एसएबीए कप बॅडमिंटन स्पर्धा, सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आयोजन
पुणे : लोकेश जांगीड, अदिती काळे आणि अदिती रोडे यांनी सुधांशू बॅडमिंटन अॅकॅडमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लोकेशने आनंद साबूवर १५-८, १५-९ अशी मात केली. लोकेशची आता विजेतेपदासाठी अथर्व घाणेकरविरुद्ध लढत होईल. अथर्वला दुस-या उपांत्य फेरीत गुरुप्रसाद राऊतविरुद्ध पुढे चाल मिळाली.

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अदिती काळेने प्रिया बोरसेवर १५-३, १५-७ असा विजय मिळवला, तर अदिती रोडेने मनाली देशपांडेला १५-५, १५- ८ असे नमविले. अदिती काळेला तिहेरी मुकुटाची संधी आहे. तिने मिश्र दुहेरीत ऋतुराज देशपांडेच्या साथीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अदिती काळे-ऋतुराज देशपांडे जोडीने उपांत्य फेरीत मिहिर रतनजांकर-अदिती रोडे जोडीला १५-४, १५-१ असे नमविले. यानंतर महिला दुहेरीत अदिती काळे राधिनी भामेरेच्या साथीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिला उपांत्य फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

निकाल – पुरुष एकेरी – उपांत्यपूर्व फेरी – गुरुप्रसाद राऊत वि. वि. आकाश भालेकर १५-८ १५-११, अथर्व घाणेकर वि. वि. सुशांत पाटील 1१५-९ १५-११, लोकेश जांगीड वि. वि. हिमांशू मेहरा १५-५ १५-६, आनंद साबू वि. वि. विशाल खिरे १५-८ १५-७.
पुरुष एकेरी – ३० वर्षांवरील – उपांत्य फेरी – ओंकार केळकर वि. वि. शांतनू पाटील १४-१६, १७-१५, १५-१३, सुशांत पाटील वि. वि. विपूल अन्वेकर १५-९ १५-११.
३५ वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी – आनंद साबू वि. वि. अजिंक्य धर्माधिकारी १७-१५ १५-९, अक्षय गद्रे वि. वि. शांतनू पाटील १५-६ १५-३.
४० वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी – सारंग व्यास वि. वि. सलिल गाडगीळ १५-१० १५-७, दिगांत गुप्ता वि. वि. श्रीकांत वाडेकर १५-११ १५-१२