Home Blog Page 1538

मुंबईला मागे टाकून दिल्ली बनले देशातील सर्वात विसराळू शहर; उबरमध्ये विसरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये झाडू, टीव्ही, कमोड यांचाही समावेश

गुरगाव१७ मे २०२३: उबरने आपला २०२३ सालचा लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स प्रकाशित केला. उबरमध्ये सर्वात जास्त विसरल्या जाणाऱ्या वस्तूदेशातील सर्वाधिक विसराळू शहरे तसेच उबर रायडर्सचा विसराळूपणा सर्वात जास्त प्रमाणात असतो ते दिवस आणि वेळा अशी तपशीलवार माहिती या इंडेक्समध्ये देण्यात आली आहे.

देशातील विसराळू शहरांच्या यादीत गेली दोन वर्षे पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबईला मागे टाकून यंदा दिल्लीचा विसराळूपणा वाढला आहे. या यादीत पहिल्या ४ स्थानांमध्ये पहिल्यांदा हैदराबादचा समावेश झाला आहे. २०१९ सालचे देशातील सर्वाधिक विसराळू शहरबंगलोर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. उबरमध्ये आपली काही वस्तू राहून गेली तर ती परत मिळवण्याचा सहजसोपा उपाय उबर ऍपमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रायडर्सपर्यंत मजेशीर पद्धतीने पोहोचवणे हा उबरच्या लॉस्ट अँड फाउंड इंडेक्सचा उद्देश आहे.

गेल्या वर्षभरात फोनबॅग्सवॉलेट्स आणि कपडे या वस्तू भारतभरात उबरमध्ये सर्वात जास्त विसरल्या गेल्या. त्यापाठोपाठ पाण्याच्या बाटल्याचाव्या आणि चष्मे व दागिने यासारख्या ऍक्सेसरीज देखील रायडर्स विसरले. झाडूकॉलेजचे ऍडमिट कार्डलहान मुलांचा स्ट्रॉलर या गोष्टी देखील रायडर्स उबरमध्ये विसरतात. एक रायडर तर स्वतःची वॉकिंग स्टिक विसरले होते तर एक जण चक्क मोठा टीव्हीच उबरमध्ये विसरून गेले.

सेंट्रल ऑपरेशन्सचे डायरेक्टर श्री. नितिश भूषण म्हणालेमहत्त्वाचीखूप जवळचीवैयक्तिक वस्तू विसरली हे लक्षात आले की भीती वाटणेगोंधळ उडणे हे आपल्या सर्वांच्याच बाबतीत होते.  पण उबरमध्ये तुम्ही सपोर्टशी संपर्क साधून तुमच्या वस्तू परत मिळवू शकता. उबरमध्ये एखादी वस्तू विसरली गेली तर ती परत मिळवण्याची विनंती ऍपमधूनच करण्याची सुविधा रायडर्सना उपलब्ध करवून देण्यात आली आहे याची आठवण करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी हा मजेशीर व माहितीपूर्ण सर्व्हे करत असतो. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवासाचे दिवस असल्याने रायडर्सना उबरमधील सेवासुविधांची आठवण करून देण्याची ही योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते.”

ठळक वैशिष्ट्ये:

  1. शनिवार हा सर्वात आळसाचा दिवस असावा कारण यादिवशी उबरमध्ये वस्तू विसरण्याचे प्रमाण जास्त असते.
  2. उबरमध्ये विसरल्या गेलेल्या आयफोन्सपेक्षा अँड्रॉइड फोन्सचे प्रमाण तीन पट जास्त आहे.
  3. उबरमध्ये विसरल्या गेलेल्या वस्तूंमध्ये लाल रंगाच्या वस्तूंचे प्रमाण जास्त आहे.
  4. संध्याकाळी लोकांचा विसराळूपणा वाढतोवस्तू विसरण्याचे प्रमाण सायंकाळी ७ नंतर सर्वात जास्त आहे.

