Home Blog Page 1551

“सासूबाई जोरात’२६ मे पासून

संदीप पाठक, सयाजी शिंदे, मोहन जोशी, विजय पाटकर यांच्या प्रमुख भूमिका

  • सिद्धार्थ प्रभाकर ढगे दिग्दर्शित चित्रपट २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं “सासूबाई जोरात” हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

“सासुबाई जोरात” ही गोष्ट आहे आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची. या सासूला तिच्या नवऱ्याचीही चिंता नाही. त्याशिवाय ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्यात काय होतं याची धमाल गोष्ट सासूबाई जोरात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या अनेक प्रकारच्या लढाया आजवर चित्रपट मालिकांतून पाहिल्यानंतर आता सासु-जावयाची धमाल गोष्ट चित्रपटात पाहणं हा मनोरंजक अनुभव ठरेल यात शंकाच नाही. त्याशिवाय चित्रपटात उत्तम स्टारकास्ट असल्यानं हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल.

संरक्षण राज्य मंत्र्यांनी सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात तांत्रिक संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे केले उद्घाटन

सुरळीत कामकाजासाठी आणि वाढीव पारदर्शकतेसाठी एक सॉफ्टवेअर केले लाँच; बीआरओ आणि जीआरएसईने स्वदेशी श्रेणी 70R डबल लेन मॉड्युलर पुलांच्या बांधकामासाठी केला सामंजस्य करार

नवी दिल्‍ली, 7 मे 2023

सीमा रस्ते संघटना (BRO) ने 07 मे 2023 रोजी देशभरातील सर्व केंद्रांमध्ये आपला 64 वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्ताने मुख्य कार्यक्रमाचा भाग म्हणून पुण्यातील सीमा रस्ते संघटना शाळा आणि केंद्रात मुख्य अभियंते आणि उपकरणे व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली होती. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या कार्यक्रमात उपस्थित होते. स्थापना दिवसानिमित्त, संरक्षण राज्य मंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील केंद्राच्या आवारात बीआरओ तांत्रिक प्रशिक्षण संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे उद्घाटन झाले. या सुविधांमुळे सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांचा प्रशिक्षण दर्जा सुधारेल आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी ते अधिक चांगल्या प्रकारे सज्ज होण्यास मदत होईल.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केलेले बीआरओ-केंद्रित सॉफ्टवेअरही यावेळी लॉन्च करण्यात आले. बीआरओ च्या कामकाजाचे विविध पैलू स्वयंचलित करण्यासाठी तसेच सुरळीत आणि जलद काम व्हावे यासाठी आणि वाढीव पारदर्शकतेसाठी रिक्रूटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट बुक आणि वर्क मॅनेजमेंट सिस्टीम हे तीनही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहेत.

याशिवाय, स्वदेशी वर्ग 70R डबल लेन मॉड्युलर पुलांच्या बांधकामासाठी बीआरओ आणि जीआरएसई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हे पूल सशस्त्र दलांच्या कार्यान्वयन तयारीला चालना देण्यासाठी मदत करतील.

एक संस्था म्हणून उत्तरोत्तर विकास साधण्यासाठी सीमा रस्ते संघटनेने ‘बीआरओ व्हिजन@2047’ वरील मोनोग्राफसह अनेक दस्तऐवजांची संकल्पना केली आहे. यामध्ये, रस्त्यालगतच्या घोषवाक्यांचे संकलन; वैद्यकीय आस्थापनांची सुधारणा आणि मानकीकरण; बीआरओ मालमत्तेचे निरीक्षण करण्यासाठी उपग्रहांच्या वापरासह संरक्षण उत्कृष्टतेसाठीच्या (iDEX) नवकल्पनांची गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा आणि पुलांची रचना तसेच समस्या समाधान यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क संचालनालयाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘सैनिक समाचार’ या पाक्षिकाच्या विशेष बीआरओ आवृत्तीचे देखील संरक्षण राज्यमंत्र्यांनी प्रकाशन केले. या आवृत्तीमध्ये बीआरओच्या आजवरच्या कामगिरींची माहिती, निर्माणाधीन प्रकल्प आणि बीआरओ चा इतिहास प्रकाशित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी 10 एप्रिल 2023 रोजी सुरू झालेल्या ‘एकता अवाम श्रद्धांजली अभियान’ या मोहिमेला झेंडा दाखविला. या साहसी-जागरूकता मोहिमेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या सर्व घटकांना एकत्र आणण्यात आले होते. मोटार-सायकल आणि चार-चाकी वाहनांचा समावेश असलेल्या या मोहिमेमध्ये विविध सीमावर्ती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील टीमनी मातीचे नमुने, नद्या/तलाव/जलसाठे आणि स्थानिक रोपे यांचे नमुने गोळा केले. भट्ट आणि इतरांनी बीआरओ शाळा आणि केंद्रात रोपांची लागवड केली.

