गुरगाव, १७ मे २०२३: उबरने आपला २०२३ सालचा लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स प्रकाशित केला. उबरमध्ये सर्वात जास्त विसरल्या जाणाऱ्या वस्तू, देशातील सर्वाधिक विसराळू शहरे तसेच उबर रायडर्सचा विसराळूपणा सर्वात जास्त प्रमाणात असतो ते दिवस आणि वेळा अशी तपशीलवार माहिती या इंडेक्समध्ये देण्यात आली आहे.
देशातील विसराळू शहरांच्या यादीत गेली दोन वर्षे पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबईला मागे टाकून यंदा दिल्लीचा विसराळूपणा वाढला आहे. या यादीत पहिल्या ४ स्थानांमध्ये पहिल्यांदा हैदराबादचा समावेश झाला आहे. २०१९ सालचे देशातील सर्वाधिक विसराळू शहर, बंगलोर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. उबरमध्ये आपली काही वस्तू राहून गेली तर ती परत मिळवण्याचा सहजसोपा उपाय उबर ऍपमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रायडर्सपर्यंत मजेशीर पद्धतीने पोहोचवणे हा उबरच्या लॉस्ट अँड फाउंड इंडेक्सचा उद्देश आहे.
गेल्या वर्षभरात फोन, बॅग्स, वॉलेट्स आणि कपडे या वस्तू भारतभरात उबरमध्ये सर्वात जास्त विसरल्या गेल्या. त्यापाठोपाठ पाण्याच्या बाटल्या, चाव्या आणि चष्मे व दागिने यासारख्या ऍक्सेसरीज देखील रायडर्स विसरले. झाडू, कॉलेजचे ऍडमिट कार्ड, लहान मुलांचा स्ट्रॉलर या गोष्टी देखील रायडर्स उबरमध्ये विसरतात. एक रायडर तर स्वतःची वॉकिंग स्टिक विसरले होते तर एक जण चक्क मोठा टीव्हीच उबरमध्ये विसरून गेले.
सेंट्रल ऑपरेशन्सचे डायरेक्टर श्री. नितिश भूषण म्हणाले, “महत्त्वाची, खूप जवळची, वैयक्तिक वस्तू विसरली हे लक्षात आले की भीती वाटणे, गोंधळ उडणे हे आपल्या सर्वांच्याच बाबतीत होते. पण उबरमध्ये तुम्ही सपोर्टशी संपर्क साधून तुमच्या वस्तू परत मिळवू शकता. उबरमध्ये एखादी वस्तू विसरली गेली तर ती परत मिळवण्याची विनंती ऍपमधूनच करण्याची सुविधा रायडर्सना उपलब्ध करवून देण्यात आली आहे याची आठवण करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी हा मजेशीर व माहितीपूर्ण सर्व्हे करत असतो. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवासाचे दिवस असल्याने रायडर्सना उबरमधील सेवासुविधांची आठवण करून देण्याची ही योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते.”
ठळक वैशिष्ट्ये:
- शनिवार हा सर्वात आळसाचा दिवस असावा कारण यादिवशी उबरमध्ये वस्तू विसरण्याचे प्रमाण जास्त असते.
- उबरमध्ये विसरल्या गेलेल्या आयफोन्सपेक्षा अँड्रॉइड फोन्सचे प्रमाण तीन पट जास्त आहे.
- उबरमध्ये विसरल्या गेलेल्या वस्तूंमध्ये लाल रंगाच्या वस्तूंचे प्रमाण जास्त आहे.
- संध्याकाळी लोकांचा विसराळूपणा वाढतो, वस्तू विसरण्याचे प्रमाण सायंकाळी ७ नंतर सर्वात जास्त आहे.
उबर लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स इंडिया २०२३ मधील माहितीमधील ठळक मुद्दे:
सर्वात जास्त विसरल्या गेलेल्या अनोख्या वस्तू
1. टीव्ही
2. वेस्टर्न कमोड
3. 3 दुधाची पॅकेट, आणि पडदे
4. झाडू
5. कॉलेज ऍडमिट कार्ड
6. चालताना आधारासाठी हातात धरण्याची काठी
7. इंडक्शन स्टोव्ह
8. कौटुंबिक फोटोंचा कोलाज
9. अवजड यंत्रसामग्री
10. प्रिंटेड दुपट्टा (स्कार्फ)
१० सर्वात जास्त विसरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य वस्तू
- फोन
- लॅपटॉप बॅग्स
- पैशाचे पाकीट
- कपडे
- हेडफोन्स
- पाण्याची बाटली
- चष्मा/सनग्लासेस
- चाव्या
- दागिने
- घड्याळ
देशातील पहिली चार सर्वाधिक विसराळू शहरे
- दिल्ली
- मुंबई
- हैदराबाद
- बंगलोर
विसराळूपणा सर्वात जास्त असतो असे वर्षातील टॉप तीन दिवस
- २६ मार्च
- ९ एप्रिल
- ८ एप्रिल
विसराळूपणा सर्वात जास्त असतो असे आठवड्यातील टॉप तीन दिवस
- शनिवार
- रविवार
- शुक्रवार
विसराळूपणा सर्वात जास्त असतो असा दिवसातील तीन वेळा
- सायंकाळी ७
- रात्री ८
- संध्याकाळी ६
या रंगांच्या वस्तू सर्वाधिक विसरल्या जातात, पहिले पाच रंग
- लाल
- निळा
- पिवळा
- गुलाब
- गुलाबी
उबरमध्ये या ब्रँड्सचे फोन सर्वात जास्त विसरले गेले
- सॅमसंग
- ऍपल
- वनप्लस
उबरमध्ये एखादी वस्तू राहिली तर ती परत मिळवण्यासाठी हे करा:
- “मेनू” चिन्हावर टॅप करा.
- “युअर ट्रिप्स” वर टॅप करा आणि ज्या ट्रीपमध्ये तुम्ही वस्तू विसरलात ती ट्रिप निवडा.
- “रिपोर्ट ऍन इश्यू विथ धिस ट्रिप” वर टॅप करा.
- “आय लॉस्ट ऍन आयटम” वर टॅप करा.
- “कॉन्टॅक्ट माय ड्रायव्हर अबाउट अ लॉस्ट आयटम” वर टॅप करा.
- खाली स्क्रोल करा आणि तुमच्याशी ज्यावर संपर्क साधता येईल तो फोन नंबर एंटर करा. “सबमिट”वर टॅप करा
- तुमचा फोन हरवला असल्यास, त्याऐवजी मित्राचा फोन नंबर एंटर करा.
- तुमच्या फोनवर रिंग वाजेल आणि तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरच्या मोबाईल नंबरशी थेट कनेक्ट करेल.
- जर ड्रायव्हरने फोन उचलला आणि तुमची वस्तू राहिली आहे याची खात्री केली तर ती वस्तू परत मिळवण्यासाठी सोयीचे ठिकाण व वेळ ठरवा.
- जर तुम्ही ड्रायव्हरशी कनेक्ट होऊ शकत नसाल तर, नुकसानाची तक्रार करण्यासाठी ‘इन-अॅप सपोर्ट’ वापरा आणि उबर सपोर्ट टीम तुम्हाला मदत करेल.