उबर लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स इंडिया २०२३ मधील माहितीमधील ठळक मुद्दे:

सर्वात जास्त विसरल्या गेलेल्या अनोख्या वस्तू

1. टीव्ही

2. वेस्टर्न कमोड

3. 3 दुधाची पॅकेटआणि पडदे

4. झाडू

5. कॉलेज ऍडमिट कार्ड

6. चालताना आधारासाठी हातात धरण्याची काठी

7. इंडक्शन स्टोव्ह

8. कौटुंबिक फोटोंचा कोलाज

9. अवजड यंत्रसामग्री

10. प्रिंटेड दुपट्टा (स्कार्फ)

१० सर्वात जास्त विसरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य वस्तू

  1. फोन
  2. लॅपटॉप बॅग्स
  3. पैशाचे पाकीट
  4. कपडे
  5. हेडफोन्स
  6. पाण्याची बाटली
  7. चष्मा/सनग्लासेस
  8. चाव्या
  9. दागिने
  10. घड्याळ

देशातील पहिली चार सर्वाधिक विसराळू शहरे

  1. दिल्ली
  2. मुंबई
  3. हैदराबाद
  4. बंगलोर

विसराळूपणा सर्वात जास्त असतो असे वर्षातील टॉप तीन दिवस

  1. २६ मार्च
  2. ९ एप्रिल
  3. ८ एप्रिल

विसराळूपणा सर्वात जास्त असतो असे आठवड्यातील टॉप तीन दिवस

  1. शनिवार
  2. रविवार
  3. शुक्रवार

विसराळूपणा सर्वात जास्त असतो असा दिवसातील तीन वेळा 

  1. सायंकाळी ७
  2. रात्री ८
  3. संध्याकाळी ६

या रंगांच्या वस्तू सर्वाधिक विसरल्या जातातपहिले पाच रंग

  1. लाल
  2. निळा
  3. पिवळा
  4. गुलाब
  5. गुलाबी

उबरमध्ये या ब्रँड्सचे फोन सर्वात जास्त विसरले गेले

  1. सॅमसंग
  2. ऍपल
  3. वनप्लस

उबरमध्ये एखादी वस्तू राहिली तर ती परत मिळवण्यासाठी हे करा:

  • “मेनू” चिन्हावर टॅप करा.
  • “युअर ट्रिप्स” वर टॅप करा आणि ज्या ट्रीपमध्ये तुम्ही वस्तू विसरलात ती ट्रिप निवडा.
  • “रिपोर्ट ऍन इश्यू विथ धिस ट्रिप” वर टॅप करा.
  • “आय लॉस्ट ऍन आयटम” वर टॅप करा.
  • “कॉन्टॅक्ट माय ड्रायव्हर अबाउट अ लॉस्ट आयटम” वर टॅप करा.
  • खाली स्क्रोल करा आणि तुमच्याशी ज्यावर संपर्क साधता येईल तो फोन नंबर एंटर करा. “सबमिट”वर टॅप करा
  • तुमचा फोन हरवला असल्यास, त्याऐवजी मित्राचा फोन नंबर एंटर करा.
  • तुमच्या फोनवर रिंग वाजेल आणि तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरच्या मोबाईल नंबरशी थेट कनेक्ट करेल.
  • जर ड्रायव्हरने फोन उचलला आणि तुमची वस्तू राहिली आहे याची खात्री केली तर ती वस्तू परत मिळवण्यासाठी सोयीचे ठिकाण व वेळ ठरवा. 
  • जर तुम्ही ड्रायव्हरशी कनेक्ट होऊ शकत नसाल तर, नुकसानाची तक्रार करण्यासाठी ‘इन-अॅप सपोर्ट’ वापरा आणि उबर सपोर्ट टीम तुम्हाला मदत करेल.

पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीच्या वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

मुंबई, दि. १७: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे पीएमआरडीए प्राधिकरणाची दहावी बैठक झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रो लाईन ३ हा महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प घोषीत केल्याने १८ जुलै २०१८ ते १६ एप्रिल २०२३ पर्यंत मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये १०० टक्के वाढीव अतिरीक्त विकास शुल्काच्या थकबाकी वसूली चा प्रस्ताव या बैठकीत चर्चेला ठेवला होता. त्यावर या पाच वर्षांच्या काळातील वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच एप्रिल २०२३ पासून जे अतिरिक्त विकास शुल्क लावले जात आहे, ते सरसकट न लावता क्षेत्रनिहाय देता येईल काय हे तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. माफ केलेल्या वाढीव विकास शुल्काची रक्कम सुमारे ३३२ कोटी एवढी आहे.

