पुणे: महापालिकेतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग नाहक बदनाम करून सोडला जात असून आता राजकारण थांबवा एकच ठाम निर्णय घ्या कारवाई करायची कि नाही ? नसेल करायची तर हे दोन्ही विभागच बंद करून टाका आणि होऊ द्यात काय ते एकदाचे असा पवित्रा घेत आता मेटाकुटीला आलेले महापालिका अधिकारी आणि कर्मचारी थेट राज्य सरकारला आव्हान देण्याच्या मनस्थितीत बंद पुकारणार असल्याचे वृत्त आहे.
महिन्यापुर्वीचे व्हिडीओ आता का आणले जात आहेत , जुने व्हिडीओ दाखवून ,जुन्या कारवाया दाखवून नेमके कोण काय साधत आहे? कुठेही कारवाईला गेले कि विरोध आहेच ,वाद आहेच, राजकीय दबाव आहेच, पोलीस संरक्षणाचा प्रश्न आ वासून आहेच , अगदी मंत्र्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांची बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे आहेत . हि असताना सामान्य नागरिकांवर देखील कारवाई करायची आहे. या सर्व भावना उचंबळून येण्यास काही घटना अलीकडच्या दिवसात घडल्या आहेत .आज तर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कैलास स्मशाभूमीत ते आरटीओ कार्यालय परिसरात हा प्रकार घडला.अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई असताना मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे.जी- २० परिषदेच्या निमित्ताने शहरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. ढोले पाटील रस्त्यावर कारवाई सुरू असताना जमावाने कर्मचारी आणि अधिका-यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेच्या निषेधार्थ महापालिकेच्या हिरवळीवर बुधवारी निषेध सभा होणार असून काम बंद करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.