अशा एकूण 2497 उमेदवारांपैकी 2002 उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करुन नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कीटकनाशक उद्योगाने सादर केलेल्या सुरक्षितता आणि परिणामकारकता यावरील भरीव माहितीच्या आधारे नियुक्त तज्ज्ञ समितीमार्फत २७ कीटकनाशकांचा व्यापक आढावा घेतल्यानंतर भारत सरकारने २४ कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अल्पभूधारक शेतकाऱ्यांसह संपूर्ण कृषी समुदायाने स्वागत व कौतुक केले आहे, कारण ते या उत्पादनांचा गेल्या दशकांपासून अनेक पिकांवर सुरक्षितपणे वापर करीत आहेत.
ही कीटकनाशके भारतात उत्पादित होत असल्याने भारतीय शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी किफायतशीर किंमतीत तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची हमी या निर्णयामुळे राहील.
या अत्यंत महत्त्वाच्या कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय शेतीची वास्तविकता आणि शेतकऱ्यांना किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध असण्याची गरज दर्शवितो कारण प्रचंड महागड्या आयात केलेल्या पर्यायी कीटकनाशकांच्या तुलनेत आपलेच, परवडणाऱ्या किंमतीतील तंत्रज्ञान वापरुन दर्जेदार व किफायतशीर अन्न उत्पादन करण्याची आज आवश्यकता आहे.
पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि चांगले पीक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशके उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत देशभरातली शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या महत्त्वाच्या २४ कीटकनाशकांचा वापर चालू ठेवणे भारताच्या अन्न उत्पादन प्रणालीचे रक्षण करण्याच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे आणि त्याचबरोबर यामुळे हे शेतकरी कार्यक्षमतेने आणि शाश्वतपणे अन्न उत्पादन करणे सुरू ठेवू शकतात.
हरयाणा येथील अंबाला शेतकरी उत्पादन संस्थांचे संचालक श्री. गवनीत सिंग म्हणाले, “शेतकरी म्हणून आम्ही जाणतो की आमच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि चांगले पीक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशकांचा वापर करणे किती महत्वाचे आहे. सरकारचा हा निर्णय एक सकारात्मक पाऊल आहे कारण या कीटकनाशकांची राज्य कृषी विद्यापीठांकडून शिफारस केली जात आहे आणि शेतकऱ्यांना पिकांवर त्यांचा सुरक्षितपणे वापर करण्याचा अनुभव आहे.”
हरियाणा येथील पेहोवा शेतकरी उत्पादन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हरप्रीत सिंग म्हणाले, “उत्पादन आणि उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे. आम्ही या कीटकनाशकांसोबत काम केले आहे आणि त्यांच्या कामगिरीवर आमचा विश्वास आहे. अन्य कोणत्याही पर्यायांचा स्वीकार करावा लागल्यास त्याचा आमच्या इन्पुट खर्चावर आणि एकूण उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.”
आपले अन्न पुरवठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी कीटक आणि रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. या २४ महत्त्वपूर्ण कीटकनाशकांचा वापर चालू ठेवणे ही एक आवश्यक पायरी आहे, कारण या कीटकनाशकांचा वापर तुलनेने नवीन उत्पादनांसाठी संभाव्य तण, कीटक व रोगांविरूद्ध प्रतिरोधक व्यवस्थापनासाठी मिश्रण म्हणून देखील केला जातो.
किडे आणि कीटके गोदामांमध्ये साठवलेल्या धान्यांसह २० ते ३० % एवढे पिकांचे नुकसान करू शकतात. गहू, तांदूळ, कडधान्ये आणि तेलबियांमधील साठवण कीडपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या कीटकनाशकांचा वापर धान्य साठवणुकीसाठी स्मार्ट फ्युमिगंट्स म्हणून केला जातो.
भारत सरकारने कीटकनाशकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापरासाठी ड्रोनच्या वापरास आधीच मान्यता दिली आहे. आपल्या अन्न पुरवठ्याची गुणवत्ता व सुरक्षितता राखण्यासाठी कीटक आणि रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. कीटकनाशके विशिष्ट कीटक व रोगांनाच केवळ लक्ष्य करण्यासाठी तशा पद्धतीने काळजीपूर्वक तयार केली जातात आणि त्यांचा वापर केल्याने लक्ष्य नसलेल्या जीवांना आणि पर्यावरणाला पोहोचू नये याची खात्री करण्यासाठी कठोरपणे नियम केले जाते.