Home Blog Page 1537

डोंबिवलीत पुन्हा १० वा.किलबिल महोत्सव सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

0

मुंबई, दि.१२ नोव्हेंबर- डोंबिवलीकर बाल दोस्तांच्या आवडीचा किलबिल महोत्सव उद्या रविवारी १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा धमाल मजा मस्तीची संध्याकाळ घेऊन येणार आहे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल महोत्सव म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा असतो. लहान मुलांना खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित या धमाल कार्यक्रमाचे यंदाचे १० वे वर्ष आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतील किलबिल महोत्सव म्हणजे बालगोपाळांचा कॅलेंडरमधील मौज मजा धमाल मस्तीचा दिवस असतो. या अविस्मरणीय महोत्सवात धाडसी खेळांचे साहस रंगत आणतात.

केवळ लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दहा वर्षांपूर्वी डोंबिवलीकर किलबिल महोत्सवाची संकल्पना सुरू केली. मुलांना चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर यासोबत कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी, वायरची खेळणी स्वतः बनवता येणार आहेत तसेच बालनाट्य, जादूचे प्रयोग यासारखे कार्यक्रमही पाहायला मिळणार आहेत.  तनुरा ऍक्ट हा अद्भुत कलाप्रकार बाळगोपाळांना आकर्षित करेल अशी खात्री आहे. मिकी माउस, टेडी बेअर छोट्या दोस्तांच्या चेहेरीवर हास्य खुलवतील.
तर साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग असे थरारक प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. यंदा दोन सेगवे व्हेइकल्सचा थरार पण मुलांना अनुभवायला मिळणार आहे. तांदुळावर नाव कोरणे, मेंदी, लाखेच्या बांगड्या बनवून मिळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीकर बाळ गोपाळांसाठी मोफत आहेत.
डोंबिवलीकर किलबिल महोत्सव रविवार दि १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० दरम्यान डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले

जितेंद्र आव्हाड यांच्यासह बारा जणांना जामीन मंजूर

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासाला सहकार्य करण्याचे निर्दश ठाणे कोर्टाने दिला आहे. यानंतर आव्हाड तरुगांतून बाहेर आले आहेत.ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालामुळे जितेंद्र आव्हाडांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच आव्हाडांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी झाली. यावेळी त्यांच्यासह बारा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अ‌ॅड. प्रशांत कदम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान अ‌ॅड. कदम यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाडांची अटक बेकायदेशीर आहे. अटक करण्याच्या 72 तास आधी आव्हाडांना नोटीस देणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी तसे केले नाही. नियमांचे उल्लंघन करुन, कोणताही प्रोटोकॉल न पाळता आव्हाडांना अटक करण्यात आली आहे.

आव्हाडांच्या वकिलांनी सांगितले की, आव्हाड हे पोलिसांना चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. ते स्वत: पोलिस स्टेशनमध्ये नोटीस घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावण्यात आली. आव्हाडांनी चित्रपटगृहात कोणालाही मारहाण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल गुन्हे चुकीचे आहेत. तर, सरकारी वकिलांनी चौकशीसाठी आव्हाडांची 8 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.

दरम्यान, न्यायालयात नातेवाईकांनी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आव्हाड म्हणाले, मी पोलिस स्टेशनमध्ये असताना चाणक्याचा पोलिसांना वारंवार फोन येत होता. माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे.

चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण करत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल अटक केली होती. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिस आव्हाड यांना घेऊन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमले होते. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांविरोधात कलम 323 आणि कलम 504 लावण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

7 नोव्हेंबर रोजी रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्ते ठाण्यातील विवियन मॉल येथे घुसले. या वेळी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच त्यांना विरोध करणाऱ्या काही जणांना बेदम मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. दुसऱ्या दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोफत शोचे आयोजन केले. त्यानंतर राजकीय स्तरावर हा वाद वाढतच गेला होता. हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या दृश्यांवर आहे आक्षेप

  • छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंची लढाई दाखवली. त्यांचे नाते गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राला माहीत आहे, मग विकृती दाखवली जात आहे? असे आक्षेप आव्हाडांनी नोंदवले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मांडीवर घेऊन कोथळा काढला.
  • रामाला हनुमान तसा शिवाजी महाराजांना बाजीप्रभू असे चित्रपटात दाखवले.

फाशीवर दिले तरी माफी मागणार नाही

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमची इच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांविरोधात लढले हे चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत इतिहास दाखवला जात आहे. मला फाशीवर दिले तरी माफी मागणार नाही.

कोथरूडमध्ये दृकश्राव्य ग्रंथालय सुरु करणार! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

पुणे -वाचन चळवळीच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर असून, त्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. वाचन चळवळीच्या वाढीसाठी ज्ञानाचे आदानप्रदान आवश्यक आहे. त्यामुळे बदल्यात काळानुसार आगामी काळात कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालय सुरु करण्याचा मानस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून कोथरूड मतदारसंघासाठी सुरु केलेल्या मोफत फिरते पुस्तक घर उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक-समिक्षक संजय जोशी, संजय कुलकर्णी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, वाचन चळवळीच्या विकासासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये ही माझ्याच अखत्यारीत येतात. त्यामुळे ग्रंथालये वाढीसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. त्यात प्रामुख्याने ग्रंथालयांच्या अनुदान वाढीसह, गाव तिथे ग्रंथालय योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

ते पुढे म्हणाले की, कोथरूड मध्ये वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी गेल्या वर्षी मोफत फिरते पुस्तक घर उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला कोथरुडकरांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाचाही मोठा विकास झाला आहे. त्यामुळे आगामी काळात तरुणांना या वाचन संस्कृतीचा भाग होता, यावा यासाठी कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालय (Audio-visual Library) सुरू करु, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रसिद्ध लेखन संजय जोशी यांनीही फिरते पुस्तक घर उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, वाचन संस्कृती लयाला चालल्याचं अनेकदा बातम्यांमधून वाचायला मिळतं.‌पण मूळात हे सर्व भ्रम आहेत. पण अनेकजण पुष्कळ वाचन करत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनामध्ये फिरते पुस्तक घर हा उपक्रम अप्रतिम जोड आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सर्वां दिली. तसेच राज्यात वाचन संस्कृती वाढीसाठी माननीय दादांनी घेतलेल्या, निर्णयांमुळे आज राज्यातील प्रत्येक‌ ग्रामपंचायत स्तरावर ग्रंथालय उभारण्यात येत असल्याचे नमुद केले. आशुतोष वैशंपायन यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत जोशी यांनी केले.

डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारकांसाठी पुण्यामध्ये 13 नोव्हेंबर 2022 रोजी देशव्यापी शिबिराचे आयोजन

0

नवी दिल्ली-भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्याही ऍन्ड्रॉईड मोबाईल फोनद्वारे फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात चेहऱ्याचे प्रमाणीकरण करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ केला होता. आता या विभागाने जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून उपलब्ध करण्याच्या योजनेचा प्रचार करण्यासाठी आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान योजनेची लोकप्रियता वाढवण्यासाठी एक देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक संघटना, निवृत्तीवेतन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विषयक केंद्रांना विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र / फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच मालिकेंतर्गत निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे एक पथक पुण्याला भेट देणार आहे. त्याअंतर्गत 13 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्र सरकारी निवृत्तीवेतन धारकांसाठी एसबीआय, पुणे मुख्य शाखा, डॉ. आंबेडकर रोड, कलेक्टर ऑफिस कंपाऊंड, पुणे-411001 या ठिकाणी या शिबिराचे आयोजन होणार आहे. आपली जीवन प्रमाणपत्रे डिजिटल साधनांच्या माध्यमातून जमा करण्यासाठी सर्व निवृत्तीधारकांसाठी येथे सोय करण्यात आली आहे.

यापूर्वी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वयोवृद्ध निवृतीवेतनधारकांना तासनतास बँकेच्या बाहेर रांग लावून ताटकळत उभे राहावे लागत होते. आता आपल्या घरीच केवळ एक बटण क्लिक करून ही सोय उपलब्ध झाली आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक इत्यादी संबंधित तपशील केवळ सुरुवातीला एकदाच देणे आवश्यक आहे. ही सुविधा राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरुपात वितरण अधिकाऱ्यांमार्फत देखील उपलब्ध आहे.

केंद्रीय पथकाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना या केंद्राला भेट देऊन आपली जीवन प्रमाणपत्रे डिजिटल माध्यमातून सादर करण्याचे आवाहन केले आहे.

 ‘नो मनी फॉर टेरर’ या तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेचे नवी दिल्लीत 18 आणि 19 नोव्हेंबरला आयोजन

0

नवी दिल्ली-भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे ‘ नो मनी फॉर टेरर’ या तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेच्या आयोजनाद्वारे मोदी सरकार आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मुद्याला देत असलेले महत्त्व आणि या समस्येच्या विरोधातील शून्य सहनशीलतेचे धोरण तसेच या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायासोबत चर्चा करण्याच्या आवश्यकतेबाबतचे सरकारचे गांभीर्य दिसून येत आहे.

केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह या परिषदेत सहभागी होणार असून दहशतवादाविरोधात आणि त्याला पाठबळ देणाऱ्या यंत्रणां विरोधातील लढ्यामध्ये भारताचा निर्धार ते प्रदर्शित करतील.

दहशतवादाला होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी यापूर्वी पॅरिसमध्ये (2018) आणि मेलबर्नमध्ये (2019) झालेल्या परिषदेमध्ये झालेल्या चर्चा आणखी पुढे नेण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. त्याचबरोबर दहशतवादाला होणाऱ्या अर्थपुरवठ्याच्या तांत्रिक, कायदेशीर, नियामक आणि सहकार्यविषयक सर्व पैलूंबाबतच्या चर्चांचा यात समावेश करण्याचा उद्देश आहे. दहशतवादाच्या अर्थपुरवठ्याला आळा घालण्यावर भर देणाऱ्या उच्चस्तरीय अधिकृत आणि राजकीय विचारमंथनाला गती देण्याचा देखील या परिषदेचा उद्देश आहे.

जागतिक स्तरावर अनेक देशांना अनेक वर्षांपासून दहशतवाद आणि हिंसाचार, घुसखोरांच्या कारवायांची झळ पोहोचली आहे. बऱ्याच भागांमध्ये दहशतवादाच्या स्वरुपामध्ये फरक दिसत असला तरी त्यामुळे प्रदीर्घ काळ चालणाऱ्या सांप्रदायिक संघर्षाला खतपाणी घालण्यासह अस्थिर भू-राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रमुख उददेश यामागे दडलेला असतो. अशा संघर्षामुळे शासनव्यवस्था ढासळते, राजकीय अस्थिरता, आर्थिक विवंचना आणि नियंत्रण विरहित मोठा भूभाग असे परिणाम दिसू लागतात. अशा प्रकारांचे समर्थन करणाऱ्या देशाकडून या दहशतवादाला चालना दिली जाते, विशेषतः अर्थपुरवठा केला जातो.

भारताला तीन दशकांपेक्षा जास्त काळ दहशतवादाच्या विविध प्रकारांची आणि त्यासाठी होणाऱ्या अर्थपुरवठ्याची झळ पोहोचली आहे. म्हणूनच अशाच प्रकारची झळ बसलेल्या देशांची वेदना आणि हानी यांची जाणीव भारताला आहे. शांतताप्रिय देशांसोबत एकजूट प्रदर्शित करण्यासाठी आणि दहशतवादाच्या अर्थपुरवठ्याला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने शाश्वत सहकार्याचा सेतू निर्माण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात भारताने दोन जागतिक कार्यक्रमांचे  दिल्लीत आयोजन केले. इंटरपोलची वार्षिक महासभा तसेच मुंबई आणि दिल्लीत आयोजित करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद प्रतिबंधक समितीची विशेष बैठक या कार्यक्रमांचा त्यात समावेश होता. आगामी एनएमएफटी परिषदेमुळे, विविध देशांमध्ये या समस्येविरोधात जागरुकता आणि सहकार्य निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना पाठबळ प्राप्त होईल.

तिसऱ्या ‘ नो मनी फॉर टेरर’ परिषदेमध्ये दहशतवादाचे जागतिक कल आणि दहशतवादाला अर्थपुरवठा, दहशतवादाला अर्थपुरवठा करण्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक स्रोतांचा वापर, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर भर दिला जाईल. 75 देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींना या दोन दिवसीय परिषदेत सविस्तर विचारविनिमयासाठी एकत्र आणण्याचा या परिषदेचा उद्देश आहे.

हळद पावडर, धनिया पावडर, मिरची पावडर, जीरे पावडर तसेच करी पावडर: 27 लाख 39 हजार किमतीचा साठा जप्त

0

मुंबई, दि.12 : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई या ,”उत्पादक” अन्न आस्थापनातून दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी हळद पावडर (वजन 296 किलो), धनिया पावडर (वजन 3998 किलो), मिरची पावडर (वजन 6498 किलो), जीरे पावडर (वजन 5454 किलो) तसेच करी पावडर (वजन 2498 किलो) असा एकूण रुपये 27 लाख 39 हजार एवढ्या किमतीचा अन्नपदार्थाचा साठा तो गैरछापाचा व कमी प्रतीचा असल्याचा संशयावरून जप्त करण्यात आला.