यावेळी मोशी पुणे (पीआयईसीसी) येथील अडीच एकर जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी मान्यता देण्यात आली. पीएमआरडीएचा विकास आराखडा २० जूनपर्यंत सादर करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजीत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आल्या यावेळी पुणे रिंग रोड प्रकल्प, प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातून पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ व २३ गावांचा विकासनिधी त्याचबरोबर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम २०२३ ची पीएमआरडीए क्षेत्रात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पीएमआरडीएच्या क्षेत्रात चालविल्या जातात या महामंडळाला जो तोटा सहन करावा लागतो त्यापोटी १८८ कोटी एकवेळ देण्यास यावेळीमान्यता देण्यात आली. यावेळी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.१७: पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भरता निधी अर्थात स्वनिधी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रमकुमार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव राहुल कपूर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पथविक्रेत्यांनी एकत्रितपणे वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास कमी किमतीत खरेदी होईल. त्यामुळे मिळणारे उत्पन्न वाढविता येईल.  सुरुवातीच्या खरेदीसाठी  निधी उभारण्यातांना लोकप्रतिनिधी मदत करतील. पुढच्या आठवड्यात प्रलंबित अर्जाबाबत बँक प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येईल. पथविक्रेत्यांसाठी नियुक्त शासकीय समिती आणि महानगरपालिकेने एकत्रित बसून पथविक्रेत्यांसंदर्भातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा.

कोविड संकटकाळात पथविक्रेत्यांना सर्वाधिक हानी सहन करावी लागली. त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वनिधी योजना सुरू केली, असे त्यांनी सांगितले.

श्री. कपूर म्हणाले की, पाहिल्यावर्षी देशात २० लाख पथविक्रेत्यांनी स्वनिधी योजनेचा लाभ घेतला. महाराष्ट्रात ४५ टक्के आणि देशात ४१ टक्के महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. रोजगारासाठी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. योजनेत सहभागी ९० टक्के लाभार्थी प्रथमच बँकिंग क्षेत्राशी जोडले गेले. देशात ५ हजार ६०० कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले असून राज्यात ४ लाख ५० हजार पथविक्रेत्यांनी योजनेचा लाभ घेतला. अधिकाधिक पथविक्रेत्यांपर्यंत योजना पोहोचावी, असे आवाहन त्यांनी केले.

आयुक्त विक्रमकुमार म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी पथविक्रेत्यांना सहकार्य करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. विक्रेत्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करून त्यांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता ३ हजार पथविक्रेत्यांना नव्याने परवाना देण्यात येईल. विमाननगर येथे हॉकर्स पार्क उभारण्यात येत असून शहरात १५ ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. बँकांनी प्रलंबित अर्जाना लवकर मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात श्री.उदास म्हणाले की, पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पुणे शहरात ४६ हजार ७७ अर्ज प्राप्त झाले असून १७ हजार ७५२ पथविक्रेत्यांना २१ कोटी ८० लाखाचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून पथविक्रेत्यांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पथविक्रेत्यांना धनादेश आणि परिचय फलकाचे वितरण करण्यात आले. चांगली कामगिरी करणारे अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी आणि पथविक्रेत्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डिजिटल व्यवहारासाठी प्रातिनिधिक स्वरूपात क्यूआर कोडचे वाटपही यावेळी करण्यात आले.

प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.

नागरिकांच्या समस्या आठ दिवसांत सोडवून अहवाल सादर करामन्र:पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

जनता दरबारच्या माध्यमातून विविध सोसायटीतील नागरिकांशी संवाद

पुणे-नागरिकांशी थेट भेट व जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी आज ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडमधील सहवास सोसायटी सभागृहात या भागातील नागरिकांशी संवाद साधला. कोथरूड मधील सहवास सोसायटी भागातील नागरिकांनी मांडलेल्या समस्या तातडीने सोडवून, आठ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिल्या.

यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे,ॲड. मिताली सावळेकर, गिरीश खत्री, नवनाथ जाधव, अनुराधा एडके, कुलदीप सावळेकर, महेश पवळे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनता दरबारावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या काही समस्या नामदार पाटील यांच्या समोर मांडल्या. यात‌ प्रामुख्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, कचरा संकलन आणि विशेषत: झावळ्या आणि झाडांचा पाळा पाचोळा / पानांचा कचरा, डीपी रस्त्यावरील अतिरिक्त वाहतुकीमुळे अंतर्गत सेवा रस्त्यांवर होणारी वाहतूक, टवाळखोर तरुणांमुळे होणारा त्रास, रस्त्यावरील फुगे विक्रेत्यांमुळे महिलांना होणारा त्रास, रात्री अपरात्री वाजविले जाणारे फटाके,डी पी रस्त्यावरील मंगल कार्यालयाबाहेर होणारे अव्यवस्थित पार्किंग व तेथे होणाऱ्या कार्यक्रमांतील कर्णकर्कश्श आवाजामुळे होणारा त्रास ( स्पीकर चा आवाज मान्य डेसिबल पेक्षा जास्त असल्यामुळे ) आदी प्रमुख समस्या मांडल्या.

