पुणे : विकासाच्या योजनांच्या नावाने पुण्यातील टेकड्या , नद्या , नाले आणि एकूणच निसर्गाचा बळी देता कामा नये अन्यथा आपल्यालाच त्याची फळे भोगावी लागतील असा स्पष्ट इशारा आज आदित्य ठाकरे यांनी येथे दिला .कात्रजच्या टेकड्या असो कि वेताळ टेकडी असो सर्व टेकड्या आणि नद्या नाले यांचे अस्तित्व मिटविणाऱ्या योजना राबवू
पुण्यातील नदी सुधार प्रकल्प,वेताळ टेकडी, मुंबईतील आरे,बारसू या सर्व ठिकाणी सध्या जी काही परिस्थिती दिसत आहे.त्यातून एकच म्हणावे लागले की, जनते विरुद्ध हुकुमशाही दिसत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात जिथे कुठे प्रकल्प सुरू असतील. त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या त्या प्रकल्पाबाबत मनात नेमक्या काय भावना आहेत. त्याबद्दल महापालिका प्रशासनाने राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यानंतरच पुढील पावल उचलली पाहिजे. अन्यथा एखाद्या दिवशी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुण्यातील वेताळ टेकडी टिकली पाहिजे. अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली.वेताळ टेकडी येथील प्रस्तावित असलेल्या बालभारती ते पौडफाटा रस्ता, दोन बोगदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी पुण्यात वेताळ टेकडी कृती समितीच्या वतीने मागील महिन्यात वेताळ बाबा चौक ते खांडेकर चौक दरम्यान लाँग मार्च काढण्यात आला होता. त्या लाँग मार्चमध्ये शहरातील विविध भागातील पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वेताळ टेकडीवर जाऊन परिसराचा पाहणी केल्यावर पर्यावरण प्रेमी सोबत चर्चा केली होती. या सर्व घडामोडी दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे पुणे दौर्यावर आज आले होते. त्यावेळी त्यांनी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली.
त्यावेळी पर्यावरण प्रेमी सोबत चर्चा केल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की,यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की,मागील सहा ते सात महिन्यात आपल्या राज्यात भ्रष्ट्राचार आणि अनियमितता आहे. विकासाचा आणि स्थानिक नागरिकाचा विचार न करता लाठी काठी, दमदाटीने सर्व प्रकार सुरू आहे. आपल्यासाठी ते भयानक असल्याच सांगत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
तसेच ते पुढे म्हणाले की, नदी सुधार प्रकल्पादरम्यान एकही झाड काढले जाणार नसल्याचे सुरुवातीच्या काळात सांगण्यात आले होते. पण आता जवळपास ७ हजार झाड काढली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. हे कशा प्रकारे रोखता येईल हे पाहणे जरुरीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.