अन्न आस्थापनातून एकूण पाच अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने उचित कायदेशीर कारवाई घेण्यात येईल.  सदरची कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांचे आदेश व अभिमन्यु  काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. ही कार्यवाही  राहुल ताकाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी  अशोक पारधी, सहाय्यक आयुक्त (अन्न), ठाणे यांचे उपस्थितीत केलेली आहे.

खाद्यतेल उत्पादकांनी टिनांच्या डब्यांचा खाद्यतेलाच्या पॅकिंग करण्यासाठी पुनर्वापर करू नये, कोणत्याही खाद्यतेलाचे पॅकिंग करताना विहित दर्जाच्या बी. आय. एस. ग्रेडच्याच टीनाच्या डब्यांचा उपयोग करावा, खाद्यतेलाच्या सर्वांगीण व सर्वंकष तपासणी व विश्लेषणासाठी स्वतःची अद्यावत इन हाऊस (अंतर्गत) प्रयोगशाळा ठेवावी. कोणत्याही खाद्यतेलाची लूज, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरूपात विक्री करू नये. अन्नपदार्थ हाताळणीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक कामगारांचे ते संसर्गजन्य रोग आणि किंवा त्वचारोग यापासून मुक्त आहेत याची खात्री व खातर जमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. “मिठाई” याअन्नपदार्थाच्या किरकोळ विक्रेत्यांनी सुट्ट्या स्वरूपातील मिठाईच्या ट्रेवर सदर मिठाई कोणत्या तारखेपर्यंत वापरावी याबाबतचा स्पष्ट उल्लेख नेहमी करावा.

प्रत्येक उत्पादकाने उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी 25 कामगारामागे एका व्यक्तीला अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत फास्टट्रॅक ट्रेनिंग प्राप्त करून घ्यावे. जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाद्यतेला व्यतिरिक्त इतर उत्पादकांनी त्यांनी विक्रीसाठी उत्पादित केलेल्या प्रत्येक अन्न पदार्थाचे बॅच निहाय तपासणी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी प्राधिकृत केलेल्या एन. ए. बी. एल. प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी. प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाने बिलावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत त्याला मंजूर करण्यात आलेला परवान्याचा क्रमांक न चुकता नमूद करावा तसेच सदरचा परवाना सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फोटो फ्रेम करून लावावा.

उत्पादक, आयातदार, वितरक यांनी कोणत्याही अन्नपदार्थाची विनापरवाना किंवा विनानोंदणी अन्न आस्थापकडून खरेदी करू नये किंवा विनानोंदणी किंवा विनापरवाना अन्न आस्थापनांना कोणत्याही अन्नपदार्थाची कोणत्याही परिस्थितीत विक्री करू नये. प्रत्येक अन्न व्यवसायाचालकाने त्याच्या दुकानात व परिसरात अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचा परवाना व नोंदणी) 2011 अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण स्वच्छता राखावी तसेच कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जा बाबत आणि किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन ठाणे अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न), सुरेश देशमुख यांनी केलेली आहे.

शाहरुख खानला मुंबई विमानतळावर रोखले,१८ लाखांच्या घड्याळ खरेदीवरून ६ तासांचा मनस्ताप : ७ लाखांची कस्टम ड्युटी केली वसूल

0

मुंबई-बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर रोखल्याची बाब उजेडात आली आहे. विमानतळावर तैनात एअर इंटेलिजेंस यूनिट अर्थात AIU च्या सूत्रांनी सांगितले की, शाहरुख शुक्रवारी रात्री शारजाहून परतला होता. त्यावेळी त्याच्याकडे 18 लाख रुपयांच्या घड्याळांंचे महागडे कव्हर आढळले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला काही वेळ रोखून धरले. या घड्याळांंसाठी शाहरुखला सुमारे 6.83 लाख रुपयांची कस्टम ड्यूटी मोजावी लागली.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, , शाहरुख खान आपल्या टीमसोबत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनने दुबईला गेला होता.

शाहरुख 11 नोव्हेंबर रोजी UAE च्या एक्सपो सेंटरमध्ये गेला होता. तिथे इंटरनॅश्नल बुक फेयर 2022 च्या 41 व्या एडिशनमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांचा ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नरेटिव्ह अवॉर्ने सन्मान करण्यात आला होता.

याच विमानाने तो शुक्रवारी रात्री साडे 12 वा. मुंबईत परतला. विमानतळावरील रेड चॅनल पार करताना कस्टमने त्यांना थांबवून त्यांच्या सामानाची तपासणी केली होती.शाहरुख खान एका खासगी चार्टर्ड प्लेनहून मुंबईला पोहोचला होता. त्याला T-3 टर्मिनलवर शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. यावेळी झालेल्या तपासणीत त्यांच्या बॅगेत Babun & Zurbk घड्याळ, Rolex घड्याळीचे 6 डब्बे, Spirit ब्रँडचे घड्याळ, अॅपल सीरीजची घड्याळे आढळली . तसेच त्यांचे रिकामे बॉक्सही आढळले.

एअरपोस्टवर तासभर चाललेल्या प्रक्रियेनंतर शाहरुख व त्याची मॅनेजर पूजा ददलानीला सोडण्यात आले. पण शाहरुखचा बॉडीगार्ड रवी व त्याच्या टीमच्या उर्वरित सदस्यांना थांबवून ठेवण्यात आले. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शाहरुखचा बॉडीगार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपयांची कस्टम ड्यूटी भरली. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सकाळचे 8 वाजले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रवीची सुटका केली.

पोलिसांची सूचना जेव्हा जिव्हारी लागते …..