त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सदर समस्या तातडीने सोडवून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना नामदार पाटील यांनी दिल्या. तसेच,टवाळखोर तरुणांवर चाप बसवण्यासाठी आणि महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, भागातील अतिक्रमणे तातडीने हटवावे आदी सूचना दिल्या.‌तसेच कर्वेनगर मधील विठ्ठल मंदिर रस्ता व अलंकार पोलीस स्टेशन जवळील समर्थ पथ येथील कामं त्वरित पूर्ण करून तेथे डांबरीकरण करावे अश्या सूचना देखील केल्या.
दोन दिवसापूर्वी गिरीजाशंकर सोसायटीत घडलेल्या खड्डा पडण्याच्या घटनेची दखल घेऊन रातोरात दुरुस्तीकार्य करून दिल्याबद्दल सोसायटीचे अध्यक्ष रवी गोखले व श्री. भांड यांनी मा. चंद्रकांतदादांचा सत्कार केला. तर डॉ. महेश तुळपुळे यांनी सहवास सोसायटीच्या वतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत केले, संदीप खर्डेकर यांनी संयोजन व सूत्रसंचालन केले. यावेळी मनपा च्या विविध खात्यांचे अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. सर्व नागरिकांनी मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यतत्परतेबाबत समाधान व्यक्त केले.

एअर इंडियाच्या विमानाला हवेत झटके, खराब हवामानामुळे अपघात, 7 प्रवासी किरकोळ जखमी

दिल्ली-दिल्लीहून सिडनीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेत झटके लागले. त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले. एअर इंडियाच्या B787-800 विमान VT-ANY AI-302 सोबत मंगळवारी ही घटना घडली. खराब हवामानामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.DGCA अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनी विमानतळावर 7 जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. मात्र, कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. या घटनेवर एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

विमानात उपस्थित डॉक्टर-नर्सने उपचार दिले
अपघातादरम्यान घाबरलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांवर क्रूने प्राथमिक उपचार केले. त्याचवेळी प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सनेही उर्वरित प्रवाशांना मदत केली. सिडनी विमानतळावर उतरल्यानंतर केवळ 3 प्रवाशांनी वैद्यकीय मदत घेतली. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

अतिक्रमण पथकाच्या अधिकाऱ्यांना बेदम मारहाण, बंडगार्डन पाेलिसांकडून पाच जणांना अटक

पुणे

पुणे मनपा अंर्तगत अतिक्रमण कारवाई करण्याचे काम पथकातील कर्मचारी कैलास स्मशानभूमी ते आरटीओ कार्यालय यादरम्यान करत हाेते. त्यावेळी सार्वजिनक रक्स्त्यारवरील हात गाडयांवर अतिक्रमण विराेधी पथक कारवाई करताना, सदर पथकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी बंडगार्डन पाेलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

गणेश परदेशी (वय-40), राेहित परदेशी (25), राेहन परदेशी (25), महेश परदेशी (33), सुरज परदेशी (20) या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्यासह प्रती गणेश परदेशी , शामा सुपरसिंग परदेशी (50) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत प्रल्हाद काेळेकर यांनी बंडगार्डन पाेलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. 16 मे राेजी संबंधित ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावरील हात गाडयांवर अतिक्रमण कारवाई करण्याचे तक्रारदार हे त्यांचे सरकारी काम करत हाेते.

त्यावेळी संबंधि आराेपींनी सदरची कारवाई करु नये म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांना शिवीगाळ करुन, बघुन घेण्याची धमकी देऊन हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तक्रारदार यांच्या साेबतचे अतिक्रमण कारवाईस हजर असलेले सुरक्षा रक्षक नितीन आकाश लाेंखडे यांनाही हाताने मारहाण करुन , धक्का बुक्की करुन डाेक्यात लाेखंडी झाऱ्या मारुन जखमी करुन त्यांचे सरकारी काम करण्यापासून परावृत्त केले आहे. याबाबत पुढील तपास ंबडगार्डन पाेलिस करत आहे.