बीआरओच्या सर्व श्रेणींतील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची समर्पण भावना आणि त्यांच्या कठोर परिश्रमाची अजय भट्ट यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली. बीआरओच्या जवानांनी बांधलेले रस्ते, पूल आणि बोगद्यांमुळे केवळ सशस्त्र दलांची सज्जता वाढली नाही तर सीमावर्ती भागांचा सामाजिक-आर्थिक विकास व्हायलाही मदत झाली आहे, असे ते म्हणाले. सेला बोगदा आणि नेचिफू बोगदा प्रकल्पातील लक्षणीय प्रगतीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवभारत अभूतपूर्व वेगाने प्रगती करत आहे, असे मत त्यांनी पुढे व्यक्त केले. “आपण पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि अनेक देशांना आपण लष्करी उपकरणे निर्यात करत आहोत. हा नवभारत मजबूत आहे आणि स्वतःचे हित जपण्यासाठी सक्षम आहे. आम्ही कोणापुढे झुकत नाही आणि झुकणार नाही”, असे ते म्हणाले.

सर्व पदांवर जोमाने आणि समर्पणाने काम सुरू ठेवण्याचे आवाहन बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी केले. ‘आम्ही एक तर मार्ग शोधू किंवा एक नवीन मार्ग तयार करू’ या मंत्राच्या अनुषंगाने बीआरओ उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीआरओ 60 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून या संघटनेने भारताच्या सीमेवर तसेच भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानसह परदेशी मित्र देशांमध्ये 61,000 किलोमीटरहून अधिक रस्ते, 900 हून अधिक पूल, चार बोगदे आणि 19 हवाई क्षेत्रे बांधली आहेत.

2022-23 मध्ये बीआरओने 103 पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले. एका वर्षात या संस्थेने बांधलेले हे  सर्वात जास्त प्रकल्प आहेत. यामध्ये पूर्व लडाखमधील श्योक ब्रिज आणि अरुणाचल प्रदेशमधील अलोंग-यिंकिओंग रोडवरील लोड क्लास 70 च्या स्टील आर्क सियोम ब्रिजच्या बांधकामाचा समावेश आहे. हे आणि यासारखे इतर धोरणात्मक महत्त्वाचे प्रकल्प संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्राला समर्पित केले आहेत.

अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

मुंबई, दि. ७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत.

११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती दिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुदत कर्ज योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायांना प्रथम प्राधान्य देऊन ३.२० लाख रुपयंपर्यंतचे कर्ज मंजूर करुन मंजुरीपत्र लाभार्थ्यांना निर्गमित करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील ७८३ लाभार्थ्यांना आतापर्यंत मंजुरीपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्ज मंजुरीपत्र निर्गमित केलेल्या लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरुन स्थळपाहणी करण्याच्या सूचना कर्जवितरण अधिकारी व कर्जवसुली अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. दस्तऐवजांची पुर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्दतीने कर्ज परतफेडीसंदर्भातील बँकेकडील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कर्ज रकमेचे त्वरित वितरण करण्यात येईल, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली.

