महिला डॉक्टरांच्या बाबत असुरक्षिता: वैद्यकीय क्षेत्रातून संताप
पुणे-बस स्थानकावर ,रस्त्यावर महिलांना चोरट्यांची भीती तर आहेच ,टवाळ पोरांची भीती आणि आता बड्या म्हणविल्या जाणाऱ्या लोकांकडून तर वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर महिलांसाठी देखील हडपसर मध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होतेय कि काय अशी स्थिती आहे. गुन्हे दाखल करताना पोलिसांनी दबावाला बळी पडू नये असे सांगणारे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आता या वातावरणाबद्दल संताप व्यक्त करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .आणि हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिला डॉक्टर च्या विनयभंगाचा गुन्ह्याची आता सीआयडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे . पोलीस आयुक्त आता तरी यात लक्ष घालणार काय असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
एका तीस वर्षीय महिला डॉक्टरचा वेळोवेळी पाठलाग करून, जवळीक साधण्याचा प्रयत्न करत महिलेस मारहाण करून तिली व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस हडपसर पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी अटक केली .अतुल वसंत घुले (वय – 42 ,राहणार- मांजरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी दिल्ली पर्यंत संबध असणाऱ्या एका बड्या उद्योजकाशी संबधित असल्याचे समजते आहे.याबाबत ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मार्च 2022 ते 30/ 4/2023 यादरम्यान घडलेला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांचे मांजरी येथे क्लिनिक असून सदर आरोपीचे जवळपासच्या परिसरात मोठे हॉटेल देखील आहे. आरोपी हा वारंवार काहीतरी कारण काढून तक्रारदार यांच्या क्लिनिकवर येऊन बोलत बसत त्यांना त्रास देत होता.
पीडित महिलेच्या क्लिनिकमध्ये येत आरोपीने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेचा हात पकडून तिला मारहाण करून भिंतीवर ढकलून देत अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांवर मोठा दबाव असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून खाजगीत सांगितले जाते आहे. पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव याबाबत पुढील तपास करत आहेत.