द केरला स्टोरीवरून झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू, 8 जण जखमी

द केरला स्टोरीशी संबंधित पोस्टवरून वाद सुरू ; अकोल्यात कलम 144 लागू

अकोला – ५ मे रोजी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे महाराष्ट्रातील अकोला शहरात हिंसाचार इतका वाढला की एका मुलाचा मृत्यू झाला. या हिंसाचारात अनेक वाहने जाळण्यात आली तर एका महिला कॉन्स्टेबलसह 9 जण जखमी झाले.याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात कलम 144 लागू केले असून सुमारे 26 जणांना ताब्यात घेतले आहे. त्या भागातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

वास्तविक, या हिंसाचाराची सुरुवात द केरला स्टोरीशी संबंधित एका वादग्रस्त पोस्टने झाली. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अरबाज नावाच्या व्यक्तीने भडकाऊ पोस्टवर आक्षेप घेतल्यानंतर त्याला अपशब्द आणि धमकीचे मेसेज येऊ लागले. मेसेजमध्येच एका व्यक्तीसोबत अरबाजचा वाद इतका वाढला की दोघांमध्ये दुफळी निर्माण झाली आणि ते एकमेकांशी भांडायला गेले.

हे प्रकरण 13 मे, शनिवारी अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात सुरू झाले, त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटायला आले होते. त्यांची भेट होताच दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्यात एकाचा मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती मिळताच हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यात दोन पोलीस जखमीही झाले. त्याचबरोबर हिंसाचार करणारे 8 जण जखमीही झाले आहेत. पोलिसांनी २६ जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध हिंसाचार भडकवल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

जिल्हा दंडाधिकारी नीमा अरोरा यांनी शहरातील 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसाचार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि लोकांना शांतता राखण्याचे सतत आवाहन करत आहेत.

नळस्टॉप चौकातील ‘नाईट लाईफ’वर अतिक्रमण विभागाची कारवाई

साईड मार्जिन मधील हॉटेल्स वर कारवाई ची जोरदार मागणी

पुणे-कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकामध्ये रात्री १२ वाजल्यानंतर सुरू होणार्‍या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. याठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरू करू नये अशी तंबी संबधित व्यावसायीकांना देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून रात्री बारा वाजल्यानंतर याठिकाणी दहा ते बारा हातगाड्यांवर खाद्य पदार्थांची विक्री होत असून ‘नाईट लाईफ’ च्या नावाखाली मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने ही कारवाई केली. दरम्यान आता नागरिकांकडून विशेषतः वाहनचालकांकडून एरंडवना,कोथरूड आणि एकूणच महापालिकेच्या परिसरात साईड मार्जिन मध्ये सुरु असलेल्या हॉटेल्स वर अतिक्रमण विभागाने कारवाई करावी , अशा हॉटेल्स मुळे वाहतुकीला अडथळे आणि कोंडीचे प्रकार होता असल्याचे दिसते आहे.

नळ स्टॉप चौकामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर चहा पोह्यांसह खाद्यपदार्थ विक्री सुरू झाली होती. सुरूवातीला एक दोन व्यावसायीकांपासून सुरू झालेल्या रात्रीच्या खाद्य अड्डयावर ग्राहकांच्या वाढत्या संख्येसोबतच विक्रेत्यांचीही संख्या वाढत होते. कोथरूडच नव्हे तर शहराच्या अन्य भागातुनही गरजूच नव्हे तर मोठ्याप्रमाणावर युवक, युवती देखिल नाईट लाईफच्या नावाखाली येथे गर्दी करत होते. यातून रात्री उशिरापर्यंत गाड्यांचे आवाज आणि वादावादी सारख्या घटनांमुळे स्थानीक नागरिक त्रासले होते.रात्री बारा वाजल्यानंतर पहाटेपर्यंत या गाड्या उभ्या केल्या जात असल्यानेही अतिक्रमण विभागावर कारवाईच्या मर्यादा येत होत्या.
अखेर काल कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने येथील गाड्या, खुर्च्या आणि टेबल जप्त करून नेल्या.
याठिकाणी पुन्हा व्यवसाय करू नये,अशी ताकीद देतानाच पुन्हा व्यवसाय सुरू झाल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशाराही व्यावसायीकांना देण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या सेवेत आता तृतीयपंथी!