योजनेला अल्पसंख्याक समाजाचा मिळालेला प्रतिसाद विचारात घेता प्राप्त झालेल्या अर्जावर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी ३१ मे २०२३ पर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी ३१ मे २०२३ नंतर पुढील आदेश होईपर्यंत या योजनेअंतर्गत नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 हजार 553 प्रस्ताव जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहे. यामध्ये मुंबईतून 4 अर्ज, ठाणे 1, रायगड 2, पुणे 84, सोलापूर 44, सातारा 12, सांगली 10, कोल्हापूर 102, नाशिक 7, नंदुरबार 15, धुळे 29, जळगाव 101, अहमदनगर 42, औरंगाबाद 96, परभणी 173, बीड 215, लातूर 53, जालना 82, हिंगोली 43, नांदेड 9, उस्मानाबाद 61, अमरावती 18, वाशिम 54, बुलढाणा 157, यवतमाळ 97, अकोला 27, नागपूर १३ तर वर्धा जिल्ह्यातून 2 अर्ज जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत

मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे,तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ..म्हणाले मुरलीधर मोहोळ

आदित्य ठाकरे यांच्या बालभारती-पौडफाटा रस्त्याबाबतच्या भूमिकेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका…

पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही !

पुणे – टेकड्या ,नद्या ,नाले आणि एकूणच निसर्गाबद्दल काळजी घ्या,विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस करू नका असे सांगत पुण्यात वेताळ टेकडी ला शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी भेट दिल्यावर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरेंना टीकेचे लक्ष्य करत म्हटले आहे कि,’आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडला होता. स्वतःच्या ‘इगो’पायी मुंबईकरांच्या डोक्यावर १० हजार कोटींचा बोजा आला.पर्यावरणाचं रक्षण आणि ज्वलंत नागरी प्रश्नांची सोडवणूक यांचा समतोल न राखता येणाऱ्यांनी पुण्यात येऊन अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही बोलावे, हा मोठा विनोद आहे.

मोहोळ यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’आदित्यजी, मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ आहे. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका.नदीकाठसुधार आणि बालभारती-पौडफाट रस्ता हे दोन्ही विकास प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊनच पुढे नेण्यात येत आहेत. तरीही यावर काही पुणेकरांचे आक्षेप असल्यावर त्यावर निश्चितच सुचनांचा विचार करुन पुढे जाऊ.पण बालभारती-पौडफाटा रस्ता रद्दच करण्याची मागणी करण्याचा आदित्य यांना नैतिक अधिकार काय? केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्याच्या प्रयत्नांना सुज्ञ पुणेकर थारा देणार नाहीत.

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

चंद्रपूर,दि.७ : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्‍या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वनविभागाने बोपचे यांच्‍या कुटूंबास ५ लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते प्रदान केला.

यावेळी देवराव भोंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कारेकर,  माजी उपमहापौर राहूल पावडे, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, दिनकर सोमलकर, डॉ. गिरीधर येडे, मनोज पोतराजे, पप्‍पु बोपचे, प्रलय सरकार, आशिष ताजने व त्‍या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यापुढील मदतीची रक्‍कम या कुटूंबाला लवकरात लवकर देण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले.

लोकेश, अदिती काळे, अदिती रोडे अंतिम फेरीत

एसएबीए कप बॅडमिंटन स्पर्धा, सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आयोजन
पुणे : लोकेश जांगीड, अदिती काळे आणि अदिती रोडे यांनी सुधांशू बॅडमिंटन अॅकॅडमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लोकेशने आनंद साबूवर १५-८, १५-९ अशी मात केली. लोकेशची आता विजेतेपदासाठी अथर्व घाणेकरविरुद्ध लढत होईल. अथर्वला दुस-या उपांत्य फेरीत गुरुप्रसाद राऊतविरुद्ध पुढे चाल मिळाली.