सायकल ट्रॅक आणि बीआरटी ट्रॅक काढून टाका : पुण्याच्या वाहतूक कोंडीची समस्या
पुणे- सध्या पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सरळ साफ नजरेला दिसतात अशी वाहतूक कोंडीची कारणे पाहून त्याबद्दल उपाय योजना करण्यास महापालिकेला पत्र काय दिले.महापालिकेने लगेच पोलिसांना टार्गेट करणारे राजकारण नेहमीप्रमाणे सुरु केल्याचे काल स्पष्ट झाले. या राजकारणातून त्यांनी सायकल ट्रॅक आणि बीआरटी ट्रॅक हे वाहतूक कोंडीला कारणीभूत नाहीच हे सांगत म्हणे पोलीस आयुक्तांचे कान टोचले आहेत असे सांगण्याचा प्रताप केला आहे. वाढती वाहतूक संख्याच कारणीभूत आहे असाही दावा या लॉबी राजकारणाने केला आहे. वाढती वाहतूक संख्या कोंडीला निश्चित जबाबदार आहे असे पोलीस हि मान्य करतात,पण हि वाढणारी संख्या रोखणे पोलिसांच्या हाथी नाही.पण तेवढेच एक कारण वाढत्या वाहतूक कोंडीला कारणीभूत आहे असे हि नाही पण ते मान्य करण्याची हिंम्मत पालिकेच्या प्रशासकात नाहीच.मुळात लॉबी करून उखळ पांढरे करणाऱ्यांकडून अशी अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल.पण केवळ स्वहितासाठी शहराचा बट्ट्याबोळ करणाऱ्या पालिकेच्या प्रशासनाला पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशी प्रवृत्ती याच राजकारणाने उघड झाल्या आहेत.आता खरा प्रश्न पुन्हा एकदा सविस्तर मांडू यात जो आहे वाहतूक कोंडीचा..वाहने वाढलीत ; बरोबर आहे,मग शहरातील रस्त्यांचे त्या प्रमाणात रुंदीकरण करण्याची जबाबदारी कोणाची होती ? पोलिसांची कि महापालिकेची ? सायकल ट्रॅक आणि बीआरटी ट्रॅक काढून रस्ते मोकळे करा असे पोलीस आयुक्तांनी पत्र दिले ; बरोबर आहे,हेच पत्र महापालिकेच्या जिव्हारी लागले,कारण यासाठी हजारो कोटी खर्च केलेले आहेत आणि अजूनही खर्च केले जात आहेत.दर वर्षी केले जातात.आता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच हे दोन्ही प्रकल्प आणल्याचा दावा महापालिका करत आली आहे हे देखील सत्य आहे.परंतु प्रत्यक्षात झाले काय ? ज्यांनी ‘सायकल चालवा,प्रदूषण घालवा ‘ अशी घोषणाबाजी करत सायकल रॅल्या काढल्या त्यांनी वृत्तपत्रात आणि टीव्ही वर झळकण्यापुरत्या या कृती केल्या,ते बीआरटीच्या बसेस मधून देखील ते फोटो पुरतेच फिरले.ज्यांनी हे प्रकल्प आणले,जे अजूनही याच प्रकल्पांचे पुरस्कर्ते असून पोलीस आयुक्तांचे कान टोचायला निघालेत त्यांना कधी सायकलनेच येता जाताना,अगर बीआरटीनेच प्रवास करताना कोणी पाहिले आहे काय ? तर याचे उत्तर नाही असेच आहे ज्याला चालेंज करण्याचा आघावपणा कोणी करणार नाही.त्याच बरोबर सायकल लोक वापरत नाहीत आणि बीआरटी मार्ग कित्येकदा दिवसभर मोकळे पडलेले दिसतात हे सत्य कोणी नाकरू शकणार नाही.म्हणजे रस्त्याच्या रुंद भागातील किती भाग किती काळ वापराविना ओस असतो हे लोकच सांगतील.मग होते काय ? जी वाहने संख्येने सर्वाधिक आहेत,त्या वाहनांना अत्यंत अरुंद मार्ग देऊन त्यांची गळचेपी महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाने करून ठेवली आहे.या विभागाचे म्हणणेच या दोन्ही योजना आणताना असे मांडले आहे कि, यांची गळचेपी केल्याशिवाय हे सार्वजनिक वाहतुकी कडे वळणार नाहीत.पण गेली १५ वर्षे असे काहीही झाले नाही. हि वाहने संख्येने वाढतच राहिली आणि महापालिकेचे वाहतूक नियोजन करणारे हटवादी पण करत राहिले आणि शहरात निर्माण झाली आता वाहतूक कोंडीची उग्र समस्या.पोलीस आयुक्तांचे कान काय टोचता ? अगोदर तुमच्या खाली किती अंधार आहे ते पहा असे म्हणण्याची वेळ आली आहे.तुमच्या जुन्या काय नव्या कार्यालयात तरी तुम्ही पुरेसी पार्किंग व्यवस्था करून ठेवली आहे काय ? असेहि विचारण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.मग ते कान टोचणारे असो की कान टोचायला सांगणारे पालिकेचे प्रशासन असो.टीकेचा भाग महत्वाचा नाही पण ज्या लॉबी राजकारणामुळे ती करावी लागते ती महत्वाची आहे,ज्यामुळे वाहतूक कोंडी सोडवायची नाही तर स्वहित साधण्याचीच वृत्ती उघड झालेली आहे. लोक सायकल मार्ग,बीआरटी मार्ग येथून अखेरीस घुसखोरी करत आपापली वाहने नेतात..खरे आहे हे.पण का नेतात ? हा हि प्रश्न तेवढाच महत्वाचा नाही काय ? खाजगी वाहनांची गळचेपी करण्याचा गेली २० वर्षांपासून पुणे महापालिकेने सुरु ठेवलेला प्रकार निश्चितच निषेधार्हच नाही तर अन्यायकारक आहे जुलमी आहे.माणसांच्या जीवनात रोजगार आणि त्या अनुषंगाने रोटी कपडा और मकान ला सर्वाधिक प्राधान्य आहेच.आणि पुण्यात नौकरी.काम धंदा, शिक्षण करायचे म्हटले  कि त्याला दुचाकी आवश्यक आहेच,त्या शिवाय कोणी काम करू शकत नाही,ना तुमच्या बसवर ना तुमच्या मेट्रोवर अवलंबून काम धंदा करता येत नाही.सायकल मार्गाने तरी होणारच नाही.आणि पुण्याच्या हद्दी कान टोचणाऱ्यांच्या आद्यगुरूंनी वारंवार वाढवून ठेवल्या आहेत. खेड्याकडे चला,खेडी विकसित करा हे महात्मा गांधीनी सांगितले, तेच काल पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले ‘आत्मा गावांचाच राहू द्यात पण सुविधा.तिथे शहरांच्या द्या ‘ असे मोदींनी म्हटले आहे. यातून जरी शहाणपणा घेतला तरी पुण्याच्या वाहतूक कोंडीला कोण जबाबदार आहे हे समजेल तेव्हा पोलीस आयुक्तांनी सांगितलेले सुचविलेले उपाय अयोग्य नाहीत त्यावर टीका करू नका ते अंमलात आणून तर पहा,नाही तर लोक स्वतः अंमलात आणत आहेत आणखी आणतील, सायकल मार्ग कामाचा नाही,बीआरटी मार्ग फार काळ कामात नसतो म्हणून ते काढून सर्व वाहनांना रस्ते मोकळे करा,अन्यथा  वाहन संख्येच्या प्रमाणात ज्या त्या वाहनांना रस्त्यावर देखील आरक्षण देण्याची प्रथा तुम्हाला आचरणात आणावी लागेल हे लक्षात घ्यावे लागेल

सायकल ट्रॅक,स्काय वॉक वापरतात किती लोक ?