पुणे: महापालिकेच्या सेवेत तृतीयपंथींंची कंत्राटी सेवक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली असून महापालिकेच्या मिळकतींच्या संरक्षणासाठी प्रायोगिक तत्वावर २५ तृतीयपंथींची नियुक्ती ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सेवेत तृतीयपंथींची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव सुरक्षा विभागाला देण्यात आला होता. तृतीयपंथींसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची समिती तयार करून महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि तृतीयपंथी कर्मचारी यांच्यात समन्वय रहावा यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. सध्या पंचवीस तृतीयपंथींची नियुक्ती ठेकेदारामार्फत करण्यात येणार असून उर्वरीत नियुक्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिली.

 आरोपीने लॉकअपच्या बाथरुममध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या

पुणे-वाहन चोरीच्या एका गुन्हयात हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस लॉकअप मध्ये ठेवले असताना, संबंधित आरोपीने लॉकअपच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला .

सुरेश उत्तम गरड ( वय -26, मूळ राहणार – वाशिम) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेश गरड याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. मंगळवारी रात्री हडपसर पोलिसांनी त्याला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवले होते. यावेळी त्याच्यासोबत लॉकअपमध्ये अन्य गुन्ह्यातील 20 ते 25 आरोपी ही बंदिस्त होते. बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरेश गरड याने लॉकअपमध्ये बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

विश्रामबाग पोलिसांनी तातडीने त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन, ससून रुग्णालयात शुभविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आकस्मात मयतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश गरड हा हडपसर पोलिसांच्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी होता. मंगळवारी रात्री त्याला लॉकअपमध्ये ठेवले असताना, त्यानी आरोपींना झोपण्यासाठी देण्यात येणाऱ्या बेडशीटच्या किनारा फाडून त्याच्या साह्याने बाथरूम मध्ये जाऊन गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस पुढील तपास करत आहे.

नऱ्ह्यातील महाविद्यालयातच 29 वर्षीय महिलेचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग

पुणे-नऱ्हे परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात काम करत असलेल्या 29 वर्षीय महिलेचा महाविद्यालयातच काॅम्प्युटर लॅबचे अस्टिटंटने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 29 वर्षीय पिडित महिलेने सिंहगड राेड पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे.

सदर तक्रारीनुसार पोलिसांनी गणेश विठ्ठल कडू (वय-35,रा.किरकटवाडी,पुणे) या आराेपीला अटक केली आहे. सदरचा प्रकार 15 मे राेजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुणाल हाईटस झी काॅलेज सी विंभ मधील अभियांत्रिकी विभागाचे एचओडी सरांचे कार्यालय जवळ, नऱ्हे,पुणे येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या नाेकरीस असलेल्या झील काॅलेजच्या अभियांत्रिकी विभागातील कंप्युटर लॅबचे असिस्न्टंट म्हणून नाेकरीस असलेला आराेपी मणेश कडु त्यांचे ओळखीचा आहे. 15 मे राेजी दुपारी आराेपीने तक्रारदार यांना एचओडी सरांचे कार्यालयातील पंखा चालु करण्याचे बहाण्याने आत बाेलवून त्यांचे एकटेपणाचा गैरफायदा घेऊन पाठीमागून येवून त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना बळजबरीने जवळ ओढण्याचा प्रयत्न करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जाधव पुढील तपास करत आहे.

परमवीर सिंहांनी मविआ सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची शिंदे फडणवीसांनी परतफेड केली: नाना पटोले

फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली

मुंबई, १६ मे २०२३

अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत येण्यासाठी त्यांना मदत केली आहे. अशी घणाघाती टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, कॅटच्या ऑर्डरमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला स्पष्ट आदेश दिले होते की आपण चौकशी करून आरोपपत्र दाखल करा तसेच परमवीर सिंह यांची विभागीय चौकशी करा. पण शिंदे फडणवीस सरकारने ते केले नाही. परमवीर सिंह यांना निलंबित केले होते पण त्यांच्या निलंबनाचा दर तीन महिन्याला आढावा घेऊन निलंबनाला मुदतवाढ देणे आवश्यक होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने ना परमवीर सिंहाची विभागीय चौकशी केली ना त्यांच्या निलंबनाला मुदतवाढ दिली. त्यामुळे कॅट न्यायाधिकरणासमोर झालेल्य़ा सुनावनीत राज्य सरकारच्या भूमिकेमुळे परमवीरसिंहांना दिलासा मिळाला.