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अदिती काळेने प्रिया बोरसेवर १५-३, १५-७ असा विजय मिळवला, तर अदिती रोडेने मनाली देशपांडेला १५-५, १५- ८ असे नमविले. अदिती काळेला तिहेरी मुकुटाची संधी आहे. तिने मिश्र दुहेरीत ऋतुराज देशपांडेच्या साथीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अदिती काळे-ऋतुराज देशपांडे जोडीने उपांत्य फेरीत मिहिर रतनजांकर-अदिती रोडे जोडीला १५-४, १५-१  असे नमविले. यानंतर महिला दुहेरीत अदिती काळे राधिनी भामेरेच्या साथीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिला उपांत्य फेरीत पुढे चाल मिळाली आहे.  

निकाल – पुरुष एकेरी – उपांत्यपूर्व फेरी – गुरुप्रसाद राऊत वि. वि. आकाश भालेकर १५-८ १५-११, अथर्व घाणेकर वि. वि. सुशांत पाटील 1१५-९ १५-११, लोकेश जांगीड वि. वि. हिमांशू मेहरा १५-५ १५-६, आनंद साबू वि. वि. विशाल खिरे १५-८ १५-७. 

पुरुष एकेरी – ३० वर्षांवरील – उपांत्य फेरी – ओंकार केळकर वि. वि. शांतनू पाटील १४-१६, १७-१५, १५-१३, सुशांत पाटील वि. वि. विपूल अन्वेकर १५-९ १५-११.

३५ वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी – आनंद साबू वि. वि. अजिंक्य धर्माधिकारी १७-१५ १५-९, अक्षय गद्रे वि. वि. शांतनू पाटील १५-६ १५-३.

४० वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी – सारंग व्यास वि. वि. सलिल गाडगीळ १५-१० १५-७, दिगांत गुप्ता वि. वि. श्रीकांत वाडेकर १५-११ १५-१२ 

रोझ, भूमिका, तन्मय अंतिम फेरीत

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा; गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन
पुणे: रोझ सय्यद, भूमिका खिलारे, तन्मय कांबळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा शुक्रवार पेठेतील नातू बाग मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेतील ज्युनियर मुलींच्या ४८  ते ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत रोझ सय्यदने शिखा यादववर मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. रोझच्या आक्रमक खेळासमोर शिखाचा निभाव लागला नाही. शिखाची आता सुवर्णपदकासाठी भूमिका खिलारेविरुद्ध लढत होईल. भूमिकाने दुस-या उपांत्य लढतीत ईशप्रीत कटारियावर ५-० ने मात केली.

यानंतर सब-ज्युनियर मुलांच्या ३५ ते ३७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तन्मय कांबळेने सुहम जाधवला ४-१ ने पराभूत केले. आता तन्मयची विजेतेपदासाठी रणवीर कटारियाविरुद्ध लढत होईल. दुस-या उपांत्य फेरीत रणवीरने प्रभू छलवाडीवर ५-० ने विजय मिळवला.

निकाल : उपांत्य फेरी – सब ज्युनियर मुली – ३५ ते ३७ किलो – श्रावणी गायकवाड वि. वि. संध्या सोनवाल, सोनिया सूर्यवंशी वि. वि. श्रेया धांधर. ३७ ते ४० किलो – आर्या गर्दे वि. वि. वेधा शिंदे, झिनत शेख वि. वि. आर्या कोंडके. ४० ते  ४३ किलो – माही शिंदे वि. वि. आराध्या पवार, प्रांजल आठवले वि. वि. आर्या पगारे. ४३ ते  ४६ किलो – साशा हरपाळे वि. वि. ओवी पावले, सृष्टी दोडमिसे वि. वि. ईशिका मंडल.

ज्युनियर मुली – ४४ ते ४६ किलो – अक्षदा जाधव वि. वि. तनीषा कांबळे, सृष्टी चोरगे वि. वि. जान्हवी घोडे. ४६ ते ४८ किलो – तनिष्का कांबळे वि. वि. समिक्षा सूर्यवंशी, ज्ञानदा जमादार वि. वि. खुशी तरडेल. ५० ते ५२ किलो – रिया कुटे वि. वि. आकांक्षा पोलकम, एलिझा झोव्हिस वि. वि. नयना गवळी.