सायकल ट्रॅक आणि स्काय वॉक, प्रत्यक्षात किती लोक वापरतात ? हा प्रश्न हि या निमित्ताने गंभीरपणे घ्यायला हवा.यासाठी केलेला हजारो कोटीच्या खर्चाची गणना या प्रकल्पांच्या उपयुक्ततेशी करणे गरजेचे आहे.सायकल मार्गाने रस्त्याची रुंदी अडवून ठेवल्याने जेव्हा जेव्हा खाजगी वाहनांच्या लेन मध्ये कोंडी होते तेव्हा तेव्हा हि वाहने मग सायकल मार्गावर आक्रमण करून त्याचा वापर करतात, जर त्यांचा वापर होताच नसेल तर सायकल डे जरूर राबवा पण त्यासाठी ट्रॅक कितपत योग्य आहे हा विचार व्ह्यालाच हवा.

बीआरटी चा इतिहास

पुण्यात सुरेश कलमाडींनी केंद्राच्या आर्थिक सहाय्याने बीआरटी आणली. तेव्हा खूप मोठ मोठी स्वप्ने दाखविली गेली,या प्रकल्पामुळे एकच फायदा झाला तो म्हणजे रस्ते रुंद करण्याचा मार्ग मोकळा झाला.पण बी आर टी साठी स्वतंत्र लेन ठेवल्याने शहरात खाजगी वाहनांना अत्यंत तोकडी रुंदी दिली गेल्याने अशा वाहनधारकांची नेहमीच गळचेपी झाली. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी तेव्हा याच बीआरटी वर टीकेची झोड उठविली आणि कलमाडींची सत्ता गेली.पण सत्तेवर आल्यावर अजित पवारांनी बीआरटी प्रकल्प थांबविला नाही उलट पुढेच नेला. मग पुढे त्यांची सत्ता गेली आणि नंतर भाजपची सत्ता आली.भाजपाने हि हा प्रकल्प थांबविला नाही.उलट राष्ट्रवादीच्या काळातील सायकल मार्गांवर शेकडो कोटींची उधळण केली.हि सर्व वाया गेली.ना लोकांनी सायकल चालविली ना सायकल चालवा असा संदेश देणाऱ्यांनी या मार्गाचा रोज वापर करत सायकलने आपले दैनंदिन कामकाज सुरु ठेवले.

कशासाठी बीआरटी आणि सायकल मार्ग

एवढ्या वर्षात हे दोन्ही प्रकल्प फेल गेल्याचे निदर्शनास आल्यावरही दर वर्षी यासाठी काही तरतूद महापालिकेच्या अर्थ संकल्पात केली जाते जी शेकडो कोटीच्या घरात असते.जर या प्रकल्पांचा फारसा उपयोगच झाला नाहीतर गेली कित्येक वर्षे दर वर्षी यावर कोट्यवधींचा खर्च का करण्यात येतो आहे.तोच खर्च रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनासाठी का वापरला जात नाही असा हि सवाल उपस्थित होतो आहे.

शरद पवारांच्या या वागण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ते प्रचंड खंबीर आहेत -अजित पवार


पुणे:राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना कॅन्सर झाला होता.त्यावेळी ते खचले नव्हते. उलट नेटाने लढा दिला होता. त्यावेळी शरद पवार डॉक्टरांना काय म्हणाले होते . ते अजित पवार यांनी सांगितले
शरद पवारांच्या या वागण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ते प्रचंड खंबीर आहेत, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक देखील केलं.
मावळ तालुक्यातील तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित १०० खाटांच्या ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरच्या उद्धाटनाचा कार्यक्रम आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्तेपार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले,कॅन्सरचं निदान झाल्यावर शरद ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले होते. एक-एक दिवस उशीर झाला तर आजार वाढणार होता. त्यावेळी आम्ही देखील घाबरलो होतो. ऑपरेशन देखील पार पडलं. तेव्हा डॉक्टरांनी प्रश्न विचारला होता. पवार तुमचं आयुष्य किती आहे, हे सांगू का? त्यावर नेमकं भाष्य काय झालं माहित नाही. पण साहेबांनी डॉक्टरला उत्तर दिलं की मी तुम्हाला पोहोचवल्यावर मी जाणार आहे. तुम्हाला पटणार नाही पण ते असंच म्हणाले. कॅन्सर झाला तरी खचून जाऊ नका, घाबरु नका, त्याचा सामना करायचा, असं शरद पवार कायम सांगत असतात. शिवाय कोणत्याही परिस्थितीत न घाबरता काम करणं, हे त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आर. आर. पाटील यांनादेखील कॅन्सर झाला हे ज्यावेळी शरद पवारांना कळलं त्यावेळी त्यांनी आबांना त्यांनी फोन केला होता. त्यांचं सांत्वन केलं होतं आणि त्यांना खचून न जाता लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र आबा खचले आणि महाराष्ट्राला एका चांगल्या नेत्याला मुकावं लागलं होतं. मात्र शरद पवार आजही काम करत आहेत आणि खंबीर उभे आहेत, असं सांगत त्यांनी शरद पवारांच्या खंबीरपणाचा दाखला दिला.
सध्याच्या काळात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेची आहे. आपण काही पथ्ये पाळली पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे, ताणतणाव दूर केला पाहिजे तरच आपण आशा आजारांना दूर करु शकतो. आरोग्यात वजन कमी पाहिजे, बाकी ठिकाणी वजन वाढलं तर काही नाही. जाड व्यक्ती मला दिसला तर मी आधी त्या व्यक्तीला बारीक होण्याचा सल्ला देतो.असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, यासारख्या संस्था पुढे कशा जातील यासाठी पुढच्या पिढीनं लक्ष दिलं पाहिजे, तशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवला जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण भर पडेल, यात शंका नाही. या हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत होईल यासाठी राज्य सरकारशी चर्चा करू, प्रयत्नांची शिकस्त करू. याविषयीचा पाठपुरावा करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातील

राष्‍ट्रीय जलविद्युत महामंडळाने सहामाहीमध्‍ये प्रत्यक्ष कामामध्‍ये आणि आर्थिक वृद्धीमध्‍ये आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवली

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2022

  • एनएचपीसीने आपल्‍या एकट्याच्या, निव्वळ नफ्यामध्‍ये 12% वाढ नोंदवली आहे
  • कंपनीने 2483 कोटी रुपयांचा पीएटी म्‍हणजेच देय करानंतरचा  सर्वाधिक अर्धवार्षिक नफा नोंदवला आहे.
  • एनएचपीसीची आपल्या 24 उर्जा निर्मिती केंद्रांच्‍या माध्‍यमातून एकूण 7071 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्‍याची  स्थापित क्षमता आहे.