आपण विधानसभा अध्यक्ष असताना दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलो त्यावेळी त्यांनी परमवीर सिंह यांच्या भ्रष्टाचाराबाबतची फाईल आपल्याकडे काही जणांनी दिल्याचे सांगितले होते. त्या फाईलची एक प्रतिलीपी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही संबंधिताने दिल्याचे ते म्हटले होते. यानंतर परमवीरसिंह मला भेटायला आले होते. त्यावेळी याबाबत मी स्वतः त्यांना विचारले असता त्यांनी आमच्या खात्यात असे चालते असे उत्तर दिले होते. यावरून हे स्पष्ट होते की परमवीर सिंहाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला असूनही त्याच्यावर कारवाई होणे दूरच त्याची साधी चौकशीही भाजप सरकारने केली नाही.

अँटिलीया जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणे हे सर्व प्रकार महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून केले होते आणि यामागे फडणवीस होते. हे मी विधानसभेत वारंवार सांगितले होते व ते आता स्पष्ट झाले आहे.

कॅटच्या ऑर्डरचे अवलोकन केले असता परमवीर सिंहांना क्लीन चीट दिलेली नाही. तर शिंदे फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक प्रकरण कमजोर करून परमवीर सिंह यांना तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे वाचविण्यासाठी मदत केली आहे असे दिसून येते. परमवीर सिंह प्रकरणात शिंदे फडणवीस सरकारची गलिच्छ मानसिकता राज्याच्या जनतेसमोर आली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारण कधीही एवढ्या खालच्या पातळीवर गेले नव्हते ते घेऊन जाण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पाप शिंदे फडणवीसांनी केले आहे. हे परमवीर सिंहाच्या प्रकरणात स्पष्ट झाले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

अतिक्रमण विरोधी कारवाईस गेलेल्या महापालिका पथकाला बेदम मारहाण(व्हिडीओ)

पुणे-पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई (Anti-Encroachment Action) जोरदार सुरू आहे. या कारवाईमध्ये आज पालिकेच्या सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला आहे. कारवाई चालू असताना फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकालाच बेदम मारहाण करण्यात आली आहे.आज दुपारी 1 ते1.30 चे दरम्यान ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कैलास स्मशानभूमी ते आरटीओ कार्यालय परिसरात G-20 निमित्त अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करत असताना तेथील व्यवसायीकानी पथकातील सेवकांवर हल्ला करून मारहाण केली. या भ्याड घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी उप आयुक्त , अतिक्रमण व म न पा सेवक युनियन यांचे नियंत्रणात सर्व क्षेत्रिय कार्यालयामधील सर्व अतिक्रमण निरीक्षक,सेवक,बिगारी ,सुरक्षा रक्षकांनी व अधिकारी यांनी उद्या सकाळी 10 वाजता महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील हिरवळीवर एका सभेचे आयोजन केले आहे. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांचे अशा बाबींवर पुढील धोरण ठरविण्यात येईल असे वृत्त आहे.

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यावर कारवाई करायची कि नाही याबाबत एकच ठाम निर्णय घ्या ..अन्यथा विभागच बंद करा – महापालिका अधिकाऱ्यांचे राज्य शासनाला थेट आव्हान

पुणे: महापालिकेतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग नाहक बदनाम करून सोडला जात असून आता राजकारण थांबवा एकच ठाम निर्णय घ्या कारवाई करायची कि नाही ? नसेल करायची तर हे दोन्ही विभागच बंद करून टाका आणि होऊ द्यात काय ते एकदाचे असा पवित्रा घेत आता मेटाकुटीला आलेले महापालिका अधिकारी आणि कर्मचारी थेट राज्य सरकारला आव्हान देण्याच्या मनस्थितीत बंद पुकारणार असल्याचे वृत्त आहे.