एलिट मुली – ५२ ते ५४ किलो – अनुराधा वि. वि. मुनवी ओव्हाळ, खुशी परदेशी वि. वि. साक्षी वाडेकर. ५४ ते ५७ किलो – प्रियान शिर्के वि. वि. हर्षदा लोहत, ऋतुजा रणदिवे वि. वि. सिद्धी उजागर. ५७ ते ६० किलो – राखी घाडगे वि. वि. श्रद्धा पगारे, तेजवीर सहोटा पुढे चाल वि. ऋतुजा काळे. ६० ते ६३ किलो – गौरी साकळे वि. वि. दीक्षा राक्षे, काया चौधरी वि. वि. श्रावणी काटकर.

सब-ज्युनियर मुले – ३७ ते ४० किलो – आर्यन सरतापे वि. वि. सुयश धेंडे, वेदांत भिलारे वि. वि. कल्पेश बिका. ४० ते ४३ किलो – प्राश्ती मोरे वि. वि. सुयश कोंढाळकर, निखिल पाल वि. वि. नीरज गायकवाड. ४३ ते ४६ किलो – शौर्य द्विवेदी वि. वि. प्रितेश राठोड, साईराज चौधरी वि. वि. साद खान. ४६ ते ४९ किलो – साद शेख वि. वि. आर्यन सोनावणे, उदय घोरपडे वि. वि. यशदानी शेख. ४९ ते ५२ किलो – क्षिती जाधव वि. वि. आयुष पवार, निमिष हुबळीकर वि. वि. शिवम भोईर.

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

मुंबई, दि. ७ : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले, त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार, 229 चर्चासत्रांमध्ये तब्बल 546 वर विचारले प्रश्न

पुणे-

संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.

संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या प्रख्यात इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. या अहवालात संसदेतील नोंदींनुसार खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या. विद्यमान १७ व्या लोकसभेचा अहवाल आहे. यात २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, प्रश्न किती विचारले व त्यांची सभागृहात उपस्थिती किती होती, अशी सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणी केली. खासदार सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या.

देशात लोकशाही आहे, पण लोकशाही वृत्ती हवी : प्रा. अविनाश कोल्हे

पुणे- भारतीय घटना निर्मितीनंतर कालानुरूप बदल स्वीकारत आपण गेलो आहोत. घटनेत सुधारणांना वाव ठेवला आहे. घटनेमुळे देश म्हणून आपण प्रगल्भ होत गेलो आहोत. देशात लोकशाही आहे पण, नागरिकांनी लोकशाही वृत्ती बाणविण्याची गरज आहे ‘, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अविनाश कोल्हे यांनी येथे केले.

‘लोकशाहीला वाचविणे हे घटनेच्या मूलभूत रचनेमुळेच शक्य आहे. कितीही खासदार निवडून आले तरी ही मूलभूत बांधणी, रचना टिकून राहिल ‘, असेही प्रा. कोल्हे यांनी सांगीतले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने ‘भारतीय संविधानाची वैशिष्टये ‘ या विषयावर राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवन ,कोथरूड येथे हे व्याख्यान शनिवार, ६ मे २०२३ रोजी दुपारी २ ते ४ दरम्यान झाले. ‘ संविधान अभ्यासवर्ग ‘ या उपक्रमांतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले .

सचिन पांडुळे यांनी स्वागत केले. प्रा. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.

डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ. उर्मिला सप्तर्षी, सिसिलीया कार्व्हालो, अरुण गद्रे, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रा. कोल्हे म्हणाले, ‘अमेरिकेची घटना ही जगातील पहिली लिखित घटना आहे. भारतीय घटना करताना ६० घटनांचा अभ्यास ३०० जणांच्या घटना समितीने केली.भारतीय घटना तयार करीत असताना प्रत्येक शब्दावर चर्चा घडलेली आहे.भारतीय लोकप्रतिनिधी हे भारतीय राज्यघटनेला उत्तरदायी आहेत.संसदेपेक्षा घटना सर्वोच्च आहे.घटनेत दिलेले मूलभूत हक्क हे बलस्थान आहे. अधिकाराबरोबर जबाबदारी दिलेली आहे.मूलभूत अधिकारावर गदा आली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.सर्वोच्च न्यायालयाला अन्यायाची दखल स्वतःहून घेता येते,जनहित याचिका दाखल करता येते. जागतिक न्यायव्यवस्थेत ही अतिशय दुर्मीळ गोष्ट आहे.