एनएचपीसी लिमिटेड या भारतातील प्रमुख जलविद्युत निर्मिती कंपनीने अतिशय उत्‍तम  कार्यपालन आणि व्यवसायाने सहा महिन्यामध्‍ये ‘ स्टँडअलोन’ म्हणजेच या एकट्या कंपनीने आपल्‍या निव्वळ नफ्यात 12% वाढ नोंदवली आहे. या सहा महिन्‍यांमध्ये एनएचपीसीला देय करानंतर 2483 कोटी रुपये नफा झाला आहे. कंपनीने हा  सर्वाधिक अर्धवार्षिक स्वतंत्र नफा (देयकरानंतरचा) नोंदवला आहे. कंपनीने मागील सहामाहीमध्‍ये स्‍वतंत्रपणे देय करानंतर 2217 कोटी रूपयांचा नफा कमावला होता.

या सहामाहीसाठी एकत्रित देय करासह  एनएचपीसीचा हिस्सा  2575 कोटी रुपये आहे. मागील सहामाहीचा विचार करता हा हिस्सा 15 टक्क्‍यांनी जास्‍त आहे. मागील सहामाहीचा संयुक्‍त देय करासह एनएचपीचा हिस्सा  2243 कोटी रुपये होता.

वीज निर्मितीचा विचार केला तर चालू तिमाहीमध्‍ये आणि सहामाहीमध्‍ये वीज  निर्मिती अनुक्रमे 10138 दशलक्ष युनिट्स आणि 18303 दशलक्ष युनिट्स इतकी झाली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीमध्‍ये  कंपनीच्या उर्जा केंद्रांचे एकूण  वीज निर्मितीच्‍या प्रमाण सर्वाधिक होते. एनएचपीसी या  स्वतंत्र वीज निर्मिती केंद्रांचा विचार केला, तर  अनुक्रमे 99.87 आणि 99.23 टक्के इतकी वीज निर्मिती करण्‍यात आली. हे प्रमाण सर्वोच्च आहे.

एनएचपीसीच्‍या कार्यकारी मंडळाची बैठक दि. 10 नोव्‍हेंबर, 2022 रोजी आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत 30 सप्‍टेंबर, 2022 ला संपलेल्‍या तिमाही आणि सहा‍माहीमधील वित्‍तीय परिणामांना- निकालांना मान्‍यता देण्‍यात आली.

एनएचपीसी लिमिटेड ही भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनी आहे. एनएचपीसीची आपल्‍या 24 उर्जा केंद्रांसह एकूण स्थापित क्षमता 7071 मेगावॅट अक्षय ऊर्जा (पवन आणि सौरसह) निर्मितीची आहे. यामध्‍ये उपकंपनीव्‍दारे करण्‍यात येणा-या  1520 मेगावॅट विजेचाही समावेश आहे.

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि.११ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायींना यंदाही सोयी-सुविधा देताना सर्व यंत्रणांनी कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची खबरदारी घ्यावी. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी मैदान येथे शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई  उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव गृह (विशेष) संजय सक्सेना, प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन नानोटिया, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) संजय कुमार, मुंबई शहरचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मध्य रेल्वेचे अपर प्रबंधक अमरेन्द्र सिंह, अपर मंडल रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे शीत मरू, मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त अमरेश कुमार, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे  महासंचालक धम्मज्योती गजभिये, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मार्गदर्शक भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी, रवि गरूड,महेंद्र साळवे, मयुर कांबळे, रमेश जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चैत्यभूमीवर कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात अनुयायी येतील. त्यामुळे  वाढणारी संख्या लक्षात घेवून मुंबई महापालिकेने चांगले नियोजन केले आहे. यापूर्वी  या विषयाच्या अनुषंगाने नियोजनाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कामामध्ये त्रुटी राहू नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे ही चांगली गोष्ट आहे. मुंबई महापालिका, गृह, एसटी, सामाजिक न्याय विभाग या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने स्वच्छता करावी. त्याचबरोबर या परिसरात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखावी. ज्या ठिकाणाहून एसटीने अनुयायी चैत्यभूमीकडे येणार आहेत अशा एसटीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादनपर फलक लावावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  साहित्य वाजवी दरात उपलब्ध होण्यासाठी स्टॉल लावण्यात यावा जेणेकरून एक विचारांचा शिधा आपल्याला या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवता येईल.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यावर्षी प्रमुख पाहुण्यांसाठी चैत्यभूमी येथे दर्शनासाठी  एक ठराविक वेळ ठेवण्यात यावा जेणेकरून अनुयायांना चैत्यभूमी येथे दर्शन घेताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अनुयांयासाठी वॉटरप्रूफ मंडप, रांगेतील अनुयायांना बिस्कीटे आणि पाणी वाटपाचा निर्णय देखील चांगला आहे. अनुयायांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी पूर्वतयारी चांगल्या प्रकारे करावी. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करावे, सामाजिक न्याय विभाग व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी सर्व मान्यता  लवकरात लवकर घ्याव्यात. पुढच्या वर्षी याच दिवशी इंदू मिल सर्वांसाठी खुली करण्यात येवू शकेल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक नियोजन समितीचे रमेश जाधव यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाने करावयाच्या कामाबाबत विविध सूचना बैठकीत केल्या.