महिन्यापुर्वीचे व्हिडीओ आता का आणले जात आहेत , जुने व्हिडीओ दाखवून ,जुन्या कारवाया दाखवून नेमके कोण काय साधत आहे? कुठेही कारवाईला गेले कि विरोध आहेच ,वाद आहेच, राजकीय दबाव आहेच, पोलीस संरक्षणाचा प्रश्न आ वासून आहेच , अगदी मंत्र्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांची बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे आहेत . हि असताना सामान्य नागरिकांवर देखील कारवाई करायची आहे. या सर्व भावना उचंबळून येण्यास काही घटना अलीकडच्या दिवसात घडल्या आहेत .आज तर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कैलास स्मशाभूमीत ते आरटीओ कार्यालय परिसरात हा प्रकार घडला.अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई असताना मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे.जी- २० परिषदेच्या निमित्ताने शहरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. ढोले पाटील रस्त्यावर कारवाई सुरू असताना जमावाने कर्मचारी आणि अधिका-यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेच्या निषेधार्थ महापालिकेच्या हिरवळीवर बुधवारी निषेध सभा होणार असून काम बंद करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जागतिक बँकेसमोर महाराष्ट्रातील प्रकल्पांचे सादरीकरण आगामी प्रकल्पांना निधी देण्यास तत्वत: मान्यता

मुंबई, दि. 16 : राज्यातील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचा वेग वाढविण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने जागतिक बँक समूहाचा सदस्य असलेल्या आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत करार केला आहे. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने विविध प्रकल्प सुरू आहेत. पूर्ण झालेल्या आणि जागतिक बँकेने प्रकल्पांना मंजूर केलेल्या निधीव्यतिरिक्त आगामी प्रकल्पाच्या कामासाठी जागतिक बँकेने निधी देण्यास तत्वत: मान्यता दिली.

जागतिक बँकेचे भारतातील संचालक अॅगस्ते टॅनो कौमे आणि शिष्टमंडळाला जलसंपदा, कौशल्य विकास, कृषी, बेस्ट आणि आदिंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांविषयी सह्याद्री अतिथीगृह माहिती  दिली.  यावेळी मित्राचे (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव श्रीकर परदेशी, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, आयएफसीच्या(इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) देशातील व्यवस्थापक वेडी जो वर्नर, प्रादेशिक संचालक शलभ टंडन, ईएफआयच्या प्रादेशिक संचालक मॅथ्यू वर्झिस, कार्यक्रम प्रमुख अर्णव बंडोपाध्याय आदी उपस्थित होते.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पूराची तीव्रता कमी करण्यासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य करण्याची विनंती जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी केली. 2019 आणि 2021 मधील प्रकल्प उभारणीत पूरामुळे मोठ्या प्रमाणात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या काठावरील गावांना आणि शेतीला फटका बसला होता.  पूर अभ्यास समितीने सुचविल्यानुसार नागरी क्षेत्रात पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नदी-नाले पुनर्स्थापित करावेत, नदी, मोठे नाले यांचे रूंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, पूरसंरक्षक बांध घालणे आणि नदी सरळीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पूर क्षेत्रातील अतिक्रमणे काढणे, नदीच्या पाण्याला अडथळा येऊ नये यासाठी पूल, कॉजवे, छोटे बंधारे यांची तपासणी आणि बंधन घालणे, कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे बॅरेज बांधणे, पूरबाधितांचे कायस्वरूपी पुनर्वसन करणे, प्रवाहास असलेले अडथळे दूर करणे, तलाव, जलाशय, नैसर्गिक नाल्यांना जोडणेबाबत जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत 28 सप्टेंबर 2022 ला बैठक झाली, होती. त्यानुसार 3200 कोटी रूपयांच्या कामाचा प्रस्ताव आणि प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये 960 कोटी राज्य शासन तर 2240 कोटी जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होणार आहेत. वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून पूर कायमस्वरूपी दूर करण्यासाठी काम सुरू असल्याचे, श्री. कपूर यांनी सांगितले.

जागतिक बँकेचे भारतातील संचालक अॅगस्ते कौमे यांनी सांगितले की, हवामान बदलासंबंधी सर्व प्रकल्पांमध्ये जागतिक बँक महाराष्ट्रासोबत असेल,

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी कौशल्य विकास विभागाची माहिती दिली. राज्यात विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, आयटीआयला बळकटी देणे, यंत्रणा सक्षम करणे, क्षमता बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाचे नवनवीन प्रकल्प सुरु केल्याबद्दल श्री. अॅगस्ते यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.

कृर्षी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विभागाकडून  सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यापूर्वी जागतिक बँकेने चार हजार कोटी रूपये दिले होते. यापैकी विविध प्रकल्पांवर 91.37 टक्के खर्च झाला आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाला पूरक शेती पद्धतीचा अवलंब केला जाणार असून कार्बन ग्रहण वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे यावरही भर देण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबाबतचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या वाहतूक प्रकल्पाबाबत माहि