‘भारतात नागरी कायदा, विवाह कायदा अशा अनेक बाबतीतील कायद्यात सुधारणांना वाव आहे. मूलभूत हक्कांबरोबर मूलभूत कर्तव्येदेखील नागरिकाची जबाबदारी अधोरेखित करते.लोकशाही आहे पण, लोकशाही वृत्ती बाणविण्याची गरज आहे ‘, असेही प्रा. कोल्हे यांनी शेवटी सांगितले.

‘ लोकशाही वाचवणे हे लोकांच्या हातात आहे.आणीबाणी विरोधी आंदोलनात नागरिकांनी लोकशाही वाचवून दाखवली आहे. आताही कसोटीच्या कालखंडात आपण भारतीय नागरिक म्हणून कमी पडणार नाही. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ची ‘ गांधी दर्शन शिबिरे ‘ हा त्यातील जनजागृतीचा प्रयत्न आहे. ‘ असे प्रतिपादन डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले.

हडपसरमधील बड्या हस्तीकडून महिला डॉक्टरचा विनयभंग प्रकरण सीआयडीकडे देण्याची मागणी

महिला डॉक्टरांच्या बाबत असुरक्षिता: वैद्यकीय क्षेत्रातून संताप

पुणे-बस स्थानकावर ,रस्त्यावर महिलांना चोरट्यांची भीती तर आहेच ,टवाळ पोरांची भीती आणि आता बड्या म्हणविल्या जाणाऱ्या लोकांकडून तर वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर महिलांसाठी देखील हडपसर मध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होतेय कि काय अशी स्थिती आहे. गुन्हे दाखल करताना पोलिसांनी दबावाला बळी पडू नये असे सांगणारे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आता या वातावरणाबद्दल संताप व्यक्त करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .आणि हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिला डॉक्टर च्या विनयभंगाचा गुन्ह्याची आता सीआयडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे . पोलीस आयुक्त आता तरी यात लक्ष घालणार काय असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

एका तीस वर्षीय महिला डॉक्टरचा वेळोवेळी पाठलाग करून, जवळीक साधण्याचा प्रयत्न करत महिलेस मारहाण करून तिली व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस हडपसर पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी अटक केली .अतुल वसंत घुले (वय – 42 ,राहणार- मांजरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी दिल्ली पर्यंत संबध असणाऱ्या एका बड्या उद्योजकाशी संबधित असल्याचे समजते आहे.याबाबत ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मार्च 2022 ते 30/ 4/2023 यादरम्यान घडलेला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांचे मांजरी येथे क्लिनिक असून सदर आरोपीचे जवळपासच्या परिसरात मोठे हॉटेल देखील आहे. आरोपी हा वारंवार काहीतरी कारण काढून तक्रारदार यांच्या क्लिनिकवर येऊन बोलत बसत त्यांना त्रास देत होता.

पीडित महिलेच्या क्लिनिकमध्ये येत आरोपीने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेचा हात पकडून तिला मारहाण करून भिंतीवर ढकलून देत अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांवर मोठा दबाव असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून खाजगीत सांगितले जाते आहे. पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव याबाबत पुढील तपास करत आहेत.

बाणेरमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील:चंद्रकांतदादा पाटील

स्वच्छ कोथरुड मतदारसंघासाठी नेहमीच कटिबद्ध

थेट भेटच्या माध्यमातून बाणेरमधील नागरिकांशी संवाद

पुणे:कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून, त्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून कोथरुड मधील प्रत्येक भागात स्वच्छता राखली जाईल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच बाणेरमधील नागरिकांसाठी नाट्यगृह उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी आश्वास्त केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील नागरिकांशी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाअंतर्गत आज बाणेरमधील मॉर्निंग वॉकसाठी मुरकुटे गार्डन येथे येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, सचिन दळवी, प्रकाशतात्या बालवडकर, यांच्या सह भाजपाचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार पाटील म्हणाले की, कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे इथला प्रत्येक भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन केल्यानंतरही काही भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात, असे एकूण ७८ ठिकाणे निदर्शनास आली असून, सदर भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन केल्यानंतर ही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे लोकसहभागातून ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून सदर भागातील कचरा संकलित केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, बाणेर मधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेसोबत सततच्या पाठपुराव्यामुळे समान पाणीपुरवठा योजने काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे बाणेरमधील पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी नागरिकांनी बाणेरमध्ये मनोरंजनासाठी नाट्यगृह उभारावे, भागात ठिकठिकाणी टाकलेला राडारोडा, मुरकुटे गार्डन येथे मोठे विश्रांतीस्थान, अवैध फेरीवाले यामुळे होणारा त्रास, स्वच्छता गृहे आदी समस्या मांडल्या. सदर समस्यांचे तातडीने निवारण केले जाईल, असे यावेळी आश्वास्त केले. तसेच यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण: भाजपा खासदारावर कारवाई साठी आप ची निदर्शने

पुणे -शहरआम आदमी पक्षातर्फे आज अलका चौक येथे भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रिज भूषण सिंग यांनी भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंवर केलेल्या लैंगिक शोषणाविरोधात अलका चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला.आज भारत देशाचे नाव सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी या खेळाडूंनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. या ब्रिजभूषण ला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या देशात आपल्या मुली सुरक्षित नाहीत, गेले अनेक दिवसांपासून अलॉम्पिक विजेते खेळाडू उपोषणासाठी बसले आहेत त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली

या आंदोलनात राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, सुरेखा भोसले, मिताली वडावराव, माधुरी गायकवाड, सुनिता काळे, वैशाली डोंगरे, श्रद्धा शेट्टी, मिरा बिघे, सुनिता शेरखाने, शमीम पठाण, मीना नावस्कर, अंजली इंगळे, फाबियन सेमसन, साहिल परदेशी, शिवाजी डोलारे, अमोल काळे, गणेश थरकुडे, उत्तम वडावराव, गणेश ढमाले, किशोर मजुमदार, निलेश वांजळे, विरेंद्र बीघे, हेमंत बिघे, राजु परदेशी, आनंद अंकुश, किरण कद्रे, शेखर ढगे, प्रशांत कांबळे, संजय कतरनवरे, विकास चव्हाण, मनोज शेट्टी, अविनाश भाकरे, सर्फराज मोमीन, चेंथील अय्यर, सुजित अग्रवाल, ऋतुज बिघे, शंकर थोरात, किरण कांबळे, रामभाऊ इंगळे, कुमार धोंगडे, सुनील भोसले, घनश्याम मरणे, सूरज सोनावणे हे उपस्थित होते.

विकासाच्या नावाने निसर्गाचा बळी देता कामा नये अन्यथा फळे भोगावी लागतील – आदित्य ठाकरे

पुणे : विकासाच्या योजनांच्या नावाने पुण्यातील टेकड्या , नद्या , नाले आणि एकूणच निसर्गाचा बळी देता कामा नये अन्यथा आपल्यालाच त्याची फळे भोगावी लागतील असा स्पष्ट इशारा आज आदित्य ठाकरे यांनी येथे दिला .कात्रजच्या टेकड्या असो कि वेताळ टेकडी असो सर्व टेकड्या आणि नद्या नाले यांचे अस्तित्व मिटविणाऱ्या योजना राबवू