53व्या इफ्फीमध्ये मेक्सिकोच्या समकालीन चित्रपटांचा उत्सव

मुंबई, 11 नोव्‍हेंबर 2022

मेक्सिको हा देश तेथील चैतन्यपूर्ण संस्कृतीसाठी आणि अनेक पदरी इतिहासासाठी सुप्रसिद्ध आहे. या देशाच्या सतत वाढत्या सांस्कृतिक वारशामध्ये चित्रपट निर्मितीचा देखील समावेश आहे. अलेजान्द्रो गोन्झालेझ इनारितू, गुलेर्मो डेल तोरो, अल्फोन्सो क्वारोन आणि कार्लोस रेगादस यांच्यासारख्या प्रतिभावंतांनी जागतिक दर्जाच्या अनेक चित्रपटांची निर्मिती करुनआंतरराष्ट्रीय पातळीवरील समीक्षकांची वाहवा मिळवली आहे. थोड्याच काळात आपल्या भेटीला येणाऱ्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये देखील मेक्सिकोची संस्कृती आणि त्यांचे चित्रपट यांचा उत्सव साजरा करण्यात येणार असून विविध विभागांमध्ये एकूण 7 मेक्सिकन चित्रपट सादर होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात ‘रेड शूज’ हा वर्ष 2022 मधील मेक्सिकन चित्रपट इतर 14 चित्रपटांसह स्पर्धेत असेल. या विभागातील विजेत्या चित्रपटाला मानाच्या सुवर्ण मयूर पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल. कार्लोस आयचेलमन कैसर दिग्दर्शित ‘रेड शूज’ हा चित्रपट अलिप्त जीवन कंठणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा सांगतो. मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तिचे पार्थिव घरी आणण्यासाठी प्रयत्न करताना हा शेतकरी  अनोळखी आणि उपऱ्या जगात कसा वावरतो याचे वर्णन चित्रपटात पुढे दिसते. या चित्रपटाला मिळालेल्या विविध नामांकनापैकी, व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेले प्रेक्षक पसंतीचे पारितोषिक वादाच्या भोवऱ्यात होते.

‘रेड शूज’ मधील दृश्य

तसेच, अॅन मेरी श्मिट आणि ब्रायन श्मिट यांचे दिग्दर्शन असलेला ‘आयलंड ऑफ लॉस्ट गर्ल्स’ हा चित्रपट ‘पदार्पणातील सर्वोत्तम फिचर दिग्दर्शक’ पुरस्कारासाठी स्पर्धेत आहे. हा चित्रपट सागरी गुहेत अडकलेल्या आणि राक्षसी लाटा तसेच अलौकिक प्राण्यांशी झुंज देणाऱ्या तीन बहिणींची थरारक कथा सांगतो. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच फँटासिया महोत्सवामध्ये देखील हा चित्रपट सादर करण्यात आला होता.

‘आयलंड ऑफ लॉस्ट गर्ल्स’ मधील दृश्य

ब्लांक्विटा, सोल्स जर्नी, ईआमी, पिनोशियो आणि हुसेरा हे आणखी काही मेक्सिकन चित्रपट देखील 53 व्या इफ्फीमध्ये सादर होणार आहेत.

इफ्फीविषयी थोडेसे

वर्ष 1952 पासून सुरु झालेला इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. चित्रपट निर्मिती, त्यांतील कथा आणि या निर्मितीमध्ये गुंतलेल्या व्यक्ती यांचा उत्सव साजरा करणे ही या महोत्सवाच्या आयोजनामागील संकल्पना आहे. या महोत्सवाद्वारे आपण समाजात मोठ्या प्रमाणात आणि सखोलपणे चित्रपटांविषयीचे सजग कौतुक आणि उत्कट प्रेम जोपासून, वाढवून त्याचा प्रसार करण्याचा, आपापसात प्रेम,समजूतदारपणा आणि बंधुत्व यांचे सेतू बांधण्याचा आणि त्यांना व्यक्तिगत तसेच सामूहिक उत्कृष्टतेची नवी उंची गाठण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.

या महोत्सवाचे यजमान राज्य  असलेल्या गोव्याच्या सरकारच्या एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दर वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी आयोजित होत असलेल्या 53 व्या इफ्फी महोत्सवाविषयीची सर्व अद्ययावत माहिती, उत्सवाच्या www.iffigoa.org या संकेतस्थळावर, पत्रसूचना कार्यालयाच्या pib.gov.in या संकेतस्थळावर तसेच इफ्फीचे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाज माध्यम मंचांवर तसेच गोव्याच्या पत्रसूचना कार्यालयाच्या समाज माध्यम स्थळांवर उपलब्ध आहे. लक्षात असू द्या, चित्रपटांच्या सोहोळ्याचा भरभरून आनंद घेऊया आणि एकेमकांना त्यात सहभागी करून घेऊया.

  देशात प्रथमच कॉन्शसनेस – ‘द अल्टिमेट रियॅलिटी’ विषयावर जागतिक परिषद १४ व १५ नोव्हेंबर रोजी एमआयटी मध्ये

पुणे, ११ नोव्हेंबरः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी(डब्ल्यूपीयू) च्या एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटी, पुणे तर्फे देशात प्रथमच जागतिक दर्जाची ‘कॉन्शसनेसः द अल्टिमेट रियॅलिटी’ विषयावर दोन दिवसीय परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित परिषदेचे उद्घाटन सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० होईल. या वेळी प्रमुख पाहुणे व बीजभाषण नालंदा विद्यापीठाचे कुलपती, जागतिक कीर्तिचे संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर करतील. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. दीपक रानडे, एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटीचे संचालक डॉ. जयंत खंदारे हे या परिषदेचे प्रमुख संयोजक व सहसंयोजक असतील.
 परिषदेचा समारोप समारंभ दि.१५ नोव्हेंबर रोजी सायं ४.०० वा. होणार आहे.  या परिषदेचा मुख्य उद्देश भारतीय संतांनी व तत्वज्ञानांनी समाज कल्याणासाठी मांडलेल्या सुख, समाधान आणि शांतीचे तत्व संपूर्ण जगासमोर मांडणे, विज्ञान आणि अध्यात्माचा धागा धरून जगात शांतता नांदावी यासाठी कार्य करणे ही आहे.तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ‘संपूर्ण विश्व हे चैतन्यस्वरुप आणि बुद्धिमान आहे’असं म्हटलं होतं. त्याचबरोबर, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आइनस्टाइन त्यांनी ‘विश्वाच्या शिस्तबद्ध समन्वयामध्ये मला ईश्वर दिसतो’ असं विधान केल होतं. अशा रितीने अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्ही माध्यमातून व्यक्त होणार्‍या चैतन्य अर्थात कॉन्शसनेस आणि अंतिम सत्य अर्थात रियॅलिटी ह्या परिषदेमध्ये उहापोह होणार आहे.
परिषदेमध्ये जागतिक स्तरावर कॉन्शसनेस ह्या विषयावर काम करणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर, डॉ. युलिस डी. कार्पो, डॅा. अ‍ॅटोनेल्ला वॅनिनी, डॉ. अ‍ॅलेक्स हॅन्की, डॉ. मोहन उत्तरवार, डॉ.इएस.पी. शुक्ला, मा. महंत योगी अमरनाथ, डॉ. दिपक रानडे असे अनेक तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, तत्त्वचिंतक, विद्वान भाग घेणार आहेत. क्वॅाटम फिजिक्स, सिंट्रोपी, फ्री-विल-डिटर्मिनजम, ब्रेन अ‍ॅन्ड न्यूरॅालॅाजी अ‍ॅाफ कॉन्शसनेस अशा वैज्ञानिक, तात्त्विक आणि अध्यात्मिक विषयांवर चर्चा व ते याविषयी आपल्या संकल्पना मांडतील.  
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बरोबरच महाराष्ट्रातील अन्य संतांनी समाजात शांतता नांदावी व मानव सुखी रहावा यासाठी कार्य केले. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत विश्व गुरू बनेल. या तत्वांना सत्यात उतरविण्यासाठी ही परिषद एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल.
आयोजित परिषदेत डॉ. दीपक  रानडे, डॉ. जयंत खंदारे, डॉ. संजय उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, डॉ. अ‍ॅलेक्स हॅन्की व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.

मोदींनी परिधान केली गांधी टोपी:केला खादीचा प्रचार…

0

चेन्नई-, खादी हा महात्मा गांधींच्या कायम जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे, आजच्या घडीला खादी खूपच लोकप्रिय झाली आहे. गेल्या आठ वर्षात खादीच्या विक्रीत ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.गांधीजींसाठी स्वच्छतेची खबरदारी घेणं हा महत्वाचा विषय होता. यालाच पाठिंबा देताना आमच्या सरकारनं ग्रामीण स्वच्छता अभियान चालवलं, ६ कोटींहून अधिक लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलं. तसेच अडीच कोटींहून अधिक लोकांना वीज कनेक्शन दिलं.असे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूतील गांधीग्राम संस्थानच्या ३६ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते, ते म्हणाले ,’भारताचं भविष्य तरुणांच्या ‘आम्ही करु शकतो’ अशा पिढीच्या हातात आहे. आज पदवी घेणाऱ्या तरुणांना माझा हा संदेश आहे की, आपण नव्या भारताचे निर्माते आहात, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी इथल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं.

गावे स्वावलंबी व्हावीत अशी महात्मा गांधींची इच्छा होती आणि ग्रामीण विकासाची आपली दृष्टी यातूनच प्रेरणा घेते.आत्मा गावांचा असला तरी आपण सुविधा तिथे शहरांच्या द्यायला हव्यात हे हि मोडी यांनी नमूद केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते म्हैसूर – पुराची थलाईवर डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव कृषी दर्शन रेल्वेगाडीला हिरवा झेंडा

0

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2022

पंतप्रधान,  नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू येथील केएसआर  रेल्वे स्थानकावरुन  म्हैसूर आणि पुराची थलाईवार डॉ एमजीआर चेन्नई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस असून दक्षिण भारतातील अशा प्रकारची  पहिली रेल्वेगाडी  आहे. पंतप्रधानांनी आज बेंगळुरू येथील केएसआर  रेल्वे स्थानकावरुन भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीला देखील हिरवा झेंडा दाखवला.

मेक इन इंडियाच्या यशोगाथेतील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वेने भारतातील पहिली स्वदेशी, सेमी-हाय स्पीड, नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर  धावणारी – वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली होती जिला  15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधानांनी  हिरवा झेंडा दाखवला होता.  पुढे, वंदे भारत एक्सप्रेस गाड्या नवी दिल्ली-माता वैष्णो देवी कटरा, गांधीनगर राजधानी-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल आणि अंब अंदौरा-नवी दिल्ली मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत.

या रेल्वेगाडीमुळे औद्योगिक केंद्र असलेले चेन्नई आणि तंत्रज्ञानाचे केंद्र असलेतले सॉफ्टवेअर -स्टार्ट अप संकुल बेंगळुरू तसेच जगविख्यात पर्यटन स्थळ असलेले म्हैसूर शहर एकमेकांशी जोडले जातील. म्हैसूर – बेंगळुरू – चेन्नई असा प्रवास करणार्‍या नियमित प्रवाशांव्यतिरिक्त  सॉफ्टवेअर आणि  व्यावसायिक , तंत्रज्ञ, पर्यटक, विद्यार्थी यांना या गाडीचा  लाभ  होईल. हा रेल्वेप्रवास विमान प्रवासाप्रमाणे आरामदायी असेल आणि रेल्वेमधील प्रवासाला एका वेगळ्याच अनुभूतीची जोड देईल.

वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

ही एक जागतिक दर्जाची अत्याधुनिक सोईसुविधा असलेली रेल्वेगाडी आहे.   चेन्नई येथे पेरांबूर येथील  एकीकृत रेल्वे कारखान्यात स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली वंदे भारत ट्रेन – भारतीय अभियंत्यांच्या सक्षमतेची  साक्ष आहे आणि मेक इन इंडिया उपक्रमाचा कळस  आहे. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांमध्ये हा एक मैलाचा दगड आहे.

बेंगळुरू – वाराणसी भारत गौरव काशी दर्शन

बेंगळुरू ते काशी ही भारत गौरव रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे जी सर्वसमावेशक पॅकेजमध्ये आरामदायी आणि सोयीस्कर रेल्वे प्रवास, राहण्याची व्यवस्था , मुक्काम आणि दर्शन सुविधा यांनी युक्त आहे. ही रेल्वेगाडी हुबळी, बेळगावी, मिरज आणि पुणे या मार्गे जाणार आहे, ज्यामुळे केवळ बेंगळुरूच्या भाविकांनाच नाही तर काशीला जाण्याची इच्छा असलेल्या उत्तर कर्नाटकातील भाविकांनाही लाभ  होईल. ही ट्रेन प्रयागराज आणि अयोध्या या मार्गावरून देखील  जाणार आहे.

भारत गौरव काशी दर्शन ट्रेनचा एक डबा

या सहलीचा खर्च  20,000 रुपये इतका असून त्यातील    5000 रुपये अनुदान राज्य सरकारकडून दिले जाणार आहे  . या गाडीच्या पहिल्या रेल्वे प्रवासात सुमारे 600 यात्रेकरू असतील; हे यात्रेकरू काशीव्यतिरिक्त   अयोध्या आणि प्रयागराजलाही जातील. भारतासह जगभरातील लोकांना भारताचा वैभवशाली  सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक स्थळांचे  दर्शन व्हावे हे भारत गौरव रेल्वेगाडी (संकल्पनेवर आधारित टुरिस्ट सर्किट ट्रेन्स)  चालवण्याचे उद्दिष्ट आहे.