पुण्यातील नदी सुधार प्रकल्प,वेताळ टेकडी, मुंबईतील आरे,बारसू या सर्व ठिकाणी सध्या जी काही परिस्थिती दिसत आहे.त्यातून एकच म्हणावे लागले की, जनते विरुद्ध हुकुमशाही दिसत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात जिथे कुठे प्रकल्प सुरू असतील. त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या त्या प्रकल्पाबाबत मनात नेमक्या काय भावना आहेत. त्याबद्दल महापालिका प्रशासनाने राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यानंतरच पुढील पावल उचलली पाहिजे. अन्यथा एखाद्या दिवशी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुण्यातील वेताळ टेकडी टिकली पाहिजे. अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली.वेताळ टेकडी येथील प्रस्तावित असलेल्या बालभारती ते पौडफाटा रस्ता, दोन बोगदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी पुण्यात वेताळ टेकडी कृती समितीच्या वतीने मागील महिन्यात वेताळ बाबा चौक ते खांडेकर चौक दरम्यान लाँग मार्च काढण्यात आला होता. त्या लाँग मार्चमध्ये शहरातील विविध भागातील पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वेताळ टेकडीवर जाऊन परिसराचा पाहणी केल्यावर पर्यावरण प्रेमी सोबत चर्चा केली होती. या सर्व घडामोडी दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे पुणे दौर्‍यावर आज आले होते. त्यावेळी त्यांनी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली.

त्यावेळी पर्यावरण प्रेमी सोबत चर्चा केल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की,यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की,मागील सहा ते सात महिन्यात आपल्या राज्यात भ्रष्ट्राचार आणि अनियमितता आहे. विकासाचा आणि स्थानिक नागरिकाचा विचार न करता लाठी काठी, दमदाटीने सर्व प्रकार सुरू आहे. आपल्यासाठी ते भयानक असल्याच सांगत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
तसेच ते पुढे म्हणाले की, नदी सुधार प्रकल्पादरम्यान एकही झाड काढले जाणार नसल्याचे सुरुवातीच्या काळात सांगण्यात आले होते. पण आता जवळपास ७ हजार झाड काढली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. हे कशा प्रकारे रोखता येईल हे पाहणे जरुरीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“अजित पवार आता शांत बसणार नाहीत…”, अंजली दमानियांचा मोठा दावा

मुंबई-अजित पवारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. परंतु मला नाही वाटत ते इतके शांत बसतील. येत्या काही दिवसात, किंवा काही महिन्यात, कदाचित दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदरांना एकत्र करून मोठा दगाफटका करतील यात काही शंका नाही असे वक्तव्य आप च्या नेत्या अंजली दमानिया यांनी येथे केला आहे..

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी म्हणजेच ५ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. ३ मे रोजी त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. राजीनामा मागे घेताना शरद पवार म्हणाले, मी तुम्हा सगळ्यांच्या भावनांचा अपमान करु इच्छित नाही. माझा निवृत्ती घेण्याचा निर्णय ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.” दरम्यान, शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा करण्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार अनुपस्थित होते. यावरुन वेगवेगळ्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नसल्याबाबत खुद्द शरद पवारांनीच स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले की, “प्रत्येकजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत, तर काही लोक इथे उपस्थित नाहीत.”

दरम्यान, अजित पवारांबाबत सातत्याने वेगवेगळे दावे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक मोठा दावा केला आहे. दमानिया म्हणाल्य की, अजित पवारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. परंतु मला नाही वाटत ते इतके शांत बसतील. येत्या काही दिवसात, किंवा काही महिन्यात, कदाचित दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदरांना एकत्र करून मोठा दगाफटका करतील यात काही शंका नाही.दमानिया म्हणाल्या, या सर्व राजकारण्यांनी राजकारणाचा उकिरडा करून ठेवला आहे. यावेळी दमानिया यांना विचारण्यात आलं की, शरद पवार आता पुन्हा राजीनामा देतील का? या प्रश्नावर दमानिया म्हणाल्या, मला नाही वाटत शरद पवार आता राजीनामा द्यायच्या फंदात पडतील. परंतु ते कधीही आणि काहीही करू शकतात.